(१)स्टायलिंग
दूरचित्रवाणीवरील विविधांगी कार्यक्रम आणि कोणत्याही लाइव्ह कार्यक्रमांमध्ये स्टायलिस्ट महत्वाची भूमिका बजावत असतो. संपूर्ण कार्यक्रमाचे देखणेपण या स्टायलिस्टच्या कलाकारीवर अवलंबून असते. सध्याच्या काळात तर अनेक कलाकार स्वत:चा व्यक्तीगत स्टायलिस्ट ठेवतात. कौन बनेगा करोडपतीमध्ये ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या संपूर्ण सिझनच्या पेहराव (पोषाख-टाय-रुमाल-कफलिंग-पादत्राणे) यांचा सूक्ष्म विचार करण्यासाठी स्वतंत्र स्टायलिस्ट प्रत्येक सिझन सुरु होण्यापूर्वी काही महिने तयारी करत असतो.
नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी या संस्थेने सहा महिने कालावधीचा क्रिएटिव्ह फॅशन स्टायलिंग,हा अभ्यासक्रम सुरु केला आहे. या
अभ्यासक्रमात समकालीन फॅशनच्या संकल्पना,छायाचित्रणाचे तंत्र, सादरणीकरण तंत्र,पोषाखांचा कल, हेअर आणि मेक अप तंत्र, साहित्याची उपलब्धता, मॉडेल कास्टिंग आदी बाबींचे ज्ञान प्रदान केले जाते. कोणत्याही ज्ञानशाखेतील १२वी उत्तीर्ण विद्यार्थी हा अभ्यासक्रम करु शकतो. फॅशन स्टायलिंग आणि प्रतिमा संवर्धन कंपन्यांमध्ये करिअरची संधी मिळू शकते. भविष्यात स्वतंत्ररीत्या कार्य करता येणे शक्य होते.
संपर्क- नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी कॅम्पस,
प्लॉट नंबर १५,सेक्टर ४, खारघर, नवी मंबई ४१० २१०, दूरध्वनी-०२२-२७७४७०००, ईमेल-nift.mumbai@ nift.ac.in ,संकेतस्थळ-https://ww.nift.ac.in/mumbai
०००
(२) फोटोग्रॅफी
ही वेगळी कला आहे. प्रतिमा निर्मितीसाठी या कलेचा उपयोग होतो.भारत आणि सर्व जगात सातत्याने फॅशन संदर्भात नवे प्रवाह आणि कल येत असतात. त्याचे उत्तम आणि उत्कृष्ट सादरीकरण करुन ते लोकापर्यंत प्रभावीरीत्या नेण्याचे कार्य फॅशन फोटोग्रॅफर करतात.
फॅशन फोटोग्रॅफीमध्ये करिअर करता येणे सुलभ होईल असा, सर्टिफिकेट कोर्स इन फॅशन फोटोग्रॅफी हा अभ्यासक्रम पर्ल ॲकॅडमीने सुरु केला आहे. या कलेचे तंत्र पक्के करण्यासाठी या अभ्यासक्रमात डिझायनिंगच्या मुलभूत बाबी, फॅशनचा इतिहास आणि उत्क्रांती, कॅमेरा-लेन्स-लाइट- लाइट मॉडिफायर्स यांच्या तांत्रिक बाबी, डिजिटल डार्करुम, फॅश्न मॉडलेचे पोर्टफोलिओ (बायोडाटा) निर्मिती,फॅशन फोटोग्रॅफीमधील व्यवसाय संधी इत्यादी बाबींचे ज्ञान प्रदान केले जाते.
फॅशन मॅगेझिन, ॲडव्हटार्यजिंग एजंसी, फॅशन हाऊसेस, फॅशन डिझायनर्स, फॅशन शो ऑर्गनायझर,फॅशन ब्लॉगर, फॅशन इंफ्लयुंसर्स, मॉडेलिंग एजंसी यामध्ये करिअर करण्याची संधी मिळू शकते.
संपर्क– एस.एम सेंटर, अंधेरी कुर्ला रोड, मरोळ स्टेशनच्या बाजूला, अंधेरी पूर्व,मुंबई-४०००५९, दूरध्वनी-०२-४०५८५४००, ईमेल- registrar.mumbai@pearlacademy.com,संकेतस्थळ- https://pearlacademy.com