(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

सागरी मासेमारी

भारताला मोठा सागरी किनारा लाभला आहे. या सागरी किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणावर व्यावसायिक पध्दतीने मासेमारी केली जाते. यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. अशा यंत्रकुशल मनुष्यबळास करिअरच्या विविध संधी मिळू शकतात.त्या अनुषंगाने बॅचलर ऑफ फिशरी सायन्स (नॉटिकल सायन्स)हा अभ्यासक्रम उपयुक्त ठरतो. हा अभ्यासक्रम सेंट्रल इंस्टिट्यूट ऑफ फिशरीज नॉटिकल ॲण्ड इंजिनीअरिंग या संस्थेमार्फत चालवला जातो. अभ्यासक्रमाचा कालावधी चार वर्षे

या अभ्यासक्रमामध्ये समुद्रातील फिशिंग व्हेसल्स बाबत जहाजावर प्रशिक्षण दिले जाते. या अभ्यासक्रमाला डायरेक्टारेट जनरल ऑफ शिपिंग यांची मान्यता मिळाली आहे.

अर्हता- () या अभ्यासक्रमाला प्रवेश मिळवू इच्छिणाऱ्या खुल्या संवर्गातील विद्यार्थ्याला १२ वीमध्ये गणित आणि इंग्रजी विषयात किमान ५० टक्के गुण मिळणे आवश्यक आहे. विज्ञानाच्या इतर विषयांमध्ये सरासरीने ५० टक्के गुण मिळायला हवे. अनुसूचित जाती आणि जमाती संवर्गातील उमेदवारासाठी ही अट नाही. () वयोमर्यादा – १ ऑक्टोबर रोजी १७ ते २० वर्षे.

या संस्थेच्या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी चाळणी परीक्षा जून महिन्यात रोजी कोची,चेन्नई आणि विशाखापट्टणम येथे घेण्यात येते. अंतिम निवड या परीक्षेतील गुण, मुलाखत आणि शैक्षणिक गुणवत्तेवर आधारित केली जाते.

संपर्क – सेंट्रल इंस्टिट्यूट ऑफ फिशरीज नॉटिकल अॅण्ड इंजिनिअरिंग ट्रेनिंग,फाइन आर्ट अव्हेन्यू, कोची- ६८२०१६, दूरध्वनी-०४८४-२३५१४९३, फॅक्स-२३७०८७९,ईमेल-cifnet@nic.in, संकेतस्थळ- www.cifnet.gov.in

०००

काय शिकाल?

()मासेमारीचा विस्तृत अभ्यास, ()मासेमारीच्या विविध कार्यपध्दती, () मासेमारीच्या बोट/नौके(व्हेसल)ची निर्मिती, () बोटीवरील इंजिन आणि इतर यंत्रसामग्रीचा अभ्यास, () सागरीशास्त्र आणि सागरी हवामानशास्त्र, () मासेमारीचे अर्थकारण, () मासेमारी नौकेची देखभाल, ()माशांचे हार्वेस्टिंग, () पोस्ट हार्वेस्ट तंत्रज्ञान