आयआयटीमधील एमबीएसाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना पदवी परीक्षेत आणि कॅट परीक्षेत एकूण गुण (पर्सेंटाइल) सोबतच प्रत्येक घटकांमध्ये विशिष्ट गुण मिळणे आवश्यक असते. उदा-आयआयटी मुंबईच्या एमबीए प्रवेशासाठी पदवी परीक्षेत किमान ६० टक्के गुण आवश्यक आहेत. कॅट परीक्षेत किमान ९० टक्के पर्सेंटाइल आवश्यक आहेत. तथापि क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड/संख्यात्मक कल चाचणी, व्हर्बल ॲण्ड रिडिंग कॉम्प्रिहेंशन (इंग्रजी आकलन व शब्दकौशल्य चाचणी) आणि डाटा इंटरप्रिटेशन ॲण्ड लॉजिकल रिझनिंग(माहिती विश्लेषण आणि कार्यकारणभाव) या तिनही घटकांमध्ये किमान ७५ पर्सेंटाइल मिळणे आवश्यक आहे. समजा एकूण पर्सेंटाइल ९० असूनही एखाद्या घटकात ७४ टक्के पर्सेंटाइल असल्यास अर्ज नाकारला जातो. या सर्वबाबींची माहिती संस्थांच्या संकेतस्थळावर देण्यात आली आहे. ‘कॅट’ परीक्षा दिलेल्या अधिकाधिक महाराष्ट्रीय उमेदवारांनी, आयआयटीमधील एमबीए प्रवेशासाठी प्रयत्न करायला हवेत.
संस्था आणि अभ्यासक्रम
(१) आयआयटी मंडीच्या स्कूल ऑफ मॅनेजमेंट मार्फत एमबीए इन डाटा सायंस ॲण्ड आर्टिफिशिअल इंटेलिजन्स हा स्पेशलाइज्ड अभ्यासक्रम चालवला जातो.
संपर्क– https://som.iitmandi.ac.in/programs/mba
(२) आयआयटी जोधपूरच्या स्कूल ऑफ मॅनेजमेंट अँड आंत्रप्रिन्युरशिप मार्फत एमबीए आणि एमबीए – टेक्नॉलॉजी हे दोन अभ्यासक्रम चालवले जातात. पहिल्या वर्षी दोन्ही एमबीएचा अभ्यासक्रम एकच असतो. दुसऱ्या वर्षी विद्यार्थी, यापैकी कोणताही एक अभ्यासक्रम निवडू शकतात.
संपर्क- iitj.ac.in/schools
(३) आयआयटी मद्रासच्या डिपार्टमेंट ऑफ मॅनेजमेंट सायंस येथे एमबीए हा अभ्यासक्रम चालवला जातो.
संपर्क-doms.iitm.ac.in
(४) आयआयटी खरगपूरच्या विनोद गुप्ता स्कूल ऑफ मॅनेजमेंट येथे, एमबीए अभ्यासक्रम चालवला जातो.
संपर्क-som.iitkgp.ac.in
(५) आयआयटी गौहाटीच्या स्कूल ऑफ मॅनेजमेंट मार्फत एमबीए हा अभ्यासक्रम चालवला जातो.
संपर्क-iitg.ac/acad/mba
(६) आयआयटी कानपूरच्या इंडस्ट्रिअल ॲण्ड मॅनेजमेंट इंजिनीअरिंग मार्फत एमबीए अभ्यासक्रम चालवला जातो.
संपर्क– https://iitk.ac.in/doms
(७) आयआयटी रुरकीच्या डिपार्टमेंट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज मार्फत एमबीए अभ्यासक्रम चालवला जातो. (या एमबीएला दोन प्रकारे प्रवेश दिला जातो- (१) कॅट परीक्षेत किमान ६० पर्सेंटाइल व मुलाखत/व्यक्तीमत्व चाचणी) आणि (२) विशिष्ट गुणांसह, कोणत्याही आयआयटीमधून अभियांत्रिकी पदवी घेतलेल्या विद्यार्थ्यांची फक्त मुलाखतीव्दारेच निवड केली जाते.
संपर्क-ms.iitr.ac.in
(८) आयआयटी धनबादच्या डिपार्टमेंट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज ॲण्ड आंत्रप्रिन्युरशीप मार्फत एमबीए आणि एमबीए-बिझिनेस ॲनॅलिटिक्स हे अभ्यासक्रम चालवले जातात.
एमबीए- अभ्यासक्रमाला कोणत्याही शाखेतील पदवीधरास प्रवेश मिळू शकतो. एमबीए (बिझिनेस ॲनॅलिटिक्स) -या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी,कोणत्याही शाखेतील बीई/बीटेक पदवीधारक पात्र ठरतात.
संपर्क– https://admissions.iitism.ac.in/mba
(९) आयआयटी मुंबईच्या शैलेश जे मेहता स्कूल ऑफ मॅनेजमेंट स्टडीज मार्फत एमबीए हा अभ्यासक्रम चालवला जातो.यंदापासून एमबीबीए,बीडीएस,बीएएमएस आणि बीएचएमएस हे पदवीधारक सुध्दा या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी अर्ज करु शकतात. (या संस्थेत गेल्या वर्षी प्लेसमेंटसाठी ४८ कंपन्या आल्या. सर्वोच्च वार्षिक पॅकेज ७२ लाख रुपये होते. महिला उमेदवारांचे सरासरी पॅकेज २९ लाख रुपये होते. एकूण सरासरी वार्षिक पॅकेज २८ लाख रुपये होते. ४७ टक्के विद्यार्थ्यांना प्री प्लेसमेंट ऑफर मिळाल्या. या विद्यार्थ्यांना सरासरी वार्षिक पॅकेज हे २९ लाख रुपयांचे होते.)
अर्हता -कोणत्याही विद्याशाखेतील पदवीधारक
संपर्क- som.iitb.ac.in
(१०) आयआयटी दिल्लीच्या डिपार्टमेंट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज मार्फत एमबीए आणि एमबीए- टेलिकम्युनिकेशन सिस्टिम्स मॅनेजमेंट हे अभ्यासक्रम चालवले जातात.
संपर्क-dms.iitd.ac.in.
सुरेश वांदिले
०००