सध्याच्या अत्यंत धावपळीच्या आणि धकाधकीच्या काळात स्वत:ची तब्येत सुदृढ ठेवण्यासाठी आणि ताणतणावापासून मुक्ती मिळवण्यासाठी योगसाधनेकडे वळणाऱ्यांची संख्या लक्षणीयरीत्या वाढत आहे. त्यामुळे प्रशिक्षित योगगुरु वा योगतज्ज्ञांचीही गरज वाढली आहे. या क्षेत्रात प्रावीण्य मिळवल्यास करिअरच्या चांगल्या संधी उपलबध होऊ शकतात.
योगविषयाचे शिक्षण प्रशिक्षण देणाऱ्या काही संस्था
1) मोरारजी देसाई नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ योग या संस्थेची स्थापना भारत सरकारने १९९८ साली केली. योग शिक्षण आणि प्रशिक्षणांसदर्भात सेंटर ऑफ एक्सलन्स म्हणून या संस्थेची स्थापना करण्यात आली. संस्थेमार्फत (1) बी.एस्सी इन योगा हा तीन वर्षे कालावधीचा अभ्यासक्रम सुरु करण्यात आला आहे. अर्हता- १२ वी विज्ञान परीक्षेत भौतिकशास्त्र,रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र या विषयात सरासरीने ५० टक्के गुण. प्रत्येक विषयात स्वतंत्ररीत्या उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. १ ऑगस्ट रोजी उमेदवाराचे वय २१ वर्षांपेक्षा अधिक नसावे. हा अभ्यासक्रम गुरु गोविंद सिंघ इंद्रप्रस्थ युनिव्हर्सिटीशी संलग्न आहे. या अभ्यासक्रमासाठी निवड झालेल्या प्रत्येक उमेदवारास ३ हजार रुपयाचे विद्यावेतन दिले जाते.या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी चाळणी परीक्षा घेतली जाते. या परीक्षेद्वारे ६० विद्यार्थ्यांना प्रवेश दिल जातो.
(2)डिप्लोमा इन योग सायन्स हा एक वर्ष कालावधीचा अभ्यासक्रम आहे. तो कोणत्याही विद्याशाखेतील ५० टक्के गुणप्राप्त पदवीधरास करता येतो. अनुसूचित जाती आणि जमाती संवर्गासठी ४५ टक्के गुण. पदव्युत्तर पदवी असल्यास प्रवेशाच्या वेळेस ५ टक्के वेटेज दिले जाते. वयोमर्यादा १ ऑगस्ट रोजी ३० वर्षांपेक्षा कमी असावे. पहिल्या सत्रातील निकालावर आधारित १३ गुणवंत उमेदवारांना दरमहा ३०००रुपये शिष्यवृत्ती दिली जाते
(3) सर्टिफिकेट कोर्स इन योगासना फॉर हेल्थ प्रमोशन- कालावधी- ३ महिने. अर्हता- कोणत्याही विषयातील १२वी.हा अभ्यासक्रम अंशकालीन आहे. ५० विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो.
(4) सर्टिफिकेट कोर्स इन प्राणायम ॲण्ड मेडिटेशन फॉर हेल्थ प्रमोशन-कालावधी- ३ महिने. अर्हता- कोणत्याही विषयातील १२वी. हा अभ्यासक्रम अंशकालीन आहे.५० विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो.
(5)मॉड्युलर सर्टिफिकेट कोर्स इन योगा सायन्स- जागतिक पातळीवर योगाचे महत्व वाढवण्यासाठी या अभ्यासक्रमांची संरचना करण्यात आली आहे.योग प्रशिक्षक आणि गुरुंसाठी हा अभ्यासक्रम उपयुक्त ठरु शकतो. मानसिक, अध्यात्मिक आणि शारीरिक क्षमता वाढिसाठीचे आवश्यक असणारे प्रशिक्षण या अभ्यासक्रमात दिले जाते.योगाविषयी अधिकाधिक जनजागृती करण्यासाठी या अभ्यासक्रमाचा उपयोग होतो.कालावधी- साडे तीन महिने. अर्हता – कोणत्याही विषयातील १२वी उत्तीर्ण.
(6)फाउंडेशन कोर्स इन योगा सायन्स फॉर प्रमोशन ऑफ हेल्थ ॲण्ड वेलनेस.या अभ्यासक्रमाला ५० विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. कालावधी- एक महिना
संपर्क- मोरारजी देसाई नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ योग, ६८, अशोका रोड गोल डाकखाना, नवी दिल्ली- ११०००१, संकेतस्थळ-http://www.yogamdniy.nic.in/,ईमेल-mdniy@yahoo.co.in
0000
2) स्वामी विवेकानंद योग अनुसंधान संस्था या संस्थेस डीम्ड युनिव्हर्सर्टिचा दर्जा देण्यात आले आहे.या संस्थेचे अभ्यासक्रम (१) बी.एस्सी इन योग ॲण्ड कॉन्सियसनेस. अर्हता- कोणत्याही विषयातील १२वी. कालावधी- ३ वर्षे. हा निवासी स्वरुपाचा अभ्यासक्रम आहे. अभ्यासक्रमाचा प्रारंभ १ ऑगस्ट रोजी होईल. या अभ्यासक्रमात उमेदवारांना स्वत:चे योग केंद्र काढण्याची क्षमता आणि कौशल्य प्राप्त होईल असे शिक्षण-प्रशिक्षण दिले जाते.
(२) बी.एस्सी इन योग ॲण्ड एज्युकेशन.अर्हता- ५० टक्के गुणांसह कोणत्याही विषयातील १२ वी.कालावधी- ३वर्षे. हा निवासी स्वरुपाचा अभ्यासक्रम आहे. उच्च माध्यमिक शाळांमध्ये योग शिकवण्याचे क्षमता आणि कौशल्य या अभ्यासक्रमाद्वारे विद्यार्थ्यांमध्ये निर्माण केले जाते. प्रवेशासाठी इंग्रजीचे ज्ञान आवश्यक आहे.
(1) बॅचलर ऑफ नेचरोपथी ॲण्ड योगिक सायन्स. अर्हता- ५० टक्के गुणांसह कोणत्याही विषयातील १२वी. कालावधी- ५ वर्षे.या अभ्यासक्रमात वैद्यकीय निसर्गोपचार आणि योग विज्ञान यांचा समन्वय साधला जातो.विद्यार्थ्यांची निवड मुलाखत अथवा चाळणीपरीक्षेद्वारे केली जाते.
या संस्थेत एम.एसी इन योगा थेरपी, एम.एसी इन योग ॲण्ड कांशियसनेस,पोस्ट ग्रॅज्यूएट डिप्लोमा इन योग थेरपी हे अभ्यासक्रम सुध्दा करता येतात.
कौशल्य आधारित पुढील अभ्यासक्रम या संस्थेत करता येतात- (१)स्पिरिच्युअल कांउसिलिंग (२)वेद चँटिंग ॲण्ड डेली रिचियुल्स (३) ॲस्ट्रॉलॉजी फॉर हेल्थ हॅप्पिनेस ॲण्ड हार्मोनी, (४)यज्ञ- अ हिलिंग सायन्स (५) ट्रॅडिशनल नॉलेज ॲण्ड स्किल्स फॉर हार्मोनिअस लिव्हिंग- वास्तू
संपर्क- प्रशांती कुटिरम,विवेकानंद रोड,कल्लू-बल्लू पोस्ट जिगानी अनेकल,बेंगळुरु- ५६०१०५,दूरध्वनी- ०८०-२२६३९९५८,ईमेल- info@svyasa.edu.in ,संकेतस्थळ- www.svyasa.edu.in
गुरुकूल कांग्री विश्वविद्यालय हरिद्वार- संस्थेचे अभ्यासक्रम
(१)सर्टिफिकेट कोर्स इन योग.कालावधी सहा महिने.(२) बॅचलर ऑफ आर्ट् स इन योग. कालावधी- तीन वर्षे. अर्हता- कोणत्याही विषयातील १२वी उत्तीर्ण .(३) पोस्ट ग्रॅज्यूएट डिप्लोमा इन ह्युमन कांशिएसनेस ॲण्ड योगिक सायन्स
(४) मास्टर ऑफ आर्ट्स इन ह्युमन कांशिएसनेस ॲण्ड योगिक सायन्स .कालावधी- दोन वर्षे. संपर्क- रजिस्ट्रार, गुरुकूल कांग्री विश्वविद्यालय,गुरुकुल कांग्री, हरिद्वार-२४९४०४,संकेतस्थळ-http://gkv.ac.in, ईमेल-registrar@gkv.ac.in
6) राष्ट्रीय संस्कृत विद्यापीठ- पोस्ट ग्रॅज्यूएट डिप्लोमा इन योग थेरपी ॲण्ड स्ट्रेस मॅनेजमेंट- कालावधी- एक वर्षं. इंटर्नशीप- सहा महिने. अर्हता- कोणत्याही विषयातील पदवी. पांतजली योगशास्त्राची मानवी मन आणि शरीर सुदृढ राहण्यासाठी उपयुक्तता यावर या अभ्यासक्रमात भर देण्यात येतो. संस्कृत भाषेचे ज्ञान असल्यास उत्तम.
संपर्क- राष्ट्रीय संस्कृत विद्यापीठ, तिरुपती-५१७५०७, आंध्रपदेश, संकेतस्थळ-http://rsvidyapeetha.ac.in,ईमेल-registrar_rsvp@yahoo.co.in
0000