(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

 

 

सागराचे आव्हान पेलताना

भारतीय सिफेअरर्सची कार्यक्षमता, गुणवत्ता आणि दर्जा उत्कृष्ठ असल्याने त्यांना जगभरातून मोठी मागणी आहे. या उमेदवारांना मालवाहू जहाजांच्या संनियंत्रणाचे काम, सागरावरील दळवळणासाठी आवश्यक असलेले कौशल्य शिकवले जाते.

बीएस्सी (नॉटिकल सायंस) हा अभ्यासक्रम केलेल्या उमेदवारांना सिफेअरर्स या पदनामापासून सुरु होणारी करिअर संधी मिळते.  जहाजाचा प्रवास सुरु असतो, तेव्हा जहाजाचे कार्यान्वयन, देखभाल, दुरुस्ती, स्वच्छता, जहाजावरील खानपान व्यवस्थापन, इतर कर्मचारी आणि कामगार यांची तरतूद आदी कामे या उमेदवारांना करावी लागतात. 

अशी होते प्रगती-

हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर जहाजावरील कॅडेट म्हणून एक वर्षाचे प्रशिक्षण आणि त्यानंतर सेंकड मेट्स परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर मर्चंट नेव्ही जहाजावरील तिसऱ्या क्रमांकाचा अधिकारी म्हणून नियुक्ती मिळते. सध्या अशा उमेदवारांना दरमहा  दीड ते दोन लाख रुपये पगार मिळू शकतो. जहाजावर असताना मोफत राहणे आणि भोजनाची व्यवस्था केली जाते. अशा उमेदवारांना काही अटींसह त्यांचे उत्पन्न करमुक्त मिळण्याचीही तरतूद आहे. अशा उमेदवारांची वार्षिक कामगिरी, तज्ज्ञता आणि अनुभव लक्षात घेउुन त्यांना, सेकंड ऑफिसर- चिफ ऑफिसर – जहाजाचा कप्तान, अशी पदोन्नती  मिळू शकते. यासाठी साधारणत: आठ ते दहा वर्षाचा कालावधी लागतो. जहाजाच्या कप्तानास  दरमहा सहा लाख रुपये किंवा त्यापेक्षा अधिक  वेतन मिळू शकते.

इंडियन मेरिटाइम युनिव्हर्सिटी ( आयएमयू) चा बी.एस्सी इन नॉटिकल सायन्स या अभ्यासक्रमाचा कालावधी तीन वर्षे. हा अभ्यासक्रम चेन्नई, आणि नवी मुंबई कॅम्पस येथे शिकवला जातो. हा निवासी स्वरुपाचा अभ्यासक्रम आहे. अर्हता- १२ वीमधील भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित या विषयात सरासरीने ६० टक्के गुण आवश्यक. १० वी आणि १२ वीमध्ये इंग्रजित ५० टक्के गुण आवश्यक. फक्त अविवाहित मुले-मुलीच या अभ्यासक्रमाला अर्ज करु शकतात. वयोमर्यादा- () मुले- २५ वर्षे. अनुसूचित जाती आणि जमाती संवर्ग-३० वर्षे, नॉन क्रिमीलेअर ओबीसी-२८ वर्षे. () मुली-२७ वर्षे. अनुसूचित जाती आणि जमाती संवर्ग – ३२ वर्षे, नॉन क्रिमीलेअर ओबीसी – ३० वर्षे.)

काय शिकाल?  कॉम्पुटर सायन्स, नॉटिकल फिजिक्स, टेरेस्टेरिअल नेविगेशन, जनरल शिप नॉलेज, नॉटिकल मॅथेमॅटिक्स, कम्युनिकेशन इंग्लिश, नॉटिकल इलेक्ट्रॉनिक्स, ॲप्लाइड फिजिक्स ॲण्ड इलेक्ट्रिसिटी, शिप ऑपरेशन्स टेक्नॉलॉजी, शिप कंस्ट्रक्शन, ॲप्लाइड मॅथेमॅटिक्स ॲण्ड फिजिक्स, शिप मॅनेजमेंट, स्पेशलाइज्ड कार्गो हँडलिंग, सेलेस्टिअल नेव्हिगेशन, नॅवल आर्किटेक्चर, कोस्टल नेव्हिगेशन, कोलिजन प्रिव्हेंशन रेग्युलेशन,  शिप ऑपरेशन टेक्नॉलॉजी, मरिन इंजिनीअरिंग वर्कशॉप, सिमॅनशिप, ब्रिज इक्विपमेंट्स ॲण्ड वॉचकीपिंग, कार्गो हँडलिंग, मिटिओरॉलॉजी, ऑटोमेशन ॲण्ड कंट्रोल सिस्टिम, शिप  स्टॅबिलिटी, शिप मेंटनन्स ॲण्ड इमर्जन्सिज, लाइफ सेव्हिंग ॲण्ड फायर फायटिंग अप्लायंसेस

आयएमयूचे इतर अभ्यासक्रम

() डिप्लोमा इन नॉटिकल सायन्स (कालावधी एक वर्षे. हा अभ्यासक्रम चेन्नई, आणि नवी मुंबई कॅम्पस येथे शिकवला जातो. हा निवासी स्वरुपाचा अभ्यासक्रम आहे. अर्हता- भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित किंवा इलेक्ट्रॉनिक्स बीएस्सी. अंतिम वर्षाला किमान ६० टक्के गुण आवश्यक. १०वी आणि १२ वीमध्ये इंग्रजित ५० टक्के गुण आवश्यक. वयोमर्यादा- () मुले- २५ वर्षे. अनुसूचित जाती आणि जमाती संवर्ग-३० वर्षे, नॉन क्रिमीलेअर ओबीसी – २८ वर्षे. मुली – २७ वर्षे. अनुसूचित जाती आणि जमाती संवर्ग- ३२ वर्षे, नॉन क्रिमीलेअर ओबीसी-३० वर्षे.),

 () एम.टेक इन नॅव्हल आर्किटेक्चर ॲण्ड ओशन इंजिनीअरिंग,कालावधी-दोन वर्षे. हा अभ्यासक्रम विशाखापट्टण कॅम्पसमध्ये शिकवला जातो. अर्हता- मेकॅनिकल/ सिव्हिल/ मरिन/ नॅव्हल आर्किटेक्चर किंवा समकक्ष विषयातील ६० टक्के गुणांसह अभियांत्रिकी पदवी. वयोमर्यादा नाही. अनुसूचित जाती  आणि जमाती संवर्गातील उमेदवारांना गुणांमध्ये ५ टक्के सूट. उमेदवार वैद्यकीय दृष्ट्या सक्षम हवेत. हा निवासी अभ्यासक्रम आहे.

() एम.टेक इन ड्रेजिंग ॲण्ड हार्बर इंजिनीअरिंग,कालावधी – दोन वर्षे. हा अभ्यासक्रम विशाखापट्टणम कॅम्पसमध्ये शिकवला जातो. अर्हता- मेकॅनिकल/ सिव्हिल/ मरिन/ नॅव्हल आर्किटेक्चर किंवा समकक्ष विषयातील ६० टक्के गुणांसह अभियांत्रिकी पदवी. वयोमर्यादा नाही. अनुसूचित जाती  आणि जमाती संवर्गातील उमेदवारांना गुणांमध्ये ५ टक्के सूट. उमेदवार वैद्यकीयदृष्ट्या सक्षम हवेत. हा निवासी अभ्यासक्रम आहे.

() एम.टेक इन मरीन इंजिनीअरिंग ॲण्ड मॅनेजमेंट,कालावधी-दोन वर्षे. हा अभ्यासक्रम कोलकता कॅम्पसमध्ये शिकवला जातो. अर्हता- मेकॅनिकल/ मरिन/ नॅव्हल आर्किटेक्चर किंवा समकक्ष विषयातील ६० टक्के गुणांसह अभियांत्रिकी पदवी. वयोमर्यादा नाही. अनुसूचित जाती  आणि जमाती संवर्गातील उमेदवारांना गुणांमध्ये ५ टक्के सूट. उमेदवार वैद्यकीयदृष्ट्या सक्षम हवेत. हा निवासी अभ्यासक्रम आहे.

() एमबीए – इंटरनॅशनल ट्रांसपोर्टेशन ॲण्ड लॉजिस्टिक्स मॅनेजमेंट, कालावधी- दोन वर्षे. हा अभ्यासक्रम चेन्नई, कोलकता, विशाखापट्टणम आणि कोची कॅम्पसमध्ये शिकवला जातो. अर्हता- कोणत्याही विषयातील ५० टक्के गुणांसह पदवी. १० किंवा १२ वीमध्ये विद्यार्थ्यांना इंग्रजीमध्ये ५० टक्के गुण मिळणे आवश्यक. वयोमर्यादा नाही. अनुसूचित जाती आणि जमाती संवर्गातील उमेदवारांना गुणांमध्ये ५ टक्के सूट. उमेदवार वैद्यकीयदृष्ट्या सक्षम हवेत. हा अनिवासी अभ्यासक्रम आहे.

() एमबीए – पोर्ट ॲण्ड शिपिंग मॅनेजमेंट,कालावधी- दोन वर्षे. हा अभ्यासक्रम चेन्नई आणि कोची कॅम्पसमध्ये शिकवला जातो. अर्हता- कोणत्याही विषयातील ५० टक्के गुणांसह पदवी. १० किंवा १२ वीमध्ये विद्यार्थ्यांना इंग्रजीमध्ये ५० टक्के गुण मिळणे आवश्यक. वयोमर्यादा नाही. अनुसूचित जाती  आणि जमाती संवर्गातील उमेदवारांना गुणांमध्ये ५ टक्के सूट. उमेदवार वैद्यकीयदृष्ट्या सक्षम हवेत.हा अनिवासी अभ्यासक्रम आहे

() पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन मरीन इंजिनीअरिंग(कालावधी एक वर्षं. हा अभ्यासक्रम मुंबई बंदर कॅम्पस येथे शिकवला जातो. या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी सीईटी परीक्षा देण्याची गरज नाही. अर्हता- मेकॅनिकल/नॅव्हल आर्किटेक्चर किंवा समकक्ष विषयातील ६० टक्के गुणांसह अभियांत्रिकी पदवी. वयोमर्यादा- () मुले- २८ वर्षे. अनुसूचित जाती आणि जमाती संवर्ग – ३३ वर्षे, नॉन क्रिमीलेअर ओबीसी-३१ वर्षे. () मुली- ३० वर्षे. अनुसूचित जाती आणि जमाती संवर्ग-३५ वर्षे, नॉन क्रिमीलेअर ओबीसी-३३ वर्षे. अनुसूचित जाती  आणि जमाती संवर्गातील उमेदवारांना गुणांमध्ये ५ टक्के सूट. उमेदवार वैद्यकीय दृष्ट्या सक्षम हवेत.

() संशोधन अभ्यासक्रम- () पीएचडी आणि () एम.एम-बाय रिसर्च. या दोन्ही अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी वेगळी चाळणी परीक्षा घेतली जाते. ही प्रकिया डिसेंबरमध्ये सुरु होते.

 

आयएमयू- प्रवेश प्रक्रिया

  () बी.टेक इन मरिन इंजिनीअरिंग, बी.टेक इन नॅव्हल आर्किटेक्चर ॲण्ड ओशन इंजिनीअअरिंग बी.एस्सी इन नॉटिकल सायन्स आणि डिप्लोमा इन नॉटिकल सायन्स्‍ या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी कॉमन एन्ट्रन्स टेस्ट देशभरातील विविध शहरांमध्ये घेतली जाते. यामध्ये महाराष्ट्रातील मुंबई, नागपूर, नासिक, सोलापूर आणि पुणे या शहरांचा समावेश आहे.

या चाळणी परीक्षेत २०० बहुपर्यायी वस्तुनिष्ट स्वरुपाचे प्रश्न विचारले जातात. या प्रश्नांमध्ये १२  वीच्या अभ्यासक्रमावर आधारित इंग्रजी, सामान्य कलचाचणी, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणितावर प्रश्न विचारले जातात. १२ वीचा अभ्यास, संकल्पना समजून उत्तम रितीने केलेल्या विद्यार्थ्यांना ही परीक्षा कठीण जात नाही.

() एमबीए अभ्यासक्रमासाठी घेण्यात सीइटी परीक्षेत परीक्षेत १२०  बहुपर्यायी वस्तुनिष्ट पध्दतीचे प्रश्न विचारले जातात. यामध्ये तार्किक कार्यकारणभाव, संख्यात्मक विशलेषण, भाषिक कौशल्य क्षमता, माहिती विश्लेषण क्षमता यावर प्रश्न विचारले जातात. निगेटिव्ह गुण नाहीत.

संपर्क- इंडियन मेरिटाइम युनिव्हर्सिटी, इस्ट कोस्ट रोड, सेम्मेनचेरी चेन्नई- 600119, दूरध्वनी- 044-24539020/ २४५३०३४३, ईमेल-academicscell@imu.ac.in आाणि cet22@imu.ac.in, संकेतस्थळ- imu.ac.in, सीईटी हेल्पलाइन 044-24539027,

००००

हाराष्ट्र अॅकॅडेमी ऑफ नॅव्हल एज्युकेशन ॲण्ड ट्रेनिंग -अभ्यासक्रम() बी.टेक इन मरिन इंजिनीअरिंग आणि ()बीएस्सी-नॉटिकल सायंस. अर्हता12 वी विज्ञान परीक्षेतील भौतिकशास्त्र, गणित आणि रसायनशास्त्र याविषयांमध्ये किमान 60 टक्के गुण आवश्यक.१०वी किंवा १२ वीमध्ये इंग्रजी विषयात किमान ५० टक्के गुण मिळणे आवश्यक.

 संपर्क गेट नंबर 140, राजबाग, पुणे-सोलापूर हायवे, लोणी काळभोर, पुणे-412201, दूरध्वनी- ०२०-६७६५२५५२, फॅक्स-2691904, संकेतस्थळ http://www.manetpune.edu.in , ईमेल- office@manetpune.com

सुरेश वांदिले