(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

कंटेम्प्ररी ब्रॉयडल ट्रोस्स्यू डिझाइन

लग्नात नटणार नाही, सजणार नाही ती वधु कसली? म्हणजे लग्नात विधी पासून संगितापर्यंत, सजावटी पासून, लज्जतदार भोजनापर्यंत साऱ्याच बाबी महत्वाच्या असतातच. पण वधुचा साजशृंगाराची बात काही और असते. या सोहळ्यातला हा एक महत्वाचा आणि वधुच्या अत्यंत जिव्हाळ्याचा विषय असतो. सध्या तर वधु पोषाखाच्या डिझाइनवर विशेष लक्ष दिले जाते. “आता नाही तर मग केव्हा,” हा त्यामागचा दृष्टिकोन असतो.

नववधुच्या पोषाखाच्या डिझाइनचे क्षेत्र आता करिअर घडविण्यासाठीसुध्दा उपयुक्त ठरु शकते. हे कौशल्याचे क्षेत्र असून त्याविषयीचा प्रात्यक्षिकांवर आधारित अभ्यासक्रम,  या संस्थेने सुरु केला आहे. हा अभ्यासक्रम, कंटेम्प्ररी ब्रॉयडल ट्रोस्स्यू डिझाइन, या नावाने ओळखला जातो.

फॅशनेबल वस्त्रांचे डिझाइन, निर्मिती, विक्री या क्षेत्रांमध्ये आवड असणाऱ्या आणि हटके काही करु इच्छिणाऱ्या तरुण-तरुणींसाठी हा अभ्यासक्रम रोजगार आणि स्वयंरोजगार मिळवण्याच्या अनुषंगाने उपयुक्त ठरु शकतो. हा अभ्यासक्रम कोणत्याही ज्ञान शाखेत १२ वी उत्तीर्ण झालेल्या उमेदवारास करता येतो.

या अभ्यासक्रमात वधु पोषाखाच्या डिझाइनच्या अनुषंगाने रंगसंगती, पोत, आकार, साहित्य या बाबींचे प्रशिक्षण दिले जाते. संबंधित वधुची इच्छा आणि आवड, तिचे आकारमान ,तिचा कल या बाबी लक्षात घेऊन या पोषाखाचे नमूने किंवा साचे तयार करण्याचे प्रशिक्षण दिले जाते. भारतीय, पाश्चिमात्य आणि समकालीन फ्युजन वधु पोषाख निर्मितीच्या सर्व तांत्रिक बाबींचे प्रशिक्षण दिले जाते. हा अभ्यासक्रम केल्यावर फॅशन डिझायनर, उद्योजक, फॅशनेबल पोषाखांची विक्री केंद्र चालक आदी संधी मिळू शकतात. हा अभ्यासक्रम सहा महिने कालावधीचा आहे.

डिप्लोमा इन फॅशन फिट ॲण्ड स्टाइल

राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरील आधुनिक फॅशन प्रचलित कल, संभाव्य कल लक्षात घेऊन दर्जेदार स्मार्ट फॅशनेबल डिझायनर्स पोषांखाची निर्मिती करण्याची कला, कौशल्य  आणि तंत्र या अभ्यासक्रमात शिकवले जाते.

हा अभ्यासक्रम केल्यावर पुढील करिअर संधी मिळू शकतात. () डिझायनर्स, () फ्री लान्स डिझाइन कंसलटंट, () डिझाइन मॅनेजर्स, () स्टायलिस्ट, () फोरकास्टिंग ॲण्ड फॅशन ट्रेंड ऑर्गनायझर, () कॉस्च्युम डिझायनर, () इलुस्ट्रेटर, () पॅटर्न इंजिनीअर, () आंतरप्रिन्युरर्स.

या अभ्यासक्रमाचा कालावधी दोन वर्षे असून कोणत्याही ज्ञानशाखेतील १२वी उत्तीर्ण उमेदवारास तो करता येतो.

डिप्लोमा इन फॅशन आंत्रप्रिन्युरशीप

अभ्यासक्रमाला प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना विक्री, विपणन (मार्केटिंग), ब्रँडिंग, रिटेलिंग आणि मर्कंडायजिंगचे (व्यवसाय) प्रशिक्षण दिले जाते. वस्त्रनिर्मितीचे तांत्रिक ज्ञान, धाग्यांचे तांत्रिक ज्ञान दिले जाते. व्यवस्थापकीय कौशल्य तंत्र आणि तांत्रिक बाबी पक्क्या केल्यावर व्यवसाय कसा करावा याचे प्रशिक्षण दिले जाते. यामध्ये व्यवसायाचा आराखडा तयार करणे, व्यवसायाच्या सुसाध्यतेचा अभ्यास, प्रकल्प अहवाल, प्रकल्प व्यवस्थापन यांचे ज्ञान प्रदान केले जाते. या अभ्यासक्रमाचा कालावधी एक वर्षाचा आहे. कोणत्याही विषयातील पदवीधर किंवा १२ वीनंतर तीन वर्षे कालावधीची पदविका प्राप्त केलेले उमेदवार अभ्यासक्रमासाठी अर्ज करु शकतात. दोन ते तीन वर्षांचा अनुभव असल्यास प्रवेश घेताना प्राधान्य दिले जाते.

संधी – हा अभ्यासक्रम केल्यावर स्वतंत्र व्यावसायिक (बिझिनेस ओनर्स), व्यवसाय सल्लागार (बिझिनेस कंसलटंट्स), निधीची उपलब्धता करणे (फंड रेझर्स), नव्या व्यवसायांचा विकास (न्यू व्हेंचर डेव्हलपर्स) अशा करिअर संधी मिळू शकतात किंवा स्वत: निर्माण करता येऊ शकतात.

ई-कॉमर्स फॉर फॅशन बिझिनेस

सध्याचा काळ ई कामर्सचा असल्याने, फॅशन व्यवसायही या पध्दतीने करता येणे शक्य व्हावे यासाठी, या संस्थेने तीन महिने कालावधीचा, ई-कॉमर्स फॉर फॅशन बिझिनेस, हा अभ्यासक्रम सुरु केला आहे. तो ऑनलाईन पध्दतीने करता येतो. या अभ्यासक्रमात ऑनलाइन व्यवसाय कसा करावा, त्यासाठी सुयोग्य डिजिटल प्लॅटफॉर्म कसे निवडावे, ई-कॉमर्स व्यवसायामधील सध्याचे प्रवाह, ई-बिझिनेस वाढवण्याचे तंत्र शिकवले जाते. हा अभ्यासक्रम केलेल्या उमेदवारांना ऑनलाईन मर्कंडायजिंग, ऑनलाईन मार्केटिंग आणि फॅशन आंत्रप्रिन्युरशीप अशा क्षेत्रात स्वयंरोजगाराच्या संधी मिळू शकतात.

संधी –हा अभ्यासक्रम केल्यावर स्वतंत्र व्यावसायिक (बिझिनेस ओनर्स), व्यवसाय सल्लागार (बिझिनेस कंसलटंट्स), निधीची उपलब्धता करणे (फंड रेझर्स), नव्या व्यवसायांचा विकास (न्यू व्हेंचर डेव्हलपर्स) अशा करिअर संधी मिळू शकतात किंवा स्वत: निर्माण करता येऊ शकतात.

संपर्क- नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी, एनआयएफटी कॅम्पस, प्लॉट नंबर १५, सेक्टर-४, खारघर, नवी मुंबई-४१०२१०, दूरध्वनी-०२२-२७७४७०००, ईमेल- fce.mumbai@nift.ac.in ,पदविका अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना https://nift.ac.in/mumbai/continuingeducation या संकेतस्थळावर जाऊन अर्ज डाऊनलोड करावा लागतो.

 () फॅशन प्रॉडक्ट डिझाइन ॲण्ड टेक्नॉलॉजी

फॅशनच्या क्षेत्रातील विविध वस्तूंच्या (ॲक्सेसरीज- उदा -टाय, हँडबॅग, बेल्ट, स्कार्फ, हॅट, ग्लोव्हज इत्यादी) निर्मितीचे ज्ञान या अभ्यासक्रमात दिले जाते. या उद्योगासाठी आवश्यक असणारी पुढील कौशल्ये शिकवली जातात – (१) मुलभूत रेखांकन- बेसिक इलुस्टेशन, (२) तांत्रिक चित्रकला- टेक्निकल ड्राईंग, (३) वस्तुची गुणवत्ता- प्रॉडक्ट क्वालिटी, (४) निर्मिती/ उत्पादनाचे नियोजन- प्रॉडक्शन प्लॅनिंग, (५) डिजिटल अभिकल्प- डिझाइन, (६) चामडे आणि इतर साहित्यापासून तयार करावयाच्या वस्त्रपावरणांचा साचा/नमुना निर्मिती, (७) चित्रांकन- इलुस्ट्रेशन,

हा अभ्यासक्रम करणारे उमेदवार स्वत:चा व्यवसाय सुरु करु शकतात तसेच फॅशन उद्योगामध्ये त्यांना विविध पदांवर काम करण्याची संधी मिळू शकते. हा अभ्यासक्रम एनआयएफटीच्या दिल्ली कॅम्पस (nift.ac.in/delhi) येथे करता येतो.

() ब्रँड आयडेंटिटी डिझाइन

बाजारात येणारी कोणतीही नवी वस्तू किंवा उत्पादनाला ग्राहकांकडे आकर्षून घेण्यासाठी स्वतंत्र ओळख निर्माण करणे अत्यंत आवश्यक असते. अशी ओळख निर्माण करण्यासाठी व्युहनीती किंवा आराखडा तयार करावा लागतो तसेच अधिकाधिक ग्राहकांना आकर्षित करुन त्यांना कायमस्वरुपी टिकवायचे असते. त्याअनुषंगाने हा अभ्यासक्रम उपयुक्त ठरु शकतो. हा अभ्यासक्रम करणाऱ्या उमेदवारांना एखाद्या नव्या उत्पादनाची स्वतंत्र ओळख (ब्रँड आयडेंटिटी) निर्माण करण्याचे तंत्र आणि कौशल्य शिकवले जाते. या अभ्यासक्रमात पुढील विषय घटकांचा समावेश आहे- (१) लोगो (विशिष्ट चिन्ह/आकृती) ची निर्मिती प्रकिया आणि अभिकल्प/डिझाइन, (२) लोगो डिझाइनसाठी डिजिटल तंत्राचा वापर, (३) छायाचित्रण कला, (४) ब्रँडचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी समाज माध्यमांचा उपयोग.

हा अभ्यासक्रम केलेल्या उमेदवारांना लोगो डिझाइन, ब्रँड कोलॅट्रल डेव्हलपमेंट, सोशल मीडिया पोस्ट डिझाइन आदी क्षेत्रात करिअर संधी मिळू शकते. या अभ्यासक्रमाचा कालावधी तीन महिन्यांचा असून कोणत्याही ज्ञानशाखेतील १२ वी उत्तीर्ण उमेदवारांना तो करता येतो. हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर प्रमाणपत्र दिले जातो. हा अभ्यासक्रम एनआयएफटीच्या रायबरेली (nift.ac.in/raebareli) कॅम्पसमध्ये करता येतो.

() इंट्रोडक्शन टू फॅशन शूज-एथनिक फूटवेअर- या अभ्यासक्रमात पादत्राणांच्या डिझाइनपासून ते पॅकेजिंगपर्यंतच्या सर्व बाबींचे प्रशिक्षण दिले जाते. विशेषत: देशी गरजा आाणि ग्राहकांची आवड व कल लक्षात घेतला जातो. देशांतर्गत फॅशनेबल पादत्राणे निर्मिती उद्योगांना लागणारे डिझाइन आणि तांत्रिक कौशल्य उमेदवारांना शिकवले जाते. या अभ्यासक्रमाचा कालावधी तीन महिने. कोणत्याही ज्ञानशाखेतील १२ वी उत्तीर्ण उमेदवारांना तो करता येतो. हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर प्रमाणपत्र दिले जाते. हा अभ्यासक्रम एनआयएफटीच्या रायबरेली कॅम्पसमध्ये (nift.ac.in/raebareli) करता येतो.

(७) क्रियेटिव्ह फॅशन स्टायलिंग- या अभ्यासक्रमात इव्हेंट (कार्यक्रम/ प्रसंग), थिम (विषय), प्रचलित कल (ट्रेंड), व्यक्तिगत शैली (स्टाइल) नुसार स्मार्ट प्रतिमा निर्मितीसाठी फॅशनेबल वस्त्रप्रावरणांचा वापर करण्याचे तंत्र आणि कौशल्य यावर भर दिला जातो.

काय शिकाल?

(१) डिझाइन आणि सौंदर्यशास्त्राची मुलभूत तत्वे, (२) फॅशन स्टायलिंगची ओळख, (३) मुलभूत छायाचित्रण कला, (४) स्टायलिंग प्रेझेंटेशन

करिअर संधी- (१) फॅशन स्टायलिस्ट, (२) फॅशन कंसलटंट, (३) इमेज मेकओव्हर आर्टिस्ट, (४) फॅशन फोटोग्राफर.

या अभ्यासक्रमाचा कालावधी एक आठवडा. कोणत्याही ज्ञानशाखेतील १२ वी उत्तीर्ण उमेदवारांना तो करता येतो. हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर प्रमाणपत्र दिले जातो. हा अभ्यासक्रम एनआयएफटीच्या शिलाँग (nift.ac.in/shillong)कॅम्पसमध्ये करता येतो.

सुरेश वांदिले