मूर्ख कोण?
बऱ्याच दिवसांनी गाढवोबास निवांत मिळाला. त्यामुळे आज जरा वननगरित फेरफटका मारुन यावा, असं त्याला वाटलं. इकडेतिकडे बघत, वाटेतील गवत, पालापाचोळा खात, आणि उन्ह खात गाढवोबा रमत गमत जात असताना तलावाजवळील झाडाखाली माकडोबा, डोक्याला हात लावून बसल्याचे त्यांना दिसले. डोळे लावून ध्यानस्थच असल्यासारखे वाटत होते माकडोबा. कसल्यातरी विचारात होते ते.
माकडोबांना बघताच गाढवोबास आनंद झाला. त्याच्यासोबत गप्पा-टप्पा करु, झाडावरची फळं खायला मागू, या विचाराने गाढवोबा मोहरुन गेला.
डोळे मिटून बसलेल्या माकडोबाचे लक्ष वेधण्यासाठी आता माकडोबास हाक मारुन बालावावं की लाथ आपटून त्याची समाधी भंग करावी असा प्रश्न गाढवोबास पडला. या प्रश्नाच्या उत्तरात काहीतरी कृती करणार इतक्यात गाढवोबाकडे माकडोबाचेच लक्ष गेलं.
माकडोबाने गाढवोबाकडे बघितलं. गाढवोबानं माकडोबाकडे बघितलं.
अरे, तू खरोखरचाच माकडोबा आहेस ना..गाढवोबाने त्याला विचारलं.
तुझ्या मनात असा विचार कां बर आला गाढवोबा, माकडोबानं विचारलं.
तू इथे स्वस्थपणे डोक्यावर हात ठेऊन विचारमग्न झाल्याचं मी बघितलं ना..उड्या मारणं,चित्रविचित्र चाळे करणं,दात वेंगाडणं असं करायचं सोडून हे असं तुझं भलतच दर्शन झालय, म्हणून मला जरा शंका आली रे…
बरं बाबा..तू कां बरं आलास इथं.. माकडोबानं गाढवोबास विचारलं.गाढवोबा माकडोबाजवळ येऊन निवांत बसला.दोन तिनदा माकडोबाने वर आभाळाकडे बघितलं. तीनचार वेळा आजूबाजूला बघितलं, आणि तो गाढवोबास हळूच म्हणाला,
गाढवोबा, आपण दोघेही मूर्ख आहोत कां रे..नाही म्हणजे, काहीही उलट सुलट घडलं की, माकडासारखा करु नकोस नाही तर गधडया, तुला काही जमतच नाही,असं मुलांना आपणा दोघांची नाव घेऊन रागवतात सर्वजण..
मग रागावू दे की..रागावतील त्यांचे दात दिसतील..गाढवोबा म्हणाला.
म्हणजे तुला यात काही गैर वाटत नाही..अरे गाढवोबा,उपहास असतो त्यात. आपण बावळट, मूर्ख ,एैदी आणि बिनकामाचे असणे यासाठी आपल्या दोघांच्या प्रतिकांचा सर्रास वापर केला जातो…
करु दे ना रे..आपल्या बापाचं काय जातय..
पण, आपला तर पाणउतारा होतो ना…
यात कसला आलाय पाणउतारा..
म्हणजे तुला माझं म्हणणं मान्य नाही तर..
नाही बाँ..
मूर्ख आहेस तू..माकडोबा गाढवोबास बोलण्याच्या ओघात बोलून गेला..
हे दोघे वाद घालत असताना,तिथे हळूवार पावलाने दोन अस्वल आले होते. संधी साधून या दोघांवर हल्ला करायचा असं त्यांनी ठरवलं. झुडूपात काहीतरी सळसळ होतेय हे गाढवोबाच्या लक्षात आलं.
तो हळूच माकडोबाच्या कानाला लागून म्हणाला..
शत्रू आलाय..झाडावर पळ..मी धूम पळतो…
अरे मुर्खा..कोण शत्रू, कसला शत्रू..काही सांगू नकोस…माकडोबा जोराने म्हणाला…
माकडोबा ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याचं गाढवोबानं ताडलं. त्याच्यासोबत आपलाही जीव धोक्यात येईल असं त्याला वाटून तो ताडकन उभा ठाकला. त्याने जोराने त्याने पळ काढला…माकड मात्र तसेच खाली बसून राहिले..मूर्ख गाढव कुठला, पळणाऱ्या गाढवोबाकडे बघत तो म्हणाला…
दोन्ही अस्वलांनी ताडले की हीच ती संधी, माकडोबावर हल्ला करण्यासाठी. त्यातील एक अस्वल हळूवार पावलाने माकडापर्यंत चालत आले नि त्याला काही कळण्याच्या आत त्याने त्याच्यावर झडप घातली..
दुसरे अस्वलही तिथे आले होते.
ते माकडोबास म्हणाले,अरे तो पळून गेलेला गाढव मूर्ख नाही,तू खरा मूर्ख..
नको त्या गोष्टिंचा विचार केला ना की असच होतं…पहिले अस्वल म्हणाले..
आपण गाढवोबाचं ऐकलं असतं तर या संकटात सापडलो नसतो…खऱ्याखोट्या पानउताऱ्यापेक्षा जीव महत्वाचा…हे आपल्या लक्षात आलं नाही…माकडोबा स्वत:लाच म्हणाला…पण आता त्याचा काही उपयोग नव्हता..
दोन्ही अस्वलांनी माकडोबावर यथेच्छ ताव मारला……
सुरेश वांदिले

%20MON.jpg)
.jpg)