नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी- या संस्थेच्या वेगवेगळया कॅम्पसमध्ये निरंतर शिक्षण पध्दतीच्या उपक्रमांतर्गत ज्वेलरी डिझायनिंगच्या क्षेत्रातील कौशल्य विकासाचे अभ्यासक्रम सुरु करण्यात आले आहेत.
(अ) चेन्नई कॅम्पसमध्ये दोन वर्षे कालावधीचा, ग्रॅज्युएट डिप्लोमा इन ज्वेलरी डिझाइन हा अभ्यासक्रम करता येतो. या अभ्यासक्रमाला कोणत्याही शाखेतील १२ वी उत्तीर्ण विद्यार्थ्याला प्रवेश मिळू शकतो. हा अभ्यासक्रम केल्यावर संबंधित उमेदवारांना प्रोफेशनल ज्वेलरी डिझायनर, प्रॉडक्ट हेड, रिटेल ज्वेलरी सोर्सिंग हेड्स, ज्वेलरी उद्योजक आदी करिअर संधी मिळू शकतात.
संपर्क- cep.chennai@nift.ac.in, दूरध्वनी- ०४४-२२५४२७५९
(ब) गांधीनगर कॅम्पसमध्ये ज्वेलरी डिझाइन ॲण्ड मॅन्युफॅक्चुरिंग हा सहा महिने कालावधीचा अभ्यासक्रम करता येतो.
संपर्क- https://nift.ac.in/gandhinagar/continuing-education, दूरध्वनी- ०७९-२३२६५०५१
(क) दिल्ली कॅम्पसमध्ये लक्झरी प्रॉडक्ट ॲण्ड ज्वेलरी डिझाइन हा एक वर्षे कालावधीचा अभ्यासक्रम करता येतो. अर्हता- कोणत्याही विषयातील १२वी उत्तीर्ण.
संपर्क- ce.delhi@nift.ac.in, दूरध्वनी – ०११ – २६५४२१४९
०००
(३) जे.डी. इंस्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी–
डिप्लोमा इन फाइन ज्वेलरी डिझाइन– कालावधी – एक वर्षं. अर्हता- कोणत्याही विषयातील १२ वी उत्तीर्ण.
हा अभ्यासक्रम केल्यावर ज्वेलरी डिझायनर, ॲक्सेसरी डिझायनर, ज्वेलरी कंसलटंट लक्झरी सर्विस, कास्चुम ज्वेलरी, क्युटरेटर अशा सारख्या करिअर संधी मिळू शकतात.
संपर्क- ३९ दरयाचा बिल्डिंग, हौज खास व्हिलेज, नवी दिल्ली- ११००१६, दूरध्वनी- ०११- २६९६०८२१, , ईमेल- delhi@jdinstitute.co, संकेतस्थळ- https://jdinstitute.ac.in/courses/diploma-jewellery-design-1-year/
०००
(४) जेमॉलॉजिकल इंस्टिट्यूट ऑफ इंडिया
या संस्थेमध्ये, डिप्लोमा इन ज्वेलरी डिझाइन हा अभ्यासक्रम करता येतो. कौशल्य निर्मितीसाठी उपयुक्त ठरणारा हा अभ्यासक्रम दहावी/बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्याला करता येतो. या अभ्यासक्रमात डिझायनिंग आणि सर्जनशीलतेच्या संकल्पनांची ओळख, रेखांकने, डिझायनिंगशी संबंधित चित्रे व त्याबरहुकूम साचा तयार करणे, विविध मौल्यवान धातू आणि खड्यांची तोंड ओळख, सोन्याची पोत ओळखणे, विविध प्रकारच्या रिंग, गळयातील दागिने, हात व बोंटांमध्ये वापरण्यात येणारे दागिने, नेकलेस, अमेरिका, जर्मन आणि जपान देशातील मार्केटमधील दागिने व्यापाराची संधी, दागिने निर्मितीची मूलभूत तत्वे आदी विषयघटकांचा समावेश करण्यात येतो. या अभ्यासक्रमाचा कालावधी १५ आठवड्यांचा आहे.
डिप्लोमा इन जेमॉलॉजी हा अभ्यासक्रमही या संस्थेत करता येतो. कालावधी एक वर्षं.
संपर्क -501/502, मेहता भवन, पाचवा माळा, राजा राम मोहनरॉय मार्ग, चर्नीरोड स्टेशन(पूर्व)च्या विरुध्द दिशेला,मुंबई-४००००४, संकेतस्थळ- https://www.giigemlab.com/diploma-in-jewellery-designing/ ईमेल- edu@giionline.com, दूरध्वनी- ०२२-२३८८९२३६
०००
(5) इंटरनॅशनल जेमॉलॉजिकल इंस्टिट्यूट
या संस्थेने ज्वेलरी डिझाइनचा पदविका अभ्यासक्रम सुरु केला आहे. या अभ्यासक्रमात दागिने आणि त्यासाठी लागणारे साहित्य, धातू आणि खडे यापासून तयार करावयाच्या दागिन्यांची चित्रे आणि रेखांकने, दागिन्यांच्या सूक्ष्म बाबी, धातूंचे पोत, दागिन्यांच्या विविध प्रकारांची निर्मिती, सोन्याचे मूल्य जोखणे, दागिने डिझायनिंगचे मूल्य निर्धारण करणे, हिरे आणि रंगीत खड्यांचे मूल्य निर्धारण करणे, आदी विषय घटकांचा समावेश आहे.
कौशल्यनिर्मितीचा हा अभ्यासक्रम केल्यावर ज्वेलरी डिझायनर, फ्रीलान्सर डिझायनर, ज्वेलरी मॅन्युफॅक्चरिंग, ज्वेलरी रिटेलर आदी व्यवसाय वा करिअर संधी मिळू शकतात.
या संस्थेने ज्वेलरी डिझाइनसाठी कॉम्प्युटर एडेड डिझाइन/ कॉम्प्युटर एडेड मशिन टेक्नॉलॉजी या तंत्रकौशल्याला अवगत करण्यासाठी अभ्यासक्रम सुरु केला आहे. अत्याधुनिक टू डायमेंशेनल आणि थ्री डायमेंशेनल संगणकीय सॉफ्टवेअरचा वापर करुन असंख्य नावीन्यपूर्ण डिझाइन करण्याचे तंत्र या अभ्यासक्रमात शिकवले जाते.
संपर्क – इंटरनॅशनल जेमॉलॉजिकल इंस्टिट्यूट, स्कूल ऑफ जेमॉलॉजी, ७०२, द कॅपिटल, बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स, मुंबई -४०००५१,दूरध्वनी-०२२-४०३५२५५०, ईमेल-: india@igi.org /www.igi.org/education/jewelry-cad-course,
सुरेश वांदिले
00000