(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

गेल्या महिन्यात जॉईंट एन्ट्रन्स एक्झामिनेशन (जेइइ)- मेन परीक्षेचा निकाल घोषित झाला. जेइइ- मेन परीक्षेच्या गुणांवर आधारित नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ  टेक्नॉलॉजी (एनआयटी), इंडियन इंस्टिट्ट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, (आयआयआयटी), इतर केंद्रिय अभियांत्रिकी/तंत्रज्ञान संस्थेत प्रवेश दिला जातो. त्याच बरोबर जेइइ-मेन गुणांच्या आधारावर भारतीय नौदल आणि भारतीय थल सेनेत, थेट प्रवेशाची सुवर्णसंधी उपलब्ध होते. सैन्यामध्ये उच्चश्रेणीचे करिअर करण्याची महत्वाकांक्षा असणाऱ्या व प्रज्ञावंत, शारीरिकदृष्ट्या सक्षम आणि मानसिकदृष्ट्या कणखर तरुण/तरुणींनी तरुण/तरुणींनी या पर्यायाचा अवश्य विचार करायला हवा.

वेगळे करिअर आणि दर्जेदार जीवनशैली जगण्याची संधी यामुळे मिळू शकते. नागरीसेवांपेक्षा अधिक सुविधा, व्यक्तीमत्व विकासाच्या संधी, निवृत्तीनंतर उत्तम आयुष्य जगण्यासाठी करण्यात येणारे साहाय्य, देशात आणि देशाबाहेरही नियुक्ती, उत्कृष्ट वैद्यकीय सेवा, मुलांच्या शिक्षणासाठी साहाय्य, ही काही या सेवेची वैशिष्ट्ये सांगता येतील.

थलसेना

भारती थलसेनेत, थेट प्रवेशासाठी, १०+२ टेक्निकल एन्ट्री स्किम, ही योजना राबवली जाते. यासाठी केवळ पुरुष उमेदवारच अर्ज करु शकतो.जानेवारी २०२७ मध्ये सुरु होणाऱ्या या अभ्यासक्रमासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. या प्रशिक्षणासाठी ९० उमेदवारांची निवड केली जाईल. या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज करावा लागतो.त्यासाठी www.joinindiaarmy.nic.in या संकेतस्थावरील,ऑनलाइन ॲप्लिकेशन,या बटनला क्लिक करावे लागेल.

या योजनेंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना चार वर्षे कालावधीचे अभियांत्रिकी शिक्षण दिले जाते. हा कालावधी संपल्यावर त्यांना, लेफ्टनंट या पदावर नियुक्ती दिली जाते. ही नियुक्ती अभियांत्रिकी पथक/दल/तुकडी, सिग्नल पथक,मेकॅनिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकी पथक येथे मुख्यत्वे केली जाते.

अर्हता-

(१) जेइइ मेन परीक्षा, (जेइइ मेन परीक्षेतील गुणांचा कटऑफ जुलै २०२६ मध्ये घोषित केला जाईल.), (२) १२  वी विज्ञानशाखेत गणित, रसायनशास्त्र आणि भौतिकशास्त्र या विषयामध्ये सरासरीने ६० टक्के गुण मिळवणारे उमेदवार यासाठी पात्र ठरतात. (३) वयोमर्यादा १ जानेवारी २०२७ रोजी किमान साडेसोळा वर्षे  आणि कमाल साडे एकोणवीस वर्षे.

प्रशिक्षणाचे टप्पे-

(१) फेज वन (टप्पा एक)  एकात्मिक मुलभूत लष्करी प्रशिक्षण आणि अभियांत्रिकी प्रशिक्षण- याचा कालावधी तीन वर्षाचा असून ते कॉलेज ऑफ मिलिटिरी इंजिनीअरिंग पुणे / मिलिटरी कॉलेज ऑफ इलेक्ट्रॉनिक्स ॲण्ड मेकॅनिकल इंजिनीअरिंग सिंकदराबाद/ मिलिटरी कॉलेज ऑफ टेलिकम्युनिकेशन महू येथे दिले जाते.

(२) फेज टू (टप्पा दोन)  एकात्मिक मुलभूत लष्करी प्रशिक्षण आणि अभियांत्रिकी प्रशिक्षण- याचा कालावधी एक वर्षाचा असून ते इंडियन मिलिटरी ॲकॅडेमी,देहरादून येथे दिले जाते.

अभ्यासक्रमाच्या पूर्तेतनंतर विद्यार्थ्यांना जवाहरलाल नेहरु युनिव्हर्सिटीची अभियांत्रिकी पदवी  प्रदान केली जाते. या उमेदवारांना लेफ्टनंट म्हणून नियुक्ती मिळाल्यावर दोन वर्षात कॅप्टन या पदावर पदोन्नती दिली जाते. पुढे टप्प्याटप्प्याने पदोनत्ती होत राहते.

अभ्यासक्रम/प्रशिक्षणाचे तीन वर्षे पूर्ण झाल्यावर दरमहा ५६,१०० रुपये विद्यावेतन दिले जाते. चौथ्या वर्षाचा कालावधी पूर्ण झाल्यावर या उमेदवारांना लेफ्टनंट पदाचे संपूर्ण वेतन, भत्यासह लागू केले जाते.

निवड प्रकिया

या योजनेअंतर्गत निवडीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांची, १२  वीमध्ये गणित, भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्रात मिळालेल्या गुणांवर आधारित गुणवत्ता यादी तयार केली जाते. यासाठी विशिष्ट कटऑफ गुण निर्धारित करण्यात येतात. निवडलेल्या उमेदवारांना सर्व्हिसेस सिलेक्शन (एसएसबी)बोर्डा पुढे मुलाखती/चाळणी परीक्षा द्यावी लागते. ही चाळणी ऑगस्ट ते सप्टेबर २०२६ या काळात होतील. याच्या तारखा जुलै २०२६ मध्ये जाहीर केल्या जातील. ही चाळणी मानसोपचार तज्ज्ञ, समूह चाळणी अधिकारी आणि मुलाखत घेणारे अधिकारी यांच्याव्दारे घेतली जाते.

सुरेश वांदिले