(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

यशाच्या नव्या वाटा

कौशल्य प्राप्त करुन देणारे नावीन्यपूर्ण अभ्यासक्रम केल्यास चांगले करिअर घडू शकते. असे अभ्यासक्रम करण्याची मानसिक तयारी, परीश्रम करण्याची तयारी आणि जिद्द  मात्र असायला हवी. भारत सरकारच्या विविध संस्था आणि काही महत्वाच्या शिक्षण संस्थांनी सुरु केलेले असेच काही वेगळे पण यश मिळवून देऊ शकणारे अभ्यासक्रम-

नॅशनल रेल ॲण्ड ट्रान्सपोर्ट इंस्टिट्यूट,

अभ्यासक्रम- () बी.एसस्सी इन ट्रान्सपोर्ट टेक्नॉलॉजी, () बीबीए इन ट्रान्स्पोर्ट मॅनेजमेंट, अर्हता- १२ वीमध्ये गणित विषयासह ५५ टक्के गुण, राखीव संवर्गासाठी ५० टक्के गुण.

पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम-()एमबीए इन सप्लाय चेन मॅनेजमेंट,कालावधी- दोन वर्षे,अर्हता-५० टक्के गुणांसह कोणत्याही विषयातील पदवी. ()एमबीए इन, ट्रान्सपोर्टेशन मॅनेजमेंट, कालावधी- दोन वर्षे,अर्हता-५० टक्के गुणांसह कोणत्याही विषयातील पदवी. ()एम.एस्सी इन ट्रान्सपोर्ट इकॉनॉमिक्स,

()एम.एस्सी इन ट्रान्सपोर्ट इन्फर्मेशन सिस्टिम्स ॲण्ड ॲनालिटिक्स,टेक्नॉलॉजी ॲण्ड पॉलिसी, कालावधी- दोन वर्षे,अर्हता-५० टक्के गुणांसह कोणत्याही विषयातील पदवी.

()एम.एस्सी इन रेल्वे सिस्टिम्स  इंजिनीअरिंग ॲण्ड इंटिग्रेशन

संधी– रेल्वे आणि इतर परिवहन क्षेत्र

संपर्क- नॅशनल अॅकेडमी ऑफ इंडियन रेल्वे कॅम्पस, लालबाग, वडोदरा- ३९०००४, दूरध्वनी- ०७३०-६३७८१९८ किंवा ६३५८८५२२५५,ईमेल-info@nrti@edu,in संकेतस्थळ- nrti.in

०००

इंडियन मेरिटाइम युनिव्हर्सिटी

अभ्यासक्रम- बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी इन नॅव्हल आर्किटेक्चर ॲण्ड ओशन इंजिनीअरिंग. कालावधी- चार वर्षे/ अर्हता- भौतिकशास्त्र ,गणित आणि रसायनशास्त्र या विषयांमध्ये ६० टक्के गुणांसह १२वी उत्तीर्ण. १०वी आणि १२ वीमध्ये इंग्रजी विषयात ५० टक्के गुण मिळणे आवश्यक.

संधी– जहाज बांधणीक्षेत्र

संपर्क- इंडियन मेरिटाइम युनिव्हर्सिटी, गांधीग्राम, विशाखापट्टणम कॅम्पस-५३०००५, दूरध्वनी-०८९१-२५७८३६०, फॅक्स- २५७७७५४, ईमेल- director.vizag@imu.ac.in
,संकेतस्थळ- www.imu.edu.in

०००

नॅशनल इं‍स्टिट्यूट फॉर एम्पॉवरमेंट ऑफ पर्सन्स वुइथ मल्टिपल डिसॅबिलिटीज (दिव्यांगजन)

अभ्यासक्रम-  बॅचलर ऑफ ऑडिऑलॉजी ॲण्ड स्पीच लँग्वेज. अर्हता-भौतिकशास्त्र, जीवशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित किंवा संगणकशास्त्र किंवा सांख्यिकी किंवा इलेक्ट्रॉनिक्स किंवा मानसशास्त्र यापैकी कोणत्याही एका विषयासह १२ वी परीक्षेत ५० टक्के गुण.

संधी– कर्णबधीर दिव्यांगांना शिक्षण आणि प्रशिक्षण,

सुविधा

संपर्क– मुट्टुकडू, इस्ट कोस्ट रोड, कोवालाम, चेन्नई-६०३११२, दूरध्वनी- ०४४-२७४७२१०४, ईमेल- niepmd/gmail.com, संकेतस्थळ-niepmd.tn.nic.in,

०००

मुंबई विद्यापीठ

अभ्यासक्रम- बी.ए इन चायनीज स्टडीज, कालावधी-तीन वर्षे, अर्हता- कोणत्याही शाखेतील १२वी उत्तीर्ण.

संधी– चायनीज भाषेत (मँड्रिन)उच्चशिक्षण,संशोधन,आणि चीन देशातील दुभाषे,भाषांतरकार,पर्यटन मार्गदर्शक, माध्यमातील करिअर

संपर्क- डिपार्टमेंट ऑफ जर्मन,पहिला मजला, रुम नंबर-१११, रानडे भवन, कलिना कॅम्पस, सांताक्रुज पूर्व-मुंबई-४०००९८, दूरध्वनी- ०२२-०२२-२६५२८३५९, संकेतस्थळ-german-mu.com/ba-in-chinese-studies ईमेल-deptofgerman@mu.ac.in

०००

गरवारे इंस्टिट्यूट ऑफ करिअर एज्युकेशन ॲण्ड डेव्हपलमेंट.

अभ्यासक्रम- () बॅचलर कोर्स इन सॉयकॉजिकल हेल्थ ॲण्ड बिहेव्हिरिअल सायन्स, कालावधी- तीन वर्षे,अर्हता- १२वी विज्ञान किंवा कला शाखा . संधी- मानसशास्त्रीय सल्ला आणि उपचार. () बॅचलर कोर्स इन बायोमेडिकल इंस्ट्रुमेंटेशन सायंस. संधी- जैववैद्यकीय उपकरणे विकास, संशोधन आणि  निर्मिती.

अर्हता- रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र आणि गणित या विषयांसह किंवा रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र आणि जीवशास्त्र या विषयांसह १२वी किंवा व्होकेशनल इलेक्ट्रॉनिक्स.

संपर्क- विद्यानगरी, सांताक्रुज(पूर्व), मुंबई- ४०००९८, भ्रमणध्वनी- ९७०२१४२१०१,दूरध्वनी-०२२-२६५३०२५८, फॅक्स-२६५३०२६३, ईमेल-gicedenquiry @giced.mu.ac.in

 संकेतस्थळ- http://gicededu.co.in/

०००

सेंट्रल काउंसिल फॉर रिसर्च इन आयुर्वेदिक सायंसेस

अभ्यासक्रम- पंचक्रम साहाय्यक प्रशिक्षण, अर्हता- १२वी उत्तीर्ण, कालावधी- १ वर्षं, हा अभ्यासक्रम संस्थेच्या दिल्ली आणि  केरळमधील चेरुथुरुथी येथे शिकवला जातो.

संधी– पंचकर्म सेवा आणि सुविधा पुरवणारे स्पा,आरोग्य केंद्र,आयुर्वेद केंद्र, स्वयंरोजगार

संपर्क- अनुसंधान भवन, नंबर ६१-६५, इंस्टिट्यूशनल एरिया, अपोजिट डी ब्लॉक, जनकपुरी, नवी दिल्ली-११००५८, दूरध्वनी- ०११-२८५८५८५२, फॅक्स-२८५२०७४८, www.ccras@nic.in, ईमेल-dg-ccras@nic.in

()नॅशनल आयुर्वेद रिसर्च इंस्टिट्यूट ऑफ पंचकर्म,चेरुथुरुथी,थ्रिशुर डिस्ट्रिक्ट व्हाया शोरानपूर,केरळ-६७९५३१,दूरध्वनी-०४८८४-२६२५४३,ईमेल-nrip-cheruthuruthv@gov.in ०००

ऑल इंडिया इंस्टिट्यूट ऑफ फिजिकल मेडिसिन ॲण्ड रिहॅबिलिटेशन

अभ्यासक्रम- बॅचलर ऑफ प्रोस्थेटिक्स ॲण्ड आर्थोटिक्स/ कालावधी- साडेचार वर्षे, अर्हता– १२वी विज्ञान. संधी– कृत्रिम हातपाय (अवयव) निर्मिती, डिझाइन आणि संबंधित रुग्णाच्या गरजेनुसार उपलब्ध करुन देणे.

संपर्क- हाजी अली पार्क, के.खाडे मार्ग, महालक्ष्मी, मुंबई-४०००३४, संकेतस्थळ- www.aiipmr.gov.in

०००

महाराजा रणजितसिंह गायकवाड- इंस्टिट्यूट ऑफ डिझाइन.

अभ्यासक्रम- बॅचलर इन डिझाइन इन क्रॅाफ्ट्स ॲण्ड डिझाइन

संधी- विविध साहित्यापासून कलाकुसरीच्या वस्तुनिर्मिती उद्योग, याच क्षेत्रातील स्वयंरोजगार

अर्हता- कोणत्याही १२ वी शाखेत ५० टक्के गुण,कालावधी-चार वर्षे.

संपर्क- सयाजीभवन, बी/एच युनिव्हर्सिटी, हेड ऑफिस, प्रतापगंज, वडोदरा, दूरध्वनी०२६५२७८८२०१, www.mridbaroda.com, ईमेल-mridmsu@gmail.com

०००

जी.डी गोयंका युनिव्हर्सिटी

अभ्यासक्रम- () बॅचलर ऑफ सायंस इन हेल्थकेअर ॲण्ड क्लिनिकल रिसर्च. संधी-आरोग्य सेवा आणि  प्रयोगशाळा () बॅचलर ऑफ सायंस इन न्युट्रिशन ॲण्ड हेल्थ.संधी- पोषण आहार, वजन कमी करण्यासाठी सल्ला आणि मार्गदर्शन

 अर्हता- १२वी.

संपर्क– जी.डी गोयंका एज्युकेशन सिटी, गुरुग्राम सोहना रोड, दिल्ली-एनसीआर, हरयाणा- १२२१०३, दूरध्वनी-०१२४-३३१५९९९ किंवा ९९१०००००६२,ईमेल-admissions@gdgoenka.ac.in, संकेतस्थळ-www.goenkauniversity.com

०००

नर्सी मोन्जी इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायंस युनिव्हर्सिटी (सुनंदन दिवातिया स्कूल ऑफ सायंस)

अभ्यासक्रम- इंटिग्रेटेड एम.एस्सी इन बायोमेडिकल सायंस. कालावधी- पाच वर्षे,अर्हता- १२वी विज्ञान शाखेत जीवशास्त्र, भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्रासह ६० टक्के गुण.

संधी- क्लिनिकल संशोधन संस्था, औषधनिर्मिती उद्योग क्षेत्रातील विकास आणि संशोधन विभाग, बौध्दिक संपदा अधिकार क्षेत्र, नियामक संस्था, जैवतंत्रज्ञान आणि आरोग्यसुविधा क्षेत्र

संपर्क- तिसरा माळा, भाईदास सभागृह इमारत, भक्तिवेदांत मार्ग, विले पार्ले(पश्चिम), मुंबई-४०००५६, दूरध्वनी-०२२-४२३५५०५८, ईमेल-admissions.sos@nmims.edu

, संकेतस्थळ-science.nmims.edu

०००