शरीरातील अनावश्यक कचरा, विषारी द्रव्य/ पदार्थ बाहेर काढून शरीराच्या शुध्दीकरणाची प्रक्रिया पंचकर्म तंत्राव्दारे राबवली जाते. शरीरात खोलवर रुजलेला तणाव आणि आजारावर मात करण्यासाठी पंचकर्म उपयुक्त ठरु शकतं. पंचकर्म हे आयुर्वेदातील एक महत्वाची उपचार पध्दती समजली जाते. सध्याच्या काळात धावपळीमध्ये विविध ताण- तणाव आणि जीवनशैलीशी निगडित शारीरिक समस्या निर्माण झाल्या आहेत. त्यावरील उत्तम उपाय म्हणून पंचकर्म तंत्राकडे बघितलं जातं. ही बाब लक्षात आल्यानं देश-विदेशात पंचकर्म प्रकिया करण्यासाठी अधिकाधिक नागरिकांचा ओढा वाढत चालल्याचे दिसून येतं. त्यामुळे पुढील काळात या विषयातील जाणकार किंवा तंत्रकौशल्य हस्तगत केलेल्या मनुष्यबळाला आयुर्वेद रुग्णालये, पंचकर्म केंद्रे, आरोग्य केंद्रे (हेल्थ रिसॉर्ट), वेलनेस सेंटर, पुनर्वसन केंद्रे या ठिकाणी करिअरच्या विविध संधी मिळू शकतात.
हे पंचकर्म पाच पध्दतीचे असल्याने त्याला पंच म्हणजे पाच आणि कर्म म्हणजे पध्दती किंवा प्रकिया असं संबोधलं जातं. शरीरास वेगवेगळया प्रकारचे आजार होऊ नये म्हणून या उपचार पध्दतीत, प्रतिबंधात्मक आणि उपचारात्मक बाबींचा समावेश केला जातो. पंचकर्म करणाऱ्या तज्ज्ञ आणि सहाय्यकांची मागणीही वाढत आहे.
भारतात आणि परदेशतातही पंचकर्म सहाय्यकांची अतिशय कमतरता असल्याचं निदर्शनास आलं आहे. हे सहाय्यक पंचकर्म तज्ज्ञांना विविध उपचार आणि क्रियांसाठी मदत करतात. ही बाब लक्षात घेऊन सेंट्रल काउंसिल फॉर रिसर्च इन आयुर्वेदिक सायंस या स्वायत्त संस्थेने पंचकर्म टेक्निशिअनचा अभ्यासक्रम सुरु केला आहे. ही संस्था केंद्रीय आयुर्वेद, योग, नेचरोपथी, युनानी, सिध्द आणि होमिओपथी (आयुष) अंतर्गत कार्यरत आहे.
हे प्रशिक्षण पंचकर्मातील चार सेवा पुरवणाऱ्यांसाठी उपयुक्त ठरेल अशा पध्दतीने तयार करण्यात आलय. त्यासाठी केंद्र सरकार आणि जागतिक आरोग्य संघटनेच्या सूचनांचा उपयोग करण्यात आला आहे. हे प्रशिक्षण, राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळांतर्गत येणाऱ्या आरोग्य सेवा कौशल्य परिषदेशी संलग्नित आहे. या पूर्णकालीन प्रशिक्षणाचा कालावधी एक वर्षाचा आहे. या प्रशिक्षणाचं माध्यम इंग्रजी आणि हिंदी आहे. अर्हता – या प्रशिक्षणास कोणत्याही विद्याशाखेतील १२ वी उत्तीर्ण विद्यार्थ्यास प्रवेश मिळू शकतो. संबंधित उमेदवाराचं वय किमान १८ वर्षे असावं.
निवड प्रक्रिया
या प्रशिक्षणासाठी अर्ज केलेल्या उमेदवारांची, बारावित मिळालेल्या गुणांवर आधारित संवर्ग निहाय (अनुसूचित जाती, जमाती, ओबीसी इत्यादी) उमेदवारांची यादी तयार केली जाते.
हे प्रशिक्षण, सेंट्रल आयुर्वेद रिसर्च इंस्टिट्यूट – नवी दिल्ली (१० जागा) , नॅशनल आयुर्वेद रिसर्च इंस्टिट्यूट फॉर पंचकर्म – चेरुथिरुती (३० जागा), सेंट्रल आयुर्वेद रिसर्च सेंटर – गोहाटी (१० जागा), रिजनल आयुर्वेद रिसर्च सेंटर-जम्मू (१५ जागा) या केंद्रांवर चालवलं जातं. यातील ५० टक्के जागा महिलांसाठी राखीव आहेत.
या प्रशिक्षणाचं शुल्क ३० हजार रुपये असून ते प्रत्येकी १० हजार रुपये याप्रमाणे तीन हप्त्यात देता येतं. हे प्रशिक्षण संस्थेचे नियमित अध्यापक, पंचकर्म, कायाचिकित्सा आणि इतर तज्ज्ञ डॉक्टर आणि या क्षेत्रातील नामांकित खाजगी तज्ज्ञांकडून दिलं जातं. शेवटच्या तीन महिन्यात देशातील इतर पंचकर्म केंद्रामध्ये पंचकर्माच्या प्रात्यक्षिकाची सुविधा उपलब्ध करुन दिली जाते.
करिअर संधी
हे प्रशिक्षण पूर्ण केल्यावर (१) पंचकर्म तंत्रज्ञ, (२) पंचकर्म साहाय्यक, (३) मसाजर म्हणून रोजगाराच्या अनेक संधी देश-विदेशातील आयुर्वेदिक संस्था, रुग्णालयात मिळू शकतात.
या प्रशिक्षासाठीचा अर्ज http://ccras.nic.in/ या संकेतस्थळावरुन डाऊनलोड करता येतो. संपर्क- जवाहरलाल नेहरु भारतीय चिकित्सा आणि होमिओपॅथी अनुसंधान भवन,नंबर-६१-६५, इंस्टिट्यूशनल एरिआ,अपोजिट डी ब्लॉक,जनकपुरी,नवी दिल्ली-११००५८, दूरध्वनी-०११-२८५२५८६२
नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ आयुर्वेद या संस्थेतही सर्टिफिकेट कोर्स इन पंचकर्म टेक्निशियन हा अभ्यासक्रम करता येतो. या अभ्यासक्रमाचा कालावधी -एक वर्षं. अर्हता- शाखेतील १२ वी उत्तीर्ण.संपर्क संकेतस्थळ- nia.nic.in