(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

बीबीए इन कलनरी आर्ट हा अभ्यासक्रम केल्यावर फुड स्टायलिस्ट म्हणून करिअर करता येतं. जे डोळ्यांना सुंदर दिसतं, ते खाण्यासाठीही सुंदरच असतं अशी खात्री पटवण्याची किमया फूड स्टायलिस्ट करतो. समाजमाध्यमे (सोशल मीडिआ) च्या आगमनानंतर मोठी रेस्टारेंट्स, हॉटेल्स, शेफ ,अन्नपदार्थ तयार करणाऱ्या कंपन्या त्यांच्या वैशिष्ट्यूपर्ण डिशेशच्या जाहिराती फूड स्टायलिस्टच्या सहाय्यानं करुन अधिकाधिक खवय्यांना आकर्षित करतात. उपहारगृहातील खाद्यपदार्थांच्या ब्रँडची निर्मिती करण्यासाठी फूड स्टायलिस्टचा मोठा हातभार लागतो.

विविध पदार्थांच्या चवीचं आणि अन्नपदार्थ निर्मितीचे ज्ञान, नावीन्यपूर्ण सजावटीच्या सर्जनशील कल्पना या बाबींची पूर्तता करता येणारी कोणतीही व्यक्ती फूड स्टायलिस्टचं करिअर करु शकते. फूड स्टायलिस्टला कॅमेरामन सोबत समन्वय साधून कार्य करावं लागतं. पंचतारांकित रेस्टारेन्ट्स फूड स्टायलिस्ट्सना त्यांच्याकडील डिशेसची सजावट आणि त्यानंतर त्याच्या प्रसिध्दीसाठी पाचारण करतात, तेव्हा त्यास अन्नपदार्थनिर्मितीच्या सूक्ष्मबाबींसोबतच त्याअन्नपदार्थाच्या मूख्य घटकाची माहिती करुन घेणं आवश्यक ठरतं. कारण हा महत्वाचा घटक त्या डिशचा मुख्य हिरो असतो. त्या हिरोस उत्तमरीत्या सादर करणं हे कौशल्याचं काम फूड स्टायलिस्टला करावं लागतं.  प्रारंभी फूड ब्लॉगिंग सुरु करुन अधिकाधिक खवय्यांना आकर्षित करु शकता. त्यातून तुम्हास ग्राहक मिळू शकतात.

 

 

एमबीए कलनरी आर्ट

या अभ्यासक्रमाचा कालावधी दोन वर्षांचा आहे. हा अभ्यासक्रम तिरुपती आणि नॉयडा येथील कॅम्पसमध्ये करता येतो. प्रत्येक ठिकाणी ३० जागा भरल्या जातात.

अर्हता- चाळणी परीक्षेला बसू इच्छिणाऱ्या खुल्या संवर्ग आणि नॉन क्रिमिलेयर इतर मागासवर्ग संवर्गातील कोणत्याही शाखेतील विद्यार्थ्याला पदवी अभ्यासक्रमात ५० टक्के गुण मिळायला हवेत. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, दिव्यांग संवर्गातील विद्यार्थ्यांना ४५ टक्के गुण मिळायला हवेत. यंदा पदवीची परीक्षा दिलेले विद्यार्थी सुध्दा ही चाळणी परीक्षा देऊ शकतात. मात्र त्यांचा निकाल ३० सप्टेंबर २०२४ पर्यंत लागायला हवा. त्यांना त्यांच्या संवर्गानुसार अर्हतेसाठीचे किमान गुण ‍मिळायला हवेत.

प्रवेश प्रक्रिया

या अभ्यासक्रमाला दोन पध्दतीने प्रवेश दिला जातो. आयजीएनटीयू-आयसीआय-जेईई (इंदिरा गांधी नॅशनल ट्रायबल युनिव्हर्सिटी-इंडियन कलिनरी इंस्टिट्यूट-जॉईंट एंट्रन्स एक्झामिनेशन-पोस्ट ग्रॅज्युएट), (२) सीयुईटी-कॉमन युनिव्हर्सिटी एन्ट्रन्स टेस्ट-पोस्ट ग्रॅज्युएट.

प्लेसमेंट

कोणत्याही हॉटेलमध्ये सर्वाधिक वेतन शेफला दिलं जातं. त्याच्या स्वयंपाकीय कौशल्याच्या बळावर ग्राहकांची संख्या वाढण्यात आणि उपहारगृह अथवा हॉटेलची लोक्रिपयता वाढण्यास मोठा हातभार लागतो. हा अभ्यासक्रम केलेल्या विद्यार्थ्यांना अन्नपदार्थ निर्मिती ते किचन व्यवस्थान, किचन प्रशासन अशा विविधांगी जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात.

कलनरी आर्टमधील बीबीए आणि एमबीए अभ्यासक्रम केलेल्या सर्व विद्यार्थ्यांना पुढील कंपन्या/ संस्था/ उपाहरगृहे/ हॉटेल यामध्ये प्लेसमेंट मिळाले आहे. (१) बिग सेडॉर लॉज, अमेरिका, (२) आयटीसी हॉटेल्स, (३) मॅरिऑट ग्रुप्स, (४) रेसिडंसी ग्रुप्स, (५) कंम्पास ग्रुप्स, (६) रॅडिसन ग्रुप्स, (७) द रेन ट्री हॉटेल ग्रुप्स, (८) ताज ग्रुप्स ऑफ हॉटेल्स, (९) ॲकॉर हॉटेल्स, (१०) नेसले, (११) जिओ मार्ट, (१२) ॲमेझान, (१३) ओबेरॉय ग्रुप

इंडियन कलिनरी इंस्टिट्यूटच्या चेन्नई येथील विस्तारीत कॅम्पसमध्ये, बीएस्सी इन हॉस्पिटॅलिटी ॲण्ड हॉटेल ॲडमिनिस्ट्रेशन, हा चार वर्षे कालावधीचा अभ्यासक्रम करता येतो. या अभ्यासक्रमला नॅशलन काऊंसिल ऑफ हॉटेल मॅनेजमेंट ॲण्ड कॅटेरिंग टेक्नॉलॉजीच्या वतिने घेण्यात येणाऱ्या जॉईंट एन्ट्रस एक्झामिनेशन व्दारे प्रवेश दिला जातो.

संपर्क- संकेतस्थळ-https://www.icinoida.com, ईमेल- indianculnaryinstitute@gmail.com

सुरेश वांदिले

 

 

सुरेश वांदिले