(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजच्या, शैक्षणिक विभागामार्फत, बॅचलर ऑफ मॅनेजेंट इन कॅपिटल मार्केट, हा अभ्यासक्रम सुरु करण्यात आला आहे. कॅपिटल मार्केट म्हणजे भांडवली बाजारातील विविध प्रकारची कार्ये करु इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा अभ्यासक्रम उपयुक्त ठरु शकतो. या अभ्यासक्रमाचा कालावधी- तीन वर्षे आहे. हा अभ्यासक्रम मुंबई विद्यापीठाशी संलग्नित आहे. कोणत्याही ज्ञानशाखेतील १२वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमाला प्रवेश मिळू शकतो.

कौशल्य निर्मिती

वित्तीय क्षेत्रात करिअर करण्यासाठी हा अभ्यासक्रम संधी उपलब्ध करुन देऊ शकतो. भांडवली बाजाराशी निगडित विविध प्रकारची आव्हाने स्वीकारण्यासाठी उमेदवार सैध्दांतिकरीत्या परिपूर्ण व्हावा, अशी कौशल्ये या अभ्यासक्रमात शिकवली जातात. उत्तम संवाद कौशल्य, सादरीकरण कौशल्य, प्रकल्प नियोजन, उद्योगातील माजी विद्यार्थ्यांसोबत सहकार्य मिळवण्याचे कौशल्य प्राप्त करुन देण्यासाठी प्रयत्न केले जातात.

करिअर संधी-

 हा अभ्यासक्रम केलेल्या उमेदवारांना बँका, वित्तीय कंपन्या, शेअर ब्रोकिंग, कमोडिटी, वेगवेगळे फंडस् यांच्या सोबत, सेक्युरिटीज ॲण्ड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी), फॉरवर्ड मार्केट कमिशन (एफसीआय), नॅशनल स्टॉक एक्स्चेंज,बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज या सारख्या नियामक संस्थांमध्ये करिअर संधी मिळू शकतात.

पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन प्रेडिक्टिव्ह ॲनॅलिटिक्स-

सर्व प्रकारच्या उद्योग आणि व्यवसायासाठी ॲनॅलिटिक्स (आकडेवारीचे विश्लेषण आणि निष्कर्ष) हे अत्यंत महत्वाचे ठरत आहेत. माहिती किंवा डेटाचा प्रवाह विस्मयकारक असल्याने, त्यावर लक्ष ठेवणे, त्यातील कंपनी/उद्योगाच्या बाबींचा आणि बारकाव्यांचा शोध घेणे, त्यांचा उपयोग उत्पादकता आणि कंपनीचा नफा वाढवण्यासाठी उपाय सुचवणे यासाठी ॲनलिटिक्स तज्ज्ञांचे साहाय्य घेतले जाते. या क्षेत्रातील तज्ज्ञांची गरज आणि पुरवठा यांचे व्यस्त प्रमाण सध्या दिसून येते. त्यामुळे या क्षेत्रातील विविध नवे तंत्र-कौशल्य (स्किल सेट) संच यावर पारंगत असणाऱ्या उमेदवारांना मोठी मागणी आहे. ही बाब ध्यानात घेऊन बॉब्मे स्टॉक एक्स्चेंजने हा अभ्यासक्रम सुरु केला आहे.

या अभ्यासक्रमाचा कालावधी दोन वर्षाचा आहे. हा अभ्यासक्रम मुंबई विद्यापीठाशी संलग्नित आहे. अर्हता – हा अभ्यासक्रम कोणत्याही विद्याशाखेतील पदवीधरास करता येतो. तथापि अभ्यासक्रमांच्या बऱ्याच बाबींमध्ये तांत्रिक कौशल्य, संगणीकय कौशल्य, गणितीय विश्लेषणाचे कौशल्य आवश्यक असल्याने , अभियांत्रिकी, अर्थशास्त्र, गणित, बीसीए या ज्ञानशाखेतील उमदेवारांना हा अभ्यासक्रम करणे तुलनेने सुलभ जाऊ शकते.

काय शिकाल

ॲनलिटिक्स शास्त्रात पारंगतता मिळवता यावी याअनुषंगाने या अभ्यासक्रमामध्ये पुढील विषय घटकांचा समावेश करण्यात आला आहे. (१) इंट्रोडक्शन टू डेटा सायन्स, (२) इंट्रोडक्शन टू डेटा मॅनेजमेंट,(३) इंट्रोडक्शन टू बिझिनेस मेट्रिक्स,(४) इंट्रोडक्शन टू ॲप्लाइड बिझिनेस स्टॅटिस्टिक्स, (५) स्टॅटिस्टिकल कॉम्प्युटिंग,(६) स्टॅटिस्टिक्स युजिंग आर, (७) रिअल टाइम सिस्टिम्स, (८) हेल्थ केअर, (९) वेब इंटेलिजन्स, (१०) मशिन लर्निंग,(११) टूल्स ॲण्ड टेक्निक्स ऑफ डेटा व्हिज्युलायझेशन ॲण्ड कम्युनिकेशन, (१२) द सिरिज मॉडेलिंग, (१३) नेक्स्ट जनरेजशन डेटा बेस, (१४) हाय परफॉर्मन्स कॉम्पुटिंग, (१५) डिजिटल फॉरेन्सिक, (१६) इमेज ॲण्ड व्हिडिओ ॲनलिटिक्स, (१७) सोशल नेटविर्किंग ॲण्ड मायनिंग, (१८) फायनांशिअल रिस्क ॲनलिटिक्स.

या विषयघटकांची नावे नजरेखालून घातली तरी , करोनोत्तर काळात या उद्योग/ व्यवसाय/ व्यापार जगतासाठी सध्या कोणत्या विषयांची व कौशल्यांची गरज आहे, हे लक्षात यावे. पारंपरिक विषयांपेक्षा हे सर्व विषय नवे असून, त्यातही सतत बदल होत आहेत. त्यामुळे या अभ्यासक्रमासारखे अभ्यासक्रम करुन आपली सध्यकालीन उपयुक्तता सिध्द करणे गरजेचे आहे.

संपर्क- बीएसई इंस्टिट्यूट लिमिटेड, पी. जे. टॉवर, दलाल स्ट्रीट मुंबई-४००००१, ईमेल-admissions@bseindia.com, संकेतस्थळ- bseindia.com,टोल फ्री दूरध्वनी- १८०० २२ ९०३०

आयआयएमधील बिझिनेस ॲनॅलिटिक्स

(1) पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन बिझिनेस ॲनॅलिटिक्स हा आजच्या काळातील अत्यंत महत्वाचा अभ्यासक्रम सुरु करण्यासाठी, इंडियन इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (आयआयएम) कोलकता, इंडियन इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (आयआयटी)- खरगपूर आणि इंडियन स्टॅटिस्टिकल इंस्टिट्यूट (आयएसआय)-कोलकता या, आपल्या देशातील तीन श्रेष्ठ दर्जाच्या शैक्षणिक संस्था एकत्र आल्या आहेत. त्यावरुन या अभ्यासक्रमाच्या दर्जा आणि गुणवत्तेचे महत्व लक्षात यावे. बिझिनेस ॲनॅलिटिक्स या विषयातील श्रेष्ठ दर्जाचे मनुष्यबळ देशातच निर्माण व्हावे यासाठी या तीन संस्थांमार्फ या अभ्यासक्रमाची संरचना तयार करण्यात आली आहे.

हा दोन वर्षे कालावधीचा अभ्यासक्रम आहे. विश्लेषणात्मक विचार करण्याकडे कौशल्य, आव्हानात्मक समस्या सोडवण्यात रुची आणि गणिताकडे कल असलेल्या उमेदवारांसाठी हा अभ्यासक्रम अत्यंत उपयुक्त ठरु शकतो. हा अभ्यासक्रम तिनही संस्थांच्या कॅम्प्समध्ये शिकवला जातो. आयआयएम कोलकता येथे विश्लेषण कौशल्याच्या प्रत्यक्ष वापराचे ज्ञान आणि कौशल्य प्रदान केले जाते. आयएसआय- कोलकता येथे सांख्यिकी आणि मशिन लर्निंगच्या तत्वांना शिकवले जाते. आयआयटी खरगपूर येथे विश्लेषणाच्या तंत्रज्ञान विषयक पैलूंविषयी अवगत केले जाते. बिझिनेस ॲनॅलिटिक्स तंत्रज्ञानाचा वापर करणाऱ्या कंपन्यां किंवा उद्योगांमध्ये सहा महिन्यांची इंटर्नशीप करावी लागते.

या अभ्यासक्रमाच्या निवडीसाठी आएआयएम कोलकतामार्फत ऑनलाईन चाळणी परीक्षा घेतली जाते. या परीक्षेतील गुण आणि मुलाखतीमधील गुणांवर आधारित अंतिम निवड केली जाते. चाळणी परीक्षेला पात्र होण्यासाठीची अर्हता-६० टक्के गुणांसह बी.टे किंवा बी.ई,किंवा एम.एस्सी किंवा एम कॉम.

संपर्क- पीजीडीबीए ऑफिस,के-२११,न्यू ॲकॅडेमिक ब्लॉक, आयआयएम कोलकता-७००१०४, दूरध्वनी-०३३-७१२११२००१

०००

(2) एमबीए इन बिझिनेस ॲनिलिटिक्स

इंडियन इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट बेंगळुरु या संस्थेने, एमबीए इन बिझिनेस ॲनिलिटिक्स हा दोन वर्षे कालावधीचा अभ्यासक्रम सुरु केला आहे. आयआयएम मधील प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या कॉमन ॲडमिशन टेस्ट (कॅट) मधील गुण प्रारंभिक निवडीसाठी ग्राह्य धरले जातात. त्यातील निवडक उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाते. मुलाखतील गुण आणि १० वी,१२वी व पदवीपर्यंतच्या परीक्षांमध्ये मिळालेले गुण आणि लेखन कौशल्य यावर काही वेटेज (पर्सेंटाइल/गुणांकन) देऊन अंतिम निवड केली जाते.

संपर्क- आयआयएम, बानेघट्टा रोड, बेंगळुरु-५६००७६ दूरध्वनी-०80.26993013, ईमेल- pgpba.adm@iimb.ac.in, संकेतस्थळ- iimb.ac.in

०००

(3) ई-पीजीडी इन ॲडव्हान्स्ड बिझिनेस ॲनॅलिटिक्स

इंडियन इंस्टिट्यूट ऑफ मॅनजमेंट अहमादाबादने ई-पीजीडी इन ॲडव्हान्स्ड बिझिनेस ॲनॅलिटिक्स हा अभ्यासक्रम सुरु केला आहे. हा सोळा महिन्यांचा अभ्यासक्रम असून तो सध्या कार्यरत असणाऱ्या उमेदवारांना बिझिनेस ॲनॅलिटिक्सचे तंत्र आणि कौशल्य प्राप्त करता यावे याअनुषंगाने सुरु करण्यात आला आहे. ऑनलाईन आणि कॅमस अध्ययनाचा समन्वय यात साधला जातो. संपूर्ण अभ्यासक्रमाच्या काळात चार वेळा प्रत्येकी एक आठवड्यासाठी, आयआयएम ॲहमदाबादमधील कॅम्पसमध्ये अध्ययानासाठी जाणे बंधनकारक आहे.

संपर्क- ई-पीजीडी  इन ॲडव्हान्स्ड बिझिनेस ॲनॅलिटिक्स, आयआयएम, वस्त्रपूर, अहमदाबाद-380015, दूरध्वनी- 07971524513, ईमेल- epgdaba-query@iima.ac.in, संकेतस्थळ- iima.ac.in

०००

सर्टिफाइड मार्केट प्रोफेशनल कोर्स

सिडेन्हॅम कॉलेज ऑफ कॉमर्स ॲण्ड इकॉनॉमिक्स या संस्थेत सेल्फ फायनांस, या तत्वावर पुढील अभ्यासक्रम चालवण्यात येतात. (१) नॅशनल स्टॉक एक्स्चेंज सर्टिफाइड मार्केट प्रोफेशनल कोर्स (एनसीसीएमपी) -हा अभ्यासक्रम २०१० पासून सुरु करण्यात आला असून सेक्युरिटी मार्केट बद्दल जाणीवजागृती व्हावी, यासाठी या अभ्यासक्रमाची सुरुवात करण्यात आली. स्टॉक मार्केटमध्ये कार्य करण्यासाठी आवड आणि गती निर्माण होण्यासाठी हा अभ्यासक्रम उपयुक्त ठरु शकतो. या अभ्यासक्रमात इंट्रोडक्शन टू फायनांशिएल मार्केट्स, डेरिव्हिटिज, फंडामेंटल ॲनॅलिसीस, टेक्निकल ॲनॅलिसीस, मॅक्रो इकॉनॉमिक्स रिलेटेड टू कॅपिटल मार्केट्स या विषय घटकांचा समावेश करण्यात आलाय. कोणत्याही विषयातील १२ वी उत्तीर्ण विद्यार्थी हा अभ्यासक्रम करु शकतो. कालावधी-१०० तास. (२) व्होकेशनल कोर्स इन फॉरेन ट्रेड- आयात निर्यातीच्या संकल्पना स्पष्ट होण्यासाठी या अभ्यासक्रमाची संरचना करण्यात आली आहे. परकीय व्यापार सुरु करण्यासाठी कार्यपध्दती, निर्यात व्यापारासाठी करावयाची संस्थात्मक सुविधा आणि वित्तीय उपलब्धता, सागरी वाहतूक आणि सीमा शुल्क, नोंदणी आणि इतर कागदपत्रांची जुळवाजुळव इत्यादी विषय घटकांचा समावेश करण्यात येतो. हा अभ्यासक्रम बी.कॉम, बॅचलर ऑफ मॅनेजमेंट सायन्स, बॅचलर ऑफ बँकिंग ॲण्ड इन्शुरन्स या अभ्यासक्रमासाठी याच संस्थेत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना करता येतो. संपर्क संकेतस्थळ- http://sydenham.ac.in/