(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

नवे पर्व !

आपल्या देशात ॲनिमेशन, व्हिज्युएल इफेक्ट्स, गेमिंग आणि‍ कॉमिक्स (एव्हीजीसी) क्षेत्राची झपाट्याने वाढ होत आहे. जागतिक पातळीवर, या क्षेत्रातील भारतीयांच्या कामगिरीची दखल घेतली गेलीय. आता, या क्षेत्रातील महत्वाच्या देशांमध्ये भारताचा समावेश केला जातो. पुढील काही वर्षातच जागतिक पातळीवरील ॲनिमेशन क्षेत्रातील ६० टक्के आशय (कंटेट) हा भारतीय राहू शकतो, अशी शक्यता या क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. गेल्या काही वर्षात, भारतीय चित्रपटांनी अत्याधुनिक तंत्रकौशल्याचे प्रदर्शन करणारे ॲनिमेशन आणि द्ष्यात्मक परिणाम (व्हिज्युएल इफेक्ट्स) साधणारे भव्य पट जगापुढे आणले आहेत. यातून दृष्यात्मक कथाकथनास नवे परिमाण मिळाले आहे. जागतिक पातळीवर ॲनिमेशनच्या प्रेक्षकांची भारतातील संख्या दुसऱ्या क्रमांकाची आहे. या क्षेत्रातील अमर्याद क्षमता लक्षात घेऊन भारत सरकारने, मुंबईत, नॅशनल सेंटर ऑफ एक्सलेन्स फॉर एव्हीजीसी- व्हीआर (व्हर्च्युअल रिॲलिटी), ही संस्था स्थापन केली आहे. ही संस्था, इंडियन इंस्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी यानावाने ओळखली जाईल, अशी घोषणा, केंद्रिय माहिती प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी, गेल्या महिन्यात मुंबईत झालेल्या, व्हेव्हज (वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युएल एंटरटेनमेंट समिट) मध्ये केली. या संस्थेला विविध औद्योगिक फेडरेशनने साहाय्य केले आहे.

गेमिंग, ॲनिमेशन, कॉमिक्स, ऑगमेंटेड रिॲलिटी, व्हॅर्च्युअल रिॲलिटी, या क्षेत्रातील आशय निर्मितीचे भारत जागतिक केंद्र बनावे, हे उद्दिष्ट निर्धारित करण्यात आले आहे. यासाठी या क्षेत्राच्या विकासाला आणखी चालना मिळावी, यासाठी शास्वत  आणि नावीन्यपूर्ण पायाभूत सुविधा उपलब्ध करुन दिल्या जातील. देशी आशयाची अधिकाधिक निर्मिती आणि सर्जनशील प्रतिभावंतांची मोठ्या प्रमाणावर उलब्धता करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. ही संस्था, इंडियन इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आणि इंडियन इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट या दर्जाची असेल. या संस्थेत प्रात्यक्षिकांवर अधिक भर देणारे अत्याधुनिक अभ्यासक्रम सुरु केले जातील. पुढील काळात या क्षेत्रात निर्माण होणा-या ५ लाखाच्या आसपास रोजगार संधीचा लाभ, या संस्थेतील विद्यार्थ्यांना मिळेल. जागतिक पातळीवरची आशय निर्मितीही होईल.

 भारताच्‍या गेमिंग उद्योगाची वार्षिक वाढ २५ टक्के आहे. मोबाइल गेमिंग प्लॅटफॉर्मचा वापर करणाऱ्यांची संख्या आश्चर्यकारक गतिने वाढत असल्याने, या क्षेत्राच्या विकासालाही विलक्षण गती आली आहे. त्यामुळे गेमिंग, व्हीएफएक्स, ॲनिमेशन याक्षेत्रातील करिअरच्या संधीही वाढल्या आहेत. या क्षेत्रात करिअर करण्यासाठी पुढील तंत्रकौशल्याची गरज असते-

(१) अनरिअल इंजिन, युनिटी, गोडॉट सारखे गेम इंजिन तंत्र- ग्रॅफिक्स, ध्वनी आणि गेम खेळण्यासाठीच्या यंत्रणेची निर्मिती, या तंत्राव्दारे केली जाते. (२) ब्लेंडर, ऑटोडेस्क माया, थ्रीडी मॅक्ससारखे थ्रीडी मॉडेलिंग तंत्र- ॲनिमेशनच्या स्वरुपातील पात्र, कथानकाचे पर्यावरण, विविध वस्तूंची निर्मिती, (३) सी प्लस प्लस (अनरिअल), सी (युनिटी), पायथन या सारख्या प्रोग्रॅमिंग भाषा- गेमप्लेची संहिता, प्रकियेचे स्वयंचलन आणि गेम निर्मितीसाठी आवश्यक असणारी साधने, (४) टेन्सरफ्लो, पाय टॉर्च, नॅवमेश सारखे आर्टिफिशिअल इंटेलिजन्स – बुध्दिमान नॉन प्लेअर (गेम मधील काल्पनिक पात्र, जे स्वत: खेळतात आणि ज्याला खरा खेळाडू नियंत्रित करु शकत नाही.) कॅरेक्टरची निर्मिती, आशयाची निर्मिती, (५) एफमॉड, डब्ल्यूवाइज, ऑडॅसिटी सारखे साऊंड डिझाइन कौशल्य- ध्वनी निर्मिती, पार्श्वध्वनी, (६) व्हुफोरिआ, ऑक्युलस, एसडीके, युनिटी, अनरिअल इंजिन सारखे ऑगमेंटेड रिॲलिटी/ व्हर्च्युअल रिअॅलिटी तंत्र – खेळाडूंना गुंतवणूक ठेवणाऱ्या आणि वेढून टाकणाऱ्या एआर आणि व्हीआरची त्रिमिती चित्रे, (७) ॲबॉड, एक्सडी, फिग्मा, स्केच सारखे, युझर एक्सपिरिअंस डिझाइन/युझर इंटरफेस डिझाइन- अंर्तज्ञानी गेम प्रकियेचे डिझाइन करणे, (७) शेडर ग्रॅफ (युनिटी), मटेरिअल एडिटर (अनरिअल) शेडर्स आणि व्हीएफएक्स   (व्हिज्युअल इफेक्ट्स)- अत्यंत आकर्षक असे दृष्यपरिणाम आणि ग्रॅफिक्सची निर्मिती

काही अभ्यासक्रम आणि संस्था-

(१) नॅशनल स्कूल ऑफ डिझाइन (एनआयडी), अहमदाबाद कॅम्पसमध्ये, बॅचलर ऑफ डिझाइन इन ॲनिमेशन फिल्म डिझाइन, ग्रॅफिक डिझाइन हा अभ्यासक्रम करता येतो. कालावधी चार वर्षे. अर्हता- कोणत्याही विषयातील १२ वी उत्तीर्ण. प्रवेशासाठी संस्थेमार्फत घेण्यात येणारी चाळणी परीक्षा द्यावी लागते.

संपर्क- एनआयडी पाल्डी, अहमदाबाद- ३८०००७, संकेतस्थळ- https://www.nid.edu/about/campuses/ahmedabad-campus

(२) एनआयडीच्या बेंगळुरु कॅम्पसमध्ये, मास्टर ऑफ डिझाइन इन डिजिटल गेम डिझाइन, हा अभ्यासक्रम करता येतो. कालावधी- अडीच वर्षे. अर्हता कोणत्याही विषयातील पदवी किंवा बॅचलर ऑफ डिझाइन. चाळणी परीक्षेव्दारे प्रवेश दिला जातो.

संपर्क- एनआयडी, १२, लिंक रोड, तुमकर रोडच्या विरुध्द दिशेला, बेंगळुरु- ५६००२२

संकेतस्थळ- https://www.nid.edu/academics/programmes/master-of-design-mdes/digital-game-design-mdes

(३) फिल्म ॲण्ड टीव्ही इंस्टिट्यूट पुणे- या संस्थेने, अंडर ग्रॅज्युएट सर्टिफिकेट कोर्स इन ॲनिमेशन ॲण्ड व्हिज्युएल इफेक्ट्स, हा तीन वर्षे कालावधीचा अभ्यासक्रम सुरु केला आहे. अर्हता- कोणत्याही विषयातील १२ वी उत्तीर्ण. अभ्यासक्रमाला संस्थेच्या चाळणी परीक्षेव्दारे प्रवेश दिला जातो.

संपर्क- लॉ कॉलेज रोड, एरंडवणे, पुणे- ४११००४, संकेतस्थळ –https://ftii.ac.in/p/admission-process, ईमेल- academic.office@ftii.ac.in, दूरध्वनी- ०२०-२५५८००२२

(४) एशिअन ॲकॅडेमी ऑफ फिल्म ॲण्ड टेलिव्हिजन (एएएफटी) नॉयडा- बीएस्सी गेम डिझाइन, बीएस्सी- ॲनिमेशन, बी. डिझाइन इन ॲनिमेशन ॲण्ड व्हिज्युअल इफेक्ट्स- या तिनही अभ्यासक्रमाचा कालावधी प्रत्येकी तीन वर्षे. अर्हता- कोणत्याही विषयातील १२ वी उत्तीर्ण.

संपर्क- एएएफटी मारवाह स्टुडिओ कॉम्प्लेक्स वन, एफसी- १४/१५, सेक्टर-१६ ए, नॉयडा फिल्म सिटी, दिल्ली एनसीआर-२०१३०१, संकेतस्थळ-https://aaft.com, ईमेल- help@aaft.com

() इमेज  कॉलेज ऑफ आर्ट्स इन ॲनिमेशन ॲण्ड टेक्नॉलॉजी– गेमिंग डेव्हलपमेंट (‍डिजिटल खेळांचा विकास)चा अभ्यासक्रम चालवणारी महत्वाची संस्था आहे. या संस्थेने राष्ट्रीय कौशल्य विकास मंडळासोबत, कौशल्यनिर्मितीचे अभ्यासक्रम आणि प्रशिक्षणासाठी भागिदारी केली आहे.

 पदवीस्तरीय अभ्यासक्रम() गेम प्रोग्रॅमिंग- अर्हता- १२वी विज्ञान शाखेत भौतिकशास्त्र आणि गणिताचा अभ्यास केलेला असावा. कालावधी- चार वर्षे, (२) गेम डिझाइन ॲण्ड डेव्हलपमेंट – अर्हता- १२वी विज्ञान शाखेत भौतिकशास्त्र आणि गणिताचा अभ्यास केलेला असावा. कालावधी- तीन वर्षे, (३) गेम आर्ट आणि डिझाइन, (४) युझर एक्सपिरिअंस डिझाइन ॲण्ड डेव्हलपमेंट, (५) बॅचलर डिग्री इन व्हिज्युएल इफेक्टस (व्हीएफएक्स) (क्रमांक ३,४ आणि ५ अभ्यासक्रमांसाठी अर्हता- कोणत्याही विषयातील १२ वी उत्तीर्ण. कालावधी- तीन वर्षे.)

या अभ्यासक्रमांना बारावीतील गुण आणि मुलाखतीव्दारे प्रवेश दिला जातो.

संपर्क-  () ४२४ बोमनहल्ली, हौसर मेन रोड, बेंगळुरु, ५६००६८, दूरध्वनी- ०८०-४११०७७५५, संकेतस्थळ-www.icat.ac.in,

(६) व्हिसलिंगवूड इंटरनॅशनल (स्कूल ऑफ ॲनिमेशन ॲण्ड गेम डिझाइन)बॅचलर ऑफ डिझाइन इन गेम डिझाइन, बॅचलर ऑफ डिझाइन इन व्हिज्युएल कम्युनिकेशन डिझाइन, ॲनिमेशन, कालावधी चार वर्षे. अर्हता- कोणत्याही ज्ञानशाखेतील १२ वी. ही पदवी टाटा इंस्टिट्यूट ऑफ सोशल सायंस, या संस्थेमार्फत दिली जाते.

संपर्क- फिल्मसिटी, गोरेगाव (पश्चिम) मुंबई- ४०००६५, दूरध्वनी- ०२२-६२७१६०७०, ई-मेल-admissions@whistlingwoods.net, संकेतस्थळ- whistlingwoods.net

    (७) एमआयटी इंस्टिट्यूट ऑफ डिझाइन– बॅचलर ऑफ डिझाइन इन गेम डिझाइन. कालावधी- चार वर्षे. संपर्क- राजबाग, लोणी– काळभोर, हडपसरच्या बाजूला, पुणे- सोलापूर महामार्ग, पुणे- ४१२२०१, संकेतस्थळ-mitid.edu.in,

(८) वेल्लोर इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलाजी- बीएस्सी मल्टिमीडिया ॲण्ड ॲनिमेशन,  व्हिज्युएल कम्युनिकेशन, अर्हता- कोणत्याही शाखेतील १२ वी कालावधी- तीन वर्षे. प्रवेश- चाळणी परीक्षेव्दारे,

संपर्क- ॲडमिशन ऑफिस, वेल्लोर इंस्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजी, वेल्लोर- ६३२०१४, दूरध्वनी- ०४४-४६२७७५५५, ईमेल-  ugadmission@vit.ac.in https://vit.ac.in/admissions/programmes-offered

(९) श्रीष्टी मनिपाल इंसिटट्यूट ऑफ आर्ट, डिझाइन ॲण्ड टेक्नॉलॉजी- बॅचलर ऑफ व्होकेशन इन (१) डिजिटल मीडिया प्रॉडक्शन, (२) युझर इंटरफेस ॲण्ड इंटरॲक्शन डिझाइन, (३) क्रिएटिव्ह मॅन्युफॅक्चुरिंग, (४) ग्रॅफिक आर्ट ॲण्ड डिझाइन प्रॅक्टिसेस. हे सर्व कौशल्य आधारित अभ्यासक्रम आहेत. अर्हता- कोणत्याही विषयातील १२ वी. प्रवेशासाठी संस्थेची चाळणी परीक्षा द्यावी लागते.

संपर्क- एमएएचइ बेंगळुरु कॅम्पस, गोविंदपुरा, येलेहांका, बेंगळुरु- ५६००६४, दूरध्वनी- ०८०-२४४९७१०१

ईमेल- admissions@srishtimanipalinstitute.in, संकेतस्थळ- srishtimanipalinstitute.in

(१०) अजिंक्य डी.वाय.पाटील युनिव्हर्सिटी – बॅचलर ऑफ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन इन गेम  डेव्हलपमेंट. कालावधी- ३ वर्षे. अर्हता- कोणत्याही विषयातील १२ वी उत्तीर्ण.

संपर्क- दूरध्वनी- ०२०-३५०३७९४२, संकेतस्थळ-www.adypu.edu

सुरेश वांदिले