(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

स्मार्ट पॅकेजिंग मधील करिअर संधी- आजच्या स्मार्ट काळात एखाद्या वस्तुची गुणवत्ता आणि दर्जा महत्वाची असतेच. त्याशिवाय त्या वस्तुचे आकर्षक पॅकिंग सुध्दा तितकेच महत्वाचे असते. त्यामुळे पॅकेजिंगकडे अधिकाधिक लक्ष दिले जाते. पॅकेजिंगच्या नवनवीन डिझाइन्स शोधल्या जातात. त्याच्या विविध रंगसंगती विकसित केल्या जातात. वस्तुंकडे आकर्षित करण्यासाठी पॅकेज (कव्हर) महत्वाची भूमिका बजावत असते.

आपल्या देशातील विविध वस्तुंच्या बाजारपेठेचा आकार बघता पॅकेजिंग क्षेत्राचे महत्व लक्षात यावे.

  या क्षेत्रात  करिअर करण्याची इच्छा असणाऱ्या व्यक्तिंना चांगल्या संधी उपलब्ध होऊ शकतात.कोरोनोत्तर काळात ग्राहकांचा कल हा ऑनलाइन खरेदीकडे असल्याने,होम डिलिव्हरीच्या पॅकेजिंगची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे.त्यासाठी अशा कौशल्यप्राप्त उमेदवारांची गरजही वाढणार आहे.ही बाब लक्षात घेता इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पॅकेजिंग या संस्थेने सुरु केलेले विविध अभ्यासक्रम उपयुक्त ठरु शकतात.

यातील काही अभ्यासक्रम हे दीर्घ कालावधीचे आहेत. तर काही अभ्यासक्र लघु मुदतीचे आहे. या लघुमुदतीच्या अभ्यासक्रमात सर्टिफिकेट अभ्यासक्रमाचा समावेश आहे.

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पॅकेजिंग

अभ्यासक्रम

·     सर्टिफिकेट प्रोग्रॅम इन पॅकेजिंग टेक्नॉलॉजी-

 कालावधी तीन महिने. हा अभ्यासक्रम विशेषत: निर्यातयोग्य  मालाच्या सुयोग्य पॅकेजिंगसाठी उपयुक्त ठरतो.१९६९ साली हा अभ्यासक्रम सुरु करण्यात आला. भारत सरकारच्या वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या सहकार्याने हा अभ्यासक्रम चालवला जातो. या अभ्यासक्रमास एशियन पॅकेजिंग फेडरेशनची अधिस्वीकृती मिळाली आहे.

हा अभ्यासक्रम मुंबई, दिल्ली, कोलकता ,हैदराबाद, चेन्नई येथे करता येतो. एकाच वेळी १५ ते २५ उमेदवारांना प्रवेश दिला जातो. हा अभ्यासक्रम सप्टेबर ते डिसेंबर या कालावधीत आयोजित केला जातो. कोणत्याही शाखेतील १२ वी, आयटीआय, पदवीधर किंवा पदविकाधारकांना या अभ्यासक्रमास प्रवेश मिळू शकतो.

काय शिकाल?

या अभ्यासक्रमात पॅकेजिंगची मलभूत तत्वे, साधने, प्रक्रिया, कार्यप्रणाली, विविध प्रकारांची निर्मिती आणि त्यांचा उपयोग यांचा ढोबळमानाने समावेश करण्यात येतो.

उमेदवारांना पॅकेजिंगच्या अनुषंगाने तांत्रिक, शास्त्रीय आणि कलात्मक ज्ञान प्रदान केले जाते. पॅकेजिंग सहित्याची सुरक्षिता,मूल्य  याविषयीसुध्दा प्रशिक्षण दिले जाते. हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर संस्थेमार्फत प्रमाणपत्र दिले जाते.  

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पॅकेजिंग

अभ्यासक्रम

पोस्ट ग्रज्युएट डिप्लोमा इन पॅकेजिंग

गेल्या २५ वर्षांपासून हा अभ्यासक्रम चालवण्यात येत आहे. कालावधी दोन वर्षे. अर्हता- अभियांत्रिकी, तंत्रज्ञान आणि विज्ञान विषयातील पदवी. या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी दरवर्षी जून महिन्यात चाळणी परीक्षा घेतली जाते. अभ्यासक्रमाचा प्रारंभ ऑगस्ट महिन्यात होतो. हा अभ्यासक्रम संस्थेच्या मुंबई, दिल्ली, कोलकता आणि हैदराबाद कॅम्पसमध्ये करता येतो.

 हा अभ्यासक्रम चार सत्रांचा आहे. यापैकी तीन सत्रांचा अभ्यासक्रम कॅम्पसमध्ये शिकवला जातो. चौथ्या सत्रामध्ये वेगवेगळया पॅकेजिंग उद्योगामध्ये प्रत्यक्ष काम करावे लागते.

हा अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना पॅकेजिंग उद्योगात गुणवत्ता परीक्षण आणि मूल्यमापन, निर्मिती, विक्री आणि विपणन, डिझायनिंग अशा सारख्या क्षेत्रात करिअरच्या संधी मिळतात. हा अभ्यासक्रम केलेले उमेदवार राष्ट्रीय आणि बहुराष्ट्रीय कंपन्यांमधे सध्या उच्च पदांवर कार्यरत आहेत.

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पॅकेजिंग

अभ्यासक्रम

·     डिप्लोमा इन पॅकेजिंग- हा १८ महिने कालावधीचा अभ्यासक्रम असून तो दूरशिक्षण पध्दतीने(करस्पांडन्स)करता येतो.

·     यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून एम.एस्सी इन पॅकेजिंग टेक्नॉलॉजी हा अभ्यासक्रम सुरु करण्यात आला आहे.कालावधी- दोन वर्षे.अर्हता-भौतिकशास्त्र,रसायनशास्त्र,गणित,सूक्ष्मजीवशास्त्र किंवा जैवरसायनशास्त्र या मुख्य विषयांसह किंवा किंवा यापैकी एक दुय्यम विषयासह ३ वर्षे कालावधीची विज्ञान विषयातील पदवी किंवा कृषी/अन्न विज्ञान-फूड सायन्स/पॉलिमर सायन्स किंवा अभियांत्रिकी/टेक्नॉलॉजी या विषयातील पदवी.

अभ्यासक्रमाच्या निवडीसाठी कॉमन एन्ट्रन्स टेस्ट घेतली जाते.संपर्क-iidelhi@ iip-in.com

 

संपर्क इंडियन इंस्टिट्यूट ऑफ पॅकेजिंग, प्लॉट इ , रस्ता क्रमांक, एमआयडीसी एरिय,पोस्ट बॉक्स९४३२,अंधेरी पूर्व, मुंबई ४०००९३, दूरध्वनी०२२-२८२१९८०३, फॅक्स२८३२८५३०२, ईमेल- – director-iip@iip-in.com

 संकेतस्थळ- http://www.iip-in.com. ०००