(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

मार्च 2020 पूर्वी संबंध देशात मोठ मोठे प्रदर्शन, संगीत जलसे, सेलिब्रिटी लग्न सोहळे, चित्रपट व इतर क्षेत्रातील पुरस्कार वितरण कार्यक्रम, परिषदा, कार्पोरेट क्षेत्रातील चर्चासत्रे, क्रीडा क्षेत्रातील आयपीएल (क्रिकेट),प्रिमियर बॅडमिंटन लिग, प्रो कबड्डी लिग इत्यादी, लाइव्ह शोज इत्यादी यांची रेलचेल होती. या सर्वांचे भव्यदिव्य आयोजन इव्हेंट व्यवस्थापनातील तंत्र आणि कौशल्य  वापरुन केले जात होते. या क्षेत्रातील आर्थिक उलाढाल सातत्याने वाढत होती. त्यामुळे या क्षेत्राचा विस्तारही मोठ्या प्रमाणावर होत होता. त्यासाठी लागणाऱ्या मनुष्यबळाला वेगवेगळ्या प्रकारच्या करिअरसंधी मिळत होत्या. पण मार्च 2020  पर्यंत सारीच परिस्थिती बदलली. याचा फटका इव्हेंट व्यवस्थापन क्षेत्राला मोठा बसला.  त्‍यानंतरची दोन वर्षे अत्यंत बिकट गेली.मात्र गेल्या दिडी दोन वर्षापासून  आपली उत्सवप्रियता पुन्हा पूर्वपदावर आल्याचं दिसतं. सर्वत्र लहान मोठ्या इव्हेंटची नुसती रेलचेल आहे. इव्हेंट व्यवस्थापन करणाऱ्या कंपन्यांना आणि त्यातील मनुष्यबळास सुगीचे दिवस आले आहेत. त्या अनुषंगाने 3 ते 4 वर्षे कालावधीच्या पदवी स्तरीय अभ्यासक्रमास यंदा प्रवेश घेण्याचा विचार करायला हवा.

अभ्यासक्रम आणि संस्था

(1) एनएइएमडी (ॲकॅडेमी ऑफ इव्हेंट मॅनेजमेंट ॲण्ड डेव्हलपमेंट)अभ्यासक्रम- बॅचलर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज (बीएमएस) इव्हेंट मॅनेजमेंट ॲण्ड पब्लिक रिलेशन. कालावधी- तीन वर्षे. हा अभ्यासक्रम मुंबई विद्यापीठाशी संलग्न आहे.

काय शिकाल ?

व्यवसाय संवाद कौशल्य, इव्हेंट  व्यवस्थापनाची कौशल्ये, संस्थात्मक वर्तणूक, इव्हेंट नियोजन आणि स्थान निश्चितीचे व्यवस्थापन, इव्हेंट निर्मितीची प्रकिया, इव्हेंट संसाधानांचे व्यवस्थापन, इव्हेंट आथित्यशीलता आणि खानपान, इव्हेंट विपणन आणि प्रायोजक, लग्न सोहळ्याचे नियोजन आणि लाईव्ह इव्हेंट्स, इव्हेंट व्यवस्थापनाच्या वैधानिक बाजू, ब्रँड व्यवस्थापन -संशोधन आणि विकास, कॉर्पोरेट इव्हेंट्स, नैतिक मूल्ये आणि सुशासन, माध्यम व्यवस्थापन, ग्राहकांची वर्तणूक, जनसंपर्क, जाहिरात, इव्हेंट सुरक्षा आणि धोक व्यवस्थापन, इव्हेंट लेखा आणि वित्त व्यवस्थापन, आदी विषय घटकांचा अभ्यासक्रमात समावेश करण्यात आला आहे. या अभ्यासक्रमामध्ये प्रात्यक्षिकांवर भर देण्यात येत असल्याने विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष इव्हेंट आयोजनासाठी आवश्यक असणारे तंत्र-कौशल्य यामध्ये पारंगतता मिळवणे शक्य होऊ शकते. हा अभ्यासक्रम केलेल्या उमेदवारांना इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी, जनंसपर्क कंपनी, पर्यटन आणि आतिथ्यशीलता कंपनी आदी ठिकाणी रोजगार संधी मिळू शकतात. स्वत:ची इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी उघडून स्वयंरोजगारही करता येतो.

संपर्क- संकेतस्थळ – giced.co.in ईमेल-mumbai@naemd.edu.in

(२) व्हिसलिंगवूड इंटरनॅशल- इंस्टिट्यूट ऑफ फिल्म, कम्युनिकेशन ॲण्ड क्रिएटिव्ह आर्ट्स (स्कूल ऑफ इव्हेंट मॅनेजमेंट) – अभ्यासक्रम -बीबीए इन इव्हेंट मॅनेजमेंट, कालावधी- तीन वर्षे. अर्हता- कोणत्याही ज्ञानशाखेतील १२ वी उत्तीर्ण. प्रवेश- चाळणी परीक्षेव्दारे. या संस्थेत एमबीए इन इव्हेंट मॅनेजमेंट हा अभ्यासक्रमही करता येतो.

काय शिकाल ?

कॉपार्रेट, धार्मिक, सामुदायिक, डिजिटल आणि रिटेल इव्हेंट्स, शासकीय आणि सार्वजनिक क्षेत्रातील घटकांचे इव्हेंट्स, दूरचित्रवाणींसाठीचे इव्हेंट्स, लग्नसोहळयांचे नियोजन, शोकसभा आयोजन व्यवस्थापन, वर्धापन दिन आयोजन.

संपर्क- फिल्मसिटी कॉम्प्लेक्स, आरे कॉलनी, गोरेगाव, मुंबई- ४०००६५, दूरध्वनी- ८४५१८०३८५२, संकेतस्थळ-whistlingwoods.net, ईमेल-admissions@whistlingwoods.net

सुरेश वांदिले