(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

व्हा तंत्रोव्यवस्थापक!

देशातील दहा इंडियन इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (आयआयटी) यांनी व्यवस्थापन विषयातील पदव्युत्तर पदवी (एमबीए) अभ्यासक्रम सुरु केले आहेत. या आयआयटी पुढील प्रमाणे आहेत- (१) आयआयटी- मुंबई, (२) आयआयटी-मद्रास, (३) आयआयटी-कानपूर, (४) आयआयटी-दिल्ली, (५) आयआयटी-धनबाद, (६) आयआयटी-जोधपूर, (७) आयआयटी-रुरकी, (८) आयआयटी- मंडी, (९) आयआयटी- खरगपूर,  (१०) आयआयटी- गौहाटी.

उद्योग,व्यवसाय आणि स्टार्टअप यांना उच्च गुणवत्ता प्राप्त तंत्रोव्यवस्थापक मिळावे या अनुषंगाने, आयआयटीमधील एमबीए अभ्यासक्रमाची संरचना करण्यात आली आहे.

आयआयटीच्या कॅम्पसमध्येच एमबीएची संस्था असते. त्यामुळे आयआयटीच्या सर्व (शैक्षणिक,ग्रंथालय,क्रीडांगण,व्यक्तीमत्व विकासाचे कार्यक्रम इत्यादी) पायाभूत सोईसुविधांचा लाभ  विद्यार्थ्यांना मिळतो. देश विदेशातील उद्योगजगतात आयआयटी ब्रँडचे महत्व आहे असल्याने या एमबीए अभ्यासक्रमांच्या प्लेसमेंटसाठी देशातील नामवंत कंपन्या येतात. आयआयटीतील दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण अध्यापन, तंत्रकौशल्याचा लाभ, एमबीए अभ्यासक्रमासाठीही मिळतो. हा अभ्यासक्रम शिकवण्यासाठी, कायमस्वरुपी उच्च प्रशिक्षित अध्यापक असतातच शिवाय, उद्योग जगतातील नामवंत तज्ज्ञही शिकवायला येतात. विद्यार्थ्यांना हमखास इंटर्नशीपची संधी मिळते. त्यामधून अनेकांना, प्री प्लेसमेंट ऑफर म्हणजेच शिकत असतानाचा नोकरीची ऑफर मिळते. सर्वच संस्थांमध्ये १०० टक्के प्लेसमेंट होत असते. काही आयआयटीमधील एमबीए विद्यार्थ्यांना, अनेक आयआयएमपेक्षा चांगले वार्षिक पॅकेज मिळते. काही आयआयटीमधील एमबीए अभ्यासक्रमांना, नॅशनल इंस्टिट्यूशनल फ्रेमवर्क रॅकिंग (एनआयआरएफ) मध्ये, बऱ्याच आयआयएमपेक्षा वरचा क्रमांक मिळाला आहे. उदा- दिल्ली आयआयटी एमबीएचा एनआयआरएफ क्रमाक ४ आहे, मुंबई आयआयटी एमबीएचा क्रमांक १४, आयआयटी मद्रास एमबीए क्रमांक १३, आयआयटी रुरकी एमबीए क्रमांक २२, आयआयटी खरगपूर एमबीए क्रमांक १२,  कानपूर आयआयटी एमबीए क्रमांक- २७, धनबाद आयआयटी एमबीए क्रमांक-४८ आहे.

आयआयटीमधील एमबीएचे शिक्षण शुल्कही इंडियन इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटपेक्षा तुलनेने कमी असते. काही विद्यार्थ्यांना ते जास्त वाटण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र अशा विद्यार्थ्यांना, सुलभतेने शैक्षणिक कर्ज मिळू शकते. सार्वजनिक क्षेत्रातील बँकासोबतच खाजगी क्षेत्रातील बँकाही, आयआयटी ब्रँड लक्षात घेऊन विनासायास शैक्षणिक कर्ज देतात. मुलींना व्याजदरात अर्धा टक्के सुट दिली जाते. बहुतेक एमबीए  अभ्यासक्रम हे निवासी स्वरुपाचे आहेत. विद्यार्थ्यांना राहण्यासाठी आयआयटी परिसरातच वसतिगृहाची सुविधा उपलब्ध करुन दिली जाते.

निवड प्रक्रिया

आयआयटीमधील एमबीए प्रवेशासाठी, कॅट परीक्षेतील  गुणांचा उपयोग प्रारंभिक निवडीसाठी केला जातो. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी कॅट परीक्षा दिली असेल, तेच विद्यार्थी आयआयटी मधील एमबीएसाठी पात्र ठरतात. अशा विद्यार्थ्यांना प्रत्येक आयआयटी मधील एमबीए प्रवेशासाठी कॅटमधील गुणांसह स्वतंत्ररित्या अर्ज करावा लागतो. प्रवेशासाठी अर्ज केलेल्या निवडक उमेदवारांना, या गुणांच्या आधारे, पुढील टप्प्याच्या प्रवेश प्रकियेसाठी निवड केली जाते. या निवडक उमेदवारांची संख्या, संबंधित संस्थेतील एकूण प्रवेश संख्येच्या ५ ते १० पट राहू शकते. या उमेदवारांना संस्थेच्या कॅम्पसमध्ये मुलाखत, समूह चर्चा किंवा लेखन कौशल्य चाचणी अशा टप्प्यांसाठी निवडले जाते. कॅटमधील गुण, दहावी- १२वी- पदवीमधील गुण-मुलाखत/समूह चर्चेतील गुण-कार्यानुभव, मुलींसाठी विशेष गुण, इतर कामगिरी, अशा घटकांवरच्या एकत्रित गुणांवर अंतिम निवड केली जाते. प्रत्येक आयआयटीच्या मॅनेजमेंट स्कूलच्या अंतिम निवडीसाठी वेगवेगळ्या अर्हता वापरल्या जातात. त्याची विस्तृत माहिती संस्थेच्या संकेतस्थळावर देण्यात आली आहे. या एमबीएसाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना पदवी परीक्षेत आणि कॅट परीक्षेत एकूण गुण (पर्सेंटाइल) सोबतच प्रत्येक घटकांमध्ये विशिष्ट गुण मिळणे आवश्यक असते. उदा-आयआयटी मुंबईच्या एमबीए प्रवेशासाठी पदवी परीक्षेत किमान ६० टक्के गुण आवश्यक आहेत. कॅट परीक्षेत किमान ९० टक्के पर्सेंटाल आवश्यक आहेत. तथापि क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड/संख्यात्मक कल चाचणी, व्हर्बल ॲण्ड रिडिंग कॉम्प्रिहेंशन (इंग्रजी आकलन व शब्दकौशल्य चाचणी) आणि डाटा इंटरप्रिटेशन ॲण्ड लॉजिकल रिझनिंग(माहिती विश्लेषण आणि कार्यकारणभाव) या तिनही घटकांमध्ये किमान ७५ पर्सेंटाल मिळणे आवश्यक आहे. समजा एकूण पर्सेंटाल ९० असूनही एखाद्या घटकात ७४ टक्के पर्सेंटाल असल्यास अर्ज नाकारला जातो.  या सर्वबाबींची माहिती संस्थांच्या संकेतस्थळावर देण्यात आली आहे. कॅट परीक्षा दिलेल्या अधिकाधिक महाराष्ट्रीय उमेदवारांनी, आयआयटीमधील एमबीए प्रवेशासाठी संस्था आणि अभ्यासक्रम

(१) आयआयटी मंडीच्या स्कूल ऑफ मॅनेजमेंट मार्फत एमबीए इन डाटा सायंस ॲण्ड आर्टिफिशिअल इंटेलिजन्स हा स्पेशलाइज्ड अभ्यासक्रम चालवला जातो.

संपर्क– https://som.iitmandi.ac.in/programs/mba

(अर्ज करण्याची शेवटची तारीख- ३१ जानेवारी २०२६)

() आयआयटी जोधपूरच्या स्कूल ऑफ मॅनेजमेंट अँड आंत्रप्रिन्युरशिप मार्फत (१) एमबीए, (२) एमबीए टेक्नॉलॉजी आणि (३) एमबीए इन फिनटेक ॲण्ड सायबर सेक्युरिटी हे तीन अभ्यासक्रम चालवले जातात.

(अर्ज करण्याची शेवटची तारीख १२ फेब्रुवारी २०२६)

संपर्क- iitj.ac.in/schools

() आयआयटी मद्रासच्या डिपार्टमेंट ऑफ मॅनेजमेंट सायंस येथे एमबीए हा अभ्यासक्रम चालवला जातो.

या अभ्यासक्रमांतर्गत (१) फायनांस, (२)इंटिग्रेटिव्ह मॅनेजमेंट, (३)इन्फॉर्मेशन सिस्टिम, (४)मार्केटिंग, (५)ह्युमन रिसोर्स ॲण्ड ऑर्गनायझेशनल बिहेव्हिअर, (६) ऑपरेशन या विषयांमध्ये स्पेशलायझेशन करता येतं.

संपर्क-doms.iitm.ac.in

(अर्ज करण्याची शेवटची तारीख- ३१ जानेवारी २०२६)

() आयआयटी खरगपूरच्या विनोद गुप्ता स्कूल ऑफ मॅनेजमेंट येथे, एमबीए अभ्यासक्रम चालवला जातो.

 संपर्क-som.iitkgp.ac.in

(अर्ज करण्याची शेवटची तारीख- ५ फेब्रुवारी २०२६)

() आयआयटी गौहाटीच्या स्कूल ऑफ मॅनेजमेंट मार्फत एमबीए हा अभ्यासक्रम चालवला जातो.

संपर्कhttps://www.iitg.ac.in/sob

(अर्ज करण्याची शेवटची तारीख- ८ फेब्रुवारी २०२६)

() आयआयटी कानपूरच्या इंडस्ट्रिअल ॲण्ड मॅनेजमेंट इंजिनीअरिंग मार्फत एमबीए अभ्यासक्रम चालवला जातो.

संपर्क– https://iitk.ac.in/doms

(अर्ज करण्याची शेवटची तारीख- ३१ जानेवारी २०२६)

() आयआयटी रुरकीच्या डिपार्टमेंट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज मार्फत एमबीए अभ्यासक्रम चालवला जातो. या एमबीएला दोन प्रकारे प्रवेश दिला जातो- (१) कॅट परीक्षेत किमान ६० पर्सेंटाइल व मुलाखत/व्यक्तीमत्व चाचणी) आणि (२) विशिष्ट गुणांसह, कोणत्याही आयआयटीमधून अभियांत्रिकी पदवी घेतलेल्या विद्यार्थ्यांची फक्त मुलाखतीव्दारेच निवड केली जाते.

या आयआयटीने  महिला उमेदवारांसाठी, गोल्डन गर्ल स्किम कार्यान्वित केली आहे.या योजनेव्दारे महिला उमेदवांराना थेट प्रवेश दिला जातो.अशा महिला उमेदवारांनी आयआयटी किंवा एनआयआरएफ मधील पहिल्या ५० मध्ये असणाऱ्या संस्थांमधील अभियांत्रिकी/तंत्रज्ञान पदवी परीक्षेत पहिला क्रमांक मिळवलेला असावा.(एनआरआयएफ-नॅशनल इंस्टिट्यूशनल रॅकिंग फ्रेमवर्क)

संपर्क-ms.iitr.ac.in

(अर्ज करण्याची शेवटची तारीख- ३१ जानेवारी २०२६)

() आयआयटी धनबादच्या डिपार्टमेंट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज ॲण्ड आंत्रप्रिन्युरशीप मार्फत एमबीए आणि एमबीए-बिझिनेस ॲनॅलिटिक्स हे अभ्यासक्रम चालवले जातात.

एमबीए- अभ्यासक्रमाला कोणत्याही शाखेतील पदवीधरास प्रवेश मिळू शकतो. एमबीए (बिझिनेस ॲनॅलिटिक्स) -या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी, कोणत्याही शाखेतील बीई/बीटेक पदवीधारक पात्र ठरतात.

संपर्क https://admissions.iitism.ac.in/mba

(अर्ज करण्याची शेवटची तारीख- ३१ जानेवारी २०२६)

() आयआयटी मुंबईच्या शैलेश जे मेहता स्कूल ऑफ मॅनेजमेंट स्टडीज मार्फत एमबीए हा अभ्यासक्रम चालवला जातो. यंदापासून एमबीबीए, बीडीएस, बीएएमएस आणि बीएचएमएस हे पदवीधारकसुध्दा या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी अर्ज करु शकतात. (या संस्थेत गेल्या वर्षी प्लेसमेंटसाठी ४८ कंपन्या आल्या. सर्वोच्च वार्षिक पॅकेज ५४ लाख रुपये होते. महिला उमेदवारांचे सरासरी पॅकेज २९.७ लाख रुपये होते. एकूण सरासरी वार्षिक पॅकेज २८.८८ लाख रुपये होते. ४७ टक्के विद्यार्थ्यांना प्री प्लेसमेंट ऑफर मिळाल्या. या विद्यार्थ्यांना सरासरी वार्षिक पॅकेज हे २९ लाख रुपयांचे होते.)

अर्हता -कोणत्याही विद्याशाखेतील पदवीधारक

संपर्क- som.iitb.ac.in

(१०) आयआयटी दिल्लीच्या डिपार्टमेंट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज मार्फत एमबीए आणि एमबीए- टेलिकम्युनिकेशन सिस्टिम्स मॅनेजमेंट हे अभ्यासक्रम चालवले जातात.

संपर्क-dms.iitd.ac.in.

(अर्ज करण्याची शेवटची तारीख- २६ जानेवारी २०२६)

या एमबीए अभ्यासक्रमांना कोणत्याही विद्याशाखेतील पदवीधरांना प्रवेश मिळू शकतो. या एमबीए अभ्यासक्रमांची प्रवेश प्रकिया सुरु झाली आहे.