(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

स्टायलिंग आणि मेकअप

राजे- महाराजे यांच्या घरच्या लग्न सोहळयांसारखेच लग्नसोहळे सर्वत्र साजरे होताना दिसतात. बिग फॅट इंडियन वेडिंग, असा एक वाक्प्रचार सुध्दा प्रचलित झाला आहे. या लग्नसोहळयामधला महत्वाचा भाग हा ब्रायडल मेकअप म्हणजेच वधुला सजवणे हा असतो. लग्न ठरताक्षणीच ब्रायडल मेकअपचे नियोजन केले जाते. किंबहुना काही घरात त्याची तयारी आधीच करुन ठेवली जाते. ब्रायडल मेकअपमुळे वधुच्या असलेल्या – नसलेल्या सौंदर्यात चार चांद, आठ सूर्य आणि सोळा तारे वगैरे शंभर टक्के लागतातच. ब्रायडल मेकअपची सेवा घेऊन वऱ्हाड्यांच्या समोर येणाऱ्या वधुकडे काही क्षण टक लावून बघणे क्रमप्राप्तच ठरते. ब्रायडल मेकअप आर्टिस्टचे हे कौशल्य असते. वधु राजकुमारीसारखी सजली जाते, हे असे दिसणे बहुतांश वधुच्या जीवनात एकदाच होत असल्याने ब्रायडल मेकअसाठी चांगला खर्च करण्याची तयारी असते.

ब्रायडल मेकअप

ब्रायडल मेकअपचे अभ्यासक्रम किंवा प्रशिक्षण १० वी किंवा १२ वी उत्तीर्ण कोणत्याही उमेदवारास घेता येतात. या प्रशिक्षण अभ्यासक्रमांध्ये ब्रायडल मेकअपचे विविध प्रकार, पारंपरिक, आधुनिक अथवा समकालीन पध्दती हे विषय शिकवले जातात. हा अभ्यासक्रम करणाऱ्या व्यक्तिंना स्टायलिंगचे प्रशिक्षण मिळत असल्याने ते सेलिब्रिटी स्टायलिंग पासून कॉर्पोरेट्समधील उच्चपदस्थ व्यक्तिंचे स्टायलिंग करु शकतात. चित्रपट, टीव्ही, क्रीडापटू, कॉर्पोरेट बॉसेस, उ्द्योजक, उच्चपदस्थांचे कुटुंबीय, शेकडो मालिकांधील हजारो पात्रे, असंख्य रिॲलिटी शोमधील शेकडो स्पर्धक आणि परीक्षक आदींसाठी स्टायलिस्ट्सची गरज मोठी आहे.

लॅक्मे ॲकॅडेमी

स्टायलिंग आणि मेकअपच्या अभ्यासक्रमात व्यक्तिमत्व फुलवण्याचे कौशल्यतंत्र समाविष्ट असल्याने या तज्ज्ञांची मागणी उत्तरोत्तर वाढत चाललीय. लॅक्मे ॲकॅडेमिने ब्रायडल मेकअप, ऑकेजन मेकअप, फॅन्टसी मेकअप, हाय डेफिनेशन मेकअप, अल्टिमेट एअर ब्रश मेकअप असे ॲडव्हहान्स्ड अभ्यासक्रम सुरु केले आहेत. शिवाय, डे ॲण्ड नाईट मेकअप, पार्टी मेकअप, एंगेजमेंट मेकअप, ऑकेजन मेकअप, कॉर्पोरेट मेकअप, एव्हरीडे मेकअप असे मुलभूत अभ्यासक्रम सुरु केले आहेत.

करिअर संधी

हा अभ्यासक्रम केल्यावर (१) ब्रायडल हेअर स्टायलिस्ट (लग्नाचा दिवस हा वधुसाठी अत्यंत आणि अत्यंत महत्वाचा  असल्याने हा तज्ज्ञ वधुला अधिक सौंदर्यवान करुन आनंदाचा मोरपिसारा फुलवत असतो. लग्नाचा दिवस संस्मरणीय करण्याचे कसब याने प्राप्त केलेले असते.) (२) ब्रायडल मेकअप आर्टिस्ट (वधुस नुर-ए – जहाँ” करण्याचे कसब प्राप्त केल्याने मिळणारी वाहवा आणि त्याहुन मनोजोगते पारिश्रामिक हे अत्यंत समाधान देऊन जाते.) (३) सेलिब्रिटी हेअर स्टायलिस्ट (विविध क्षेत्रातील नामवंतांना त्यांचा वैशिष्टपूर्ण लूक किंवा चेहरा देण्याचे कार्य हा तज्ज्ञ करतो.) (४) सेलिब्रिटी मेकअप आर्टिस्ट (वेगवगळ्या इव्हेंट-कार्यक्रम – समारंभ यासाठी वेगवेगळी हेअरस्टाइल करण्याकडे विविध क्षेत्रातील नामवंतांचा ओढा असतो. त्यांना भाऊर्गदित आपला ठसा उमटवायाचा असतो. हा ठसा ठसठशितपणे उमटवण्याचे कार्य हा तज्ज्ञ करतो. कालांतरने हे स्टायलिस्ट या नामवंतांच्या गळ्यातील ताईत बतात.त्यांना मर्यादित स्वरुपाचे सेलिब्रिटीपण प्राप्त होते.) (५) ब्युटी कंसलटंट – विविध प्रकारच्या हेअर स्टायलिंग आणि मेकअपचे ज्ञान प्राप्त झाल्याने वेगवेगळया संस्था आणि व्यक्तिंसाठी सल्ला – सेवा देण्याचे काम मिळू शकते. तुमच्या ज्ञानाची गुणवत्ता जितकी मोठी तितके तुमचे मानधनही मोठे हे लक्षात ठेवले पाहिजे. (७) स्टायलिस्ट असिस्टंट (नामवंत आणि स्थापित झालेल्या स्टायलिस्ट्सला सहाय्यक म्हणून काम करण्याची संधी मिळते. हा कालावधी उत्तम अनुभव मिळवण्यासाठी उपयुक्त ठरतो. या अनुभवाचा उपयोग आणखी कौशल्यप्राप्तीसाठी केल्यास स्वत: स्टायलिंग सेवा देण्यासाठी मैदानात उतरु शकतो. अशा सारख्या करिअर संधी मिळतात.

संपर्क- https://www.lakme-academy.com/

०००

पर्ल ॲकॅडेमी

या संस्थेने (१) फॅशन ॲण्ड सेलिब्रिटी मेकअप आणि (२) पर्सनल स्टायलिंग ॲण्ड इमेज कंसलटंट हे दोन प्रत्येकी हा ११ महिने कालावधीचे प्रोफेशनल सर्टिफिकेट अभ्यासक्रम सुरु केले आहेत. कोणत्याही शाखेतील १२ वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना ते करता येतात.

संपर्क-https://admission.pearlacademy.com/