वनव्यवस्थापन विषयक महत्वाचा अभ्यासक्रम इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ फॉरेस्ट मॅनेजमेंट या संस्थेने सुरु केला आहे. ही संस्था भारत सरकारच्या पर्यावरण आणि वने मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत आहे. या या संस्थेमार्फत पुढील अभ्यासक्रम चालवले जातात.
(१) पोस्ट ग्रॅज्युएट प्रोग्रॅम इन फॉरेस्ट्री मॅनेजमेंट, हा दोन वर्षे कालावधीचा अभ्यासक्रम चालविला जातो. हा अभ्यासक्रम निवासी स्वरुपाचा आहे. या अभ्यासक्रमाला पदव्युत्तर पदवी (मास्टर्स डिग्री) चा दर्जा मिळाला आहे.
(२) पोस्ट ग्रॅज्युएट प्रोग्रॅम इन सस्टेनिबिलिटी मॅनेजमेंट. कालावधी- दोन वर्षे. अर्हता- कोणत्याही विषयातील पदवी.
प्रवेश प्रक्रिया
या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी कॉमन एन्ट्रन्स टेस्ट (कॅट), झेव्हियर ॲप्टिट्यूड टेस्ट (झॅट), मॅनेजमेंट ॲडमिशन टेस्ट (मॅट), कॉमन मॅनेजमेंट ॲडमिशन टेस्ट (सी-मॅट), ग्रॅज्युएट मॅनेजमेंट ॲप्टिट्युड टेस्ट (जी मॅट )एन्ट्रन्स यापैकी कोणत्याही एका परीक्षेचे गुण प्रारंभिक निवडीसाठी (शॉर्टलिस्टिंग) ग्राह्य धरले जातात.
(२) या परीक्षांना बसलेल्या विद्यार्थ्यांना या संस्थेचा स्वतंत्र अर्ज भरावा लागेल. (३) चाळणी परीक्षेच्या गुणांवर आधारित निवडलेल्या विद्यार्थ्यांना समुहचर्चा आणि मुलाखतीसाठी बोलावण्यात येते. ही चाळणी भोपाळ येथे एप्रिल /मे मध्ये घेतली जाते.
(३) पीएचडी या संस्थेने खालील विषयांमध्ये प्रगत संशोधनाची संधी उपलब्ध करुन दिली आहे.
१) कम्युनिकेशन ॲण्ड एक्सटेंशन मॅनेजमेंट, २) इकोसिस्टम ॲण्ड एन्व्हॅायरेन्मेन्ट मॅनेजमेंट, ३) फायनांशियल मॅनेजमेंट, ४) ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट, ५) मार्केटिंग मॅनेजमेंट, ६) एन्व्हॅायरेन्मेन्ट ॲण्ड डेव्हलपमेंट इकॉनॉमिक्स, ७) इंफर्मेशन टेक्नालॉजी ॲण्ड क्वांटिटेटिव्ह टेक्निक्स, ८) सोशिऑलॉजी ॲण्ड कम्युनिटी डेव्हलपमेंट, ९) टेक्निकल फॉरेस्ट्री.
अर्हता- कोणत्याही विषयातील ५० टक्के गुणांसह पदवी आणि संशोधनासाठी सुयोग्य विषयातील ५५ टक्के गुणांसह पदव्युत्तर पदवी / उत्तम गुणांसह पाच वर्षे किंवा चार वर्षे कालावधीचे पदव्युत्तर पदवी इंटिग्रेटेड अभ्यासक्रम किंवा ५५ टक्के गुणांसह सीए , आयसीडब्ल्यूए ,कंपनी सेक्रेटरी अभ्यासक्रम उत्तीर्ण विद्यार्थी किंवा इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ फॉरेस्ट मॅनेजमेंट या संस्थेमधून पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन फॉरेस्ट्री मॅनेजमेंट किंवा इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट या संस्थेमधून पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन मॅनेजमेंट हा अभ्यासक्रम विशिष्ट गुणांसह उत्तीर्ण विद्यार्थी.
संशोधनासाठी प्रवेश मिळवू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी पुढील चाळणी परीक्षा उत्तीर्ण करणे आवश्यक आहे- १) इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटमार्फत घेण्यात येणारी कॉमन एंट्रस टेस्ट किंवा ग्रॅज्युएट मॅनेजमेंट ॲप्टिट्युड टेस्ट (जीमॅट). या परीक्षांमध्ये मिळालेल्या गुणांवर आधारित उमेदवारांची गुणवत्ता यादी तयार केली जाते. २) युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन मार्फत घेण्यात येणाऱ्या नॅशनल इलिजिबिलिटी टेस्ट किंवा ज्युनिअर रिसर्च फेलोशीप परीक्षा. ३) ग्रॅज्युएट ॲप्टिट्यूड टेस्ट इन इंजिनीअरिंग (गेट)मधील सुयोग्य गुण (व्हॅलिड स्कोअर). अशा उमेदवारांना समूह चर्चा आणि मुलाखतीसाठी भोपाळ येथे बोलावले जाते.
पत्ता- चेअरपर्सन ॲडमिशन, फेलो प्रोग्रॅम इन मॅनेजमेंट, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ फॉरेस्ट मॅनेजमेंट, नेहरु नगर, भोपाळ-४६२००३, दूरध्वनी- ०७५५ २६७१९२९, संकेतस्थळ-www.iifm.ac.in, ई-मेल-admission@iifm.ac.in
०००
फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिट्यूट,देरहादून
अभ्यासक्रम
(१) एम.एस्सी इन फारेस्ट्री (अर्हता-वनस्पतीशास्त्र, रसायनशास्त्र, भूगर्भशास्त्र, गणित, भौतिकशास्त्र, प्राणिशास्त्र या विषयातील विज्ञान पदवी किंवा फॉरेस्ट्री या विषयातील पदवी, (२) एम.एस्सी इन वूड सायन्स ॲण्ड टेक्नॉलॉजी (अर्हता-रसायनशास्त्र, गणित, भौतिकशास्त्र, विषयातील विज्ञान पदवी किंवा फॉरेस्ट्री या विषयातील पदवी, (३) एम.एस्सी इन एन्व्हॅायरेन्मेन्ट मॅनेजमेंट (अर्हता-वनस्पतीशास्त्र, रसायनशास्त्र, भूगर्भशास्त्र गणित, भौतिकशास्त्र, प्राणिशास्त्र या विषयातील विज्ञान पदवी किंवा फॉरेस्ट्री वा कृषी या विषयातील पदवी किंवा बी.टेक किंवा बी.ई, (४) एम.एस्सी इन सेल्युलोज ॲण्ड पेपर टेक्नॉलॉजी (अर्हता- रसायनशास्त्र या विषयासह विज्ञान पदवी )
पत्ता- रजिस्ट्रार, फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिट्यूट ,पोस्ट ऑफिस न्यू फॉरेस्ट, देहरादून, दूरध्वनी-,०१३५-२२२४४३९, ,संकेतस्थळ – http://fridu.edu.in/
सुरेश वांदिले