५० – ६० वर्षापूर्वी प्रत्येक विभागाकडे न्याय वैद्यकीय प्रयोगशाळा होती. रसायनशास्त्र, जैवरसायनशास्त्र, भौतिकशास्त्र आणि अभियंत्यांना न्यायवैद्यक शास्त्राचे प्रशिक्षण दिले जात असे. गुन्ह्यांचा प्रकार आणि शोधकार्याची गुणवत्ता यावर बऱ्याच बाबी अवलंबून असतात. न्यायवैद्यक शास्त्रज्ञांना गुन्हेगारांनी मागे सोडलेल्या एखाद्या सूक्ष्म बाबींवर, प्रमाणित अशा अनेक चाचण्या कराव्या लागतात. या तज्ज्ञांना न्यायालयात साक्षिदार म्हणूनही उपस्थित राहावे लागते. यामुळेच इतर क्षेत्रातील मनुष्यबळास प्रशिक्षित करण्याऐवजी, न्यायवैद्यक शास्त्रात पारंगत असणारे मनुष्यबळ असण्याची गरज भासू लागली. त्याअनुषंगाने मध्यप्रदेशातील सागर विद्यापीठाने पहिल्यांदा एम.एस्सी -फॉरेंसिक सायंस, हा अभ्यासक्रम सुरु केला.
सध्या अनेक विद्यार्थी फॉरेंसिक सायन्स या विषयाकडे जाणिवपूर्वक वळतात. त्यांना शोधकार्याचे मूलभूत तत्वे शिकवली जातात. त्याचबरोबर गुन्हा घडलेल्या ठिकाणी पुरावे गोळा करण्याचे तंत्र शिकवले जाते. सध्या बहुतेक सर्वच बँकांना, फ्रॉड (फसवणूक शोध) डिपार्टमेंटसाठी न्यायवैद्यक शास्त्राशी निगडित प्रशिक्षित मनुष्यबळाची गरज भासते. कॉर्पोरेट क्षेत्रातही संभाव्य फ्रॉड थोपवण्यासाठी या मनुष्यबळाची गरज भासू लागली आहे. प्रत्येक राज्य सरकारने न्यायवैद्यक शास्त्राच्या प्रयोगशाळा उघडल्या आहेत.
या क्षेत्रात करिअर करु इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यास गुन्हे घडलेल्या ठिकाणी पुरावे गोळा करण्याचे तंत्र आत्मसात करणे आवश्यक ठरते. गुन्हे घडलेल्या ठिकाणाच्या वस्तुंची ने-आण करण्याची प्रकिया आणि या वस्तू सुरक्षित ठेवण्याची पध्दती समजून घ्यावी लागते. न्यायवैद्यकशास्त्र प्रयोगशाळेत प्रत्यक्ष काम करताना या बाबींचे तंत्र समजून घेणे शक्य होऊ शकते. अशा गुन्ह्यांमध्ये केवळ तपासाचा अहवाल सादर करणे अपेक्षित नसून गुन्ह्यांची सामाजिक कारणे कोणती आणि त्याच्या संभाव्य उपाययोजना, याचे सुतोवाच करणे अपेक्षित असते. काही वर्षांपूर्वी माटुंगा लोकल स्थानकावर लागलेल्या आगीचा मुख्य गुन्हेगार मातीचे तेल (केरोसीन) असल्याचे दिसून आले. त्यानंतर रेल्वेमध्ये केरोसीन आणि ज्वलनशील पदार्थांच्या वाहतुकीस पूर्णपणे बंदी घालण्यात आली.
अधिकाधिक प्रगत तंत्रज्ञानाचा वापर गुन्हे करण्यासाठी गुन्हेगार करु लागल्याने न्यायवैद्यक शास्त्राचे महत्व दिवसेंदिवस वाढत चालले आहे. त्यामुळेच भारत सरकारने नॅशनल फॉरेसिंक सायंस युनिव्हर्सिटीची स्थापना २०२० मध्ये केली असून या संस्थेचे कॅम्पसेस गुजरात- गांधीनगर, दिल्ली, त्रिपुरा, भोपाळ, पुणे, गौहाटी, मणिपूर, गौहाटी, धारवाड येथे उघडण्यात आली आहेत. या संस्थेमार्फत ७० हून अधिक देशात या क्षेत्रातील क्षमता बांधणी केली जात आहे. भारताची न्यायवैद्यक क्षमता वाढवण्याचे उद्दिष्ट्य या संस्थेला देण्यात आले आहे. या संस्थेमार्फत न्यायवैद्यक प्रयोगशाळांचा दर्जा उंचावण्याचा कार्यक्रम राबवला जाणार आहे. प्रत्येक जिल्ह्याला सर्व यंत्रसामुग्रीने सुसज्ज अशी मोबाइल शोध वाहने पुरवली जातील. या क्षेत्रातील विविध घटकांच्या अनुषंगाने, सेंटर ऑफ एक्सलेन्सची उभारणी केली जाईल. शोधकार्याच्या गुणवत्तेत देशभरात एकसमानता राहावी सासाठी गृहमंत्रालाने लक्ष केंद्रित केले आहे.
नॅशनल फॉरेंसिक सायंस युनिव्हर्सिटीचे अभ्यासक्रम (कंसामध्ये अभ्यासक्रम कोणत्या कॅम्पसमध्ये करता येतो,त्याची नावे आहेत.)
स्कूल ऑफ फॉरेंसिक सायंस
- बी.एस्सी- एमएस्सी इन फॉरेंसिक सायंस (गांधीनगर, दिल्ली, गोवा, त्रिपुरा, धारवाड), (२) एम.एस्सी इन फॉरेंसिक सायंस (गांधीनगर, दिल्ली, गोवा, त्रिपुरा, भोपाळ), (३) एम.एस्सी इन फॉरेंसिक बायोटेक्नॉलॉजी (गांधीनगर), (४) एम.एस्सी इन मल्टिमीडिया फॉरेंसिक (गांधीनगर), (५) एम.ए इन फॉरेंसिक मास कम्युनिकेशन ॲण्ड जर्न्यालिझम-स्पेशलायझेशन इन फॉरेंसिक जर्न्यालिझम (गांधीनगर), (६) पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन क्राइम सिन फोटोग्रॅफी (दिल्ली), (७) पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन क्राइम सिन मॅनेजमेंट (गांधीनगर, भोपाळ, धारवाड, पुणे, मनिपूर), (८) पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन फिंगरप्रिंट सायंस (गांधीनगर, दिल्ली, भोपाळ, पुणे), (९) पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन फॉरेंसिक डाक्युमेंट (गांधीनगर, दिल्ली, भोपाळ, पुणे, गौहाटी, मनिपूर), (१०) पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन डीएनए फॉरेंसिक (भोपाळ, पुणे, गौहाटी), (१०) पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन फॉरेंसिक जर्न्यालिझम (गांधीनगर), (११) पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन फॉरेंसिक बॅलिस्टिक्स (गौहाटी,मनिपूर)(अपूर्ण)
सुरेश वांदिले