नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ डिझाइन,ही भारत सरकारच्या अखत्यारितील संस्था आहे. गुणवत्ता आणि दर्जा याबाबत ही संस्था आंतरराष्ट्रीय पातळीची आहे. या संस्थेतील विद्यार्थी जगभरात वेगवेगळया उच्च श्रेणींच्या पदांवर विराजमान झाले आहेत. विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला वेगळ्या उंचीवर नेण्याची क्षमता या संस्थेच्या अभ्यासक्रमांमध्ये आहे.
अहमदाबाद आणि गांधीनगर येथील कॅम्पससोबत देशात इतरत्रही एनआयडीचे कॅम्पस आहेत.तेथील अभ्यासक्रम पुढील प्रमाणे आहेत-
(१) एनआयडी आंध्रप्रदेश (गुंटूर), (२) एनआयडी हरयाणा (कुरुक्षेत्र), (३) एनआयडी मध्यप्रदेश (भोपाळ), (४) एनआयडी आसाम (जोरहट)- बॅचलर ऑफ डिझाइन इन (१) इंडस्ट्रिअल डिझाइन, (२) कम्युनिकेशन डिझाइन आणि (३) टेक्सटाइल ॲण्ड ॲपेरल डिझाइन
प्रत्येक स्पेशलायझेशनला प्रत्येकी २५ विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. अभ्यासक्रमाचा कालावधी चार वर्षाचा आहे.
शैक्षणिक अर्हता– (अ) कला, वाणिज्य किंवा विज्ञान शाखेतील पास श्रेणीत १२ वी उत्तीर्ण किंवा बारावीला असलेले विद्यार्थी किंवा (ब) ३ वर्षे कालावधीचा तंत्रशिक्षण मंडळाचा पदविका अभ्यासक्रम करणारे विद्यार्थी किंवा (क) किंवा नॅशनल ओपन स्कूलिंग अतंर्गत पाच विषयांसह सिनिअर सेकंडरी स्कूल परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थी किंवा (ड) हायर सेकंडरी सर्टिफिकेट व्होकेशनल एक्झामिनेशन.
पदव्युत्तर पदवी (मास्टर ऑफ डिझाइन)
एनआयडीमधील पदव्युत्तर पदवी (मास्टर ऑफ डिझाइन) या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीची प्रवेश प्रकिया सुध्दा सुरु झाली. ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख ३ डिसेंबर २०२४ ही आहे. प्राथमिक आणि मुख्य परीक्षेतील गुणांवर आधारित प्रवेश दिला जातो. प्राथमिक परीक्षा ५ जानेवारी २०२५ रोजी घेण्यात येऊन १७ फेब्रुवारी २०२५ रोजी निकाल घोषित केला जाईल.३ मार्च ते ६ एप्रिल २०२५ कालावधित कोणत्याही दिवशी मुख्य परीक्षा घेतली जाईल.६ मे रोजी २०२५ रोजी निकाल घोषित केला जाईल.
हा अभ्यासक्रम १९ स्पेशलायझेशनमध्ये करता येतो. हे स्पेशलायझेशन गांधीनगर, अहमदाबाद आणि बेंगळुरु कॅम्पसमध्ये करता येतात. या अभ्यासक्रमाचा कालावधी अडीच वर्षे आहे. या अभ्यासक्रमाला दोन टप्प्यात घेतल्या जाणाऱ्या डिझाइन ॲप्टिट्यूड टेस्टव्दारे प्रवेश दिला जातो. डिझाइन क्षेत्रातील ज्ञान, कौशल्य आणि उमेदवाराच्या वर्तणुकीचा दर्जा यांचे परिक्षण या चाळणी परीक्षेव्दारे केले जाते.
शाखा आणि विषय
(१) कम्युनिकेशन डिझाइन- (अ) फिल्म ॲण्ड व्हिडिओ (अहमदाबाद कॅम्पस), (ब) ग्रॅफिक डिझाइन (अहमादाबाद), (क) ॲनिमेशन फिल्म डिझाइन (अहमदाबाद कॅम्पस), (ड) फोटोग्रॅफी डिझाइन (गांधीनगर कॅम्पस).
(२) इंडस्ट्रिअल डिझाइन- (अ) सेरॅमिक ॲण्ड ग्लास डिझाइन (अहमदाबाद कॅम्पस), (ब) फर्निचर ॲण्ड इंटेरिअर डिझाइन (अहमदाबाद कॅम्पस), (क) प्रॉडक्ट डिझाइन (अहमदाबाद कॅम्पस), (ड) टॉय ॲण्ड गेम डिझाइन (गांधीनगर कॅम्पस), (इ) ट्रांस्पोर्टेशन ॲण्ड ऑटोमोबाइल डिझाइन (गांधीनगर कॅम्पस), (ई) युनिव्हर्सल डिझाइन (बेंगळुरु कॅम्पस)
(३) इंटरडिसिप्लिनरी डिझाइन- (अ) डिझाइन फॉर रिटेल एक्सपिरियंस ( बेंगळुरु कॅम्पस), (ब) स्ट्रेटेजिक डिझाइन मॅनेजमेंट (गांधीनगर कॅम्पस),
(४) आयटी इंटिग्रेटेड डिझाइन, (अ) डिजिटल गेम डिझाइन( बेंगळुरु कॅम्पस), (ब) इंटरॲक्शन डिझाइन( बेंगळुरु कॅम्पस), (क) इन्फॉर्मेशन डिझाइन( बेंगळुरु कॅम्पस), (ड) न्यू मीडिआ डिझाइन( गांधीनगर कॅम्पस).
(५) टेक्स्टाइल,ॲपेरल,लाइफस्टाइल ॲण्ड ॲक्सेसरी डिझाइन- (अ) ॲपेरल डिझाइन( गांधीनगर कॅम्पस), (ब) लाइफस्टाइल ॲण्ड ॲक्सेसरी डिझाइन( गांधीनगर कॅम्पस)- (क) ॲक्सेसरी डिझाइन (अहमदाबाद कॅम्पस).
अर्हता- (१) कोणत्याही विषयातील चार किंवा तीन वर्षे कालावधीची पदवी किंवा (२) चार वर्षे कालावधीचा डिझाइन/फाइन आर्ट/अप्लाइड आर्ट /आर्किटेक्चर या विषयातील १२वीनंतरची पदविका.
या संस्थेत पीएचडी करण्याची सुध्दा सुविधा आहे.
संपर्क- नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ डिझाइन पालडी अहमदाबाद – ३८०००७, दूरध्वनी- ०७९-२६६२९५००,टेलेफॅक्स- २६६२९६००, ईमेल – admissions@nid.edu, प्रवेश प्रक्रिया संकेतस्थळ- www.admissions.nid.edu, मुख्य संकेतस्थळ- http://www.nid.edu
सुरेश वांदिले
००००