सर्वांचा सन्मान करा..
खूप वर्षांपूर्वी सध्याच्या सिंहमहाराजांच्या आजोबांच्या आजोबांची एका उंदरानं शिकाऱ्याच्या जाळ्यातून सुटका केली होती. तेव्हापासून सिंहमहाराजांची प्रत्येक पिढी उंदरांसोबत छान संबंध ठेऊन होती. प्रत्येक पिढीचा सिंहमहाराज त्यांच्या वारसांना एक धडा शिकवायचे की केवळ शक्ती असल्यानेच विजय मिळवता येतो असं नाही तर कधीकधी युक्तीच शक्तीपेक्षा श्रेष्ठ ठरते. सगळ्यांशी चांगलं वागायला हवं. कोण कधी आपल्या मदतीला धावून येईल हे सांगता येत नाही.
सिंहमहाराजांच्या प्रत्येक पिढीने ही शिकवण तंतोतंत अंगिकारली. सध्याचे सिंहमहाराज तर दोन पावलं समोर होते. ते उंदराचाच सन्मान करायचे असं नाही तर मुंगीसारख्या छोट्या जीवाचाही आदर करायचे. पण सिंह महाराजांचंहे असं वागणं पंतप्रधान वाघोबांना पटायचं नाही. महाराज असं प्रेमळपणे वागत राहिलात तर हा उंदऱ्या आणि ती मुंगीटली,ती खारुटली तुमच्या आमच्या डोक्यावर बसतील.
यावर महाराज हसत म्हणाले,
वाघोबाजी, अहो तो पिटुकला उंदिर नि चिटुकली मुंगी, इवलीशी खारुमावशी माझ्या डोक्यावर बसल्यानं माझी आयाळ गळून जाणार नाही की माझी मान वाकडी होणार नाही. तुमच्या झुपकेदार मिशांची शान कमी होणार नाही की तुमच्या जिभेवर फोडं येणार नाहीत.
वाघोबांना महाराजांचं बोलणं आवडलं नाही. त्यामुळे ते नाखुशी दर्शवत म्हणाले,
महाराज, तुमचं म्हणणं मला पटत नाही. अशा कमकुवतांना अशी ढील देणं बरोबर नाही. त्यांच्याशी कठोरपणेच वागायला हवं. असं जर वागलो नाही तर आपला दबदबा राहणार नाही. त्यांच्यावर आपला वचक राहणार नाही. जो तो आपल्या मर्जीचा राजा होईल, महाराज. असा गोंधळ राज्यासाठी चांगला नसतो. या गोंधळाचा लाभ घेऊन शेजारील गेंडाश्री महाराज आपल्यावर आक्रमण करतील. वननगरी हकनाक त्यांच्या ताब्यात जाईल. वाघोबा, महाराजांना समजावूनसांगू लागले.
अस्वल, कोल्हा, लांडगा या दरबाऱ्यांनीवाघोबांना पाठिंबा दर्शवला.
सिंह महाराजांनी वाघोबा, कोल्होबा, लांडगोबा, अस्वलराव यांचे बोलणे शांतपणे ऐकून घेतले. आपल्या राज्यातील निरुपद्रवी छोट्या जीवांबद्दल त्यांची अशी मतं बघून महाराजांना वाईट वाटलं. आपल्या दरबाऱ्यांना स्वत:च्या शक्तीचा गर्व आणि अहंकार वाटतो. त्यांच्या गर्व आणि अंहकारचा फुगा फोडणं गरजेचं असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. पण, राजा म्हणून त्यांना असं एकांगी विचार करणं बरोबर नव्हतं. वाघोबा, कोल्होबा, लांडगोबा,अस्वलराव या मोठ्या शक्तीशाली प्राण्यांसोबत छोटे जीव-जंतू-प्राणी-पक्षी हे त्यांचे प्रजाजन होते. सर्वांशी समानतेनं वागणं हाच त्यांचा राजधर्म होता. त्यामुळे महाराजांनी दरबाऱ्यांची वेगवेगळी मतेमतांतरे शांतपणे ऐकून घेतली.
वाघोबा, कोल्होबा, लांडगोबा,अस्वलराव या दरबाऱ्यांना वाटले की आता महाराज उंदीर, मुंगी यासारख्या शुल्लक आणि क्षुद्र प्राण्यांना दरबारात येण्यास मनाई करतील.त्यांचं महत्व कमी करणारा आदेश काढतील. पण महाराजांनी तसं काही केलं नाही. त्यांनी कोणताही निर्णय न घेता दरबार बरखास्त केला.
वाघोबा, कोल्होबा, लांडगोबा, अस्वलराव यांना आश्चर्य वाटलं.
०००
महाराजांनी दुसऱ्या दिवशी पुन्हा दरबार भरवला. त्यांनी एका लखोट्यातून कागद बाहेर काढला. तो एक आदेश होता. या आदेशात असं नमूद होतं की, वाघोबा, कोल्होबा, लांडगोबा, अस्वलराव,रानडुकरे यांच्यासारख्या सर्व मोठ्या प्राण्यांनी उंदिर,मुंगी,माकोडे अशा सारख्या सर्व छोट्याप्राण्यांना प्रेमाणे वागणूकदिली पाहिजे. त्यांचा आदर केला पाहिजे.असं जे कोणी वागणार नाहीत, मग ते कोणत्याही पदावर असतो वा शक्तीशाली असतो त्यांना राज्यातून हाकलून दिलंजाईल.
हा आदेश वाचून दाखवल्याबरोबर महाराजांनी दरबार बरखास्त केला नि ते अंत:पुरात निघून गेले.
०००
याआदेशाचा वाघोबांना प्रचंड रागआला. आपल्यासारख्या शक्तीशाली प्राण्यांपेक्षा आणि वननगरीच्या इतर महत्वाच्या प्राण्यांपेक्षा उंदिर, मुंग्या महाराजांना अधिकप्रिय वाटतात हे त्यांनासमजून चुकले. अशा पुळचट महाराजांना वननगरीतून हाकलून लावायला हवं आणि त्यासाठी शेजारील गेंडा–श्रीमहाराजांची मदत घेतली पाहिजेअसं वाघोबांना वाटू लागलं.
०००
गेंडा-श्री महाराजांसोबत संधान बांधण्याचा दुष्ट हेतू घेऊन वाघोबांनी शेजारीराज्यात एकेदिवशी गुपचूप भेटदिली. सिंहमहाराज कसेगुळाचा गणपती आणि साखरेचा महादेव झाले असून त्यांना मुंग्याव उंदिर आवडायला लागल्याचं गेंडा–श्रींनासांगितलं. गेंडा–श्रींनी जरसिंहमहाराजांना हटवण्यास मदत केलीतर वननगरीच्या गादीवरबसल्यावर अर्धे राज्य देऊअसा प्रस्ताव त्यांनी गेंडा-श्री महाराजांपुढे ठेवला.
गेंडा–श्रीयांच्यासाठी ही सुवर्णसंधी होती. एकदा का सिंहमहाराजाला हटवलेकी मग सगळेच राज्यताब्यात घेऊन या वाघोबासहाकलून लावू असा विचारकरुन गेंडा–श्रींनी वाघोंबाकडेमैत्रीचा हात पुढे केला.
ठरल्याप्रमाणेएके दिवशी वाघोबा आणिगेंडा–श्री यांनी वननगरीवरआक्रमण केले. वाघोबांना सर्वखाचाखोचा माहीत असल्याने तेथेट सिंह महाराजाच्या दरबारातपोहचले. महाराज त्यावेळी न्यायनिवाडादेत होते. दरबारात इतरप्राण्यांसमवेत उंदिर आणि मुंग्याहीहोत्या.
वाघोबाआणि गेंडा–श्रीने सैन्यासह दरबारात प्रवेश केला. गेंडाश्रीच्या सैन्याने सिंहमहाराजांना वेढा टाकला. लांडगा, कोल्हा, अस्वल, रानडुक्कर आंनदले. या सर्व घडामोडींकडे हुषार उंदराचे बारिक लक्ष होते. प्रसंगाचं गांभीर्य त्याला चटकन कळलं. त्याने झटदिशीगेंडा–श्रीच्या डोक्यावर उडीघेतली. झटपट कचदिशी चावा घेतला. गेंडा-श्री यांना काही कळण्याचा आत उडी मारुन तो आपल्या सहकाऱ्यांना बोलावायला बाहेर पडला. त्याचे सहकारी दरबाराच्या आसपास वेगवेगळ्या बिळात होतेच. ते पटापट बाहेर पडले. काही कळण्याचा आत उंदिर टोळी गेंडाश्रीच्या सैन्याला चावू लागली. त्यांच्या चपळाईपुढे गेंडा-श्री आणि त्याचे सैन्य हैरान झाले . वाघोबाचीदुष्टबुध्दी एव्हाना मुंगीच्याहीलक्षात आलीच होती. अवतीभोवती शांतपणे काम करत असणाऱ्या आपल्या टोळीला तिने इशारा केला. मुंगीटोळी वाघोबांच्या अंगावर पोहचून इकडे तिकडे चावू लागल्या. एकाच वेळी खूप साऱ्या मुंग्या चावू लागल्याने वाघोबांना काय करावे हेच कळेनासे झाले. त्यातच उंदराने आता आपलामोर्चा वाघोबाकडे वळवला. त्यानेवाघाच्या नाकपुडीला करकचून चावाघेतला नि मिशीचे केसओढले. वाघ वेदेनेन तळमळूलागला. उंदिर झरदिशी वाघावरुनउडी मारुन पुन्हा गेंडा–श्रीवरचढून त्याला चावा घेऊलागला. मुंग्या आणि उंदिरआलटून पालटून वाघोबा, गेंडा–श्रीव त्याच्या सैनिकांवर चालून जातराहिले.
यालहानग्या प्राण्यांना कसंपकडायचं,हे कुणालाचकळेना. पुन्हा एकदा उंदिरआणि मुंगी आपल्या मदतीलाधावून आल्याचं सिंह महाराजांच्यालक्षात आलं.
काहीक्षणगडबडून गेलेले महाराज आतासावध झाले. त्यांनी मोठीडरकाळी दिली. आपला पंजाउगारुन त्यांनी वाघोबाला उचललेनि त्याला खाली आपटले. हा गोंधळ आणि उंदिरव मुंग्यांच्या चाव्याने गोंधळून गेलेल्यागेंडा–श्रीला सिंहमहाराजांच्या सैन्यानेपकडले.फंदीफितुरीने सिंह महाराजांवरील झालेला हा हल्लाउंदिर आणि मुंग्यामुळे अयशस्वीठरला.
यापुढेतरी कुणीही कुणाला लहानसमजू नका. प्रत्येकाचा सन्मानकरायला शिका. अशी तंबी महाराजांनी सर्व दरबाऱ्यांना दिली.
सुरेश वांदिले
००००
