(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

स्मार्ट व्यवस्थापक  

सध्याच्या काळाशी सुसंगत असे अभ्यासक्रम सुरु करण्यात इंडियन इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (आयआयएम) या संस्था आघाडीवर असतात. विविध विषय घटकांचे आणि कालावधीचे अभ्यासक्रम वेगवेगळया आयआयएममध्ये सुरु केले जातात. त्याचाच एक भाग म्हणून वेगवेगळया आयआयएमने, इंटिग्रेटेड एमबीए अभ्यासक्रम सुरु केले आहेत. हे पाच वर्षे कालावधीचे अभ्यासक्रम आहेत. १२ वी नंतर ज्याप्रमाणे अभियांत्रिकी, वैद्यकीय शाखा, अभिकल्प (डिझाइन), विधि शाखेमध्ये प्रवेश घेता येतो, त्याचप्रमाणे या पाच वर्षे कालावधीचा अभ्यासक्रमाला प्रवेश घेता येतो. या कालावधित विद्यार्थ्यांमधून, टेक्नोसॅव्ही आणि स्मार्ट व्यवस्थापक घडविण्याची प्रक्रिया केली जाते.

पाच वर्षे कालावधीचा इंटिग्रेटेड अभ्यासक्रम सर्वात आधी इंदौर आयआयएमने सुरु केला. त्यानंतर रोहतक, रांची, बोधगया आणि जम्मू येथील आयआयएम यांनी असा अभ्यासक्रम सुरु केला. या सर्व अभ्यासक्रमांमध्ये पहिली तीन वर्षे विद्यार्थ्यांना सर्व प्रकाराचे मूलभूत ज्ञान प्रदान करुन त्याचा पाया पक्का केला जातो. पुढील दोन वर्षे व्यवस्थापन विषयाच्या मुख्य घटकांना शिकवले जाते. नवीन शैक्षणिक धोरणानुसार या पाचही आयआयएमने तीन वर्षानंतर इंटिग्रेटेड अभ्यासक्रम सोडून जाण्याची सुविधा दिली आहे. अशा विद्यार्थ्यांना, बीबीए ही पदवी प्रदान केली जाते. या अभ्यासक्रमांना कोणत्याही ज्ञानशाखेतील १२ वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना प्रवेश मिळू शकतो.

  • आयआयएम बोधगया

    या संस्थेने २०२१ सालापासून इंटिग्रेटेड प्रोग्रॅम इन मॅनेजमेंट अभ्यासक्रम सुरु केला आहे. अर्हता- १० वी आणि १२ वीमध्ये किमान ६० टक्के गुण आवश्यक. राखीव संवर्गासाठी ५५ टक्के गुण.

संपर्क संकेतस्थळ- https://iimbg.ac.in/programs/ipm/, ईमेल -director_office@iimbg.ac.in

(२) आयआयएम जम्मू

या संस्थेने इंटिग्रेटेड प्रोग्रॅम इन मॅनेजमेंट हा अभ्यासक्रम गेल्या वर्षी सुरु केला आहे. अर्हता- १० वी आणि १२ वीमध्ये किमान ६० टक्के गुण आवश्यक. राखीव संवर्गासाठी ५५ टक्के गुण.

संपर्क- संकेतस्थळ- https://www.iimj.ac.in/programs/ipm/IPM_at_a_glance, ईमेल- : info@iimj.ac.in

निवड प्रकिया

बोधगया आाणि जम्मू येथील इंडियन इंस्टिट्यूट मॅनेजमेंट मधील पाच वर्षे कालावधीच्या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी, जिपमॅट-जॉईंट इंटिग्रेटेड प्रोग्रॅम इन मॅनेजमेंट, ही परीक्षा द्यावी लागते. ही परीक्षा नॅशनल टेस्टिंग एजंसीव्दारे घेतली जाते. परीक्षेचा कालावधी अडीच तास. ही संगणकाधारित (कॉम्पुटर बेस्ड) परीक्षा आहे.

(३) आयआयएम रांची

या अभ्यासक्रमाला  प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्याला १० वी आणि १२ वीमध्ये किमान ६० टक्के गुण मिळणे आवश्यक आहे. राखीव संवर्गासाठी ५५ टक्के गुण.

या अभ्यासक्रमाला, इंटिग्रेटेड प्रोग्रॅम मॅनेजमेंट ॲप्टिट्यूड टेस्ट (आयपीमॅट)मधील गुणांच्या आधारे प्रवेश दिला जातो. ही परीक्षा आयआयएम-इंदौर मार्फत घेतली जाते.

संपर्क- संकेतस्थळ- https://iimranchi.ac.in/ipm/ ईमेल-chair.ipm@ iimranchi.ac.in

(४) आयआयएम रोहतक

२०१९ च्या शैक्षणिक वर्षापासून रोहतक स्थित इंडियन इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटने पाच वर्षे कालावधीचा इंटिग्रेटेड अभ्यासक्रम सुरु केला आहे. प्रवेशासाठी आयपीएम ॲप्टिट्यूड टेस्ट, द्यावी लागते. ही परीक्षा आयआयएम-रोहतकव्दारे घेतली जाते.

संपर्क संकेतस्थळ- https://www.iimrohtak.ac.in/ipm-admission.php,ईमेल-admin@ www.iimrohtak.ac.in

(५) आयआयएम इंदौर-

इंटिग्रेटेड प्रोग्रम इन मॅनेजमेंट या अभ्यासक्रमाला संस्थेमार्फत घेण्यात येणाऱ्या, इंटिग्रेटेड मॅनेजमेंट प्रोग्रॅम-ॲप्टिट्यूड टेस्ट (आयपी-मॅट) व्दारे प्रवेश दिला जातो. १० वी १२ वीमधील उत्तीर्ण श्रेणितील विद्यार्थी या परीक्षेला बसू शकतात.

संपर्क – संकेतस्थळ – www.iimidr.ac.in, ईमेल-ipmadmissions @iimid.ac.in