
स्टार्टअप २०२४
महाराष्ट्र शासनाची स्टार्टअप २०२४ ही योजना घोषित झाली आहे.
या स्टार्टअप योजनेमध्ये पुढील क्षेत्रांचा समावेश आहे- (१) कृषी तंत्रज्ञान आणि तत्सम (ॲग्री टेक ॲण्ड अलाइड), (२) शैक्षणिक तंत्रज्ञान आणि कौशल्य (एज्युटेक ॲण्ड स्किलिंग), (३) सुशासनासाठी तंत्रज्ञान (टेक्नॉलॉजी इन गव्हर्नन्स), (४) शास्वतता (स्वच्छ उर्जा, जल, कचरा व्यवस्थापन (वेस्ट मॅनेजमेंट), सर्क्युलर इकॉनॉमी), (५) आरोग्य तंत्रज्ञान (हेल्थ टेक ॲण्ड अलाइड), (६) उगवते तंत्रज्ञान (इर्मजिंग टेक्नॉलॉजी-सायबर सेक्युरिटी), (७) स्मार्ट पायाभूत सुविधा (स्मार्ट इन्फ्रास्ट्रक्चर, मोबिलिटी, लॉजिस्टिक्स), (९) शासनासाठी उपयुक्त ठरु शकतील अशी कोणतीही क्षेत्रे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख १ ऑगस्ट २०२४.
अटी आणि शर्ती
(१) डिपार्टमेंट फॉर प्रमोशन ऑफ इंडस्ट्री ॲण्ड इंटर्नल ट्रेड कडून मान्यताप्राप्त, देशातील कोणतेही स्टार्टअप, (२) कार्यान्वित होऊ शकतील असे स्टार्टअप, (३) शासनासाठी उपयुक्त ठरु शकतील अशा सेवा किंवा उत्पादने, (४) मागील स्टार्टअप विजेत्यांचा विचार केला जाणार नाही.
या योजनेत सहभागी झालेल्या स्टार्टअपमधून गुणवत्ता आणि दर्जानुसार सर्वोच्च १०० स्टार्टअपची प्रारंभी निवड केली जाईल. या स्टार्टअप्सना त्यांच्या उपक्रमाच्या सादरीकरणासाठी निमंत्रित केलं जाईल. हे सादरीकरण तज्ज्ञ परीक्षकांसमोर करावं लागेल. या तज्ज्ञ परिक्षकांडून सर्वोत्कृष्ट विविध क्षेत्रातील (सेक्टर) २४ स्टार्टअपची निवड पुढील टप्प्याकरिता केली जाईल. त्यांना १५ लाख रुपयाचे शासकीय काम थेट दिलं जाईल. या शिवाय (१) क्लाऊड क्रेडिट, (२) बहुविध योजनांशी थेट संपर्क, (३) प्रेरकां(मेंटर)ची सुविधा, (४) गुंतवणूकदारांसोबत संपर्क, (५) स्टार्टअप प्रत्यक्ष कार्यान्वित होईपर्यंत शासनाच्या विविध विभागांकडून एक वर्षापर्यंत आवश्यक ते साहाय्य आदी लाभ सुध्दा या स्टार्टअप्सना मिळतील.
मागील स्टार्टअप योजनेतील विजेत्यांची माहिती – https://bit.ly/msw-winners संपर्क साखळीवर ठेवण्यात आली आहे. या योजनेत सहभागी होताना मार्गदर्शनाची सुविधा म्हणून सादरीकरणाचा नमुना – https://bit.ly/msw-sample-ppt या संपर्क साखळीवर उपलब्ध करुन देण्यात आला आहे. अर्ज ऑनलाइनच भरावा लागतो.
०००
०००
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, महिलांसाठी स्टार्टअप योजना
स्टार्टअपच्या क्षेत्रात येऊन उद्योजिका बनण्याची महत्वाकांक्षा असणाऱ्या महाराष्ट्रातील महिलांसाठी ही योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत प्रारंभिक टप्प्यावरील साहाय्यासाठी १ लाख ते २५ लाख रुपयांपर्यंत आर्थिक मदत केली जाते.
स्टार्टअप पात्रता निकष
(१) वार्षिक उलाढाल १० लाख रुपये ते १ कोटी रुपयांपर्यंत असावी, (२) स्टार्टअप किमान एक वर्षापासून कार्यरत असावे, (३) महिला संस्थापकांचा किमान ५१ टक्के वाटा असावा, (४) महाराष्ट्र नोंदणीकृत, डीपीआयआयटी (डिपार्टमेंट फॉर प्रमोशन ऑफ इंडस्ट्री ॲण्ड इंटर्नल ट्रेड) मान्यताप्राप्त स्टार्टअप असावे, (५) आश्वासक, नावीन्यपूर्ण आणि प्रभावी स्टार्टप्सना प्राधान्य दिलं जाईल, (६) रोजगार निर्मिती करु शकणाऱ्या स्टार्टअप्सना प्राधान्य दिलं जाईल, (७) राज्य शासनाच्या इतर योजनेतून अनुदानासारखा लाभ घेतलेला नसावा.
०००
स्टार्टअप्सना चालना
राज्यामध्ये सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांतील स्टार्टअप्सना चालना देण्यासाठी एक योजना राबवली जाते. त्याचे निकष पुढील प्रमाणे आहेत- (१) ज्या उद्योगाची नोंदणी होऊन पाच वर्षे झालेली नाहीत, (२) प्रत्यक्ष उद्योग सुरु होऊन तीन वर्षे झालेली नाहीत, (३) ज्या उद्योगाची मागील तीन वर्षात वार्षिक उलाढाल २५ कोटी रुपयांपेक्षा अधिक नाही, अशा उद्योगांना पुढील लाभ दिला जातो.
या योजनेत सहभागी होणाऱ्या सूक्ष्म-लघु-मध्यम उद्योगांना पहिल्या वर्षी- (१) उपदान प्रदान अधिनियम -१९७२, (२) इमारत व इतर बांधकाम कामगार (रोजगाराचे विनमयन व सेवाशर्ती) अधिनियम-१९९६, (३) आंतरराज्य स्थलांतरित कामगार (रोजगाराचे विनमयन व सेवाशर्ती) अधिनियम- १९७९, (५) कंत्राटी कामगार (नियमन व निर्मूलन) अधिनियमन- १९७२, या कामगार कायद्यांतर्गत करण्यात येणाऱ्या निरीक्षणातून सूट देण्यात येईल. (२) भविष्य निर्वाह निधी, कर्मचारी विमा योजना यासारख्या केंद्रिय कामगार कायद्यांबाबत, श्रम सुविधा पोर्टलवरील संबंधित कायद्याची स्वयंप्रमाणित विवरणपत्रे संबंधित यंत्रणेकडे दाखल करता येतील. (३) केंद्र शासनाच्या इंडस्ट्रिएल पॉलिसी ॲण्ड प्रमोशन या योजनेंतर्गत नोंदणी केलेल्या स्टार्टअप्स युनिटन्सना या योजनेचा लाभ घेता येईल.
संपर्क- महाराष्ट्र स्टेट इनोव्हेशन सोसायटी, पहिला माळा, हॉल ९, एलफिंस्टन तांत्रिक शाळा परिसर, ३, महापाहिला मार्ग, मेट्रो सिनेमाच्या विरुध्ददिशेने, धोबी तलाव, छत्रपती शिवाजी टर्मिनस परिसर, फोर्ट मुंबई, महाराष्ट्र- ४००००१, संकेतस्थळ-
https://www.msins.in
सुरेश वांदिले