(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

महत्वाकांक्षी तरुणींना सामान्य करिअरपेक्षा वेगळं आणि आव्हानात्मक करिअर करण्याची तीव्र इच्छा असते. ही इच्छा भारतीय नौदलातील त्यांच्या प्रवेशाने पूर्ण होऊ शकते. अभियांत्रिकी, तंत्रज्ञान पदवी आणि विज्ञानशाखेत पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या तरुणींना अशा संधी दरवर्षी मिळू शकतात. अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळाल्यावर कॅम्पस भरतीद्वारे आयटी कंपन्यांमध्येच जास्तित जास्त तरुणींना निवडले जाते. मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, सिव्हिल अशा कोअर शाखांमधील कंपन्या अल्पप्रमाणात येतात. त्यामुळे वेगळयाच विषयामध्ये करिअरची सुरुवात करावी लागते.

भारतीय नौदलात दरवर्षी (१) इलेक्ट्रिकल, (२) इलेक्ट्रॉनिक्स, (३) मेकॅनिकल, (४) प्रॉडक्शन, (५) इंस्ट्रुमेंटेशन, (६) इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी, (७) केमिकल, (८) मेटॅलर्जी, (९) एरोस्पेस इंजिनीअरिंग या शाखांमधील महिला अभियंत्यांची निवड केली जाते.

ही भरती (१) नॅवल आर्किटेक्चर (नौदल वास्तुकला), (२)निरीक्षक, (३) अध्यापन, (४) विधि, (४) वैमानिक, (५) अस्त्र आणि शस्त्रांची पाहणी/निरिक्षण/तपासणी, (६) विमान वाहतुक नियंत्रण या शाखांसाठी केली जाते. सध्या ही पदे लघु सेवा कमिशन म्हणजेच शॉर्ट सर्व्हिस कमिशन या संवर्गातील आहेत.

भरती  प्रक्रिया

(१)     वैमानिक व निरीक्षक या पदांच्या नियुक्तीसाठी दरवर्षी दोनदा भरती प्रक्रिया राबवली जाते. त्याची जाहीर सूचना फेब्रुवारी आणि सप्टेबरमध्ये काढली जाते.

(२)     अस्त्र आणि शस्त्रांची पाहणी/निरिक्षण/तपासणी पदाच्या नियुक्तीची जाहिरात जानेवारी आणि ऑगस्ट महिन्यात काढली जाते.

(३)     विमान वाहतूक नियंत्रण पदाची जाहिरात फेब्रुवारी,अध्यापन पदाची जाहिरात मार्च महिन्यात काढली जाते.

(४)     लॉजिस्टिक पदाची जाहिरात सप्टेबर, नौदल वास्तुकला पदाची जाहिरात ऑगस्ट महिन्यात काढली जाते.

(५)     विधि शाखेतील पदांची जाहिरात जागांच्या उपलब्धतेनुसार काढली जाते.

ही प्रकिया दरवर्षी ठरलेल्या काळातच राबवली जात असल्याने त्याच्या तारखा ठरलेल्या असतात. या पदांची जाहिरात येण्याचे वेळापत्रकही ठरले असते. याबाबी ध्यानात ठेऊन ज्या तरुणी यंदा पदवीची अंतिम परीक्षा देत असतील त्या या भरती प्रकियेत सहभागी होऊ शकतात.

धेय्य निश्चीती

या पदांसाठीच आपली निवड झालीच पाहिजे, हे उदिष्ट्य ठेऊन तशी तयारी केली तर यशाला गवसणी घालणेही शक्य होऊ शकते. तथापि या पदांची संख्या मर्यादित असते. त्यामुळे स्पर्धाही तीव्र असते. यामध्ये यश मिळवण्यासाठी पारंपरिक पदवी अभ्यासक्रमाच्या परीक्षेपेक्षा अधिक सखोल असा अभ्यास आवश्यक ठरतो. ज्या तरुणींनी अशा प्रकारे आतापावेता अभ्यास केला असल्यास त्यांना फारशी अडचण जाणार नाही. यंदा १२ वीनंतर अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान शाखेतील पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या ज्या तरुणींना नौदलात करिअर करायचे आहे त्यांनी पहिल्या सत्रापासूनच समजून उमजून ज्ञानग्रहण करण्याची मनोभूमिका तयार करायला हवी.

शारीरिक क्षमतेची चाचणी

भरती प्रक्रियेत शारीरिक आणि वैद्यकीय चाचणी महत्वाची ठरते. मौखिक चाचणीमध्ये उत्तीर्ण उमेदवारांनाच शारीरिक चाचणीसाठी बोलावले जाते. शारीरिक चाळणीत उत्तीर्ण झालेल्या महिला उमेदवारांना वैद्यकीय चाचणीसाठी बोलावले जाते. त्यामुळे या घटकांसाठीची तयारी यंदा १२ वीनंतर अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान पदवीशाखेला विद्यार्थींनींनी पहिल्यावर्षापासूनच करावी. शारीरिक क्षमतेसाठी ठरलेल्या निकषात बसण्यासाठी ज्या बाबी आवश्यक आहे, त्याकडे आतापासूनच लक्ष दिल्यास तशी सक्षमता पुढीच चार वर्षात उत्तमरीत्या प्राप्त होईल. यंदा पदवीच्या अंतिम वर्षाला असलेल्या विद्यार्थींना मात्र शारीरिक क्षमतेचे निकष पूर्ण करण्यासाठी अधिक परिश्रम करावे लागेल. त्यासाठी त्यांना सुव्यवस्थित नियोजन करुन त्याचे काटेकोरपणे पालन करावे लागेल. शारीरिक चाचणी उत्तीर्ण होणे ही सर्वात आवश्यक अर्हता असल्याने, त्यावर लक्ष केंद्रित करायला हवे.

लघु.सेवा कमिशनमध्ये प्रारंभी १० वर्षासाठी नियुक्ती दिली जाते. त्यानंतर दोन टप्प्यात प्रत्येकी दोन वर्षासाठी म्हणजे चार वर्षे वाढ मिळू शकते. यासाठी उमेदवाराचा आतापर्यंतची कामगिरी, सुदृढता आदी बाबींचा विचार केला जातो. या संवर्गात निवड झालेल्या उमेदवारांना कायमस्वरुपी नियुक्ती केली जात नाही.(अपूर्ण)

सुरेश वांदिले

Your content goes here. Edit or remove this text inline or in the module Content settings. You can also style every aspect of this content in the module Design settings and even apply custom CSS to this text in the module Advanced settings.