स्मार्ट व्यवस्थापक भाग एक
बारावीनंतर उत्तम करिअर घडवण्याची संधी इंडियन इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (आयआयएम) या संस्थेने उपलब्ध करुन दिली आहे. स्मार्ट व्यवस्थापकांची गरज सर्वच उद्योजक आणि कार्पोरेट्सना लागते. अशा व्यवस्थापकांची पायाभरणी आणि त्यानंतर उभारणी करण्यासाठी पाच वर्षे कालावधीचा इंटिग्रेटेड अभ्यासक्रम आयआयएमने सुरु केला. सर्वात आधी हा अभ्यासक्रम इंदोर आयआयएमने केला. त्यानंतर रोहतक, रांची, बोधगया आणि जम्मू येथील आयआयएम असा अभ्यासक्रम सुरु केला आहे.
या सर्व अभ्यासक्रमांमध्ये पहिली तीन वर्षे विद्यार्थ्यांची सर्व प्रकाराचे मूलभूत ज्ञान प्रदान करुन त्याचा पाया पक्का केला जातो. पुढील दोन वर्षे या सर्व आयआयएमच्या दोन वर्षे कालावधीच्या एमबीए अभ्यासक्रमच या इंटिग्रेटेड अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना शिकवला जातो. या पाचही आयआयएमने तीन वर्षानंतर अभ्यासक्रम सोडून जाण्याची सुविधा दिली आहे. तथापि असे न करणेच श्रेयस्कर. कारण पाचव्या वर्षी या सर्व आयआयएममध्ये प्लेससमेंटसाठी नामांकित संस्था येतात. शंभर टक्के मुलांना प्लेसमेंट मिळून त्याचे करिअर उत्तमरीत्या मार्गी लागते. या अभ्यासक्रमांना कोणत्याही ज्ञानशाखेतील १२ वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना प्रवेश मिळू शकतो.
आयआयएम बोधगया –
या संस्थेने- २०२१ सालापासून इंटिग्रेटेड प्रोग्रॅम इन मॅनेजमेंट अभ्यासक्रम सुरु केला आहे.अर्हता- १० वी आणि १२ वीमध्ये किमान ६० टक्के गुण आवश्यक. राखीव संवर्गासाठी ५५ टक्के गुण.
या अभ्यासक्रमातील पहिल्या तीन वर्षाचा अभ्यासक्रम हा दरवर्षी दोन सत्रांमध्ये संपवला जातो. चौथ्या आणि पाचव्या वर्षाचा अभ्यासक्रम हा दरवर्षी तीन सत्रात संपवला जातो. सहाव्या सत्रामध्ये विद्यार्थ्यास स्पेशलायझेशनचा विषय निवडता येतो. दुसऱ्या वर्षी बिझिनेस इंटर्नशीप किंवा संशोधन आधारित प्रकल्प किंवा ग्रामीण आणि सामाजिक प्रकल्प यापैकी कोणतीही एक बाब स्वीकारावी लागते.
काय शिकाल?
पहिल्या सहा सत्रांमध्ये पुढील विषय घटकांचा अभ्यास करावा लागतो- इंट्रोडक्शन टू अकाउंटिंग, इमोशनल इंटेलिजन्स ॲण्ड माईंडफुलनेस, इफेक्टिव्ह लँग्वेज ॲण्ड कम्युनिकेशन स्किल, प्रिंसिपल ऑफ मॅनेजमेंट, इंट्रोडक्शन टू सायकॉलॉजी, मॅनेजरिअल इकॉनॉमिक्स, बिझिनेस मॅथेमॅटिक्स, बिझिनेस हिस्ट्री, मार्केटिंग मॅनेजमेंट, आयटी मॅनेजमेंट, परफॉर्मिंग आर्ट्स- कोरिओग्रॅफी/ डान्स, फिजिकल ट्रेनिंग, योगा ॲण्ड स्पोर्ट्स, कॉस्ट ॲण्ड मॅनेजमेंट अकाउंटिंग, क्रिटिकल थिंकिंग ॲण्ड रायटिंग स्किल्स, बिझिनेस इंटेलिजन्स ॲण्ड डाटा सायंस, बिझिनेस ॲण्ड कंपनी लॉ, इंडियन हेरिटेज ॲण्ड कल्चर, वर्ल्ड हिस्ट्री, बिझिनेस स्टॅटिस्टिक्स, सायंस ऑफ वेलबिईंग, ड्रॅमॅटिक आर्ट्स – थिएटर, ॲडव्हान्स्ड बिझिनेस मॅथेमॅटिक्स, प्रेझेंटेशन स्किल्स वर्कशॉप, म्युझिक, ऑर्गनायझेशनल बिहेवियर, एनव्हिरॉन्मेंटल सायंस, फंडामेंटल्स ऑफ कॉर्पोरेट फायनांस, सोशिऑलॉजी, ऑपरेशन रिसर्च, इंडियन इकॉनॉमी, इंडिया ॲण्ड वर्ल्ड जिऑग्रॅफी, न्युमरिकल अनॅलिसिस, फॉरेन लँग्वेज, डाटाबेस मॅनेजमेंट सिस्टिम, ऑपरेशन मॅनेजमेंट, ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट, बिझिनेस रिसर्च मेथड्स, ॲडव्हान्स्ड कम्युनिकेशन स्किल्स, क्रिएटिव्हीटी ॲण्ड इनोव्हेशन, इंटरनॅशनल ट्रेड, बिझिनेस इथिक्स ॲण्ड व्हॅल्यूज, टॅलेंट ॲण्ड लिडरशीप डेव्हलपमेंट, मनी बँकिंग ॲण्ड फायनांस, स्पे्रड शिट मॉडेलिंग, इंटरनॅशनल इकॉनॉमिक्स, इंडस्ट्रियल रिलेशन ॲण्ड लेबर लॉज, सस्टेनिबिलिटी मार्केटिंग, पब्लिक पॉलिसी, व्हिज्युअल ॲनॅलिसीस, सोशल आंत्रप्रिन्युरशीप, मीडिया ॲण्ड सोसायटी, न्यू व्हेंच्युर प्लॅनिंग ॲण्ड आंत्रप्रिन्युरशीप डेव्हलपमेंट, मॅनेजमेंट इनसाईटस फ्रॉम भगवत गीता, इकॉनॉमिक ग्रोथ अँड डेव्हलपमेंट, इंटलेक्युचल प्रॉपटी राईट्स, केस ॲनॅलिसीस वर्कशॉप,
संपर्क – ॲडमिशन ऑफिस आयआयएम बोधगया, उरुवेला, प्रबंध विहार, बोधगया, ८२४२३४, दूरध्वनी -०६३१-२२००२३९, ईमेल- ipmadmission@iimgg.ac.in, संकेतस्थळ-iimgg.ac.in
०००
आयआयएम जम्मू
या संस्थेने इंटिग्रेटेड प्रोग्रॅम इन मॅनेजमेंट हा अभ्यासक्रम गेल्या वर्षी सुरु केला आहे. या अभ्यासक्रमाचे महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे पहिल्या वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर विद्यार्थ्यांना सर्टिफिकेट इन बेसिक्स ऑफ मॅनेजमेंट हे प्रमाणपत्र, दुसऱ्या वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर विद्यार्थ्यांना ॲडव्हान्स्ड सर्टिफिकेट इन बेसिक्स ऑफ मॅनेजमेंट हे प्रमाणपत्र, तिसऱ्या वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर विद्यार्थ्यांना बीबीए पदवी प्रदान केली जाते. नव्या शैक्षणिक धोरणानुसार विद्यार्थी प्रत्येक वर्षी त्याची इच्छा असल्यास अभ्यासक्रम सोडू शकतो.
पहिल्या वर्षी लडाख येथे बूट कॅम्पमध्ये सामील होण्याची संधी दिली जाते. या शिबिरात सांस्कृतिक आणि एैतिहासिक पैलुंची ओळख आणि अनुभव प्रदान केला जातो. चौथ्या सत्रात कॉर्पोरेट इंटर्नशीप पूर्ण करावी लागते. तिसऱ्या सत्रात सामाजिक (सोशल इंटर्नशीप) पूर्ण करावी लागते.तिसऱ्या वर्षामध्ये विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय शिक्षण संस्थेत अध्ययन करण्याची संधी मिळू शकते.
या अभ्यासक्रमात विज्ञान, समाजशास्त्र आणि व्यवस्थापन या तीन घटकांचा सुयोग्य समावेश करण्यात आला आहे. विज्ञान,तंत्रज्ञान अभियांत्रिकी आणि गणित या विषय घटकांशी व्यवस्थापनाच्या ज्ञान शाखेचे सुयोग्य पध्दतीने एकात्मिकरण करण्यात येते. २०२० सालातील नव्या शैक्षणिक धोरणानुसार या अभ्यासक्रमाची संरचना करण्यात आली आहे. विद्यार्थी बौध्दिक-शारीरिक- भावनिक-कलात्मक- नैतिक आणि सामाजिक दृष्ट्या सक्षम होण्यासाठी प्रयत्न केले जातात.
काय शिकाल?
इकॉनॉमिक्स फॉर बिझिनेस, अकाउंटन्सी, बिझिनेस मॅथेमॅटिक्स, प्रिंसिपल्स ॲण्ड प्रॅक्टिसेस ऑफ मॅनेजमेंट, कॉम्प्युटेशनल थिकिंग, सोशिऑलॉजी, बिझिनेस कम्युनिकेशन, हॅप्पिनेस ॲण्ड मेंटल वेलनेस, फिजिकल ट्रेनिंग ॲण्ड स्पोर्ट्स, कॉस्ट अकाउंटिंग, मार्केटिंग मॅनेजमेंट, क्रिटिकल थिंकिंग ॲण्ड प्रॉब्लेम सॉलव्हिंग, सायकॉलॉजी, मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टिम, परफॉर्मिंग आर्ट्स, इंडियन ॲण्ड ग्लोबल इकॉनॉमी, फायनांशिअल मॅनेजमेंट, ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट, इंडियन ॲण्ड वर्ल्ड जिऑग्रॅफी, डेटा सायंस, क्रिएटिव्हिटी ॲण्ड इनोव्हेशन, फॉरेन लँग्वेज, व्हिज्युएल आर्ट्स, कंझ्युमर बिहेव्हियर, फायनांशिअल सिस्टिम्स ॲण्ड मार्केट्स, बिझिनेस रिसर्च मेथड्स, इमर्जिंग टेक्नॉलॉजी इन बिझिनेस, एनव्हिरॉन्मेंटल सायंस, इंडियन पॉलिटी, ऑपेरशेन मॅनेजमेंट, डिजिटल कल्चर, डेव्हलपमेंटल इकॉनॉमिक्स, ब्रँडिंग ॲण्ड ॲडर्व्हटायजिंग, बिझिनेस इथिक्स ॲण्ड व्हॅल्यूज, सप्लाय चेन मॅनेजमेंट, इंडस्ट्रियल रिलेशन ॲण्ड लेबर लॉज, ऑर्गनायझेशनल बिहेव्हियर, न्यू व्हेंच्युर प्लॅनिंग, टॅलेंट ॲण्ड लिडरशीप डेव्हलपमेंट, बिझिनेस लॉज, पब्लिक पॉलिसी.
चौथ्या आणि पाचव्या वर्षी नियमित एमबीएसाठी असलेले अभ्यासक्रम शिकवले जातात.
या अभ्यासक्रमाला ६० विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. विद्यार्थ्यांच्या निवडी, जॉईंट इंटिग्रेटेड प्रोग्रॅम इन मॅनेजमेंट ॲडमिशन टेस्टचे (जिपमॅट) गुण, दहावी -बारावीतील गुण आणि महिलांसाठी विशेष गुण (जेंडर डायव्हर्सिटी) सवलत याचा आधार घेतला जातो. इच्छूक विद्यार्थ्यांना दहावी-बारावी मध्ये किमान ६० टक्के गुण मिळायला हवेत. राखीव संवर्गासाठी ५५ टक्के गुण. गुणवत्ता यादी तयार करताना जीपमॅटला ६० टक्के, १०वीच्या गुणांना १५ टक्के, १२वीच्या गुणांना १५ टक्के आणि मुलींना १० टक्के गुणांचे वेटज (भारांक) धरले जाते.
संपर्क- आयआयएएम, ओल्ड युनिव्हर्सिटी कॅम्प्स, जम्मू – १८००१६, संकेतस्थळ- ipm.admissions@iimj.ac.in, ईमेल- ipm.admissions@iimj.ac.in, दूरध्वनी- ०१९१-३५१०३१५/२५८५८३७
निवड प्रकिया
बोधगया आाणि जम्मू येथील इंडियन इंस्टिट्यूट मॅनेजमेंट मधील पाच वर्षे कालावधीच्या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी ॲडमिशन टेस्ट (जिपमॅट-जॉईंट इंटिग्रेटेड प्रोग्रॅम इन मॅनेजमेंट) ही परीक्षा द्यावी लागते. ही परीक्षा नॅशनल टेस्टिंग एजंसीव्दारे घेतली जाते. परीक्षेचा कालावधी अडीच तास. ही संगणकाधारित (कॉम्पुटर बेस्ड)परीक्षा आहे.
जिपमॅट मध्ये ४०० गुणांचे १०० प्रश्न विचारले जातात. यामध्ये संख्यात्मक कल (क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड) – ३३ प्रश्न/ प्रत्येकी चार गुण/ एकूण गुण- १३२, माहिती विश्लेषण आणि तार्किक कार्यकारणभाव – डेटा इंटप्रिटेशन ॲण्ड लॉजिकल रिजनिंग- ३३ प्रश्न/प्रत्येकी चार गुण/एकूण गुण- १३२, शाब्दिक क्षमता आणि आकलन (व्हर्बल ॲबिलिटी ॲण्ड कॉप्रिहेंशन)– ३४ प्रश्न/प्रत्येकी चार गुण/एकूण गुण- १३६. उत्तर चुकल्यास १ गुण वजा केला जातो. महाराष्ट्रातील परीक्षा केंद्रे- मुंबई/ नवी मुंबई, नागपूर, औरंगाबाद, नांदेड, पुणे, सोलापूर. संपर्क-jipmat.nta.ac.in
०००००००
जिंदाल ग्लोबल बिझिनेस
जिंदाल ग्लोबल बिझिनेस स्कूल या संस्थेने बीबीए (ऑनर्स)–एमबीए हा पाच वर्ष कलावधीचा अभ्यासक्रम सुरु केला आहे. अर्हता– विद्यार्थी कोणत्याही शाखेत १२ वी उत्तीर्ण असावा. त्याला किमान ६० टक्के गुण मिळणे आवश्यक आहे. या अभ्यासक्रमाच्या निवडीसाठी जेबीइएस ॲडमिशन टेस्ट घेतली जाते.
संपर्क – जिंदाल ग्लोबल बिझिनेस स्कूल, जगदिशपूर व्हिलेजवळ, सोनिपत,नरेला रोड,हरयाणा–१३१००१,भ्रमणध्वनी- ८३९६००७४४० संकेतस्थळ-www.jgbs,edu आणिhttp://www.jgbs.edu.in/bbaadmissions, ईमेल- info@gu.edu.in,
सुरेश वांदिले
