(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

 नवीन वर्षाचं  स्वागत ३१ डिसेंबरच्या  मध्यरात्री      साजरं  करण्यासाठी अमूक करणार नि           ढमूक करणार याचं प्लॅनिंग तेजोमयी,कल्याणी,मिहीर,वैदेही आणि इतर मित्रांनी सुरु केलं.

   “मस्त पार्टी करु या का?दे धम्माल!रात्र जागून काढू.”  कल्याणी म्हणाली.

  ” टीव्हीवरचे कार्यक्रम पाहू रात्रभर.झक्कास असतात.”   वैदेही म्हणाली.

   “मरीन ड्राईव्हवर  जायचं.पाणी पुरी,वडा पाव, पिज्जा खायचा, पेप्सी प्यायची.तिथे खूप लोक आले असतात.ते नाचतात.आरडाओरडा करतात.फटाके फोडतात.आपणही तसच करु या,”मिहीरनेही तोंड उघडलं.

   काय करायचं यावर कुणाचही एकमत होईना. असं जेव्हा जेव्हा घडतं तेव्हा मित्रांची ही       टोळी मारुतीरायांच्या मंदिरात जाते. तिथे मग त्यांना    ते आपली अडचण सांगतात. मारुतीराया टोळीवर प्रसन्न असल्याने तेही आनंदानं त्यांची समस्या सोडवतात.

०००

३१     डिसेंबर        कसा   साजरा करायचा? ही समस्या सोडवण्यासाठी मग टोळी मारुतीरायांच्या मंदिरात पोहचली.सगळयांनी त्यांना मनोभावे     नमस्कार केला.मारुतीरायांनी गदा हलवून त्यांना आशीर्वाद दिला.हळूच ते आपल्या स्थानातून बाहेर आले नि टोळीसोबत गप्पा करु लागले.अवतीभवती कुणीनाही हे बघून ते हळूच  म्हणाले.

” बाळांनो,नवीन वर्षाचं  स्वागत        ३१ डिसेंबरला कसं     करायचय याचं  प्लॅनिंग सुरुय ना तुमचं?”

“तुम्हाला कसं कळलं?”असं विचारायचा मोह कल्याणीस झाला.पण “ते” द ग्रेट    मारुतीराया       असल्याचं लक्षात येताच.तिने जीभ चावली.ते बघून मारुतीराया हसले.कुणाच्याही लक्षात येणार नाही असं बघून कल्याणीने कान पकडले नि सॉरी सॉरी, असं  तोंडातल्या तोंडात       पुटपुटली. तिचं पुटपुटणं तेजोमयीच्या लक्षात आलं.

“काय गं,काय चाललय तुझ्या मनात?”तेजोमयीन विचारलं.

“काही नाही गं,आपल्या मनातलं मारुतीरायांना कळलंच आहे तर त्यांनीच ३१ डिसेंबर साजरा करण्याचा मार्ग दाखवावा असं मला वाटलं.”

“हो हो हो, अगदी बरोबर”,टोळीतील सर्वांनी एकच गलका केला.

“सांगतो ना.मला जे सुचलय ते सांगतो.पटलं तर घ्या.नाही तर सोडून द्या”.मारुतीराया म्हणाले.

“अहो   मारुतीराया, तुमचं कां नाही पटणार,आम्हालासांगा बरं आता.” तेजोमयी म्हणाली.

मारुतीरायांनी त्यांची कल्पना सांगितली.ते म्हणाले,

“नवीन वर्षाचं स्वागतं रात्री बारा वाजता करण्याएैवजी पहाटे पहाटे करण्याचं प्लॅनिंग कराना.”

               “व्हाट! हे काय भलतच?” सगळी टोळी जोरानं ओरडली.

                “एव्हढं ओरडण्यासारखं काय बरं म्हणालो” .मारुतीरायांनी विचारलं

                “हे बघा मारुतीराया    ,नवीन वर्षाचं स्वागत रात्री 12 लाच करायचं असतं.पहाटे कुणी करत नाही.”मिहीर म्हणाला. मारुतीराया अजूनही पुरातन काळातून बाहेर यायला तयार नाहीत ,असं त्याला वाटलं.

  मारुतीराया   हसत म्हणाले   ” मी पुरातन  काळातला असलो तरी तुमच्यापेक्षा “कूल”आहेना.म्हणूनच तर मला नवं वर्षं ,  पहाटे साजरा करण्याची आयडीया सुचली       .तुम्ही मात्र अजुनही नवं       वर्षं           ३१ डिसेंबरला मध्यरात्रीच साजरा करायचा असतो,या पुरातन गोष्टीत     अडकलात की नाही?

“मारुतीराया अहो, आम्ही नवं    वर्षाचं  स्वागत ३१ डिसेंबरला पहाटे केलं तर आम्हाला आमचे मित्र वेड्यात काढतील ना.”तेजोयमीने शंका व्यक्त केली.

“काढू द्याकी. अरे बाळांनो,३१ डिसेंबरला रात्र जागून काढायची नि नव्या वर्षाचा सूर्य जेव्हा तुमच्या स्वागताला येतो ,तेव्हा अंथरुणात पडून राहायचं.हे कितपय योग्य?याचा जरा विचार       करा.नवीन वर्षाचा प्रारंभच जर असा उशिरा उठण्यानं झाला,आळसानं झाला तर आख्खं वर्षच आळसात नाही का जाणार तुमचं?विचार करा नि कृती करा उद्या.” मारतीराया म्हणाले.गदा हलवत ते आपल्या मूळ जागी     स्थानापन्न     झाले.

०००

टोळीला मारुतीरायांचा   विचार पटला.घरी परतल्यावर सगळ्यांनी आपल्या आईबाबांना सांगून टाकलं,३१ डिसेंबरला आम्ही लवकर झोपणार नि लवकर उठणार.

“तुम्हीसुध्दा असच करा?असं तेजोमयी बाबांना म्हणाली.

“हा काय      वेडेपणा!”      असं    चटकन बाबा बोलून    गेले

“अहो,हा वेडेपणा नाही.मुलीकडून  शिका  जरा    आता.ती शहाणी        झालीय, पण तुम्ही       मात्र    जिथल्यातिथे,”आई            हसत   म्हणाली.आईचा टोमणा बाबांना        बरोबर         कळला.त्यांनीही मग    ३१डिसेंबरला तेजोमयीसारखचं वागायचं       ठरवलं.टोळीतल्या इतरही मुलांच्या      घरीही  असंच “कूल”वागायचं ठरवलं गेलं.

               सुरेश   वांदिले