(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

भारतातील अनेक विद्यार्थी ऑफबिट विषयांकडे मोठ्या संख्येने वळू लागले, असल्याचे २०२५ चा ओपन डोअर अहवालात नमूद करण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय शैक्षणिक स्थितीवर या अहवालाद्वारे प्रकाश टाकला जातो. पांरपरिक विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित या विषयांकडे विद्यार्थ्यांचा ओढा कायम असला तरी रोबोटिक्स, ऑटोमेशन, मेकॅट्रॉनिक्स अशा विषयांकडे विद्यार्थ्यांचा ओढा वाढत असल्याचं दिसून येतं.

विप्रो, टेक महिंद्रा, काग्निझंट यासारख्या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांनी ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’, रोबोटिक्स, माहिती लर्निंग, कॉग्निटिव्ह डल्स, ब्लॉक चैन, ऑगमेंटेड रिॲलिटी या नव्या तंत्रज्ञानाची अर्हता प्राप्त केलेल्या उमेदवारांना अधिक प्राधान्य देण्याचे ठरवले आहे. यातील काही कंपन्यांनी अशा तज्ज्ञ मनुष्यबळाने कंपनी सोडू नये म्हणून त्यांच्या वेतनात 70 टक्के इतकी भरघोस वाढ केली आहे.  या नवतंत्रज्ञानातील तज्ज्ञ मनुष्यबळाची उपलब्ध आणि गरज यात सध्या मोठी तफावत आहे.  सध्या प्रत्येक 100 जागांमध्ये केवळ 30 प्रशिक्षित तज्ज्ञ व्यक्ती उपलब्ध होत असल्याने प्रत्येक कंपन्या आपल्याकडेच असे मनुष्यबळ टिकून राहील या दृष्टीने प्रयत्न करत आहेत.

          ऑटोमेशन आणि डिजिटायझेशनसाठी मागील वर्ष महत्वाचे ठरले. मोठ्या कंपन्या या दोन्ही बाबींवर अधिकाधिक भर द्यायला लागल्या आहेत.  ऑटोमेशनमुळे माहिती तंत्रज्ञान क्षेत्राला नवी उर्जा प्राप्त झाली आहे.  आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करुन व्यवसायांस गती देण्यात आली आहे.  या सोबतच बिग डाटा, इंटरनेट ऑफ थिंग्ज आणि कंझुमर इंटरफेस मशिन या तंत्रज्ञानाचा उपयोग करुन माहिती तंत्रज्ञान, भविष्यात वेगळ्या उंचीवर जाण्याची चिन्हे आहेत.

          रोबोटिक्स

आर्टिफिशिअल बुध्दिमत्ता म्हणजेच कृत्रिम बुध्दिमत्ता या क्षेत्रात अत्यंत वेगाने होत असलेल्या प्रगतीमुळे रोबोट हे आता केवळ एकच एक कृती पुन्हा पुन्हा करणारे निरुपद्रवी यंत्र राहिलेले नाही. सोफिया आणि सॉफ्टबँकेचे, पेप्पर या दाने ह्युमनॉइड्सनी आता यंत्रमानव पुढचा टप्पा गाठण्यासाठी तयार असल्याचं सिध्द केलं आहे. त्यामुळेच रोबोटिक्स क्षेत्रात विपुल संधी निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या विषयाशी संबंधित संशोधन ते नव्या रोबोंचे अभिकल्प किंवा डिझाइन करणे अशा अनेक क्षेत्रात मनुष्यबळाची गरज भासणार आहे. या वर्षी रोबोटिक्स शाखेकडे वळण्याची शक्यता अधिक वर्तवली गेली आहे.

आटोमेशन

चौथ्या औद्योगिक क्रांतीच्या उंबरठयावर जग उभे ठाकले आहे. या क्रांतीचा प्रमुख घटक ऑटोमेशन किंवा स्वयंचलन हे असणार आहे. निर्मिती, रिटेल, आटोमोबाइल, बँकिंग आणि वित्तीय सेवा, खाणीतील धोकादायक कार्य अशा क्षेत्रात स्वयंचलनाने गती घेतली आहे. त्यामुळे ऑटोमेशनशी संबंधित पदवी, पदव्युत्तर पदवी आणि प्रमाणपत्रे अभ्यासक्रमांकडेही विद्यार्थी वळत आहेत.

मेकॅट्रॉनिक्स

मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक्स आणि सॉफ्टवेअर अभियांत्रिकीच्या  एकत्रिकरणातून विकसित झालेल्या मेकॅट्रॉनिक्स या शाखेतील मनुष्यबळाची मागणी वाढू लागली आहे. बुध्दिमान इलेक्ट्रो-मेकॅनिकल कार्यप्रणालीच्या निर्मितीसाठी हे तंत्रज्ञान उपयुक्त ठरत आहे. या विषयातील पदवी अभ्यासक्रम केलेल्या विद्यार्थ्यांना रोबोटिक्स, ऑटोमेशन आर्टिफिशिअल इंटेलिजन्स आणि तज्ज्ञ कार्यप्रणाली, सेन्सिंग आणि कंट्रोल सिस्टिम्स, ट्रान्सपोर्टेशन सिस्टिम्स आणि व्हेहिक्युलर सिस्टिम्स या क्षेत्रामध्ये करिअर संधी उपलब्ध होत आहेत.

दिव्यांग उपकरणे

जागतिक बँकेच्या अहवालानुसार १०० कोटीपेक्षा व्यक्ती कोणत्या ना कोणत्या प्रकारच्या अपंगत्वाने ग्रस्त आहेत. ही संख्या जागतिक लोकसंख्येचा साधारणत: १५ टक्के आहे. त्यामुळेच दिव्यांगांना  साहाय्य होऊ शकेल अशी साधने, उपकरणे, साहित्य यांची मागणी अनेक देशात वाढत आहे. त्यामुळे या क्षेत्रात स्पीच थेरपिस्ट, केअरगिव्हर अशासारख्या संधी उपलब्ध होत आहेत. पदवीनंतर अशा क्षेत्रातील सेवा शासकीय, अशासकीय संस्थामंध्ये उपलब्ध होऊ शकतात.

इन्फेक्शन कंट्रोल कोवीडसारखे संसर्गजन्य आजार लक्षात घेता हे अतिशय नवे क्षेत्र विद्यार्थ्यांना आकर्षित करु शकते. विविध रुग्णालये, दवाखाने, आरोग्य सुविधा पुरवणारी केंद्रे अशा ठिकाणी या मनुष्यबळास करिअर करण्याची संधी मिळू शकते.

आंतरज्ञानशाखीय अभ्यासक्रम असलेला जिओफिजिक्स, मरिन इंजिनीअरिंग, गेम डिझाइन ॲण्ड डेव्हलपमेंट या क्षेत्रामध्ये यंदा विविध संधी मिळू शकतात.

०००

बिझिनेस अनॅलिटिक्स

तंत्रज्ञानातील सतत होणारे बदल आणि व्यवसायामध्ये निर्माण झालेली आव्हाने लक्षात घेऊन मोठी व्यावसायिक घराणी, कॉर्पोरेट हाऊसेस व्यवसायवृध्दीसाठी कमी खर्चातील उपाययोजना कशा करता येतील याकडे लक्ष पुरवित आहेत. अनेक संस्था आपल्या कार्यप्रणालीमध्ये बदल करण्यासाठी सरसावल्या आहेत.

व्यावसायिक संस्था, विक्री, विपणन, संशोधन, ग्राहकसेवा आदी मार्गातून अनेक प्रकारची व्यामिश्र माहिती गोळा करत असते. या माहितीचा प्रचंडसाठा कालपरत्वे गोळा होत जातो. साठलेल्या या माहितीचे विश्लेषण केल्यानंतर संस्था किंवा कार्पोरेट हाऊसेस  यांना भविष्यात येणाऱ्या समस्या, प्रश्न याची कल्पना येऊ शकते. कोणत्या क्षेत्रात सुधारणा करण्याची आवशक्यता आहे, हे कळू शकते. कंपनीच्या महसुलात वाढ करण्यासाठी या विश्लेषणाचा उपयोग होऊ शकतो.

सध्या () बँकिंग, () टेलिकम्युनिकेशन, () आऊटसोर्सिंग, () सोशल मीडिया, () फायनांशिअल सर्व्हिसेस, () मॅन्युफॅक्चुरिंग, () हेल्थकेअर, () ट्रॅव्हल, () एनर्जी, (१०) ई-गव्हर्नन्स आणि (११) ई-कॉमर्स या क्षेत्रात बिझिनेस अनॅलिटिक्स यांची सेवा मोठया प्रमाणावर घेतली जात आहे.

२०२५ मध्ये बिझिनेस ॲनलिटिक्स या क्षेत्रासाठी अंदाजे १२५ बिलियन डॉलर्स खर्च करण्यात आले. भारतात या ज्ञानशाखेतील मनुष्यबळाची मागणी मोठया प्रमाणावर वाढली आहे. मात्र सध्या तरी या क्षेत्रात पुरेशा प्रमाणात असे मनुष्यबळ उपलब्ध नाही. () बिग डाटा (गोळा होणाऱ्या विविध प्रकारच्या माहितीचा साठा), () ॲनॅलिटिक्स (साठलेल्या माहितीचे सांख्यिकीय निष्कर्ष काढणे किंवा विश्लेषण करणे), सांख्यिकी, () प्रॉबेबिलिटी (संभाव्यता), () मॅनेजिंग ॲबिलिटी (व्यवस्थापकीय कौशल्य), () बिझिनेस अंडरस्टँडिंग (व्यवसाची सूक्ष्म जाणीव), () मेंटनिंग रिसोर्सेस (संसाधनाची देखभाल) हे विषय हाताळणाऱ्या उच्चप्रशिक्षित मनुष्यबळाची कमतरता आढळून येत आहे.

बिझिनेस ॲनॅलिटक्स प्रणालीद्वारे निर्णय क्षमतेसाठी आवश्यक ठरणाऱ्या विश्लेषणात्मक, कार्यात्मक आणि तांत्रिक कौशल्यात वाढ करणे शक्य होऊ शकते. मॅकन्सी, मॉर्गन स्टॅनले, मायक्रोसॉफ्ट, टाटा समूह ,गुगल, फेसबुक, लिंक्डइन, अमेरिकन एक्सप्रेस, डिलॉइट, ॲक्सेंच्युर, लार्सन ॲण्ड टयुब्रो अशा सारख्या कंपन्यांमध्ये या मनुष्यबळाची भरती केली जात आहे.

करिअर संधी

या मनुष्यबळास () डाटा अनॅलिटिक्स, () फंक्शनल मॅनेजर्स (वित्त/ मनुष्य बळ/ विपणन/ वित्त/ कार्यान्वयन इत्यादी), () बिझिनेस ॲनॅलिस्ट प्रोजेक्ट मॅनेजर, () बिझिनेस इंटेलिजन्स एक्सपर्ट, () बिझिनेस ॲनॅलिटिक्स कन्सलटंट, () डाटा अनॅलिस्ट, () बिगडाटा अनॅलिस्ट, () डाटा अनॅलिटिक्स प्रोग्रॅमर, () डाटा मायनिंग एक्सपर्ट , (१०) डाटा वेअरहाऊस एक्सपर्ट, (११) प्रेडिक्टिव्ह मॉडेलर , (१२) क्वालिटेटिव्ह अनॅलिस्ट अशा सारख्या पदांवर कार्य करण्याची संधी मिळू शकते.

डाटा मायनिंग

डाटा मायनिंग म्हणजेच माहितीचे उत्खनन करुन बँका त्यांना भेडसावू शकणाऱ्या संभाव्य समस्या जाणून घेऊ शकतात, त्यादृष्टिने त्यांना खबरदारीचे उपाय शोधणे सुध्दा सुलभ जाते. क्रेडिट कार्ड कंपन्यांना फसवणूक करणाऱ्या घटक/ व्यक्ती/ कार्यप्रणाली अंदाज बांधणे शक्य होत आहे.