(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

रुग्णालयांचे प्रशासक

भारतीय आरोग्य सुविधा/सेवा उद्योग क्षेत्रामध्ये २०२५ पर्यंत ३७२ बिलियन डॉलर्सने वाढ अपेक्षित असल्याचे तज्ज्ञांचा कयास आहे. २०२५ पर्यंत भारत सरकारमार्फत एकूण सकल घरेलू उत्पादनाच्या २.५ टक्के गुंतवणूक या क्षेत्रात करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे या क्षेत्रात अनेक संधी नव्याने निर्माण होतील. रुग्णालयांच्या आर्थिक यशासाठी डॉक्टर व इतर वैद्यकीय सहाय्यकांचे मोठा हातभार लागत असला तरी व्यवस्थापकीय तंत्र आणि कौशल्याचा वापर करुन या सेवा अधिक प्रभावीपणे देता येतील त्याचबरोबर रुग्णालयांच्या खर्चातही बचत करता येणे शक्य होऊ शकते. तज्ज्ञाच्या अंदाजानुसार या वाढत्या क्षेत्रासाठी व्यवस्थापकीय मनुष्यबळ किमान अडीच लाखांपर्यंत लागू शकेल.

 

() इंस्टिट्यूट ऑफ हेल्थ मॅनेजमेंट रिसर्च युनिव्हर्सिटी, ही आरोग्यसुविधा क्षेत्रासाठी आवश्यक असणारे स्पेशलाईज्ड अभ्यासक्रम चालवणारी संस्था आहे. या संस्थेने अमेरिकेतील जॉहन्स युनिव्हर्सिटी, इंग्लंडमधील चेस्टर युनिव्हर्सिटी, कॅनडातील युनिव्हर्सिटी ऑफ माँट्रिअल, ऑस्ट्रेलियातील कर्टिन युनिव्हर्सिटींशी सहकार्य केले आहे. भारत सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने या संस्थेस इंस्टिट्यूट ऑफ एक्सलन्सचा दर्जा दिला आहे. अभ्यासक्रम- एमबीए इन हॉस्पिटल ॲण्ड हेल्थ मॅनेजमेंट. कालावधी- दोन वर्षे.

काय शिकाल ?

या अभ्यासक्रमाव्दारे आरोग्यव्यवस्था उद्योग क्षेत्रासाठी आवश्यक असणारे नियोजन, अंमलबजावणी, कार्यान्वयन व्यवस्थापन, या उद्योगाशी संबंधित समस्या व त्यांचे निराकरण, सल्ला-सेवा आणि उद्योजकता. आरोग्य सुविधा उद्योग क्षेत्रातील व्यवस्थापनाच्या गरजा भागविण्यास हे मनुष्यबळ समर्थ ठरत आले आहे.

प्रवेश प्रकिया- या अभ्यासक्रमाला ५० टक्के गुणांसह कोणत्याही विषयातील पदवी घेतलेले उमेदवार प्रवेश घेऊ शकतात. त्यासाठी विद्यार्थ्यांनी कॅट/ मॅट/ झॅट/ जीमॅट/ सीमॅट/ एटीएमए या पैकी कोणतीही एक परीक्षा देणे आवश्यक आहे. या परीक्षेतील गुण प्रारंभिक निवडीसाठी ग्राह्य धरले जातात. या गुणांवर आधारित निवडक विद्यार्थ्यांना मुलाखत आणि समूहचर्चेसाठी बोलावले जाते. यापैकी कोणतीही परीक्षा न दिलेल्या उमेदवारांना संस्थेमार्फत घेण्यात येणारी चाळणी परीक्षा (यू-मॅट- युनिव्हर्सिटी मॅनेजमेंट टेस्ट) द्यावी लागेल.

संपर्क- १, प्रभुदयाल मार्ग, संगानेर एअरपोर्टजवळ, जयपूर-३०२०२९, दूरध्वनी- ०१४१-३९२४७००, ईमेल- iihmr @iihmr.edu.in/ संकेतस्थळ- https://www.iihmr.edu.in/

(२) इंडियन इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट-कोलकता येथे पोस्ट ग्रॅज्युएट सर्टिफिकेट कोर्स इन हेल्थ केअर मॅनेजमेंट हा  अभ्यासक्रम करता येतो. आरोग्य व्यवस्था/सुविधा पुरवणाऱ्या क्षेत्राची वाढ विस्मयकारक आहे. या वाढत्या क्षेत्रासाठी तज्ज्ञ मनुष्यबळाची गरजही वाढत आहे. ही बाब ध्यानात घेऊन आयआयएम कोलकता २०१५ सालापासून  हेल्थकेअर मॅनेजमेंट या विषयाचा अभ्यासक्रम चालवत आहे. या अभ्यासक्रमात या क्षेत्रासाठी आवश्यक सैध्दांतिक ज्ञान आणि प्रात्यक्षिकांचा समावेश आहे. एखादे मोठे रुग्णालय, हेल्थकेअर संस्था येथे प्रात्यक्षिकांची संधी उपलब्ध करुन दिली जाते. अभ्यासक्रम शिकवण्यासाठी या क्षेत्रातील नामवंत तज्ज्ञ व व्यावसायिकांना बोलावले जाते. देशातील दर्जेदार आरोग्य सुविधा/सेवा पुरवणा-या संस्थांचे सहकार्य अभ्यासक्रमाच्या अनुषंगाने घेतले जाते. या अभ्यासक्रमाचा कालावधी एक वर्षाचा आहे.

काय शिकाल?

या अभ्यासक्रमात जागतिक आरोग्य व्यवस्थेतील प्रवाह आणि भारतातील स्थिती, आरोग्यव्यवस्थेचे अर्थशास्त्र, आरोग्यव्यवस्थेचे व्यवस्थापन आणि कार्यान्वयन आणि पुरवठा साखळी व्यवस्थापन, तंत्रज्ञान आणि आरोग्य व्यवस्था, नेतृत्व आणि व्यवस्थापन,
संस्थात्मक संरचना आणि त्यातील बदल, मनुष्य बळ व्यवस्थापन, आरोग्य व्यवस्थेतील संख्यात्मक विश्लेषण, सार्वजिनक आरोग्य, नेतृत्वाच्या शैली, व्यवस्थापकीय संवाद संप्रेषण, आरोग्य व्यवस्थेतील विपणन, वित्त नियोजन, व्युहात्मक व्यवस्थापन. संघर्ष आणि वाटाघाटी, मानवीय मूल्य आणि नैतिकता, सामाजिक न्याय, आपत्ती निवारण व्यवस्थापन, विकसित देशातील कामकाजासंदर्भात आरोग्यविषय प्रश्न/समस्या, आरोग्यविषयक कायदे, आरोग्य सुविधा/सेवा क्षेत्रातील उद्योजकता.

प्रत्येक विद्यार्थ्याला त्यांनीच निवडलेल्या विषयावर व्यक्तिगत आणि समूह प्रकल्प संशोधन व अहवाल तयार करावा लागतो. यासाठी संस्थेचे तज्ज्ञ अध्यापक साहाय्य करतात.

अर्हता- हा अभ्यासक्रम, एमबीबीएस, बीडीएस, बीएएमएस, जैवतंत्रज्ञान किंवा जैन वैद्यकीय विषयातील पदवी प्राप्त उमेदवार प्रवेश घेऊ शकतात. तथापि आरोग्य व्यवस्था/सेवा क्षेत्रात किमान दोन वर्षाचा अनुभव असणाऱ्या कोणत्याही विद्याशाखेतील पदवीधर सुध्दा या अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ शकतात.पदवी/पदव्युत्तर पदवी परीक्षेत किमान ५० टक्के गुण मिळणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांच्या निवडीसाठी चाळणी परीक्षेतील गुण, शैक्षणिक अर्हता, अनुभव, मुलाखत या घटकांना अवलंबण्यात येते. संपर्क- https://www.iimcal.ac.in/ldp/PGCHM

() सिम्बॉयसीस इंस्टिट्यूट ऑफ हेल्थ्‍ सायन्स या संस्थेने दोन वर्षे कालावधीचा, एमबीए इन हॉस्पिटल ॲण्ड हेल्थ केअर मॅनेजमेंट हा अभ्यासक्रम सुरु केला आहे. या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी संस्थेमार्फत घेतली जाणारी चाळणी परीक्षा द्यावी लागते. अर्हता- कोणत्याही विषयातील पदवी. संपर्क- सिम्बॉयसीस इंस्टिट्यूट ऑफ हेल्थ सायन्स, सिम्बॉयसीस इंटरनॅशनल (डीम्ड युनिव्हर्सिटी) युनिव्हर्सिटी कॅम्पस, हिल बेस, लव्हाळे. पुणे-४१२११५, ईमेल- admissions_nd@sihspune.org, संकेतस्थळ- www.sihspune.org, दूरध्वनी- ०२०-६६९७५०४०

 (४) इंस्टिट्यूट ऑफ क्लिनिकल रिसर्च या संस्थेने एमबीए इन हेल्थकेअर मॅनेजमेंट, हा दोन वर्षे कालावधीचा आणि पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन हॉस्पिटल मॅनेजमेट हा एक वर्षे कालावधीचा अभ्यासक्रम सुरु केला आहे. संपर्क- ईमेल- info@icriindia.com

(५) इंडियन इंस्टिटयूट ऑफ मॅनेजमेंट – अहमदाबादने, करोनोत्तर काळातील आरोग्य व्यवस्था/ सेवा क्षेत्राचे आव्हान स्वीकारु शकणारा, हेल्थ केअर मॅनेजमेंट इन पोस्ट कोवीड इंडिया, हा अभ्यासक्रम सुरु केला आहे. हा अभ्यासक्रम ऑनलाइन करता येतो. सध्यातरी हा अभ्यासक्रम  आरोग्य व्यवस्था सुविधा/सेवा क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या वरिष्ट पातळीवरील मनुष्यबळासाठी आहे.

काय शिकाल ?

या अभ्यासक्रमात आरोग्य सुविधा/सेवा क्षेत्राच्या मार्केटसाठी व्युहनीती, या क्षेत्रातील अर्थकारण, या क्षेत्रासाठीचे सांख्यिकी ज्ञान, या क्षेत्राचे कार्यान्वयन व्यवस्थापन, बिग डेटा आणि ॲनॅलिटिक्स तंत्र, व्यवसाय प्रारुप आणि उद्योजकता, भारतीय आरोग्य सुविधा/सेवा क्षेत्रासाठी सार्वजनिक धोरण आणि नियामके आदी विषय घटकांचा समावेश आहे.

संपर्क- आयआयएम, न्यू कॅम्पस वस्त्रपूर, अहमदाबाद- ३८०१५, दूरध्वनी- ०७९-७१५२६४००, ७१५२६३००, ७१५२६६००, ईमेल- exed@iima.ac.in, संकेतस्थळ-https://web.iima.ac.in/exed

(६) इंडियन इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट- इंदोरने, सर्टिफ‍केट कोर्स इन हेल्थ केअर मॅनेजमेंट हा अभ्यासक्रम सुरु केला आहे. कालावधी एक वर्षं. अर्हता- ५० टक्के गुणांसह कोणत्याही ज्ञान शाखेतील पदवी किंवा पदव्युत्तर पदवी किवा आरोग्य सुविधा/सेवा पुरवठा करणाऱ्या संस्थेतील व्यवस्थापकीय स्वरुपाचा ५ वर्षाचा अनुभव. संपर्क- https://courses.hugheseducation.com/iim-indore-post-graduate-certificate-in-healthcare-management

() ऑल इंडिया इंस्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स दिल्ली येथे मास्टर ऑफ हॉस्पिटल ॲडमिनिस्ट्रेशन हा दोन वर्षाचा अभ्यासक्रम करता येतो. हा या क्षेत्रातील देशातील सर्वाधिक जुना अभ्यासक्रम आहे. संपर्क- एम्स, अंसारी नगर, नवी दिल्ली-११००२९, दूरध्वनी- ०११- २६५८८५००, https://www.aiims.edu/

() इंटरनॅशनल इंस्टिट्यूट ऑफ हॉस्पिटल मॅनेजमेंट  ॲण्ड रिसर्च- दिल्ली येथे पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन हॉस्पिटल ॲण्ड हेल्थकेअर मॅनेजमेंट, हा दोन वर्षे कालावधीचा अभ्यासक्रम चालवला जातो. या अभ्यासक्रमांतर्गत, हॉस्पिटल मॅनेजमेंट, हेल्थ मॅनेजमेंट आणि हेल्थ इन्फॉर्मेशन सिस्टिम या तीन विषयांमध्ये स्पेशलायझेशनची सुविधा आहे. या अभ्यासक्रमाला अखिल भारतीय तंत्रशिक्षण मंडळाची मान्यता प्राप्त आहे. अर्हता- कोणत्याही ज्ञानशाखेतील पदवी. रुग्णालयाला भेडसावणाऱ्या व्यवस्थापकीय समस्यांचे निराकरण करणे, आरोग्यसुविधा पुरवणाऱ्या संस्थांचे नियोजन, बांधणी आणि नियोजनाचे कौशल्य प्रदान करणे, नागरी आणि ग्रामीण भागात आरोग्य सुविधांचा पुरवठा करणाऱ्या मनुष्यबळाचे प्रशिक्षण व अशा मनुष्यबळाचा विकास करणे आदी बाबींचे सैध्दांतिक ज्ञान या अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांना दिले जाते. या अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी कॅट/ मॅट/ झॅट/ जीमॅट/ सीमॅट/ एटीएमए या पैकी कोणतीही एक परीक्षा देणे आवश्यक आहे. या परीक्षेतील प्रारंभिक निवडीसाठी ग्राह्य धरले जातात. या गुणांवर आधारित निवडक विद्यार्थ्यांना मुलाखत आणि समूह चर्चेसाठी बोलावले जाते. या दोन्ही बाबींमधील काम‍गिरी आणि चाळणी परीक्षेतील गुणांवर आधारित अंतिम निवड केली जाते. या अभ्यासक्रमाचा कालावधी दहा महिन्यांचा असून तो ३० जून २०२१ पासून सुरु होत आहे.

संपर्क- आयआयएचएमआर,प्लॉट नंबर ३, सेक्टर १८ ए,व्दारका, फेज टू,न्यू दिल्ली- ११००७५, दूरध्वनी-०११-३०४१८९००, ईमेल-info.delhi@iihmrdelhi.edu.in, संकेतस्थळ- iihmrdelhi.edu.in

000