इतिहास विषय आवडीने व जाणीवपूर्वक निवडल्यास त्या अनुषंगाने भरपूर वाचन करावं लागतं. सुदैवाने ऐतिहासिक कागदपत्रे, ग्रंथ याची उपलब्धता मोठ्या प्रमाणावर आहे. अशा वाचनातून संबंधित व्यक्तीस लेखन आणि संशोधनाच्या प्रेरणाही मिळू शकतात. मूलभूत ऐतिहासिक लिखान करणाऱ्यांची बरीच वाणवा सध्या दिसून येते. त्यामुळे हे क्षेत्रही करिअर करण्यासाठी उपलब्ध होऊ शकते.
अशा आहेत संधी…
इतिहास विषयात पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम करणाऱ्या विद्यार्थीसुध्दा चांगलं करिअर करु शकतात. केंद्र आणि राज्य शासनाच्या नोकऱ्यांमध्ये संधी मिळू शकते.
(१) केंद्र सरकारच्या अखत्यारित राष्ट्रीय वस्तू संग्रहालय आणि देशभरात महत्वाची ऐतिहासिक वारसा जपणारी वस्तुसंग्रहलाये आहेत. गड – किल्ले, ऐतिसाहिक वास्तू आहेत. यांचे देखभाल, संवर्धन याची जबाबदारी प्रामुख्याने इतिहास विषयात रस असलेल्या आणि या विषयात पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम केलेल्या उमेदवारांना मिळू शकते. खाजगी वस्तुसंग्रहलायमध्ये सुध्दा अशी संधी मिळू शकते.(२) पुरातत्वशास्त्र (आर्किआलॉजी) मधील विषयाच्या एमए पदवीधारकांना आर्किआलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया या भारत सरकारच्या संस्थेमध्ये करिअर करता येऊ शकतं. या आणि अशा सारख्या संस्थेमध्ये क्युरेटर, प्रकल्प व्यवस्थापक आणि संशोधक सहाय्यक म्हणून संधी मिळू शकते.(३) एम.ए आणि सोबत एम.फिल वा पीएचडी केल्यास केंद्र आणि राज्य शासनाच्या अंतर्गत कार्यरत शिक्षण संस्था, विद्यापीठे, संशोधन संस्था, खाजगी महाविद्यालये यामध्ये अध्यापन आणि संशोधनाची संधी उपलब्ध होऊ शकते. काही स्वंयसेवीसंस्था सुध्दा अशा उमेदवारांना संधी देत असतात.(४) प्रकाशन संस्थांमध्येही संपादन, प्रकल्प संचालक अशासारखं करिअर करता येऊ शकतं.(५) ऐतिहासिक वारसा/वास्तू आदी बाबत बरेच खटले न्यायालयात दाखल होत असतात. अशा खटल्यांची तड लावण्यासाठी इतिहास आणि विधी विषयक पदवी वा पदव्युत्तर पदवी असल्यास लॉ फर्म्समध्ये संधी मिळू शकते. खाजगी प्रॅक्टिससुध्दा करता येऊ शकते.(६) इतिहास आणि व्यवस्थापन शाखेतील पदव्युत्तर पदवी असणाऱ्या उमेदवारांना भारतीय आणि बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये प्रकल्प व्यस्थापक, विपणन व्यवस्थापक म्हणून संधी मिळू शकते.(७) इतिहास आणि सामाजिक कार्य या विषयातील पदवुत्तर पदवी असणाऱ्या उमेदवारांना वेगवेगळ्या सामाजिक संस्था, संशोधन संस्था, संशोधन सहाय्यक वा संशोधन प्रकल्पाचे संचालक वा समन्वयक, खाजगी उद्योगांमधील कार्पोरेट रिस्पॉन्सिबिलिटी घटकांमध्ये संधी मिळू शकते.(८) इतिहासासोबत मास कम्युनिकेशन वा जर्न्यालिझम (जनसंवाद आणि पत्रकारिता) या विषयामध्ये पदवी घेतल्यास माध्यमांच्या क्षेत्रातही अनेक संधी मिळू शकतात. (९) इतिहास विषयात प्रावीण्य मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना पर्यटक गाइड म्हणूनही संधी मिळू शकते. इतिहासाच्या खाचा-खोचा अचूक आणि वस्तुनिष्ठपणे प्रभावीरीत्या सांगू शकणा-या विविध ऐतिहासिक घटनांचे विश्लेषण करु शकणाऱ्या उमेदवारांना या क्षेत्रात चांगली मागणी राहू शकते.
अभ्यासक्रम
ऑर्किलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया
भारत सरकारच्या ऑर्किलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया या संस्थेने इन्स्टिट्यूट ऑफ ऑर्किआलॉजी या संस्थेची स्थापना केली आहे. पुरातत्वशास्त्र्, नाणेशास्त्र, संवर्धन, वस्तुसंग्रहालय, वास्तुलेखन, प्राचीनवस्तू संशोधन कायदे अशा सारख्या बहुशाखीय अभ्यासक्रम आणि संशोधनासाठी ही संस्था शिक्षण-प्रशिक्षण देते आणि संशोधन कार्यास प्रोत्साहन देते.
या संस्थेने,पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन आर्किओलॉजी हा अभ्यासक्रम सुरु केला आहे. इतिहास विषयात पदव्युत्तर पदवी घेतलेल्या विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमास प्रवेश मिळू शकतो. हा दोन वर्ष कालावधीचा अभ्यासक्रम आहे. या अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेची जाहिरात जून महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात रोजगार समाचार या साप्ताहिकात आणि संस्थेच्या संकेतस्थळावर प्रकाशित केली जाते. अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी तयार केली जाते. यातील निवडक विद्यार्थ्यांना लेखी चाळणी परीक्षा आणि मुलाखतीसाठी बोलावे जाते. अनुसूचित जाती आणि जमाती संवर्गातील उमेदवारांना जाण्या-येण्याचे दुसऱ्या श्रेणीचे भाडे दिले जाते. या अभ्यासक्रमाला १५ विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. या विद्यार्थ्यांना दरमहा ८ हजार रुपयांचे विद्यावेतनही दिले जाते. अभ्यासक्रमाच्या कालावधीतील अभ्यासदौऱ्यांचा खर्च संस्थेमार्फत केला जातो. दिल्ली बाहेरील विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहाची सुविधा आहे.
संपर्क- जनपथ नवी दिल्ली- 110011, संकेतस्थळ – https://asi.nic.in/asi-training-admission, ईमेल-
dirins.asi@gmail.com ११ २३०१७९७
इतिहास विषयातील नोकरीच्या संधी या विषयावर खूप काही लिहिता येण्यासारखे आहे.
आपण लिहिलेला लेख छान आहे मनापासून आवडला.
धन्यवाद सर