(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

 

  

सेंटर ऑफ एक्सलन्स इन बेसिक सायन्स

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन ॲण्ड रिसर्च भूवनेश्वर आणि मुंबई विद्यापीठांतर्गत येणाऱ्या डिपार्टमेंट ऑफ ॲटोमिक एनर्जी  आणि सेंटर ऑफ एक्सलन्स इन बेसिक सायन्स या विभागात गणित विषयामध्ये पाच वर्षे कालावधीच्या इन्टिग्रेटेड एम.एस्सी अभ्यासक्रम करता येतो. या अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या वर्षापासून संपूर्णपण गणित विषयांवर लक्ष केंद्रित केले जाते.

या अभ्यासक्रमाला प्रवेश मिळालेल्या सर्व विद्यार्थ्यांना दरमहा ५ हजार रुपयांची शिष्यवृत्ती दिली जाते. ही परीक्षा जून महिन्यात देशभरातील विविध केंद्रांवर घेतली जाते. यामध्ये महाराष्ट्रातील नागपूर, मुंबई  आणि पुणे शहरांचा समावेश आहे. विद्यार्थ्यांची निवड नॅशनल एन्ट्रन्स स्क्रीनिंग टेस्ट या परीक्षेद्वारे केली जाते.

संपर्क- यूएम – डीएई सेंटर फॉर एक्सलन्स इन बेसिक सायन्सेस, हेल्थ सेंटर, मुंबई विद्यापीठ, विद्यानगरी कॅम्पस कलिना, सांताक्रुज – (पूर्व), मुंबई- ४०००९८, दूरध्वनी- ०२२-२६५३२१३२, टेलेफॅक्स – २६५३२१३४, संकेतस्थळ- http://www.cbs.ac.in/, ईमेल- info@cbs.ac.in

उच्चप्रतिचे संशोधन

इंडियन इन्स्टिटयूट ऑफ सायन्स एज्युकेशन ॲण्ड रिसर्च,पुणे या संस्थेत  गणित विषयात उच्चप्रतिचे संशोधन करण्याची संधी उपलब्ध करुन दिली जाते.  संस्थेत १२ वी विज्ञान विषयातील विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. अभ्यासक्रम हा पाच वर्षाचा असून तो पूर्ण केल्यावर बीएस-एमएस म्हणजे बॅचलर ऑफ सायन्स-मास्टर ऑफ सायन्स ही पदवी दिली जाते. प्रवेश मिळालेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला दरमहा पाच हजार रुपयांची शिष्यवृत्ती दिली जाते.

संपर्क- इंडियन इन्स्टिटयूट ऑफ सायन्स एज्युकेशन ॲण्ड रिसर्च, डॉ होमी भाभा रोड पाषाण पुणे – ४११००८, दूरध्वनी -०२०-२५९०८०००,फॅक्स-२०२५१५६६ संकेतस्थळ http://www.iiserpune.ac.in/,ईमेल-admissions@iserpune.ac.in

०००