संगीत क्षेत्रामध्ये करीअरच्या उत्तमोत्तम संधी मिळू शकतात.सध्या सर्वत्र या ना त्या स्वरुपाचे संगीत जलसे होत असतात.पाश्चिमात्य आणि शास्त्रीय संगीताच्या मैफिलिंना विविध वादकांची मोठीच गरज भासते.मोठ्या गायक संगीतकाराचे कार्यक्रम सर्व जगभर होतात.या कार्यक्रमांमध्ये 50 ते 100पर्यंत वाद्यवृंद असतात.काही छोटे छोटे संगीतकार पाच दहाच्या गटात एकत्र येऊन आपला बँड स्थापन करतात.असा छोटा बँड विविध कार्यक्रम,हॉटेल्स,लग्नादी संभारभ या ठिकाणी आपली कला सादर करतात.अशा कार्यक्रमांची संख्या सारखीच वाढते आहे.सोसायट्यामंध्ये होणाऱ्या कार्यक्रमांना अशा बँड्सना बोलवण्याकडे कल वाढत आहे.या सर्व बाबी या क्षेत्रात करियरच्या उत्तमोत्तम संधी उपलब्ध होत असल्याचे निर्दशक आहेत.संगीतावर प्रेम करणाऱ्या आणि संगीतकार होण्याचं स्वप्न बघणाऱ्या तरुण-तरुणींसाठी हे क्षेत्र स्पर्धात्मक असलं तरी प्रगती आणि उन्नतीची अचुक दिशा दाखवणारं ठरु शकतं.
नव्या तंत्रज्ञानामुळे आणि यूट्यूटब सारखे नवे प्लॅटफार्म उपलब्ध झाल्याने नव्या होतकरु संगीतकारांसाठी आता संधी दारापर्यंत चालून आलीय असं म्हंटल्यास वावगं ठरु नये.हे क्षेत्र आता पूर्ण वेळ करियर करण्यात इतपत सक्षम होत आहे.
भातखंडे संगीत संस्था
आक्टोबर 2000 मध्ये या संस्थेस केंद्र सरकारने डीम्ड युनिव्हर्सिटीचा दर्जा प्रदान केला. या विद्यालयात पुढील विषयांचे शिक्षण- प्रशिक्षण दिले जाते. (1) कंठसंगीत (शास्त्रीय कंठसंगीत, ठुमरी, दादरा,सुगम संगीत), (2) नृत्य (कथ्थक, भरतनाट्यम, कुचिपुडी, लोकनृत्य), (3) स्वरवाद्ये (सितार, सरोद, गीटार, व्हायोलिन, सारंगी, हार्मोनिअम, बासरी), (4) तालवाद्य-(तबला ,पखवाज) आणि (5) संगीतशास्त्र. या पाचही प्रकाराचे अभ्यासक्रम शिकवण्यासाठी पाच स्वतंत्र विभाग आहेत. या संस्थेत उच्च दर्जाच्या शिक्षणावर भर दिला जातो.सध्या 1500 च्या आसपास विद्यार्थी या संस्थेत शिक्षण घेत आहेत. कला आणि संगीताच्या क्षेत्रात या विद्यार्थ्यांना तत्काळ करिअरच्या संधी प्राप्त होत आहेत. यासाठी संस्थेच्या वतिनेही विशेष प्रयत्न केले जातात. संस्थेत वेळोवेळी वेगवेगळे कार्यक्रम आणि उपक्रमांच्या निमित्त श्रेष्ठ कलावंतांना त्यांची कला सादर करण्यासाठी बोलावले जाते. त्याचा लाभ विद्यार्थ्यांना होत असतो.
पत्ता: भातखंडे म्युझिक इन्स्टिट्यूट,कैसरबाग लखनौ(उत्तरप्रदेश.), संकेतस्थळ- www.bhatkhandemusic.edu.in,ईमेल-info@ www.bhatkhandemusic.edu.in
या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी चाळणी परीक्षा घेतली जाते. ही परीक्षा दरवर्षी साधारणत: 9 जुलै ते 17 जुलै रोजी घेतली जाते. निकाल 20 जुलै रोजी लावला जातो. 27 जुलैपासून प्रत्यक्ष शिकवणीस प्रारंभ होतो. 25 मे ते 25 जून या कालावधीत प्रवेश अर्ज करता येतो. भारत सरकारच्या नियमानुसार अनुसूचित जाती, जमाती, इतर मागास संवर्ग आणि दिव्यांगांसाठी जागा राखीव ठेवण्यात येतात. या जागांसाठी संबंधित संवर्गातील उमेदवारांनी अर्ज न केल्यास त्या जागा खुल्या संवर्गातील संवर्गातून भरल्या जातात.
नॅशनल इन्स्टिट्यूूट ऑफ कथ्थक
डिप्लोमा कोर्स इन तबला वादन / पखवाज वादन : (या अभ्यासक्रमाचा कालावधी 5 वर्ष / वयोमर्यादा -17 ते 22 वर्षं, अर्हता- तबला आणि पखवाज वादनाचा तीन वर्षांचा अनुभव /10 वी उत्तीर्ण ).
पत्ता- कथ्थक केन्द्र,भवालपूर हाउस,भगवानदास रोड नवी दिल्ली 110001/दूरध्वनी:011- 27654232,27654234, संकेतस्थळ-www.sangeetnatak.org,ईमेल-delhi_kathak@yahoo.co.in
00
000
मुंबई विद्यापीठ
1)बॅचलर ऑफ फाइन आर्ट्स इन व्होकल म्युझिक, 2) डिप्लोमा कोर्स इन म्युझिक-हिंदुस्थानी व्होकल क्लासिकल (कालावधी-दोन वर्ष), 2) डिप्लोमा कोर्स इन म्युझिक -हिंदुस्थानी इन्स्ट्रुमेन्टल क्लासिकल (कालावधी-दोन वर्ष), 3) डिप्लोमा कोर्स इन म्युझिक -हिंदुस्थानी व्होकल लाइट (कालावधी-दोन वर्ष), 3) डिप्लोमा कोर्स इन म्युझिक -हिंदुस्थानी इन्स्ट्रुमेन्टल क्लासिकल – तबला (कालावधी-दोन वर्ष), 5)बॅचलर ऑफ फाइन आर्ट्स इन, इन्स्ट्रुमेन्टल क्लासिकल – तबला/सितार (कालावधी-तीन वर्ष),6)मास्टर ऑफ फाइन आर्ट्स इन, म्युझिक व्होकल (कालावधी-दोन वर्ष)
पत्ता-डिपार्टमेंट ऑफ म्युझिक,विद्यापीठ,विद्यार्थी भवन,बी रोड,चर्चगेट,मुंबई-400020 ,दूरध्वनी-022-2204 8665,फॅक्स-220 42 859, संकेतस्थळ -www.mu.ac.in/arts/finearts
सुरेश वांदिले