वाणिज्य शाखेमध्ये पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम करणारे विद्यार्थी पुढील स्पेशलाइज्ड अभ्यासक्रम करुन स्वत:चा करीअर आलेख सतत उंचावत ठेऊ शकतात.
चार्टर्ड अकाउंटंट– हे तज्ज्ञ कंपनीचे लेखापरीक्षण, करनिर्धारण आदी बाबींवर लक्ष ठेवतात. कंपनीच्या वित्तीय बाबींची काळजी आणि संनियंत्रण करण्याचे कार्य त्यांना करावे लागते. आर्थिक उलाढाली सातत्याने वाढत असल्याने या तज्ज्ञांची गरजही वाढत चालली आहे. विदेशातील कंपन्याही त्यांच्या सेवा घेत असतात. द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया ही संस्था या विषयाशी निगडित अभ्यासक्रम चालवित असते.
या अभ्यासक्रमाला दोन पध्दतीने प्रवेश मिळू शकतो- (१) फाउंडेशन कोर्स- 12 वीमध्ये असणऱ्या कोणत्याही ज्ञानशाखेतील उमेदवार या अभ्यासक्रमास प्रवेश घेऊ शकतात. हा फाउंडेशन कोर्स उत्तीर्ण झाल्यावर इंटरमिजिएट कोर्सला मध्ये प्रवेश घ्यावा लागतो. त्यानंतर विशिष्ट स्वरुपाचे प्रशिक्षण (आर्टिकल्ड ट्रेनिंग) पूर्ण करुन फायनल कोर्समध्ये प्रवेश घ्यावा लागतो.
(२) डायरेक्ट एन्ट्री– ५५ टक्के गुणांसह वाणिज्य शाखेतीलपदवी किंवा पदव्युत्तर पदवीप्राप्त विद्यार्थी किंवा ६० टक्के गुणांसह इतर शाखेतील पदवी किंवा पदव्युत्तर पदवीप्राप्त विद्यार्थी थेट इंटरमिजिएट अभ्यासक्रमासाठी नाव नोंदवू शकतात.
संपर्क- www.icai.org
००००
बॅचलर ऑफ कॉमर्स इन कॅपिटल मार्केट्स–
हा अभ्यासक्रम बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजने सुरु केला आहे. या अभ्यासक्रमाचा कालावधी तीन वर्षे. अर्हता- १२वी उत्तीर्ण. अभ्यासक्रम मुंबई विद्यापीठाशी संलग्नित आहे. हा अभ्यासक्रम केल्यावर विद्यार्थ्यांना बँक, वित्तीय कंपन्या, शेअर ब्रोकिंग, कमोडिटिज, पेंशन फंड यामध्ये करीअर संधी मिळू शकते. सिक्युरिटीज ॲण्ड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया, फॉरवर्ड मार्केट कमिशन, नॅशनल स्टॉक एक्स्चेंज, बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज या संस्थांमध्येही नोकरी मिळू शकते.
संपर्क- बीएसई, इंस्टिट्यूट लिमिटेड, १८ आणि १९ मजला, पी. जे. टॉवर्स, दलाल स्ट्रीट, मुंबई-४००००१, दूरध्वनी- ०२२-२२७२८८७३, ईमेल- admissions@bseindia@.com, संकेतस्थळ-mumbaiuniversity.bsebti.com आणि pgpbf.bsebti.com
००००
नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ सिक्युरिटिज मार्केट्स-
(१)पोस्ट ग्रॅज्यूएट डिप्लोमा इन मॅनेजमेंट इन सिक्युरिटज मार्केट्स-अर्हता- कोणत्याही विषयातील ५० टक्के गुणांसह पदवी, कालावधी- दोन वर्षे. प्रवेशासाठी कॅट, जीमॅट, एमएचसीईटी- एमबीए/ एमएमएस परीक्षेतील गुण.
संपर्क-– प्लॉट नंबर- एल एस १ आणि एल एस २, पाताळगंगा इंडस्ट्रिअल एरिआ, मोहोपाडा, जिल्हा-रायगड, महाराष्ट्र- ४१०२२२, संकेतस्थळ- www. nism.ac.in/pgdm, ईमेल- pgdm@nism.ac.in
(२)पोस्ट ग्रॅज्यूएट प्रोग्रॅम इन सिक्युरिटज मार्केट्स- अर्हता- कोणत्याही विषयातील ५० टक्के गुणांसह पदवी, कालावधी- एक वर्षे. संपर्क- संकेतस्थळ- www. nism.ac.in/pgpsm, ईमेल- pgpsm@nism.ac.in
०००