इंडियन इंस्टिट्यूट ऑफ ट्रॅव्हल ॲण्ड टुरिझम या संस्थेने, पर्यटन, यात्रा, सहल याक्षेत्रातील रोजगार आणि स्वयंरोजगारास उपयुक्त ठरु शकतील, असे कौशल्य निर्मितीचे ऑनलाइन प्रशिक्षण अभ्यासक्रम सुरु केले आहेत. या प्रशिक्षण अभ्यासक्रमांचा कालावधी प्रत्येकी ५ दिवस आहे. हे प्रशिक्षण सोमवार ते शुक्रवार, दररोज दोन तास, ऑनलाइन दिले जाते. पर्यटन उद्योगाशी संबंधित विविध बाबींची माहिती या प्रशिक्षणात संस्थेच्या अनुभवी अध्यापककांडून दिली जाते. हे प्रशिक्षण इंटरॲक्टिव्ह असून, प्रशिक्षणार्थीला प्रत्यक्ष चर्चेत सहभागी होता येते. प्रत्येक अभ्यासक्रमाचे शुल्क प्रत्येकी ५ हजार रुपये आहे. अभ्यासक्रमपूर्ण केल्यावर संस्थेचे प्रमाणपत्र दिले जाईल. मात्र त्यासाठी किमान ८० टक्के उपस्थिती आवश्यक राहील. एखाद्या प्रशिक्षणार्थीला मध्येच प्रशिक्षण सोडायचे असल्यास शुल्क परत केले जाणार नाही.
प्रशिक्षणाची वैशिष्ट्ये
(१) टुरिझम स्टार्टअप सुरु करण्यासाठी आवश्यक असणारे कौशल्य, तंत्र आणि ज्ञान विकसित होण्यासाठी या प्रशिक्षणाचा उपयोग होईल. (२) विक्रीचे मुलभूत तत्वे, प्रभावी संवाद कौशल्य, पर्यटन व्यवसायातील आधुनिक प्रवाहांबद्दल प्रशिक्षणार्थींना अवगत केले जाईल. (३) या क्षेत्रात उपलब्ध असलेल्या विविध रोजगार आणि स्वयंरोजगार संधींची माहिती दिली जाईल. (४) व्यावसायिक स्वरुपाची व्यवस्थापकीय कौशल्य निर्मिती होईल, (५) सांस्कृतिक, नैतिक, सामाजिक जबाबदारीची भान असणाऱ्या व्यक्तीमत्वाचा विकास होण्यासाठी प्रशिक्षणातील घटक उपयुक्त ठरतील. (६) पर्यटन आणि यात्रा क्षेत्राशी संबंधित भविष्यातील, अभ्यास संधीबाबत अवगत केले जाईल.
प्रशिक्षणाचे विषय
(१) चित्रपट पर्यटन (फिल्म टुरिझम), (२) पर्यटनातील पुरवठा साखळी व्यवस्थापन (सप्लाय चेन मॅनेजमेंट इन टुरिझम), (३) टुर ऑपरेटर कसे व्हाल?, (४) शास्वत पर्यटनातील आव्हाने (चॅलेंजेस इन सस्टनेबल टुरिझम), (५) पर्यटन व्यवस्थापन कंपनीची स्थापना (इस्टॅब्लिशिंग टुरिझम डेस्टिनेशन मॅनेजमेंट कंपनी), (६) पर्वतीय आणि साहसी पर्यटन (माउंटेनिरिंग ॲण्ड ॲडव्हेन्चर टुरिझम), (७) माहिती तंत्रज्ञानाचा पर्यटनात वापर, (८) सांस्कृतिक पर्यटन, (९) पर्यटनातील संशोधन, (१०) पर्यटनातील रसद पुरवठा आणि मालवाहतूक (लॉजिस्टिक्स ॲण्ड कार्गो इन टुरिझम), (११) विदेशी चलन व्यवस्थापन (फोरेक्स मॅनेजमेंट), (१२) एकमेकांना छेद देणारी सांस्कृतिक वर्तणूक (क्रॉस कल्चर बिहेव्हिअर), (१३) मंदिरांचा अन्वयार्थ (टेम्पल इंटरप्रिटेशन), (१४) पर्यटन उद्योजकता आणि व्यवसाय विकास, (१५) ग्रामीण भागातील पर्यटन क्षमता, (१६) भारतीय वारसा बांधकामातील प्रतिमाशास्त्र/मूर्तीशास्त्राचा अन्वयार्थ (इंटरप्रिटेटिंग ऑयकॉनॉग्रॅफी ऑफ इंडियन बिल्ड हेरिटेज), (१७) प्रवाशाच्या दिनक्रमाचे नियोजन आणि पर्यटन संस्थेची स्थापन कशी करणार? (इटिनेरीरी प्रिपरेशन ॲण्ड हाऊ टू ओपन ट्रॅव्हल एजन्सी), (१८) कृषी पर्यटन.
संपर्क- कोर्स कुऑर्डिेनेटर, भ्रमणध्वनी-९७७०४९०१८४, संकेतस्थळ- https://www.iittm.ac.in