(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

 

 मिलिटरी स्कूल () 

राष्ट्रीय मिलिटरी स्कूलमध्ये सीबीएसई (सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन) ने निर्धारित केलेला अभ्यासक्रम शिकवला जातो. १२वी नंतरच्या वेगवेगळया स्पर्धा परीक्षा, प्रवेश परीक्षा आणि चाळणी परीक्षांसाठी हा अभ्यासक्रम उपयुक्त ठरतो. त्यामुळे मिलिटरी स्कूलमधील विद्यार्थ्यांना नॅशनल डिफेन्स ॲकॅडमीमधील निवड सुलभ जाते. याशिवाय लष्करातील वेगवेगळया पदांच्या भरतीच्या दृष्टिने हा अभ्यासक्रम उपयुक्त ठरतो. याठिकाणी ऑल इंडिया सिनिअर स्कूल सर्टिफिकेट परीक्षा आणि लष्कर भरतीच्या परीक्षांसाठी विद्यार्थ्यांची तयारी करुन दिली जाते. अभ्यासक्रम हिंदी आणि इंग्रजीमधून शिकवला जातो. विद्यार्थ्यांचे सातत्यपूर्ण आणि सर्वसमावेशक मूल्यमापन केले जाते. यामुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण व्यक्तिमत्व विकास होतो. हा निवासी अभ्यासक्रम आहे.

या मिलिटरी स्कूल्स बेंगळुरु, बेळगाव (कर्नाटक), अजमेर, धोलपूर (राजस्थान) आणि छैल (हिमाचल प्रदेश) येथे आहेत. याशाळांची प्रशासकीय जबाबदारी डायरेक्टोरेट जनरल ऑफ मिलिटरी ट्रेनिंग यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. या शाळांच्या केंद्रीय प्रशासन मंडळाचे प्रमुख संरक्षण खात्याचे सचिव असतात.

११ वीतील प्रवेश

मिलिटरी स्कूलमध्ये ११ व्या वर्गातील प्रवेशासाठी दहावीतील गुणांचा आधार घेतला जातो. वर्ग ९ आणि वर्ग १० मधील प्रवेश हा उपलब्ध जागांनुसार केला जातो. वसतिगृहात राहणाऱ्या मुलांसाठीच हा प्रवेश मर्यादित आहे.

राखीव जागा

() ७० टक्के जागा या भूदल, नौदल आणि वायूदलातील ज्युनियर कमिशन्ड ऑफिसर्स किंवा अदर रँक्स यांच्या पाल्यांसाठी राखीव असतात. यामध्ये निवृत्त अधिकाऱ्यांच्या पाल्यांचाही समावेश आहे. प्रत्येक संवर्गामध्ये १५ टक्के जागा अनुसूचित जाती आणि ७.५ टक्के जागा अनुसूचित जमातीसाठी राखीव ठेवण्यात येतात.

() ३० टक्के जागा भूदल, नौदल आणि वायूदलातील अधिकारी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या पाल्यांसाठी राखीव ठेवण्यात येतात. यामध्ये निवृत्त लष्करी अधिकाऱ्यांच्या पाल्यांचाही समावेश आहे. () कर्तव्य बजावत असताना शहीद झालेल्या सैनिकांच्या पाल्यांसाठी ५० जागा राखीव ठेवण्यात येतात.  

अंतिम निवड

विशिष्ट गुण प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना  वैद्यकीय चाळणी परीक्षसाठी निवडले जाते. या परीक्षेत उत्तीर्ण झाल्यावरच अंतिम निवड केली जाते. ही वैद्यकीय चाचणी लष्कराच्या अखत्यारितील रुग्णालयातूनच करावी लागते.

हा निकाल आर्मी इंट्रानेट होम पेजवर  आणि (१) www.indianarmy.nic.in, () www.rashtriyamilitaryschools.in या संकेतस्थळांवर घोषित केला जातो.

प्रवेश परीक्षा उत्तीर्ण झाल्यावरच मूळ प्रमाणपत्रे तपासली जातात. त्यात काही त्रुटी आढळल्यास प्रवेश नाकारला जाऊ शकतो.

  

 

संपर्क-

() राष्ट्रीय मिलिटरी स्कूल ऑफ इंडिया छैल, सिमला हिल्स, हिमाचल प्रदेश- १७३२१२, दूरध्वनी- ०१७९२२४८३२६, ईमेल- chail@rashtriyamilitaryschools.in

() राष्ट्रीय मिलिटरी स्कूल ऑफ इंडिया, अजमेर राजस्थान, ३०५००१, दूरध्वनी- ०१४५२६२४१०५, ईमेल- ajmer@rashtriyamilitaryschools.in

() राष्ट्रीय मिलिटरी स्कूल ऑफ इंडिया बेळगाव, कर्नाटक-५९०००९, दूरध्वनी- ०८३१२४०७५२४०, ईमेल- princirmsbgm@gmail.com

() राष्ट्रीय मिलिटरी स्कूल ऑफ इंडिया, पोस्ट बॉक्स-२५०४० म्युझियम रोड, बेंगळुरु कर्नाटक- ५६००२५, दूरध्वनी- ०८०-२५५४९७२,फॅक्स-२५३०८१९१ संकेतस्थळ- http://www.rashtriyamilitaryschools.in, ईमेल- rmsbengaluru@gmail.com

  () राष्ट्रीय मिलिटरी स्कूल ऑफ इंडिया, धोलपूर, राजस्थान- ३२८०२८, दूरध्वनी-०५६४२-२२०७४९, ईमेल- principalrmsd@gmail.com

०००

 नेव्ही बॉईज स्पोर्ट्स कंपनी

नौदलाच्या क्रीडाशाखेतील नेव्ही बॉईज स्पोर्ट्स कंपनीमध्ये उद्योन्मुख तरुण क्रीडापटुंना शिक्षणाची संधी दिली जाते. या योजनेसाठी पात्र होण्यासाठी संबंधित उमेदवार आंतरराष्ट्रीय किंवा राष्ट्रीय स्तरावरील कनिष्ठ क्रीडा स्पर्धेत यॅचिंग (नौकायन) किंवा सेलिंग (नौका विहार) या क्रीडाप्रकारात सहभागी झालेला असावा. या योजनेतंर्गत मर्यादित जागा उपलब्ध असल्याने पदक विजेता वा ‍जिल्हा/ राज्य/ राष्ट्रीय स्तरावर प्रमाणपत्र प्राप्त उमेदवारांचा प्राधान्याने विचार केला जातो. संबंधित उमदेवाराने किमान पाचवी उत्तीर्ण केले असावे. इंग्रजी आणि हिंदी या दोन भाषा अवगत असाव्यात. संबंधित उमेदवाराचे वय १२ ते १५ वर्षे असावे.

मोफत शिक्षण

या योजनेंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना ६ वी ते १० वीपर्यंतचे इंग्रजी माध्यमातील शिक्षण केवी मांडवी येथे मोफत दिले जाते. यासोबत त्यांना यॅचिंग आणि सेलिंग या क्रीडाप्रकारातील उच्चदर्जाचे प्रशिक्षण, राष्ट्रीय क्रीडा प्राधिकरण अथवा नौदलातील नामवंत प्रशिक्षकांकडून दिले जाते. १० उत्तीर्ण झाल्यावर या उमेदवारांची नौदलात भरती केली जाते.

प्रशिक्षणाच्या काळात समाधानकारक प्रगती नसलेल्या आणि या क्रीडा कौशल्यात ठरविलेल्या निकषापर्यंत प्रगती न केलेल्या किंवा वैद्यकीय /शारीरिकदृष्ट्या अपात्र असलेल्या उमेदवारांना प्रशिक्षणातून बाहेर काढले जाते. तसेच खोटी माहिती देणाऱ्या किंवा प्रमाणपत्रे सादर करणाऱ्या उमेदवारांनासुध्दा प्रशिक्षणातून बाद केले जाते. आतापर्यंत या प्रशिक्षणावर झालेला खर्च संबंधित उमेदवाराच्या पालकाकडून वसूल केला जातो.

निवड प्रक्रिया- उमेदवारांची प्रारंभिक निवड सेलिंग क्रीडाप्रकारातील त्याच्या उच्च प्रतिच्या कामगिरीवर आधारित केली जाते. निवड प्रकिया तीन दिवस चालते. त्याचवेळी मूळ प्रमाणपत्र सादर करावे लागतात. या निवडप्रक्रियेचा एक भाग वैद्यकीय चाळणी/परीक्षा आहे. यामध्ये उमेदवार पात्र ठरल्यास अंतिम निवड यादी तयार केली जाते. वैद्यकीयदृष्ट्या तात्पुरते अपात्र ठरलेल्या उमेदवारास २१ दिवसाच्या कालावधित पुनर्विलोकनाची संधी दिली जाते. हा उमेदवार लष्कराच्या निवडक रुग्णालयात वैद्यकीय चाचणी करु शकतो.

अर्हतेसाठी आवश्यक बाबी- ()वयोमर्यादा- किमान १२ कमाल १५ वर्षे, ()ह्रदयाशी संबंधित कोणतीही व्याधी/ तक्रार नसावी, () कानाचे विकार नसावे, ()फिट्सचा आजार नसावा, ()कोणताही मनोविकार नसावा, ()दृष्टीसाठी शस्त्रक्रिया केलेली नसावी, () पाय किंवा गुडघ्यावरील शस्त्रक्रियेमुळे डिफॉर्मिटी (शारीरिक दोष/व्यंग) निर्माण झालेली नसावी, ()शरीराच्या कोणत्याही भागावर कायमस्वरुपी टॅटू नसावेत.

संपर्क- द सेक्रेटरी, इंडियन नॅव्हॅल सेलिंग असोशिएशन, सेव्हन्थ फ्लोअर, चाणक्य भवन, इंटिग्रेटेड हेडक्वार्टर्स, मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स, नवी दिल्ली-११००२१, दूरध्वनी-०११-२६११०८४२

०००

शिष्यवृत्ती

() प्रेसिडेंट एपिजे अब्दूल कलाम पोस्ट ग्रॅज्यएट फेलोश

  भारताचे माजी राष्ट्रपती आणि शास्त्रज्ञ भारतरत्न डॉ.एपिजे अब्दुल कलाम यांनी त्यांच्या राष्ट्रपती पदाच्या काळात युनिव्हर्सिटी ऑफ साऊथ फ्लोरिडाला भेट दिली होती. त्यांची असामान्य बुध्दीमत्ता आणि ज्ञान यांच्या सन्मानार्थ या विद्यापीठाने भारतीय विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती सुरु केली आहे. पुढील विषयांमध्ये पीएचडी करण्यासाठी ही शिष्यवृत्ती दिली जाते. यामध्ये प्लाइड अँथ्रॉपॉलॉजी, प्लाइड  फिजिक्स, सेल बॉयलॉजी,मायक्रोबॉयलॉजी, मॉलेक्युलर बॉयलॉजी, केमिस्ट्री, कॉम्प्युटर सायन्स ॲण्ड इंजिनीअरिंग, क्रिमिनॉलॉजी, इंटिग्रेटिव्ह बॉयलॉजी, मरिन सायन्स आणि सायकॉलॉजी, बिझिनेस या विषयांचा समावेश आहे.अर्हताभारतातील कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठातून पदवी.संबंधित उमेदवाराने या विद्यापीठामध्ये प्रवेश घेतलेला असावा. या शिष्यवृत्तीसाठी निवड झाल्यास किमान चार वर्षांसाठी शिकवणी शुल्क माफ केल जाते. तसेच विद्यार्थ्यांना २२ हजार अमेरिकन डॉलर्सचे विद्यावेतन दिले जाते. संपर्कईमेल- kalamfellowship@usf.edu संकेतस्थळ- http://www.usf.edu

000

() नरोत्तम सेखसारिया स्कॉलरशीप

    नरोत्तम सेखसारिया स्कॉलरशीप फाउंडेशन मार्फत व्याजमुक्त शिष्यवृत्ती (लोन स्कॉलरशीप)योजना राबवली जाते. सामाजिक शास्त्रे, उपयोजित शास्त्रे, विज्ञान, विधी, स्थापत्यकला, व्यवस्थापन या विषयांमध्ये पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम करु इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती मिळू शकते. अशा विद्यार्थ्यांना देश आणि परदेशातील नामवंत विद्यापीठांमध्ये अभ्यासक्रमांसाठी प्रवेश मिळालेला असावा. पदवीप्राप्त उमेदवार किंवा पदवी परीक्षेच्या अंतिम वर्षाला असलेले उमेदवार या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करु शकतात. वयोमर्यादा३० वर्षे.

या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करताना १० वी, १२ वी , पदवी अभ्यासक्रमाच्या सर्व सत्रांचे गुणपत्रक, पदवी प्रमाणपत्र, जीआरई (ग्रॅज्युएट रेकॉर्ड एक्झामिनेशन) किंवा कॅट (कॉमन ॲडमिशन टेस्ट) किंवा जीमॅट (ग्रॅज्युएट मॅनेजमेंट ॲप्टिट्यूड टेस्ट)  किंवा गेट (ग्रज्युएट ॲप्टिट्यूड टेस्ट इन इंजिनीअरिंग) परीक्षेचे गुणपत्रक, परदेशातील ज्या शिक्षणसंस्थेत प्रवेश मिळाला असेल त्या संस्थेचे पत्र, पासपोर्ट (पारपत्र) ची साक्षांकित प्रत, बंद केलेल्या लिफाफ्यात संदर्भ पत्र, अभ्यासक्रमाच्या शुल्काची माहिती, पासपोर्ट आकाराचे छायाचित्र, पालकांचे आयकर भरल्याची माहिती, ही कागदपत्रे सादर करावी लागते.

संपर्क नरोत्तम शेखसारिया फांऊडेशन,पहिला माळा,निर्मल बिल्डिंग ,नरिमन पाईंट, मुंबई 400021, संकेतस्थळ – http://pg.nsfoundation.co.in/

सुरेश वांदिले