(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

माहितीसाठ्याचे इंटेलिजंट खोदकाम

विक्री, विपणन, संशोधन, ग्राहकसेवा आदी मार्गातून, उद्योग, कॉर्पोरेट, व्यावसायिक संस्था, अनेक प्रकारची व्यामिश्र माहिती गोळा करत असते. विशिष्ट कालावधीनंतर, या माहितीचा प्रचंड साठा गोळा होतो. साठलेल्या या माहितीचे विश्लेषण केल्यानंतर, संस्था किंवा कार्पोरेट हाऊसेस  यांना, भविष्यात येणाऱ्या अडचणी, समस्या, प्रश्न याची कल्पना येते. कोणत्या क्षेत्रात तत्काळ सुधारणा करण्याची आवशक्यता आहे, हे कळते. कंपनीच्या महसुलात वाढ करण्यासाठी या विश्लेषणाचा उपयोग होतो.

सध्या () बँकिंग, () टेलिकम्युनिकेशन, () आऊटसोर्सिंग, () सोशल मीडिया, () फायनांशिअल सर्व्हिसेस, () मॅन्युफॅक्चुरिंग, () हेल्थकेअर, () ट्रॅव्हल, () एनर्जी, (१०) ई-गव्हर्नन्स आणि (११) ई-कॉमर्स या क्षेत्रात, बिझिनेस अनॅलिटिक्स क्षेत्रातील तज्ज्ञ मनुष्यबळाची सेवा मोठया प्रमाणावर घेतली जाते.

भारतात, या ज्ञानशाखेतील मनुष्यबळाची मागणी मोठया प्रमाणावर वाढली आहे. मात्र, सध्या तरी या क्षेत्रात पुरेशा प्रमाणात असे प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध नाही. () बिग डाटा (गोळा होणाऱ्या विविध प्रकारच्या माहितीचा साठा), () ॲनॅलिटिक्स (साठलेल्या माहितीचे सांख्यिकीय निष्कर्ष काढणे किंवा विश्लेषण करणे), () प्रॉबेबिलिटी (संभाव्यता), () मॅनेजिंग ॲबिलिटी (व्यवस्थापकीय कौशल्य), () बिझिनेस अंडरस्टँडिंग (व्यवसायाची सूक्ष्म जाणीव), () मेंटनिंग रिसोर्सेस (संसाधनाची देखभाल) हे विषय हाताळणाऱ्या उच्चप्रशिक्षित मनुष्यबळाची कमतरता आढळून येते.

बिझिनेस ॲनॅलिटक्स तंत्र आणि प्रणालीद्वारे, निर्णय क्षमतेसाठी आवश्यक ठरणाऱ्या विश्लेषणात्मक, कार्यात्मक आणि तांत्रिक कौशल्यात वाढ करणे शक्य होऊ शकते. मॅकन्सी, मॉर्गन स्टॅनले, मायक्रोसॉफ्ट, टाटा समूह ,गुगल, फेसबुक, लिंक्डइन, अमेरिकन एक्सप्रेस, डिलॉइट, ॲक्सेंच्युर, लार्सन ॲण्ड टयुब्रो अशासारख्या सर्वच मोठ्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये या मनुष्यबळाची भरती केली जात आहे.

करिअर संधी

या मनुष्यबळास () डाटा अनॅलिटिक्स, () फंक्शनल मॅनेजर्स (वित्त/ मनुष्य बळ/ विपणन/ वित्त/ कार्यान्वयन इत्यादी), () बिझिनेस ॲनॅलिस्ट प्रोजेक्ट मॅनेजर, () बिझिनेस इंटेलिजन्स एक्सपर्ट, () बिझिनेस ॲनॅलिटिक्स कन्सलटंट, () डाटा अनॅलिस्ट, () बिगडाटा अनॅलिस्ट, () डाटा अनॅलिटिक्स प्रोग्रॅमर, () डाटा मायनिंग एक्सपर्ट , (१०) डाटा वेअरहाऊस एक्सपर्ट, (११) प्रेडिक्टिव्ह मॉडेलर , (१२) क्वालिटेटिव्ह अनॅलिस्ट, अशा पदांवर कार्य करण्याची संधी मिळू शकते.

डाटा मायनिंग

डाटा मायनिंग म्हणजेच माहितीचे उत्खनन करुन, बँका त्यांना भेडसावू शकणाऱ्या संभाव्य समस्या जाणून घेऊ शकतात, त्यादृष्टिने त्यांना खबरदारीचे उपाय शोधणेसुध्दा सुलभ जाते. क्रेडिट कार्ड कंपन्यांना, फसवणूक करणाऱ्या घटक/ व्यक्ती/ कार्यप्रणाली अंदाज बांधणे शक्य होत आहे.

अभ्यासक्रम आणि संस्था

(१) पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन बिझिनेस ॲनिलिटिक्स– हा आपल्या देशातील सर्वोत्कृष्ठ आणि वैशिष्ट्यपूर्ण अभ्यासक्रम आहे. हा अभ्यासक्रम देशातील तीन दर्जेदार संस्थांनी एकत्रितरित्या सुरु केला आहे. या तीन संस्था आहेत- (१) इंडियन इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, कोलकाता (आयआयएम), (२) इंडियन इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, खरगपूर (आयआयटी) आणि (३) इंडियन स्टॅटिस्टिकल इंस्टिट्यूट कोलकाता (आयएसआय).

बिझिनेस ॲनॅलिटिक्स, क्षेत्रातील जागतिक पातळीवरील सर्वोत्कृष्ट मनुष्यबळाची निर्मिती करण्याच्या उद्दिष्ट्यपूर्तीसाठी, या तीन श्रेष्ठ संस्था एकत्र आल्या आहेत. हा अभ्यासक्रम केलेल्या विद्यार्थ्यांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध स्वरुपाच्या करिअर संधी सुलभतेने मिळाल्या आहेत. गणितीय विश्लेषणात गती व रस असणाऱ्या आणि आव्हानात्मक व्यावसायिक समस्यांना सोडवू इच्छिणाऱ्या तरुण- तरुणींसाठी हा अभ्यासक्रम, उत्कृष्ट करिअर घडवण्याचा उत्तम पर्याय ठरु शकतो. हा अभ्यासक्रम, या तीनही संस्थांमध्ये अनुभवी प्राध्यापक शिकवतात. वेगवेगळया कंपन्यांमध्ये, प्रात्यक्षिकाची सुविधा उपलब्ध करुन दिली जाते. अभ्यासक्रमाच्या कालावधित, सातत्याने या क्षेत्रातील, व्यावसायिकांशी संवाद घडवून आणला जातो. या अभ्यासक्रमाला प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना, प्रत्येकी सहा महिने तिनही संस्थांमध्ये अभ्यास करावा लागतो. (अ) आयआएम कोलकता येथे व्यवस्थापनाच्या कार्यात्मक क्षेत्रात, ॲनलिटिक्स तंत्राचा वापर, (ब) आयएसआय कोलकता येथे, ॲनलिटिक्ससाठी आवश्यक असणारे सांख्यिकी आणि मशिन लर्निंग तंत्रकौशल्य, (क) आयआयटी  कानपूर येथे ॲनलिटिक्सच्या विविध तंत्रज्ञानात्मक पैलूचे ज्ञान प्रदान केले जाते.

या अभ्यासक्रमाचा कालावधी दोन वर्षांचा आहे. यामध्ये प्रतिष्ठित व्यावसायिक संस्थेतील, सहा महिन्याच्या इंटर्नशीपचा समावेश आहे. या अभ्यासक्रमाची पदव्युत्तर पदविका प्रमाणपत्र तिनही संस्था एकत्रितरित्या देतात. हा अभ्यासक्रम करणाऱ्या विद्यार्थ्यांना आयआयएम, आयआयटी आणि आयएसआय या तिनही संस्थांच्या प्लेसमेंट प्रक्रियेत संधी दिली जाते.

अशी असते परीक्षा-

या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी, सीबीटी (कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट) घेतली जाते. या परीक्षेत १५० गुणांचे ५० प्रश्न विचारले जातात. हे प्रश्न बहुपर्यायी (मल्टिपल चॉइस) पध्दतीचे असतात. प्रत्येक प्रश्नाचे फक्त एकच अचुक उत्तर असते. अचुक उत्तराला ३ गुण दिले जातात. चुकलेल्या उत्तरासाठी एका गुणाची कपात केली जाते. या पेपरमध्ये- (१) भाषिक आणि शाब्दिक क्षमतेचे (व्हर्बल ॲबिलिटी) १५ प्रश्न, (२) तार्किक कारणमीमांसा (लॉजिकल रिझनिंग) ५ प्रश्न, (३) माहिती विश्लेषण (डाटा इंटरप्रिटेशन आणि डाटा व्हिज्युलायझेशन) १५ प्रश्न (४) संख्यात्मक कल (क्वांटिटेटिव्ह ॲबिलिटी) – २५ प्रश्न विचारले जातात.

या परीक्षेतील गुणांच्या आधारे उमेदवारांना मुलाखतीसाठी पाचारण केले जाते. त्यानंतर विद्यार्थ्यांची अंतिम निवड केली जाते.

अर्हता- या अभ्यासक्रमासाठी पुढील अर्हताप्रापत विद्यार्थी पात्र ठरतात- (१) बीई/ बीटेक/ एम कॉम/ एम.एस्सी किंवा (२) ज्या विद्यार्थ्यांनी ३ वर्षे कालावधीची अभियांत्रिकी पदविका करुन बीई/बीटेक अभ्यासक्रम पूर्ण केला असेल किंवा अभियांत्रिकी पदविकेनंतर चार वर्षे कालावधीचा बीएस्सी अभ्यासक्रम केला असेल, तेसुध्दा अभ्यासक्रमासाठी पात्र ठरतात, किंवा या सोबत चार्टर्ड अकाउंटंट परीक्षा /कंपनी सेक्रेटरी परीक्षा उत्तीर्ण झालेले विद्यार्थीही पात्र ठरतात. या सर्व अभ्यासक्रमांमध्ये खुल्या संवर्गातील विद्यार्थ्यांना ६० टक्के आणि अनुसूचित जाती आणि जमाती संवर्गातील विद्यार्थ्यांना ५५ टक्के गुण मिळायला हवेत.

संपर्क- https://www.iimcal.ac.in/programs/pgdba, ईमेल-pgdbaadmissions@iimcal.ac.in, दूरध्वनी- ०३३-७१२११२०३

(२) एमबीए-बिझिनेस ॲनॅलिटिक्स

इंडियन इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, काशिपूर मधील बिझिनेस ॲनॅलिटिक्स, अभ्यासक्रमाची संरचना ही विद्यार्थ्यांना, सध्याच्या व्यावसायिक पर्यावरणात, व्यामिश्र स्वरुपाच्या माहितीसाठ्याचे विश्लेषण करुन, सुयोग्य निर्णय घेणे शक्य व्हावे, याअनुषंगाने करण्यात आली आहे. या अभ्यासक्रमात विविध व्यवस्थापकीय कौशल्य आणि ॲनॅलिटिक्सच्या तंत्राचा सुयोग्य समन्‍वय साधण्यात आला आहे. ॲॅनलिटिकल तंत्रकौशल्य, व्यवस्थापन कौशल्य, संवादकौशल्य या तीन घटकांनी, भविष्यातील व्यावसायिक नेतृत्वाचा विकास, या अभ्यासक्रमाव्दारे होणे अपेक्षित आहे. डाटा ॲनॅलिटिक्सच्या तंत्रकौशल्यामुळे, या विद्यार्थ्यांना उद्योग व्यवसायाच्या अधिक प्रगतिसाठी व्युहनीती विकसित करणे आणि त्यानुसार अचुक निर्णय घेणे शक्य होते. या अभ्यासक्रमामध्ये अनुभवासाठी इंटर्नशीपची सुविधा उपलब्ध करुन दिली जाते.

या अभ्यासक्रमाचा कालावधी दोन वर्षे. अर्हता- कोणत्याही शाखेतील पदवी- खुला संवर्ग- ५० टक्के, राखीव संवर्ग- ४५ टक्के. प्रारंभिक चाळणीसाठी कॅट परीक्षेचे गुण ग्राह्य धरले जातात. संपर्क- https://iimkashipur.ac.in

    इंडियन इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट बेंगळुरुनेसुध्दा एमबीए इन बिझिनेस ॲनिलिटिक्स हा अभ्यासक्रम सुरु केला आहे. कालावधी दोन वर्षे. अर्हता- कोणत्याही विषयातील ६० टक्के गुणांसह पदवी (खुला संवर्ग), ५५ टक्के (राखीव संवर्ग). या अभ्यासक्रमाच्या प्रारंभिक चाळणीसाठी कॉमन एन्ट्रन्स टेस्ट (कॅट) परीक्षेतील गुण ग्राह्य धरले जातात. संपर्क- ttps://www.iimb.ac.in

(३) पोस्ट ग्रॅज्युएट सर्टिफिकेट कोर्स इन बिझिनेस ॲनॅलिटिक्स- हा अभ्यासक्रम, इंडियन इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट तिरुचिरापल्लीने, सुरु केला आहे. या अभ्यासक्रमाचा कालावधी तेरा महिने. अर्हता- कोणत्याही विषयातील ५० टक्के गुणांसह पदवी (खुला संवर्ग), ४५ टक्के (राखीव संवर्ग).

या अभ्यासक्रमात, ऑपरेशन रिसर्च फॉर बिझिनेस, डाटा सायंस युझिंग पॉयथॉन, डाटा कलेक्शन, व्हिज्युलायझेन ॲण्ड स्टोरीटेलिंग वुइथ डाटा, प्रेडिक्टिवह मॉडेलिंग, डाटा मायनिंग, बिझिनेस इंटेलिजन्स ॲण्ड ॲनॅलिटिक्स, रिस्क ॲनॅलिटिक्स, फायनांशिअल ॲनलिटिक्स, फायनांशिअल ॲनॅलिटिक्स, पिपल ॲनॅलिटिक्स, आर्टिफिशिअल इंटेलिजन्स ॲण्ड मशिन लर्निंग, मार्केटिंग ॲनॅलिटिक्स, ऑपरेशन ॲण्ड सप्लाय चेन ॲनॅलिटिक्स आदी विषयघटकांचा समावेश आहे. हा अभ्यासक्रम सध्या कार्यरत असणाऱ्या व्यावसायिकांना उपयुक्त ठरु शकतो.

संपर्क- https://www.iimtrichy.ac.in

सुरेश वांदिले