Your Title Goes Here
Your content goes here. Edit or remove this text inline or in the module Content settings. You can also style every aspect of this content in the module Design settings and even apply custom CSS to this text in the module Advanced settings.
Your Title Goes Here
Your content goes here. Edit or remove this text inline or in the module Content settings. You can also style every aspect of this content in the module Design settings and even apply custom CSS to this text in the module Advanced settings.
इंस्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रॉनिक्स ॲण्ड इन्फॉर्मेशन टेक्नलॉजी (एनआयइएलआयटी) या संस्थेच्या छ.संभाजी नगर (औरंगाबाद) कॅम्पसमध्ये अल्पकालावधीचे तंत्रकौशल्य प्रदान करणारे विविध अभ्यासक्रम करता येतात. हे सगळे अभ्यासक्रम रोजगारक्षम आहेत. स्वयंरोजगारासही चालना देणारे आहेत. या अभ्यासक्रमाचा भर प्रात्यक्षिकांवर अधिक असल्याने, संबंधित क्षेत्रात प्रगत ज्ञानाचा प्रत्यक्ष वापर करण्याची सक्षमता प्राप्त होते. याचा फायदा कंपनी, उद्योग व्यवसाय यामध्ये काम करताना होतो. अत्याधुनिक यंत्रसामुग्री आणि उपकरणांनी सुसज्ज अशा प्रयोगशाळेची सुविधा आहे. संस्थेतील अध्यापक उच्चप्रशिक्षित आहेत. ही राष्ट्रीय संस्था असल्याने विद्यार्थ्यांना, ‘नॅशनल नॉलेज नेटवर्क’ व इतर डिजिटल साधंनाचा सुलभतेने लाभ घेता येतो. संस्थेच्या प्रमाणपत्राला सर्वत्र मान्यता आहे.
फ्युचर स्किल
हे अभ्यासक्रम हे प्रामुख्याने उदयोन्मुख तंत्रज्ञानावर आधारित आहेत. उद्योगांच्या सध्याच्या गरजेनुसार (इंडस्ट्री ४.०) डिझाइन केलेले आहेत. संबंधित क्षेत्रातील सध्या कार्यरत असणाऱ्यांना नवीन तंत्रज्ञान शिकून आपली प्रगती साध्य करणे शक्य होऊ शकते.
१) थ्री-डी प्रिंटिंग / ॲडिटीव्ह मॅन्युफॅक्चरिंग – हे तंत्रज्ञान वस्तूंची त्रिमितीय रचना किंवा प्रतिकृती तयार करण्यासाठी वापरले जाते. उत्पादन क्षेत्र, वैद्यकीय क्षेत्र आणि वाहनउद्योगात याचा वापर केला जातो. अर्हता– अभियांत्रिकी पदविका किंवा पदवी (मेकॅनिकल, प्रोडक्शन किंवा इलेक्ट्रॉनिक्स)
२) इंटरनेट ऑफ थिंग्स – विविध उपकरणांना इंटरनेटद्वारे जोडून स्मार्ट यंत्रणा (उदा. स्मार्ट होम, स्मार्ट सिटी) तयार केली जाते. भविष्यात सर्व उपकरणे एकमेकांशी जोडली जाणार असल्याने हे तंत्रकौशल्य प्राप्त केलेल्या उमेदवारांना सुलभतेने रोजगार संधी मिळू शकतात. अर्हता– विज्ञान शाखेतील पदवी, पदविका किंवा अभियांत्रिकी पदवी (कॉम्प्युटर सायंस /इन्फॉर्मेशेन टेक्नॉलॉजी/ इलेक्ट्रॉनिक्स), ३) रोबोटिक प्रोसेस ऑटोमेशन – कारखान्यातील पुन्हापुन्हा करावी लागणारी कामे रोबोटद्वारे स्वयंचलित करणारी यंत्रणा. यामुळे कामाचा वेग आणि अचूकता वाढते. अर्हता– संगणक प्रोग्रॅमिंगची प्राथमिक माहिती असेलेले कोणत्याही शाखेतील पदवीधर , ४) स्मॅक (सोशल-मोबाइल-ॲनॅलिटिक्स-क्लॉउड) टेक्नॉलॉजी – सोशल मीडिया मार्केटिंग, मोबाइल ॲप डेव्हलपमेंट आणि डाटा ॲनॅलिटिक्स यांचा एकत्रित वापर करून व्यवसायाची वृद्धी करणारे तंत्र. अर्हता– पदवी किंवा पदविका (इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी किंवा संबंधित क्षेत्र). ५) बिग डेटा अॅनॅलिटिक्स – प्रचंड मोठ्या प्रमाणात उपलब्ध असलेल्या माहितीचे विश्लेषण करून व्यवसायासाठी उपयुक्त निष्कर्ष काढण्याचे तंत्र. अर्हता– पदवी (बीइ,बीटेक,एमएस्सी,एमसीए) – सांख्यिकी किंवा गणिताची पार्श्वभूमी असल्यास प्राधान्य.
०००
एनएसक्यूएफ अभ्यासक्रम
नॅशनल स्किल्स क्वालिफिकेशन फ्रेमवर्क (एनएसक्यूएफ)(राष्ट्रीय कौशल्य पात्रता आराखडा/ संरचना) नुसार संरचित करण्यात आले आहेत.
१) अँड्रॉइड ॲप्स डेव्हलपर– मोबाइल ॲप्लिकेशन निर्मितीच्या क्षेत्रात करिअर करण्यासाठी हा अभ्यासक्रम उपयुक्त ठरतो. यात अँड्रॉइड स्टुडिओ आणि इतर तंत्राच्या माध्यमातून ॲप्स तयार करण्याचे तंत्र शिकवले जाते. अर्हता– पदवी किंवा अभियांत्रिकी पदविका (कॉम्प्युटर सायंस/ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी) किंवा समकक्ष, २) ॲडिटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग – थ्रीडी प्रिंटिंग– अर्हता– पदविका किंवा पदवी (इंजिनिअरिंग/विज्ञान), ३) आर्डुइनो (Arduino) आधारित एम्बेडेड सिस्टिम डिझाइन – आर्डुइनो बोर्ड चा वापर करून इलेक्ट्रॉनिक सर्किट आणि स्मार्ट उपकरणे (उदा. ऑटोमॅटिक लाईट्स, सेन्सर्स) विकसित करण्याचे कौशल्य शिकवले जाते. (आर्डुइनो –एक प्रकारचे ‘ओपन-सोर्स‘ इलेक्ट्रॉनिक्स प्लॅटफॉर्म. यातील लहान सर्किट बोर्डास संगणकाद्वारे सूचना देऊन विविध उपकरणे किंवा प्रकल्प नियंत्रित करता येतात.) अर्हता– १० वी किंवा १२ वी उत्तीर्ण (इलेक्ट्रॉनिक्सची आवड असल्यास उत्तम), ४) ऑटोमेशन टेक्नॉलॉजी – बेसिक आणि ॲडव्हान्स्ड – उद्योगांमधील यंत्रसामुग्री चालवण्यासाठी उपयोगात आणल्या जाणाऱ्या ‘ऑटोमेशन’ तंत्राला शिकवले जाते. अर्हता- पदविका किंवा पदवी (इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रॉनिक्स/ मेकॅनिकल), ५) सोलर-एलइडी लॅम्प उत्पादन– सौर उर्जेवर चालणाऱ्या दिव्यांची निर्मिती, त्यांची जोडणी करण्याचे प्रशिक्षण यात दिले जाते. अर्हता– ८ वी किंवा १० वी उत्तीर्ण, ६) प्रिंटेड सर्किट बोर्ड (पीसीबी) डिझाइनिंग– कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तूचा मुख्य भाग म्हणजे पीसीबी. या बोर्डाच्या संगणकीय डिझाइनचे प्रशिक्षण यात दिले जाते. अर्हता– १० वी/१२ वी किंवा पदविका (इलेक्ट्रॉनिक्स), ७) सर्टिफिकेट कोर्स इन एम्बेडेड सिस्टिम डिझाइन – मायक्रोकंट्रोलर वापरून उपकरणांची कार्यप्रणाली तयार करण्याचे प्रशिक्षण यात दिले जाते. इलेक्ट्रॉनिक उत्पादन क्षेत्रात हे कौशल्य आवश्यक समजले जाते. अर्हता– बी.ई./बी.टेक (इलेक्ट्रॉनिक्स/ कॉम्प्युटर) किंवा एम.एस्सी. (इलेक्ट्रॉनिक्स), ८) सर्टिफाइड व्हीएलएसआय डिझाइन इंजिनिअर – सेमीकंडक्टर चिप्स डिझाइन करण्याच्या तंत्रज्ञानाला ‘व्हीएलएसआय’ म्हणतात. या क्षेत्रातील तज्ज्ञांना मोठ्या तंत्रज्ञान कंपन्यांमध्ये चांगली मागणी असते. अर्हता– बी.ई./बी.टेक (इलेक्ट्रॉनिक्स/ इन्स्ट्रुमेंटेशन), ९) सर्टिफिकेट कोर्स इन कॅड (कॉम्प्युटर एडेड डिझाइन) युजिंग ऑटोकॅड – अभियांत्रिकी आणि वास्तुकला क्षेत्रातील टू-डी आणि थ्री-डी आराखडे तयार करण्यासाठी, वापरल्या जाणाऱ्या या मूलभूत आणि महत्त्वाच्या सॉफ्टवेअरचे ज्ञान प्रदान केले जाते. अर्हता– १० वी/१२ वी उत्तीर्ण किंवा आयटीआय/ पदविका (मेकॅनिकल/ सिव्हिल),१०) सर्टिफिकेट कोर्स इन वेब डिझाइनिंग – सध्याच्या काळात प्रत्येक व्यवसायाला स्वतःचे संकेतस्थळ हवे असते. हे आकर्षक संकेतस्थळ विकसित करण्याचे कौशल्य यात शिकवले जाते. अर्हता– १० वी/१२ वी उत्तीर्ण आणि संगणकाचे प्राथमिक ज्ञान, ११) सर्टिफाइड कॉम्प्युटर हार्डवेअर मेंटेनन्स– संगणकाचे सुटे भाग जोडणे, खराब झालेले भाग दुरुस्त करणे आणि ऑपरेटिंग प्रणालीची जोडणी (इन्स्टॉल) करणे, याबाबिंचे तांत्रिक शिक्षण यात दिले जाते. यामुळे संगणक दुरुस्ती/देखभालीचा व्यवसाय करता येतो किंवा रोजगारही मिळू शकतो. अर्हता- १० वी उत्तीर्ण, १२) सर्टिफिकेट कोर्स इन नेटवर्किंग आणि सायबर सुरक्षा – कार्यालयातील संगणकांची एकमेकांशी जोडणी आणि त्यातील डाटा सुरक्षितता, याचे ज्ञान प्रदान केले जाते. अर्हता– पदवी किंवा अभियांत्रिकी पदविका (कोणतीही शाखा), १३) सर्टिफिकेट कोर्स इन लिनक्स ॲडमिनिस्ट्रेशन– मोठ्या कंपन्यांचे सर्व्हर्स सुरक्षित ठेवण्यासाठी विंडोज प्रणाली ऐवजी ‘लिनक्स’ ऑपरेटिंग प्रणालीचा वापर केला जातो. यात सर्व्हर व्यवस्थापन आणि सुरक्षेचे ज्ञान दिले जाते. अर्हता: पदवी आणि संगणक नेटवर्किंगची प्राथमिक माहिती.
000
डिप्लोमा इन इलेक्ट्रॉनिक्स प्रॉडक्शन अँड मेंटेनन्स
या अभ्यासक्रमात इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंचे उत्पादन, त्यांचे अभिकल्प (डिझाइन) आणि दुरुस्ती किंवा देखभाल यावर भर दिला जातो. सध्या मोबाइलपासून मोठ्या औद्योगिक यंत्रांपर्यंत सर्वत्र इलेक्ट्रॉनिक्सचा वापर होतो. कारखान्यांमध्ये इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांची मांडणी करणे, ती व्यवस्थित चालू ठेवणे यासाठी तंत्रकुशल मनुष्यबळाची गरज असते. त्यामुळे हा अभ्यासक्रम करणाऱ्या उमेदवारांना सुलभतेने रोजगार संधी मिळू शकते. अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर विद्यार्थी इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे दुरुस्तीचा किंवा उत्पादनाचा व्यवसाय करू शकतात. अभ्यासक्रमाचा कालावधी– तीन वर्षे
अर्हता– विद्यार्थ्यांनी गणित आणि विज्ञान या विषयांसह १० वी परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी.
प्रवेश प्रकिया– या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना महाराष्ट्र शासनाच्या तंत्रशिक्षण संचालनालयामार्फत राबवण्यात येणाऱ्या कॉमन ॲडमिशन प्रोसेस (सामाइक प्रवेश प्रकिया) मध्ये स्वत: सामील व्हावे लागेल. एनआयइएलआयटीचा- डीटीइ कोड (संकेतांक) – २०३१ आहे. (संकेतस्थळ- www.dtemaharashtra.gov.in)
काय शिकाल?
१) इलेक्ट्रॉनिक्स घटक– विविध प्रकारचे सेन्सर्स, ट्रान्झिस्टर आणि आय.सी.( इंटिग्रेटेड सर्किट) यांची ओळख आणि कार्य, २) सर्किट डिझाइन– संगणकाचा वापर करून इलेक्ट्रॉनिक्स सर्किट्स नकाशांची निर्मिती, ३) उत्पादन प्रक्रिया– कारखान्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर इलेक्ट्रॉनिक्स वस्तू तयार करण्याची प्रकिया, ४) दुरुस्ती आणि देखभाल– नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांची तपासणी आणि दुरुस्ती, ५) गुणवत्ता नियंत्रण– तयार झालेली वस्तू मापदंडानुसासार योग्य असल्याची तपासणी.
करिअर संधी
१) इलेक्ट्रॉनिक्स वस्तू बनवणाऱ्या कंपन्यांमध्ये तंत्रज्ञ, २) ग्राहक सेवा केंद्रांमध्ये (सर्व्हिस सेंटर) दुरुस्ती तंत्रज्ञ, ३) थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी पदवीसाठी प्रवेश घेण्याची संधी
संपर्क- नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, औरंगाबाद सी- १, एम.आय.डी.सी. परिसर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ परिसर, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) – ४३१००४, दूरध्वनी- ०२४०-२९८२००१ / २९८२००२, प्रवेश कक्ष – ९४३९३५१७१७ / ८९५६८३७७२१, ई-मेल– aurangabad@nielit.gov.in, संकेतस्थळ- www.nielit.gov.in/aurangabad
सुरेश वांदिले