(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

केंद्र शासनाच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयामार्फत इंडियन इंस्टिट्यूट ऑफ इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी (आयआयआयटी) या संस्था देशातील विविध ठिकाणी सुरु करण्यात आल्या आहेत. या संस्थांमध्ये बीटेक, एमटेक आणि पीएचडी अभ्यासक्रम करता येतात. संगणकशास्त्र, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान या विषयातील दर्जेदार शिक्षण या संस्थांमध्ये देण्यात येते.

भारत सरकारच्या केंद्रिय शिक्षण मंत्रालयाने या संस्थांची स्थापना केली आहे. माहिती तंत्रज्ञान, संगणकशास्त्र आणि इलेक्ट्रॉनिक्स या विषयातील उच्च प्रतिचे शिक्षण-प्रशिक्षण विद्यार्थ्यांना मिळण्यासाठी या संस्थांच्या वतिने प्रयत्न केले जातात. या संस्थांना स्वायत्तता प्रदान करण्यात आली आहे. या संस्था काळानुरुप व उद्योगांच्या गरजा लक्षात घेऊन स्वत:चा अभ्यासक्रम ठरवत असतात वा त्यात बदल करत असतात.

एनआयटी(नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी)मध्ये कॉम्प्युटर सायन्स , इलेक्ट्रॉनिक्स ॲण्ड टेलिकम्युनिकेशन या शाखांमध्ये प्रवेश मिळत नसल्यास आयआयआयटीमधील या अभ्यासक्रमांना प्रवेश घेणे उचित ठरेल.

या संस्थांमधील प्रवेश हे, जॉईंट एन्ट्रन्स एक्झामिनेशन- मेनच्या गुणांवर आधारित केले जातात. एनआयटी सोबत महाराष्ट्रीय विद्यार्थ्यांनी या संस्थांमधील प्रवेशासाठी तयारी ठेवायला हवी. देशात एकूण २५ आयआयआयटी आहेत. यातील अलाहाबाद, ग्वाल्हेर, जबलपूर, कांचिपूरम आणि कुर्नूल या संस्थांना पूर्णपणे केंद्रिय शिक्षण मंत्रालयामार्फत मार्फत निधी पुरवला जातो. उर्वरित २० आयआयआयटी मध्ये ५० टक्के गुंतवणूक केंद्रिय शिक्षण मंत्रालयाची, ३० टक्के गुंतवणूक राज्य शासनाची आणि २० टक्के गुंतवणूक ही उद्योग समुहाची असते. (उदा- नागपूर येथील आयआयआयटी या संस्थेमध्ये ५० टक्के गुंतवणूक केंद्रिय शिक्षण विभागाची, ३० टक्के गुंतवणूक महाराष्ट्र शासनाची आणि २० टक्के गुंतवणूक टाटा कंसलटन्सी या कंपनीने केली आहे.) या सर्व संस्थांना इंस्टिट्यूट ऑफ नॅशनल इम्पॉर्टन्सचा दर्जा देण्यात आला आहे.

एनआयटी(नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी)च्या धर्तीवर या संस्थांचा विकास केंद्र सरकारमार्फत करण्यात येत आहे. उच्च प्रशिक्षित अध्यापक, उत्तम प्रयोगशाळा आणि दर्जेदार शिक्षण व संशोधनाची सुविधा या ठिकाणी उपलब्ध आहेत. त्यामुळे महाराष्ट्रीय विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी या संस्थांचा निश्चितपणे विचार करायला हवा.

या सर्व संस्थांमध्ये प्लेसमेंट आणि ट्रेनिंग सेल उघडण्यात आले आहेत. या सेल द्वारे सर्व विद्यार्थ्यांना उद्योगामध्ये इंटर्नशीपची संधी मिळवून दिली जाते. चांगल्या कंपन्या आणि उद्योग या संस्थांमधे प्लेसमेंटसाठी येत असल्याने, पदवीनंतर पुढे काय हा प्रश्न येथील विद्यार्थ्यांसाठी संपून जातो.

माहिती तंत्रज्ञान उद्योगाच्या गरजा लक्षात घेऊन अभ्यासक्रमाची संरचना करण्यात आल्याने विद्यार्थ्यांना उत्तमोत्तम संधी मिळणे सुलभ जाऊ शकते.

आयआयआयटी- नागपूर

या संस्थेत बीटेक इन (१) कॉम्प्युटर सायन्स ॲण्ड इंजिनीअरिंग , (२) इलेक्ट्रॉनिक्स ॲण्ड कम्युनिकेशन इंजिनीअरिंग हे दोन अभ्यासक्रम करता येतात.

कॉम्प्युटर सायन्स ॲण्ड इंजिनीअरिंग या विषयांतर्गत डीप लर्निंग, मशिन लर्निंग, पॅरलल कॉम्प्युटिंग, हाय परफार्मनंस कॉम्पुटिंग, इंटरनेट ऑफ थिंग्ज, डाटा मायनिंग या सारख्या विषय घटकांवर प्राधान्याने लक्ष पुरवण्यात येते.

इलेक्ट्रॉनिक्स ॲण्ड कम्युनिकेशन इंजिनीअरिंग या विषयांतर्गत सिग्नल प्रोसेसिंग, इमेज ॲण्ड व्हीडिओ प्रोसेसिंग, ॲनटेना डिझाइन, वायरलेस कम्युनिकेशन, इंटरनेट ऑफ थिंग्ज, मशिन लर्निंग, आर्टिफिशिअल इंटेलिजन्स या सारख्या विषयांवर प्राधान्याने लक्ष पुरवण्यात येते.

संपर्क- iiitn.ac.in

०००

आयआयआयटी- पुणे

अभ्यासक्रम- (१) कॉम्प्युटर सायन्स ॲण्ड इंजिनीअरिंग (सीएसई), (२) इलेक्ट्रॉनिक्स ॲण्ड कम्युनिकेशन इंजिनीअरिंग (ईसीई).या संस्थेने २०२० पासून बीटेक ऑनर्स हा अभ्यासक्रम सुरु केला आहे. या अंतर्गत बीटेक इन सीएसई/ईसीई (ऑनर्स) आर्टिफिशिअल इंटेलिजंस आणि बीटेक इन सीएसई/ईसीई (ऑनर्स) डेटा सायंस, हे दोन अभ्यासक्रम करता येतात.

संपर्क- http://www.iiitp.ac.in

०००

आयआयआयटी-बेंगळुरु

या संस्थेने पाच वर्षे कालावधीचा इंटिग्रेटेड एमटेक अभ्यासक्रम सुरु केला आहे. हा अभ्यासक्रम कॉम्प्युटर सायन्स ॲण्ड इंजिनीअरिंग आणि इलेक्ट्रॉनिक्स ॲण्ड कम्युनिकेशन इंजिनीअरिंग या दोन विषयांमध्ये करता येतो. पदवी घेतल्यानंतर एमटेकच्या अभ्यासक्रमासाठी गेट म्हणजे ग्रॅज्युएट ॲप्टिट्यूट टेस्ट फॉर इंजिनीअर्स, ही स्पर्धा परीक्षा देण्याची गरज राहत नाही. या अभ्यासक्रमाला दहा वर्षाचा कालावधी उलटला असून हा अभ्यासक्रम केलेल्या विद्यार्थ्यांना चांगल्या करिअर संधी मिळाल्या आहेत. संपर्क- www.iiitb.ac.in

०००

आयआयआयटी- ग्वाल्हेर                             

संस्थेचे अभ्यासक्रम – (१) बीटेक इन कॉम्प्युटर सायन्स ॲण्ड इंजिनीअरिंग, (२) इंटिग्रेटेड पोस्ट ग्रॅज्युएट प्रोग्रॅम- या अभ्यासक्रमाचा कालावधी पाच वर्षाचा आहे.हा अभ्यासक्रम बीटेक+एमटेक(इंन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी) किंवा बीटेक+एमबीए असा करता येतो.पहिल्या सहा सत्रांमध्ये बीटेक चा अभ्यासक्रम शिकवला जातो.उर्वरित चार सत्रांमध्ये एमटेक किंवा एमबीएचा अभ्यासक्रम शिकवला जातो.एमटेक अभ्यासक्रम स्वीकारणाऱ्या विद्यार्थ्यांना विद्यावेतन दिले जाते.

संपर्क- www.iiitm.ac.in

०००

इंडियन इंस्टिट्यूट ऑफ इर्न्फमेशन टेक्नॉलॉजी,डिझाइन ॲण्ड मॅन्युफॅक्चुरिंग (आयआयआयटीडीएम)– – जबलपूर

या संस्थेत (१) कॉम्प्युटर सायन्स ॲण्ड इंजिनीअरिंग, (२) इलेक्ट्रॉनिक्स ॲण्ड कम्युनिकेशन इंजिनीअरिंग, (३) डिझाइन आणि (४) मेकॅनिकल इंजिनीअरिंग या विषयांमध्ये चार वर्षे कालावधीच्या बीटेक अभ्यासक्रमाला प्रवेश घेता येतो. संपर्क- http://www.iiitdmj.ac.in

०००

इंडियन इंस्टिट्यूट ऑफ इर्न्फमेशन टेक्नॉलॉजी,डिझाइन ॲण्ड मॅन्युफॅक्चुरिंग (आयआयआयटीडीएम) कांचिपूरम-

या संस्थेने आपल्या अभ्यासक्रमात अभिकल्प म्हणजेच डिझाइन आणि माहिती तंत्रज्ञान या ज्ञानशाखांचा संगम केला आहे. या संस्थेने (१) स्मार्ट मॅन्यु
फॅक्चुरिंग, (२) मेकॅनिकल इंजिनीअरिंग वुइथ स्पेशलायझेशन इन डिझाइन ॲण्ड मॅन्युफॅक्चुरिंग, (३) इलेक्ट्रॉनिक्स ॲण्ड टेलिक्युनिकेशन इंजिनीअरिंग वुइथ स्पेशलायझेन इन डिझाइन ॲण्ड मॅन्युफॅक्चुरिंग, (४) कॉम्प्युटर इंजिनीअरिंग या विषयांमध्ये बीटेक करण्याची संधी उपलब्ध करुन दिली आहे. सध्याच्या स्मार्ट काळाशी सुसंगत या अभ्यासक्रमांना उद्योगविश्वामध्ये चांगली मागणी आहे. संपर्क- www.iiitdm.ac.in/

०००

 

इंडियन इंस्टिट्यूट ऑफ इर्न्फमेशन टेक्नॉलॉजी, डिझाइन ॲण्ड मॅन्युफॅक्चुरिंग (आयआयआयटीडीएम)– कुरनूल.

या संस्थेचे अभ्यासक्रम बीटेक इन (१) मेकॅनिकल इंजिनीअरिंग वुइथ स्पेशलायझेन इन डिझाइन ॲण्ड मॅन्युफॅक्चुरिंग, (२) कॉम्प्युटर सायन्स ॲण्ड इंजिनीअरिंग , (३) इलेक्ट्रॉनिक्स ॲण्ड टेलिक्युनिकेशन इंजिनीअरिंग वुइथ स्पेशलायझेन इन डिझाइन ॲण्ड मॅन्युफॅक्चुरिंग.संपर्क- http://www.iiitdmkl.ac.in

०००

आयआयआयटी- भोपाळ

या संस्थेत (१) कॉम्प्युटर सायन्स ॲण्ड इंजिनीअरिंग , (२) इलेक्ट्रॉनिक्स ॲण्ड कम्युनिकेशन इंजिनीअरिंग (३) इर्न्फमेशन टेक्नॉलॉजी या विषयात बीटेक अभ्यासक्रम करता येतो. संपर्क- http://iiitbhopal.co.in

०००

 

आयआयआयटी- धारवाड

या संस्थेत (१) कॉम्प्युटर सायन्स ॲण्ड इंजिनीअरिंग , (२) इलेक्ट्रॉनिक्स ॲण्ड कम्युनिकेशन इंजिनीअरिंग या विषयामध्ये बीटेक अभ्यासक्रमाला प्रवेश भेटू शकतो. संपर्क-www.iiitdwd.ac.in

०००

आयआयआयटी- भागलपूर

या संस्थेने, बीटेक इन मेकॅट्रानिक्स हा चार वर्षे कालावधीचा स्पेशलाइज्ड अभ्यासक्रम सुरु केला आहे. संस्थेचे इतर अभ्यासक्रम बीटेक इन

  • कॉम्प्युटर सायन्स ॲण्ड इंजिनीअरिंग , (२) इलेक्ट्रॉनिक्स ॲण्ड कम्युनिकेशन इंजिनीअरिंग. संपर्क- iiitbh.ac.in

०००

आयआयआयटी- गौहाटी

संस्थेचे अभ्यासक्रम बीटेक इन

(१) कॉम्प्युटर सायन्स ॲण्ड इंजिनीअरिंग , (२) इलेक्ट्रॉनिक्स ॲण्ड कम्युनिकेशन इंजिनीअरिंग संपर्क- http://iiitg.ac.in

०००

आयआयआयटी- कल्याणी येथे

बीटेक इन कॉम्प्युटर सायन्स ॲण्ड इंजिनीअरिंग , या अभ्यासक्रमाला प्रवेश मिळू शकतो. संपर्क- http://iiitkalyani.ac.in

०००

आयआयआयटी- कोट्टायम येथे

बीटेक इन कॉम्प्युटर सायन्स हा अभ्यासक्रम सुरु करण्यात आला आहे. संपर्क- http://www.iiitkottayam.ac.in

 

०००

आयआयआयटी- रांची

संस्थेचे अभ्यासक्रम-  बीटेक इन (१) कॉम्प्युटर सायन्स ॲण्ड इंजिनीअरिंग , (२) इलेक्ट्रॉनिक्स ॲण्ड कम्युनिकेशन इंजिनीअरिंग, संपर्क- http://iiitranchi.ac.in

 

०००

आयआयआयटी- लखनौ

संस्थेचे अभ्यासक्रम बीटेक इन (१) कॉम्प्युटर सायन्स ॲण्ड इंजिनीअरिंग , (२) इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी, संपर्क- www.iiitl.ac.in

०००

आयआयआयटी- मणिपूर

या संस्थेमध्ये (१) कॉम्प्युटर सायन्स ॲण्ड इंजिनीअरिंग , (२) इलेक्ट्रॉनिक्स ॲण्ड कम्युनिकेशन इंजिनीअरिंग या दोन बीटेक अभ्यासक्रमासाठी अर्ज  करता येतो.

संपर्क- http://www.iiitp.ac.in

०००

आयआयआयटी- वडोदरा

संस्थेचे अभ्यासक्रम बीटेक इन (१) कॉम्प्युटर सायन्स ॲण्ड इंजिनीअरिंग , (२) इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी- संपर्क- http://iiitvadodara.ac.in

०००

आयआयआयटी- श्री सिटी,चित्तूर

संस्थेचे अभ्यासक्रम बीटेक इन

(१) कॉम्प्युटर सायन्स ॲण्ड इंजिनीअरिंग , (२) इलेक्ट्रॉनिक्स ॲण्ड कम्युनिकेशन इंजिनीअरिंग – संपर्क- http://www.iiits.ac.in

०००

आयआयआयटी- तिरुचिरापल्ली

संस्थेचे अभ्यासक्रम बीटेक इन

(१) कॉम्प्युटर सायन्स ॲण्ड इंजिनीअरिंग , (२) इलेक्ट्रॉनिक्स ॲण्ड कम्युनिकेशन इंजिनीअरिंग – संपर्क- http://www.iiitt.ac.in

००००