शासकीय रुग्णालये, महाविद्यालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे, ग्रामीण रुग्णालये यामध्येही दंतवैद्यकांची गरज भासते. सध्या मुंबई, बेंगळुरु, दिल्ली या महानगरांसोबतच, नागपूर, औरंगाबाद, कानपूर, पुणे या तुलनेने छोट्या शहरांमध्येही कार्पोरेट पध्दतीची रुग्णालये उभी राहत आहेत. अशा रुग्णालयांचा महत्वाचा भाग दंतवैद्यक असतात. काही डॉक्टर्स मिळून परस्परांच्या सहकार्याने एकमेकांच्या क्लिनिकमध्ये मल्टीस्पेशॅलिस्ट सेवा देतात. त्याठिकाणी दंत वैद्यकांची गरज भासते.
दंतवैद्यकाला चांगल्या तंत्रज्ञाची भूमिका बजवावी लागते. त्यामुळे त्याला उत्तम कौशल्य आणि ज्ञानप्राप्ती करावी लागते.
दंत-तंत्रज्ञ
ज्या विद्यार्थ्यांना बीडीएस या अभ्यासक्रमाला प्रवेश मिळू शकत नाही. त्यांनी दंत-तंत्रज्ञ अभ्यासक्राला प्रवेश घ्यायला हवा. दंत-तंत्रज्ञ हे दंतवैद्यकाच्या व्यवसायाला पूर्णत्व देतात. हे अभ्यासक्रम सुध्दा 12वी नंतर करता येतात. पदविका स्तरावरचे हे अभ्यासक्रम दोन ते तीन वर्षांचे असतात. सेंट्रल इन्स्टिट्यूट फॉर डेन्टल टेक्नॉलॉजी या संस्थेच्या मते सध्या देशाला ९५ टक्क्याहून अधिक दंत-तंत्रज्ञांची गरज आहे. दंत – तंत्रज्ञांना विविध आधुनिक यंत्रणा हाताळावी लागते. यामध्ये तो जितके कौशल्य प्राप्त करेल तेव्हढीच त्याची मार्केट व्हॅल्यू वाढेल. दंतवैद्यकासोबत काम करण्याशिवाय दंत-तंत्रज्ञ स्वत:चाही व्यवसाय सुरु करु शकतो. हा स्वंतत्र व्यवसाय त्यास दंतवैद्यकाच्या दोन पावले पुढेही ठेऊ शकतो.
दंत वैद्यकीयचं शिक्षण देणाऱ्या देशातील काही महत्वाच्या शैक्षणिक संस्था- (१) मौलाना आझाद इंस्टिट्यूट ऑफ डेंटल सायंसेस -न्यू दिल्ली, (२) फॅकल्टी ऑफ डेंटल सायंसेस, किंग्ज जॉर्ज मेडिकल युनिव्हर्सिटी -लखनौ, (३) फॅकल्टी ऑफ डेंटल सायंसेस, आयएमएस बीएचयू-वाराणसी, (४) पोस्ट ग्रॅज्युएट इंस्टिट्यूट ऑफ डेंटल सायंसेस -रोहतक, (५) मनिपाल कॉलेज ऑफ डेंटल सायंसेस -मनिपाल, (६) गव्हर्मेंट डेंटल कॉलेज ॲण्ड हॉस्पिटल-मुंबई, (७) नायर हॉस्पिटल डेंटल कॉलेज-मुंबई, (८) डॉ.जिआउद्दीन अहमद डेंटल कॉलेज, अलिगढ मुस्लिम युनिव्हर्सिटी-अलिगढ, (९) गव्हर्मेंट डेंटल कॉलेज ॲण्ड हॉस्पिटल-नागपूर, (१०) गव्हर्मेंट डेंटल कॉलेज ॲण्ड हॉस्पिटल- थिरुवनंतपुरम.
कौशल्य निर्मिती
(१)शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय मुंबई-
(१) डिप्लोमा इन डेंटल हायजेनिस्ट आणि (२) डिप्लोमा इन डेंटल मेकॅनिस्ट. दोन्ही अभ्यासक्रमांचा कालावधी प्रत्येकी दोन वर्षे. या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी १२ वी विज्ञानशाखेतील गुण ग्राह्य धरले जातात. अभ्यासक्रमासाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांची १२ वीमध्ये मिळालेल्या गुणांवर आधारित गुणवत्ता यादी तयार केली जाते. संपर्क संकेतस्थळ -https://gdcmumbai.edu.in
(२) सुमनदीप विद्यापीठ
डिप्लोमा इन डेन्टल मेकॅनिक (के.एम.शाह डेन्टल कॉलेज ॲण्ड हॉस्पिटल,पिपारिया,
पत्ता- सुमनदीप विद्यापीठ, पोस्ट पिपारीया, ता.वाघोडिया, जिल्हा- वडोदरा- 391760, दूरध्वनी-02668-24526२, संकेतस्थळ-www.sumandeepuniversity.co.in,ई-मेल-info@ sumandeepuniversity.co.in
(३) सवीता युनिव्हर्सिटी
१) बी.एस्सी इन डेंटल टेक्नॉलॉजी, अर्हता- १२ वी विज्ञान परीक्षा उत्तीर्ण. कालावधी तीन वर्षे.
२) डिप्लोमा इन डेन्टल टेक्नॉलॉजी, अर्हता- १२ वी विज्ञान परीक्षा उत्तीर्ण.कालावधी दोन वर्षे.
३) डिप्लोमा इन डेन्टल थेरपिस्ट, अर्हता- १२ वी विज्ञान परीक्षा उत्तीर्ण. कालावधी दोन वर्षे.
४) डिप्लोमा इन डेन्टल असिस्टंट, अर्हता- १२ वी विज्ञान परीक्षा उत्तीर्ण. कालावधी एक वर्षं.
पत्ता-सवीथा डेंटल कॉलेज, एन.एच-४८ चेन्नई-600077, दूरध्वनी-८९३९९९४२४८, संकेतस्थळ- www.saveetha.com, ई-मेल- admn@saveetha.com
(४)मनिपाल कॉलेज ऑफ डेंटल सायंस
(१) डिप्लोमा इन डेंटल हायजेनिस्ट, (२) डिप्लोमा इन मेकॅनिस्ट, (३) डिप्लोमा इन डेन्टल ऑपरेटिंग रुम असिस्टंट. तिनही अभ्यासक्रमांचा कालावधी प्रत्येकी कालावधी-दोन वर्षे,अर्हता-१२वी विज्ञान उत्तीर्ण.
संपर्क- https://www.manipal.edu/mcods-manipal/program-list.html
०००
(५)अम्रिता विश्वविद्यापीठम
या संस्थेच्या अम्रिता स्कूल ऑफ डेंटिस्ट्री येथे डिप्लोमा इन डेंटल मेकॅनिक हा अभ्यासक्रम करता येतो. कालावधी दोन वर्षे. अर्हता-१२ वी विज्ञान उत्तीर्ण.संपर्क- https://www.amrita.edu/program/diploma-dental-mechanics/
सुरेश वांदिले