सध्याच्या अत्यंत धावपळीच्या आणि धकाधकीच्या काळात स्वत:ची तब्येत सुदृढ ठेवण्यासाठी आणि ताणतणावापासून मुक्ती मिळवण्यासाठी योगसाधनेकडे वळणाऱ्यांची संख्या लक्षणीयरीत्या वाढत आहे. त्यामुळे प्रशिक्षित योगगुरु वा योगतज्ज्ञांचीही गरज वाढली आहे. या क्षेत्रात प्रावीण्य मिळवल्यास करिअरच्या चांगल्या संधी उपलबध होऊ शकतात.
योगविषयाचे शिक्षण प्रशिक्षण देणाऱ्या काही संस्था
१) मोरारजी देसाई नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ योग या संस्थेची स्थापना भारत सरकारने १९९८ साली केली. योग शिक्षण आणि प्रशिक्षणांसदर्भात सेंटर ऑफ एक्सलन्स म्हणून या संस्थेची स्थापना करण्यात आली. संस्थेमार्फत
(१) बी.एस्सी इन योगा हा तीन वर्षे कालावधीचा अभ्यासक्रम सुरु करण्यात आला आहे. अर्हता- १२ वी विज्ञान परीक्षेत भौतिकशास्त्र,रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र या विषयात सरासरीने ५० टक्के गुण. प्रत्येक विषयात स्वतंत्ररीत्या उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. १ ऑगस्ट रोजी उमेदवाराचे वय २१ वर्षांपेक्षा अधिक नसावे. हा अभ्यासक्रम गुरु गोविंद सिंघ इंद्रप्रस्थ युनिव्हर्सिटीशी संलग्न आहे. अभ्यासक्रमाच्या निवडीसाठी, गोविंद सिंघ इंद्रप्रस्थ युनिव्हर्सिटीमार्फत घेतली जाणारी चाळणी परीक्षा द्यावी लागते.
या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी चाळणी परीक्षा घेतली जाते. या परीक्षेद्वारे ६० विद्यार्थ्यांना प्रवेश दिल जातो.
(२) डिप्लोमा इन योग सायन्स हा एक वर्ष कालावधीचा अभ्यासक्रम आहे. तो कोणत्याही विद्याशाखेतील ५० टक्के गुणप्राप्त पदवीधरास करता येतो. अनुसूचित जाती आणि जमाती संवर्गासठी ४५ टक्के गुण. वयोमर्यादा १ ऑगस्ट रोजी ३० वर्षांपेक्षा कमी असावे.
पदव्युत्तर पदवी असल्यास प्रवेशाच्या वेळेस ५ टक्के वेटेज दिले जाते. पहिल्या सत्रातील निकालावर आधारित १३ गुणवंत उमेदवारांना दरमहा ३०००रुपये शिष्यवृत्ती दिली जाते
(३) डिप्लोमा इन योग थेरपी
जीवनशैलीशी निगडित विविध शारीरिक व मानसिक आजारावर मात करण्यासाठी उपयुक्त ठरणाऱ्य योग थेरपी(उपचारपध्दती) शिकवल्या जातात.यामध्ये पारंपरिक वैद्यकीय ज्ञानाचा समावेश असून व्यक्तिमत्व विकासासाठी हा अभ्यासक्रम उपयुक्त ठरु शकतो.
हा एक वर्ष कालावधीचा अभ्यासक्रम आहे. तो कोणत्याही विद्याशाखेतील ५० टक्के गुणप्राप्त पदवीधरास करता येतो. अनुसूचित जाती आणि जमाती संवर्गासठी ४५ टक्के गुण.
(४) सर्टिफिकेट कोर्स फॉर योग थेरपी असिस्टंट-कालावधी- ६ महिने. अर्हता- कोणत्याही विषयातील १२ वी.
(५) सर्टिफिकेट कोर्स इन योगा फॉर वेलनेस इंस्ट्रक्टर – कालावधी- ६ महिने. अर्हता- कोणत्याही विषयातील १२ वी.
डिप्लोमा इन स्पोर्ट्स कोचिंग(योगासन)
हा वैशिष्ट्यपूर्ण अभ्यासक्रम असून योगासने हा एक क्रीडा प्रकार म्हणून प्रोत्साहन देण्यासाठी त्याचा उपयोग व्हावा असं उद्दिष्ट हा अभ्यासक्रम सुरु करण्यामागे आहे. योगासनांव्दारे शारीरिक मानसिक,सामाजिक,आध्यात्मिक विकास व्हावा,खेळाडूच्या व्यक्तीमत्व विकासाला प्रोत्साहन मिळावं, खेळातील विविध हालचालींचे गुणात्मक आणि संख्यात्मक फरक ओळखता यावा अशी सुध्दा काही उद्दिष्टे आहेत. हा अभ्यासक्रम केल्यावर अधिकृत अर्हताप्राप्त क्रीडा प्रशिक्षण म्हणून करिअर संधी मिळू शकते.
हा एक वर्ष कालावधीचा अभ्यासक्रम आहे. तो कोणत्याही विद्याशाखेतील ५० टक्के गुणप्राप्त पदवीधरास करता येतो. अनुसूचित जाती आणि जमाती संवर्गासठी ४५ टक्के गुण.
एम.एस्सी इन योगा
या क्षेत्रातील उच्च श्रेणीचा अभ्यास करता यावा यासाठी संस्थेन हा अभ्यासक्रम सुरु केला आहे.या अभ्यासक्रमाचा कालावधी दोन वर्षे.तो कोणत्याही विषयातील पदवीधरास करता येतो.पदवी परीक्षेत खुल्या सवंर्गातील विद्यार्थ्यास ५० टक्के आणि आरक्षित संवर्गातील विद्यार्थ्यास ४५ टक्के गुण मिळायला हवेत.
हा अभ्यासक्रम गुरु गोविंद सिंघ इंद्रप्रस्थ युनिव्हर्सिटीशी संलग्न आहे. अभ्यासक्रमाच्या निवडीसाठी, गोविंद सिंघ इंद्रप्रस्थ युनिव्हर्सिटीमार्फत घेतली जाणारी चाळणी परीक्षा द्यावी लागते.
योगाशी संबंधित संशोधन कार्यात साहाय्य करणं,रुग्णालयामध्ये डॉक्टरांना योग उपचारांचं प्रशिक्षण देणं अथवा आजारी व्यक्तीच्या आरोग्य विषयक समस्यांच्या निराकरणासाठी साहाय्य करणं,सर्व पातळीवर योग प्रशिक्षकांचं मनुष्यबळ वाढवण्यासाठी साहाय्य करणं अथवा प्रशिक्षण देणं,जीवनशैलीशी निगडित विवधि प्रकारच्या आरोग्यविषयक समस्यांच्या निराकरणसाठी योग थेरपीचं ज्ञान विद्यार्थ्यांना देणं,योगाच्या माध्यमातून सकारत्मक जीवनशैली आणि व्यक्तिमत्व विकासाला प्रोत्साहन आणि चालना देणं,मानसिक आणि अध्यात्मिक आरोग्य सुदृढ करण्यासाठी प्रोत्साहन देण.
करण्यासाठी पय
(3) सर्टिफिकेट कोर्स इन योगासना फॉर हेल्थ प्रमोशन- कालावधी- ३ महिने. अर्हता- कोणत्याही विषयातील १२वी.हा अभ्यासक्रम अंशकालीन आहे. ५० विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो.
(4) सर्टिफिकेट कोर्स इन प्राणायम ॲण्ड मेडिटेशन फॉर हेल्थ प्रमोशन-कालावधी- ३ महिने. अर्हता- कोणत्याही विषयातील १२वी. हा अभ्यासक्रम अंशकालीन आहे.५० विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो.
(5)मॉड्युलर सर्टिफिकेट कोर्स इन योगा सायन्स- जागतिक पातळीवर योगाचे महत्व वाढवण्यासाठी या अभ्यासक्रमांची संरचना करण्यात आली आहे.योग प्रशिक्षक आणि गुरुंसाठी हा अभ्यासक्रम उपयुक्त ठरु शकतो. मानसिक, अध्यात्मिक आणि शारीरिक क्षमता वाढिसाठीचे आवश्यक असणारे प्रशिक्षण या अभ्यासक्रमात दिले जाते.योगाविषयी अधिकाधिक जनजागृती करण्यासाठी या अभ्यासक्रमाचा उपयोग होतो.कालावधी- साडे तीन महिने. अर्हता – कोणत्याही विषयातील १२वी उत्तीर्ण.
(6)फाउंडेशन कोर्स इन योगा सायन्स फॉर प्रमोशन ऑफ हेल्थ ॲण्ड वेलनेस.या अभ्यासक्रमाला ५० विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. कालावधी- एक महिना
संपर्क- मोरारजी देसाई नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ योग, ६८, अशोका रोड नवी दिल्ली- ११०००१, संकेतस्थळ-http://www.yogamdniy.nic.in/,ईमेल-dr-mdniy@nic.in
0000दूरध्वनी-०११-२३३५१०९९
गुरुकूल कांग्री विश्वविद्यालय हरिद्वार- संस्थेचे अभ्यासक्रम
(१)सर्टिफिकेट कोर्स इन योग.कालावधी सहा महिने.(२) बॅचलर ऑफ आर्ट् स इन योग. कालावधी- तीन वर्षे. अर्हता- कोणत्याही विषयातील १२वी उत्तीर्ण .(३) पोस्ट ग्रॅज्यूएट डिप्लोमा इन ह्युमन कांशिएसनेस ॲण्ड योगिक सायन्स
(४) मास्टर ऑफ आर्ट्स इन ह्युमन कांशिएसनेस ॲण्ड योगिक सायन्स .कालावधी- दोन वर्षे. संपर्क- रजिस्ट्रार, गुरुकूल कांग्री विश्वविद्यालय,गुरुकुल कांग्री, हरिद्वार-२४९४०४,संकेतस्थळ-http://gkv.ac.in, ईमेल-registrar@gkv.ac.in
6) राष्ट्रीय संस्कृत विद्यापीठ- पोस्ट ग्रॅज्यूएट डिप्लोमा इन योग थेरपी ॲण्ड स्ट्रेस मॅनेजमेंट- कालावधी- एक वर्षं. इंटर्नशीप- सहा महिने. अर्हता- कोणत्याही विषयातील पदवी. पांतजली योगशास्त्राची मानवी मन आणि शरीर सुदृढ राहण्यासाठी उपयुक्तता यावर या अभ्यासक्रमात भर देण्यात येतो. संस्कृत भाषेचे ज्ञान असल्यास उत्तम.
संपर्क- राष्ट्रीय संस्कृत विद्यापीठ, तिरुपती-५१७५०७, आंध्रपदेश, संकेतस्थळ-http://rsvidyapeetha.ac.in,ईमेल-registrar_rsvp@yahoo.co.in
सुरेश वांदिले