(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

 

करोनाचा प्रादुर्भावाच्या काळात आरोग्यदायी जीवनशैलीमध्ये योगाचा अंतर्भाव जगभरातील लाखो व्यक्तिंनी केला. शारीरिक, मानसिक आणि अध्यात्मिक सक्षमता प्रदान करण्याची योगामधील शक्ती लोकांच्या ध्यानात आली. योगाकडे कोणत्याही वयोगटातील नागरिक सुलभतेने वळू शकतात हे त्याचे सर्वात मोठे बलस्थान. वयोमान, प्रकृती, आणि आरोग्याच्या समस्या लक्षात घेऊन वेगवेगळया प्रकारची योगिक आसने करता येणे शक्य आहेत. तज्ज्ञांच्या मते योगासनांच्या सातत्यपूर्ण सरावामुळे, गॅमा ॲमिनोब्युट्रिक ॲसिडची निर्मिती होते. त्यामुळे तणाव कमी होतो. वेगवेगळया भीतीची तीव्रता कमी होते. आनंदाच्या पातळीत वाढ होते.

योगासनांचे हे फायदे लक्षात घेऊन त्याचे उत्तम पध्दतीने मार्केटिंग करता येणे शक्य आहे. या विषयात तज्ज्ञता मिळवल्यास, ऑनलाइन पध्दतिने वेगवेगळया वयोगटांसाठी योग प्रशिक्षणाचे आयोजन करता येऊ शकते. फेसबूक, यू-ट्यूब सारख्या समाजमध्यमाचा उपयोग करुन संभाव्य ग्राहकांशी थेट संपर्क साधणे शक्य आहे. त्यासाठी आपली संपर्कसाखळी (नेटवर्किंग) वाढवावी लागेल. असा संपर्क साधल्यावर त्यांना योगाविषयी सातत्यपूर्ण माहिती देणे, त्यांच्या शंकाचे निरसन करणे आणि त्यांना योगाकडे वळण्यास प्रवृत्त करणे शक्य होऊ शकते. फेसबूक लाइव्ह, इंस्ट्राग्राम वरील स्टोरिज, शंकासमाधान करणारी प्रश्नोत्तरे, ब्लॉग, पॉडकॉस्ट,याव्दारे ग्राहकांना बांधून ठेवणे शक्य होऊ शकते. या क्षेत्रातले तुमचे ज्ञान आणि त्याचे  सतत केलेले उन्नतीकरण (अपग्रेडेशन) यामुळे संबंधित व्यक्ती यात तज्ज्ञता मिळवू शकतो. यामुळे अधिकाधिक ग्राहक आकर्षित होऊ शकतात.

() योग इंस्टिट्यूट – मुंबईतील सांताक्रुझ येथे असणाऱ्या या संस्थेची स्थापना १९१८ साली, श्री योगेंद्रजी यांच्यामार्फत करण्यात आली. १०२ वर्षाचा इतिहास असणारी ही संस्था आपल्या देशातीलच नव्हे तर जगातील सर्वाधिक जुन्या संस्थांपैकी एक आहे. योगविद्देचा प्रचार आणि प्रसार यात या संस्थेने बजावलेल्या महत्वाच्या कामगिरी बद्दल, सर्वोत्कृष्ट संस्था या गटात २०१८-१९ साली प्रधानमंत्र्यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

अभ्यासक्रम– या संस्थेमार्फत पुढील वेगवेगळया कालावधीचे ऑनलाइन आणि ऑफलाइन अभ्यासक्रम चालवले जातात.- (१) टिचर्स ट्रेनिंग कोर्स, (२) योगसूत्र सर्टिफिकेट कोर्स, (३) ॲडव्हान्स्ड रेग्युलर योगा टिचर क्लासेस, (४) योगा थेरपी कोर्स, (५) रेग्युलर गायडेड मेडिटेशन क्लासेस, (६) सर्टिफिकेशन प्रोग्रॅम ऑन योग फॉर कॅन्सर, (७) योग सायकॉलॉजी, (८) २१ डेज बेटर लिव्हिंग कोर्स, (९) योग प्रयास, (१०) आसन ऑनलाइन क्लासेस.

संपर्क श्री योगेंद्र मार्ग प्रभात कॉलनी, सांताक्रुज पूर्व, मुंबई-४०००५५, दूरध्वनी-०२२-२६१२२१८५, ईमेल- info@theyogainstitute.org

() अय्ंयगार मेमोरियल योग इंस्टिट्यूट

पुणे येथे असणाऱ्या रम्माणी अय्ंयगार मेमोरियल योग इंस्टिट्यूट मार्फत अय्यंगार योगाचे प्रशिक्षण दिले जाते. ही संस्था योगाचार्य बी. के. एस अय्यंगार यांनी १९७५ साली स्थापन केली. संपर्क- ११५०७, बी/१, हरे कृष्ण मंदिर रोड, मॉडेल कॉलनी, शिवाजी नगर पुणे-४११०१६, दूरध्वनी- ०२०-२५६५६१३४, संकेतस्थळ- https://bksiyengar.com

 () अमरावती येथील हनुमान व्यायाम प्रसारक मंडळामार्फत, शारीरिक शिक्षण महाविद्यालय चालवण्यात येते. या महाविद्यालयाच्या योग विभागाने पुढील अभ्यासक्रम सुरु केले आहेत.

 

(१) बी.ए.(योगशास्त्र), अर्हता कोणत्याही विषयातील १२ वी उत्तीर्ण, कालावधी- ३ वर्षे, (२) एम.ए (योगशास्त्र),  अर्हता- कोणत्याही विषयातील पदवी, कालावधी- २ वर्षे, (३) डिप्लोमा इन योग एज्युकेशन, अर्हता- कोणत्याही विषयातील पदवी, कालावधी- एक वर्ष, (४) पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन योग थेरपी, अर्हता- कोणत्याही विषयातील पदवी, कालावधी-२ वर्षे.

संपर्क शारीरिक शिक्षण महाविद्यालय, अमरावती-४४४६०५, दूरध्वनी- ०७२१-२५७३७८८ , फॅक्स- २५७२७५७, ईमेल-principal.dcpe@hvpm.org संकेतस्थळ- dcpehvpm.org

०००००००००

() गोरधनदास सेकसारिया कॉलेज ऑफ योग ॲण्ड कल्चरल सिंथेसीस

कैवल्यधाम या संस्थेंच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या या महाविद्यालयातील लघु मुदतीचे अभ्यासक्रम.

() सर्टिफिके कोर्स इन योगा, हा चार आठवड्यांचा अभ्यासक्रम असून तो जानेवारी, मे, ऑगस्ट आणि नोव्हेंबर महिन्यात सुरु होतो. हा अभ्यासक्रम योगा असोशिएशनची संलग्नित असून योगा सर्टिफिकेट बोर्डाच्या योगा वेलनेस इंस्ट्रक्टरच्या दुस-या पातळीचा (लेव्हल टू) आहे. मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या सक्षम असणाऱ्या अठरा वर्षावरील कोणत्याही व्यक्तीस हा अभ्यासक्रम करता येतो.

() डिप्लोमा इन योग थेरपी– रुग्णालये/ सामाजिक/ शैक्षणिक संस्था येथे योगामार्फत आरोग्य विषयक उपचारांसाठी लागणाऱ्या मनुष्यबळाला प्रशिक्षित करण्यासाठी हा अभ्यासक्रम उपयुक्त ठरु शकतो. अर्हता कोणत्याही विद्याशाखेतील पदवी, आणि इंडियन योगा अशोशिएशन मार्फत योगविद्येतील किमान प्रमाणपत्र अभ्यासक्रम. वयोमर्यादा नाही. अभ्यासक्रमाचा प्रारंभ १ ऑगस्ट रोजी होईल. कालावधी दोन सत्रे आणि सहा महिन्यांचे इंटर्नशीप.

 () पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोम इन योग एज्युकेशन योग गुरु/शिक्षक हेाउुन या क्षेत्रात करिअर करण्यास उपयुक्त ठरण्याच्या अनुषंगाने अभ्यासक्रमाची संरचना करण्यात आली आहे. यंदाचे सत्र ऑगस्ट महिन्यात सुरु होईल. अर्हता– कोणत्याही विषयातील पदवी आणि उत्कृष्ट मानसिक व शारीरिक आरोग्य. वयोमर्यादा नाही. अभ्यासक्रमाचा कालावधी साधारणत: ९ महिने. हा अभ्यासक्रम इंडियन योगा असोशिएशनशी संलग्नित असून योगा सर्टिफिकेशन बोर्डाच्या योगा टिचर ॲण्ड इव्हॅल्युअरच्या तिस-या पातळी (लेव्हल थ्री) च्या अभ्यासक्रमाशी समकक्ष आहे. विद्यार्थ्यांना स्वतंत्ररीत्या इंडियन योगा असोशिएशनसोबत नोंदणी करणे आवश्यक असल्याचे संस्थेने स्पष्ट केले आहे.

     () बी. इन योगशास्त्ररामटेक येथे असणाऱ्या कवी कुलगुरु कालिदास संस्कृत विद्यापीठाशी हा अभ्यासक्रम संलं‍ग्नित आहे. कालावधी-तीन वर्षे. अर्हता कोणत्याही ज्ञानशाखेतील ४५ टक्के गुणांसह १२वी उत्तीर्ण. वयोमर्यादा नाही.

(६) एम. इन योगशास्त्रहा अभ्यासक्रम कवी कुलगुरु कालिदास संस्कृत विद्यापीठाशी संलग्नित आहे. कालावधी दोन वर्षे. अर्हता- कोणत्याही विषयातील पदवी आणि मान्यताप्राप्त संस्थेचा किमान सहा महिन्याचा योग प्रमाणपत्र अभ्यासक्रम. वयोमर्यादा- २१ ते ६०.

संपर्क– (१) स्वामी कैवल्यधाम मार्ग लोणावळा-४१०४०३, दूरध्वनी- ०२११४-२७३००१, () ईश्वरदास चुनिलाल योगिक हेल्थ सेंटर, कैवल्यधाम, ४३ नेताजी सुभाष रोड, मरिन ड्राइव्ह, तारापोरवाला मत्स्यालयाच्या जवळ मुंबई- ४००००२, दूरध्वनी-०२२-२२८१८४१७, २२८१०४९४, ईमेल-   kdhmayogcenter@gmail.com संकेतस्थळ- kdham.com

() स्वामी विवेकानंद योग अनुसंधान संस्था युनिव्हर्सिटी

1) बी.एस्सी इन योग ॲण्ड कॉन्शसनेस (अर्हता-कोणत्याही विषयातील बारावी परीक्षा उत्तीर्ण, कालावधी- ३ वर्षे),  

२) एम.एस्सी इन योग ॲण्ड कॉन्शसनेस) (अर्हता – कोणत्याही विषयातील पदवी परीक्षा उत्तीर्ण, कालावधी – २ वर्षे),

3) बी.एस्सी इन नेचरोपथी ॲण्ड योगिक सायन्स (अर्हता – जीवशास्त्र, रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र या विषयांसह  बारावी परीक्षा उत्तीर्ण, कालावधी – ५.5 वर्षे),

4) बी.एस्सी इन योग थेरपी (अर्हता-कोणत्याही विषयातील बारावी परीक्षा उत्तीर्ण, कालावधी – ३ वर्षे),

5) एम.एस्सी इन योग थेरपी (अर्हता- कोणत्याही विषयातील पदवी, कालावधी -२ वर्षे),

6) योगा इन्स्ट्रक्टर कोर्स (अर्हता – १० वी उत्तीर्ण, कालावधी-एक महिना.) , 

संपर्क स्वामी विवेकानंद योग अनुसंधान संस्था युनिव्हर्सिटी, प्रशांती कुटिरम, विवेकानंद रोड, कल्लूबल्लू पोस्ट, जिगानी, अनेकल, बेंगळुरु – ५६०१०५, दूरध्वनी – ०८०- २२६३९९६८ आणि २२६३९९६१, फॅक्स – २६६०८६४५, ई-मेल- info@svyasa.edu.in आणि admissions@svyasa.org, संकेतस्थळ – http://www.svyasa.edu.in.

() इन्स्टिट्यूट ऑफ फिजिकल एज्युकेशन

अभ्यासक्रम – १) एम.ए इन योग एज्युकेशन, कालावधी दोन वर्षे. २) पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन योग एज्युकेशन, अर्हता- कोणत्याही विषयातील पदवी. अभ्यासक्रमाचा कालावधी एक वर्षं.

संपर्क – रजिस्ट्रार, लक्ष्मीबाई इन्स्टिट्यूट ऑफ फिजिकल एज्युकेशन, शक्तीनगर, रेसकोर्स रोड, ग्वाल्हेर – ४७४००२, दूरध्वनी – ०७५१ – ४०००९०२, ४०००९१७, ४०००९००, फॅक्स -४०००९९२,  ई-मेल- registrar@ lnipe.edu.in आणि vc@lnipe.edu.in, संकेतस्थळ – www.lnipe.net.

(8) राष्ट्रीय संस्कृत विद्यापीठ– अभ्यासक्रम पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन योग थेरपी ॲण्ड स्ट्रेस मॅनेजमेंट,कालावधी-एक वर्षं,इंटर्नशीप-सहा महिने.अर्हता-कोणत्याही विषयातील पदवी.अभ्यासक्रमाची संरचना पांतजली योगशास्त्रावर करण्यात आली आहे.संपर्क-राष्ट्रीय संस्कृत विद्यापीठ,तिरुपती,आंध्रपदेश-५१७५०७,दूरध्वनी- ०८७७- २२८७८०९, ईमेल-registrar_rsvp@yahoo.co.in , संकेतस्थळ- rsvidyapeetha.ac.in

(९) मोरारजी देसाई नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ योग. या संस्थेची स्थापना भारत सरकारने १९९८ साली  केली. योग शिक्षण आणि प्रशिक्षणासंदर्भात सेंटर ऑफ एक्सलन्स म्हणून ही संस्था विकसित करण्यात येत आहे.

अभ्यासक्रम-

(१) बी.एस्सी इन योग, कालावधी- तीन वर्षे ,अर्हता– १२ वी विज्ञान परीक्षेत भौतिकशास्त्र,रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र या विषयात सरासरीने ५० टक्के गुण. प्रत्येक विषयात स्वतंत्ररीत्या उत्तीर्ण होणे आवश्यक. १ ऑगस्ट रोजी उमेदवाराचे वय २१ वर्षांपेक्षा अधिक नसावे. हा अभ्यासक्रम गुरु गोविंदसिंघ इंद्रप्रस्थ युनिव्हर्सिटीशी संलग्न  आहे.

या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी चाळणी परीक्षा घेतली जाते. या परीक्षेद्वारे ३० विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो.

(२) डिप्लोमा इन योग सायन्स,कालावधी-एक वर्षं, अर्हता- कोणत्याही विद्याशाखेतील ५० टक्के गुणप्राप्त पदवी. अनुसूचित जाती आणि जमाती संवर्गासाठी ४५ टक्के गुण. पदव्युत्तर पदवी असल्यास प्रवेशाच्या वेळेस ५ टक्के वेटेज दिले जाते. वयोमर्यादा – १ ऑगस्ट रोजी ३० वर्षांपेक्षा कमी.

() पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन योग थेरपी, कालावधी- एक वर्षं. अर्हता- ५० टक्के गुणांसह वैद्यकीय किवा फिजिओथेरपी किंवा पॅरामेडिकल विषयातील पदवी.

() सर्टिफिकेट कोर्स इन योगा फॉर प्रोटोकॉल इंस्ट्रक्टर, कालावधी- ३ महिने. अर्हता– १० वी.

 () सर्टिफिकेट कोर्स इन योग फॉर वेलनेस इंस्ट्रक्टर, कालावधी- ३ महिने. अर्हता- कोणत्याही विषयातील १२वी.

() एम.एस्सी इन योगा,कालावधी- दोन वर्षे,अर्हता-५० टक्के गुणांसह बी.एस्सी(योग)किंवा १ वर्षं कालावधीच्या डिप्लोमा इन योग या अर्हतेसह विज्ञान, वैद्यकीय, फिजिओथेरपी, पॅरामेडिकल शाखेतील पदवी.

संपर्क- मोरारजी देसाई नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ योग, ६८, अशोका रोड गोल डाकखाना, नवी दिल्ली- ११०००१, दूरध्वनी- ०११-२३७३०४१७/१८, फॅक्स- २३७११६५७, ईमेल- mdniy@yahoo.co.in, संकेतस्थळ-http://www.yogamdniy.nic.in/.