|
· “जंगलभ्रमंतीची आवड असलेल्या ऑस्टिनला एकदा अशाच एका भ्रमंतीमध्ये रहस्यमय अंडं सापडतं. काही दिवसांनी या अंड्यातून एक डायनोसॉर बाहेर पडतो. तो पुढे ऑस्टिनचा मित्र बनतो. या डायनोसॉरकडे जादुई शक्ती असते, त्याच्या बळावर हे दोघेही अंतरिक्षभ्रमणाला निघतात. त्यातून त्यांना पृथ्वीची अनेक रहस्य कळतात.” ही आहे “त्याने” लिहिलेल्या, “द डे आय फाऊंड द एग”, या विज्ञान कांदबरीची कथा. ही कादंबरी लिहिली, तेव्हा तो ५ व्या वर्गात शिकत होता. त्याच्या या विज्ञान कांदबरीनं तो अनेकांच्या गळ्यातला ताईत बनला. तसं तर त्याने, वयाच्या आठव्या वर्षापासून लिहायला सुरुवात केली. सध्याच त्याच्या नावावर ११ पुस्तकांची नोंद आहे. यातील सगळीच पुस्तकं ही निसर्ग, प्राणी आणि त्यांचे संवर्धन यावर आहेत. · त्याचं पहिलं पुस्तक होतं, ‘ग्रँडमा ॲण्ड ऑस्टिन्स प्लॅन्ट किंगडम!’ तेव्हा तो आठ वर्षाचा होता. सर्वात कमी वयाचा लेखक म्हणून त्याची नोंद, वर्ल्ड रेकॉर्ड्स (लंडन), इंडिया बूक ऑफ रेकॉर्ड्स आणि इंटरनॅशनल बूक ऑफ रेकॉर्ड्स यांनी केली. त्याचं दुसरं पुस्तक, ‘ऑस्टिन्स डायनो वर्ल्ड’ प्रकाशित झालं, तेव्हा त्याचं वय होतं ९ वर्षाचं! या दोन्ही पुस्तकांना अनेक पारितोषिकं मिळाली. · त्याच्या लिखाणाचा झपाटा सगळ्यांच आश्चर्यचकित करणारा ठरतोय. कारण त्याचे लागोपाठ, ‘अम्मूज अर्थ’, ‘ॲटॅक ऑफ द परपल ब्लॉब्स’, ‘फ्लाईंग डॉल्स ॲण्ड स्मायलिंग फ्रेंड्स’, ‘कम, लेट्स टच द सन’, ‘द रे ऑफ होप’, ‘पुथूर झुऑलॉजिक पार्क’, ही पुस्तकं प्रकाशित झाली. स्वतंत्र लेखनाशिवाय तो निसर्गाशी संबंधित बऱ्याच पुस्तकांचं उत्तम भाषांतरही करतो. या त्याच्या कौशल्यासाठी, ‘उकियोटो लिटरेचेर ॲवार्डम’मध्ये त्याचा, ‘ट्रान्सलेटर ऑफ द इयर’ म्हणून गौरव करण्यात आला. · तो निसर्गप्रेमी आहे. विशेषत: पक्षी निरीक्षण त्याला फार आवडतं, पण वेगवेगळया किटकांवरही त्याचं खास प्रेम आहे. असे किटक दिसले की तो तासनतास त्यांना न्याहळतो. त्यांची नोंद करतो. वेळ मिळाला की पक्षी निरीक्षणासाठी पळतो. नुकताच तो मेंगलुरु येथे, ड्रॅगनफ्लाय (चतुर) वरील कार्यशाळेत सहभागी झाला होता. आता त्याने फुलपाखरांच्या कार्यशाळेत सहभागी होण्याचं नियोजन केलय. · लहान वयातच त्याला निर्सर्गाचं संवर्धन आणि संरक्षण करणं किती महत्वाचं आहे, हे उमगलय. त्यामुळे निसर्ग संवर्धासाठी आवश्यक असणाऱ्या घटकांचा उपयोग करुन तो कथा लिहितो. · ‘आय नॅचरॅलिस्ट’ या डिजिटल प्लॅटफॉर्मवर त्याने आतापावेतो ८१३ पक्षांच्या निरीक्षणांची नोंद केलीय. याशिवाय वेगवेगळ्या प्रजातींच्या ४२३ नोंदी त्याच्या नावावर आहेत. या प्लॅटफॉर्मवर जगभरातील पक्षी व किटक निरीक्षक आपले निरीक्षण नोंदवतात. फोटो अपलोड करतात. अभ्यासक, अशा पक्षी किंवा किटकांची ओळख पटवतात. · पुस्तकातून जे उत्पन्न मिळतं, ते तो स्लॉथ बियरच्या म्हणजेच रेशीम अस्वलांच्या देखभालीसाठी, ‘वाइल्ड लाइफ एसओस’ या संस्थेला देतो. (स्लॉथ बियरला त्याच्या मऊ रेशमी केसांमुळे रेशीम अस्वल असं संबोधल जातं.या अस्वलिला फळ, मध, मुंग्या खायला फार आवडलं.) · मोठेपणी स्वत:ला निसर्गाच्या संवर्धनासाठीच झोकून द्यायचय नि इतरांनाही त्यासाठी प्रेरित करायचय, असा त्याने निर्धार केलाय. · असा हा ऑस्टिन अजित. वय वर्षे ११. हल्ली मुक्काम बेंगळुरु सुरेश वांदिले |