(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

 

 

मूर्ख ससा

सशाच्या कोणत्यातरीपूर्वजाने म्हणे सिंह महाराजांनायुक्तिने चित केलं होतं. ही कथा या पिढीपासूनपुढच्या पिढीपर्यंत सशाच्याकुटुंबात सांगितली जायची.

खूप खूपवर्षापूर्वी, सध्याच्या सिंह महारांजाच्यापणजोबांचे पंजोबा खूप दुष्टहोते. वननगरीत त्यांची फारदहशत होती. त्यांच्या मनातआले की, ते कुणालाहीमहाली बोलवत नि त्याचाफडशा पाडत. त्यामुळे सगळेनागरिक त्रस्त झाले होते. या दुष्ट महाराजांना कसेवठणीवर आणायचं नि त्यांचाकसा बंदोबस्त करायचा हेकुणालाच कळेना.

अशा दहशतीखालीवननगरीचं जीवन किती दिवसचालायचं, असा प्रत्येकाला प्रश्नपडायचा. पण कुणीही काहीचकरु शकत नव्हतं. आलादिवस कसा तरी पुढंढकलणं हेच प्रत्येकजण करुलागला.

मात्र एकेदिवशी सध्याच्या ससोबाच्या पणजोबाच्यापणजोबास वाटलं की आपणकाही तरी केलं पाहिजे. सिंह महाराजांना धडाशिकवला पाहिजे. तसं त्यानेआपल्या बाबांना सांगितलं. मित्रांनासांगितलं. हत्तीरावांनाही सांगितलं. बाबा घाबरले. मित्र हसले.

हत्तीराव म्हणाले, ससोबा कशाला जीव धोक्यात घालता स्वत:चा. आगीची परीक्षा घेऊ नये म्हणतात.

पण ससोबानं कुणाचंऐकलं नाही. तो हिम्मतकरुन महाराजांच्या समोरउभा ठाकला. महाराजांना म्हणाला तुमच्यापेक्षा श्रेष्ठ आणि शक्तिमान प्राणी आपल्या वननगरीत आल्याचं मी बघितलंय महाराज. त्याला आपण हाकलून दिलं नाही तर तो एके दिवशी आपलं राज्यच हिसकावून बसेल.

ससोबाचं बोलणंऐकताच सिंह महाराजांनी मोठीगर्जना केली. या गर्जनेनंजंगल घाबरलं. ते ससोबासम्हणाले,

सशा, कुठे आहे तो माझ्यापेक्षा मोठा श्रेष्ठ प्राणी. तू जर तो प्राणी दाखवू शकला नाहीस, तर मात्र आज तूच माझी मेजवाणी.

महाराज, हे मला ठाऊक नाही का? तुमच्याशी मी कसा असत्य बोलेन. तुम्ही चला माझ्यासोबत मी दाखवतो तुम्हाला तो प्राणी.

पुढची गोष्टसाऱ्यानांच ठाऊक आहे. ससोबानेसिंह महाराजांना एकामोठया विहिरीजवळ नेलं. त्यातत्यांना बघायला लावलं. सिहमहाराजांना त्यांचं प्रतिबिंब दिसलं. महाराजांनी गर्जना केली. त्याप्रतिबिंबानेही गर्जना केल्याचं दिसताचमहाराजांना आला प्रचंड राग. त्यांनी मारली उडी विहिरीत. त्यात त्यांचा झाला अंत.

दुष्ट सिंहमहाराजांच्या तावडीतून वननगरीला मुक्तकेल्याबद्दल मग ससोबांचं खूपकौतुक वगैरे झालं..

तर सध्याच्या ससोबाच्यापणजोबांच्या पणजोबांची ही खरीअसलेली किंवा नसलेली पराक्रमाचीगाथा एका पिढीकडून दुसऱ्यापिढीकडे येत राहिली. सध्याच्याससोबांनाही वाटलं की आपलेपूर्वज जर एवढे पराक्रमीहोते तर आपणही तेवढेचपराक्रमी असलो पाहिजे. त्यांचंचरक्त ना आपल्या अंगी. मग आपण सुध्दासध्याच्या सिंह महाराजांना असाचधडा शिकवला पाहिजे. आपल्यामनीची ही इच्छा ससोबानंत्याच्या बाबांना सांगितली. बाबांनीत्याच्या कानशिलात ठेऊन दिली. याचं कारण काही त्यालाकळेना.

मुर्खा, तुझ्या पणजोबाच्या पणजोबांनी खरोखरच तेव्हाच्या सिंह महाराजांना अद्दल घडवली की नाही हे सांगायला काय त्यांचं भूत आलं होतं तुला सांगायला? असल्या गावगप्पांवर फार विश्वास ठेवायचा नसतो. सिंह महाराज कुठे नि आपण कुठे. त्यांची आपली बरोबरी तरी होऊ शकते का.

पण बाबा, तुमचं असं सांगणं आपल्या पणजोबाच्या पणजोबाच्या कीर्तीला कलंक लागू शकतो ना. ससोबा हुंदकादेत म्हणाला.

अरे, जी गोष्ट आपणास ठाउुक नाही. त्याचा काही पुरावा नाही. सांगोवांगी पराक्रम अर्थहीन असतो. सिंह महाराजांनी डरकाळी फोडली तर आपण उडून जावू, इतका आपला जीव पिटुकला. त्यांच्या पंजांचं नख जरी लागलं तरी आपल्या शरीरातून रक्ताची धार वाहू लागेल. त्यांच्या समोर जाऊन आपण कोणता पराक्रम गाजवू शकतो. की पुन्हा तीच थाप नव्याने सांगणार. सिंह महाराजांना विहिरीवर नेणार. त्यांना त्यांचं प्रतिबिंब दाखवणार. मूर्खा, तुला जर कळू शकते की पाण्यात दिसतं ते आपलं प्रतिबिंब असतं तर सिंह महाराजांना कां कळू शकत नाही. तुझ्या पणजोबाचा पणजोबा एवढाच हुश्शार असता तर तोच नाही का या जंगलाचा राजा झाला असता. आपल्या कुटुंबात या जंगलाचा राजाच सोड आतापर्यंत एकही जण साधा शिपाईसुध्दा होऊ शकला नाही. कुणी तरी थाप दिली ठोकून नि आपण बसलो त्यातच गुंतून. असे जे गुंतून बसतात ना ते प्रगती करत नाही. समजलं.

ससोबाने मानडोलावली. पण त्याला काहीआपल्या बाबांचं म्हणनं पटलंनाही.

००००

ससोबाने आपल्यामित्रांना सध्याच्या सिंह महाराजांनानमवण्याचा पराक्रम करु इच्छितोअसं सांगितलं. त्यांनीससोबाच्या डोक्यात हवाच भरली. तुझ्याशिवाय कुणीही म्हणजे कुणीहीसिंह महाराजांना नमवूशकत नाही असंच काहीसंप्रत्येकजण म्हणाला. यासर्व मित्रांनी ससोबाचा जयजयकारकेला नि ते त्यासम्हणाले. शुभस्य शीघ्रम. तूउशीर कशाला करतोस. आजचआपण जाऊ या महाली. झालं. सगळेजण निघाले. वाटेतत्यांना एक गाढव भेटले. तो ससोबास म्हणाला,

ससोबा, असा कसा तू असा चालत जाणार. माझ्या पाठीवर बस नि चल एखाद्या वीराच्या थाटात. ससोबाखुष झाले. ते गाढवोबाच्यापाठीवर बसले नि निघालेसिंह महाराजांच्या महालाकडे.

महाल आल्यावरससोबा गाढवाच्या पाठीवरुन उतरले. नि सर्व मंडळी मगदरबारात पोहचली.

महाराजांनी येण्याचंकारण विचारलं

ससोबा छाती समोर करुन म्हणाला, महाराज, या वननगरीत तुमच्यापेक्षा शक्तीमान प्राणी आलाय. तो आम्ही बघितलाय. त्याला तुम्ही हाकलून लावलं पाहिजे. अन्यथा तो  एके दिवशी आपणास वननगरीतून हद्दपार करेल.

ससोबा आम्हास तो प्राणी ठाऊक आहे की..महाराज म्हणाले.

काय सांगता महाराज, महाराजांचं उत्तरऐकून ससोबा चपापलाच.

होय ससोबा, तो प्राणी वननगरीतल्या त्या मोठ्या विहिरीत राहतो. रोज आम्ही भेटतो त्यास.

पण महाराज, तो तुमच्यापेक्षा शक्तिमान आहे. तो एखाद्या दिवशी आपणास हद्दपार करेल वननरीतून..असंकाहीसं करतससोबा बोलून गेला. आपलंकाही खरं नाही. हेत्याच्या लक्षात आलं. त्याचंउसनं अवसानही गळालं. त्यानेधावत जाऊन महाराजांचे पायपकडले आणि क्षमा मागितली. आपला अंतस्थ हेतू सांगितला. आपल्या बाबांचं ऐकताफुकाचं शौर्य गाजवायला निघाल्याचंत्यानं महाराजांना सांगितलं. तो भीतीनं थरथर कापूलागला. त्याची ती अवस्थाबघून महाराज हसू लागले. ससोबाला धिर देत तेम्हणाले..

अहो ससोबा, पूर्वजांच्या अशा सर्वच कथाखऱ्या नसतात. त्यात भाकडकथाअधिक असतात. तुमचे बाबाखरं तेच म्हणाले. समजाअशा कथा खऱ्याही असतीलतरी त्या त्या काळातखऱ्या होत्या. काळ बदलतो. परिस्थिती बदलते. आपले पूर्वजपराक्रमी होते म्हणजे आपणहीतसेच असू असं नाही. ते जसे वागले तसेचआपणही वागायला हवं असंहीनाही ना. काळाप्रमाणे आपणबदललं पाहिजे. स्वत:च्याअंगी असलेली शक्ती आणिबुध्दी जोखली पाहिजे. पूर्वजांच्याकर्तृत्वावर पराक्रम गाजवता येतनाही ससोबा..सिंह महाराजांनीससोबाला समाजावलं..

यापुढे असं मुर्खासारखं वागणार नाही अशी कबुली देऊन ससोबानं महाराजांचा निरोप घेतला.

सुरेश वांदिले