(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

मार्ग यशाचा ३५ – उद्योगांचे स्मार्ट सल्लागार

वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांसाठी पुढील स्पेशलाईज्ड अभ्यासक्रमांमुळे करिअरच्या वेगवेगळ्या संधी उपलब्ध  होऊ शकतात-

१) सी.ए. (चार्टर्ड अकाउंटंट) हा अभ्यासक्रम केल्यावर लेखापरीक्षण, ऑडिट आणि कर सल्लागार म्हणून करिअर संधी मिळते. भारतीय सनदी लेखाकार संस्था (इंस्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटटन्ट्स ऑफ इंडिया आयसीएआय) ने आपल्या शिक्षण आणि प्रशिक्षण प्रणालीमध्ये  काही बदल केले आहेत. २०२६ मधील प्रमुख बदल- ) पूर्वी सीएच्या परीक्षा वर्षातून दोनदा (मे आणि नोव्हेंबर) व्हायच्या. आता सीए फाउंडेशन आणि सीए इंटरमीडिएट या परीक्षा वर्षातून तीन वेळा (जानेवारी, मे आणि सप्टेंबर) घेतल्या जाणार आहेत. मात्र, सीए फायनल परीक्षा वर्षातून दोनदाच (मे आणि नोव्हेंबर) घेतली जाईल. ) पूर्वी असलेली ३ वर्षांची आर्टिकलशिप (प्रात्यक्षिक प्रशिक्षण) आता २ वर्षांची करण्यात आली आहे. यामुळे विद्यार्थी लवकर सीए पदवी मिळवू शकतो.

सीए प्रवेश मार्ग

) फाउंडेशन अभ्यासक्रम – १० वी उत्तीर्ण झाल्यानंतर ‘बोर्ड ऑफ स्टडीज’  कडे नोंदणी करा, २) इयत्ता १२ वीची परीक्षा दिल्यानंतर फाउंडेशन परीक्षा देता येते. ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर इंटरमीजिएट अभ्यासक्रमासाठी नोंदणी करा.

 ) थेट प्रवेश वाणिज्य शाखेतील पदवीधर/पदव्युत्तर (किमान ५५ टक्के गुण) किंवा इतर शाखांतील पदवीधर (किमान ६० टक्के गुण) थेट इंटरमीजिएट अभ्यासक्रमाला  प्रवेश घेऊ शकतात. इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया किंवा इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाउंटंट्स ऑफ इंडिया च्या इंटरमीजिएट परीक्षा उत्तीर्ण केलेले विद्यार्थी थेट प्रवेशासाठी पात्र ठरतात.

सीए होण्याचा प्रवास (फाउंडेशन मार्ग)

 १) फाउंडेशन परीक्षा उत्तीर्ण, २) इंटरमीजिएट अभ्यासक्रमाची नोंदणी  व ८ महिने अभ्यास, ३) इंटरमीजिएटच्या दोन्ही गटातील (ग्रुप) परीक्षा उत्तीर्ण, ४)  प्रात्यक्षिकांचे प्रशिक्षण सुरू करण्यापूर्वी ‘इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आणि सॉफ्ट स्किल्सचे प्रशिक्षण, ५) दोन वर्षांचे प्रॅक्टिकल ट्रेनिंग (आर्टिकलशीप), ६)  चार ‘सेल्फ-पेस्ड ऑनलाइन मॉड्यूल्स’ पूर्ण करून त्यांची परीक्षा उत्तीर्ण, ७) अंतिम (फायनल) परीक्षेपूर्वी प्रगत इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आणि सॉफ्ट स्किल्स प्रशिक्षण पूर्ण, ८)  फायनलच्या दोन्ही गटातील परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर आयसीएआयचे सदस्य  

 कौशल्य चाचणीप्रत्येक स्तरावर विद्यार्थ्यांच्या वेगवेगळ्या कौशल्यांची चाचणी घेतली जाते- १) फाउंडेशन विषयाचे आकलन आणि त्याचे उपयोजन, २) इंटरमीजिएट आकलनासोबतच विश्लेषणात्मक कौशल्यांवर भर,    ३) फायनल उच्चस्तरावरील विश्लेषण आणि मूल्यमापन करण्याची क्षमता

विद्यार्थ्यांसाठी सुविधा १) डिजिटल लर्निंग हब येथे विद्यार्थ्यांना ई-बुक्स, व्हिडिओ लेक्चर्स आणि ऑनलाइन सराव चाचण्यांची सुविधा मिळते. २) प्लेसमेंट सेवा नवीन उत्तीर्ण झालेल्या सीएंना मोठ्या कंपन्यांमध्ये नोकरी मिळवून देण्यासाठी कॅम्पस प्लेसमेंटचे आयोजन केले जाते. सरासरी पॅकेज १२ लाखांच्या वर असून सर्वोच्च पॅकेज ४१ लाखांपर्यंत (परदेशी पोस्टिंगसाठी) विद्यार्थ्यांना मिळाले आहे.

संपर्क- (१) आयसीएआय भवन, प्लॉट क्र. सी-४६, ‘जी’ ब्लॉक, बीकेसी, वांद्रे (पूर्व), मुंबई – ४०००५१. फोन- ०२२-३३६७१४००, संकेतस्थळ: https://www.icai.org, ईमेल: wirc@icai.in

२) कंपनी सेक्रेटरी

          कंपनीचा अंतर्गत कायदेशीर तज्ज्ञ आणि अनुपालन अधिकारी (कॅम्प्लॉयन्स)  म्हणून कंपनी सेक्रेटरीला कार्य करावे लागते. तो कॉर्पोरेट कायदे, सिक्युरिटीज कायदे आणि भांडवली बाजार यातील तज्ज्ञ असतो. कंपनीच्या संचालक मंडळाला सुशासनासाठी  सल्ला देतो. कंपनीसाठी असणारे सर्व शासकीय व कायदेशीर नियम पाळले जात असल्याची खात्री करतो. कॉर्पोरेट नियोजक आणि धोरणात्मक व्यवस्थापक  म्हणून भूमिका बजावतो.

सीएसचे कार्यक्षेत्र

) कंपनीचे कामकाज पारदर्शक पद्धतीने चालवणे, सचिवालीय लेखापरीक्षण आणि विविध प्रमाणपत्रे देणे, ) विविध कॉर्पोरेट कायद्यांबाबत सल्ला आणि लवाद  किंवा समेट घडवण्याचे कार्य, ) शेअर बाजारात नोंदणी आणि सिक्युरिटीजचे व्यवस्थापन (पैसे सुरक्षित राखून त्यावर जास्तीत जास्त नफा मिळवण्यासाठी शेअर्स आणि बाँड्सचे नियोजन), ४) कंपन्यांचे विलीनीकरण आणि ताबाप्रक्रियेवर देखरेख, ५) करविषयक सेवा आणि आंतरराष्ट्रीय व्यापारातील मार्गदर्शन, ) धोरणात्मक व्यवस्थापन, जनसंपर्क, मानवी संसाधन आणि माहिती तंत्रज्ञान  क्षेत्रातही ‘सीएस’ योगदान द्यावे लागते.

करिअर संधी

कंपनी कायद्याच्या कलम २०३ नुसार, सीएसला की मॅनेजरियल पर्सोनेल म्हणून दर्जा देण्यात आला आहे. प्रत्येक सूचीबद्ध (लिस्टेड) कंपनी आणि १० कोटी किंवा त्याहून अधिक शेअर कॅपिटल असलेल्या सार्वजनिक कंपन्यांमध्ये पूर्णवेळ सीएसची नियुक्ती अनिवार्य आहे. ज्या खाजगी कंपन्यांचे (पेड-अप- कंपनीच्या तिजोरित असलेला प्रत्यक्ष पैसा) शेअर कॅपिटल ५ कोटींहून अधिक आहे, तिथे पूर्णवेळ सीएस असणे गरजेचे आहे. मोठ्या कंपन्यांना त्यांचा ऑडिट रिपोर्ट तयार करून देणे, परदेशी सहयोग (फॉरेन कोलॅबोरशन), संयुक्त उपक्रम, प्रकल्प नियोजन  आणि गुंतवणूकदार संबंध यांमध्ये ते सल्लागार म्हणून काम करू शकतात.

अभ्यासक्रमाची वैशिष्ट्ये:

१२ वी उत्तीर्ण किंवा पदवीधर विद्यार्थी कधीही प्रवेश घेऊ शकतात. हा अतिशय किफायतशीर असा अभ्यासक्रम आहे. अधिकार, प्रतिष्ठा आणि उच्च व्यवस्थापनापर्यंत थेट पोहचण्याची संधी मिळते. हा मुलींसाठी उत्कृष्ट करिअर पर्याय ठरु शकतो. लंडनस्थित इंस्टिट्यूट ऑफ चार्टर्ड सेक्रेटरीज ॲण्ड ॲडिमिनिस्ट्रेटर (आयसीएसए) संस्थेसोबत असलेल्या सामंजस्य करारामुळे परदेशातही संधी उपलब्ध आहेत.

सीएस  होण्याचे टप्पे

) १२ वी नंतर फाउंडेशन अभ्यासक्रम ८ महिने कालावधी, त्यानंतर  एक्झिक्युटिव्ह अभ्यासक्रम, त्यानंतर प्रोफेशनल अभ्यासक्रम, ) पदवी नंतर विद्यार्थी थेट एक्झिक्युटिव्ह अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ शकतात. (ललित कला पदवीधर वगळून). त्यानंतर प्रोफेशनल अभ्यासक्रम पूर्ण करावा लागतो.

प्रवेशाची नोंदणी वर्षभर सुरू असते. परीक्षा वर्षातून दोनदा (जून आणि डिसेंबर) घेतली जाते.

सीएसईईटी

या अभ्‍यासक्रमाच्या प्रवेशासाठी, सीएसईईटी (कंपनी सेक्रेटरी एक्झिक्युटिव्ह एन्ट्रन्स टेस्ट)  द्यावी लागते. () ही परीक्षा  १२ वी उत्तीर्ण (किंवा १२ वीची परीक्षा दिलेले) विद्यार्थी देऊ शअकतात. ललित कला सोडून इतर कोणत्याही शाखेचे विद्यार्थी पात्र ठरतात. (ब)  पदवी पूर्ण केलेले विद्यार्थी ‘ सीएसईईटी  ही परीक्षा देऊन एक्झिक्युटिव्ह स्तरावर प्रवेश घेऊ शकतात. पदवीला किमान गुणांची अट नाही. () थेट प्रवेश  सीए (फायनल) किंवा सीएमए (फायनल) उत्तीर्ण उमेदवारांना थेट प्रवेश मिळू शकतो.

संस्था आयसीएसआय भवन, १३, १३-ए, ३ रा मजला, जॉली मेकर चेंबर्स नं. २, नरिमन पॉइंट, मुंबई – ४०००२१, संकेतस्थळ- www.icsi.edu, दूरध्वनी- ०२२-६१३०७९०० / ६१३०७९०१, ईमेल: wiro@icsi.edu

३) सीएमए (कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटंट) हा अभ्यासक्रम प्रामुख्याने कोणत्याही उद्योगाचा उत्पादन खर्च, बजेटिंग आणि संसाधनांचे कार्यक्षम व्यवस्थापन यावर लक्ष केंद्रित करतो.

अर्हता १) फाउंडेशन अभ्यासक्रम १० वी उत्तीर्ण झाल्यानंतर नोंदणी करता येते, परंतु परीक्षा १२ वी उत्तीर्ण झाल्यानंतरच देता येते. (कोणत्याही शाखेचा विद्यार्थी – कला, वाणिज्य, विज्ञान), २) इंटरमीजिएट अभ्यासक्रम पदवीधर उत्तीर्ण किंवा फाउंडेशन अभ्यासक्रम उत्तीर्ण (ललित कला पदवीधर वगळून) विद्यार्थी थेट प्रवेश घेऊ शकतात.

प्रवेश प्रक्रियासीएमएमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाउंटंट्स ऑफ इंडियाडे नोंदणी करावी लागते. यात तीन टप्पे असतात- टप्पा एक- फाउंडेशन, टप्पा दोन इंटरमीजिएट, टप्पा तीन फायनल. आणि प्रॅक्टिकल ट्रेनिंग. वर्षभरात जून आणि डिसेंबर अशा दोन वेळा या परीक्षा घेतल्या जातात. प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने www.icmai.in या संकेतस्थळावर पूर्ण करता येते.

करिअर संधी औद्योगिक क्षेत्रात, विशेषतः मॅन्युफॅक्चरिंग, फार्मास्युटिकल आणि पब्लिक सेक्टर कंपन्यांमध्ये  उत्पादन खर्च नियंत्रित करण्यासाठी सीएमए व्यावसायिकांना मोठी मागणी असते.

संस्था इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाउंटंट्स ऑफ इंडिया, रोहित चेंबर, ४ था मजला, जन्मभूमी मार्ग, फोर्ट, मुंबई – ४००००१.संपर्क: ०२२-२२०४३४०६ / २२०४३४१६

४) सीएफए (चार्टर्ड फायनांशिअल ॲनॅलिस्ट)-  हा अभ्यासक्रम प्रामुख्याने पोर्टफोलिओ मॅनेजमेंट, इन्व्हेस्टमेंट ॲनॅलिसिस आणि कॉर्पोरेट फायनान्सवर आधारित आहे. जागतिक स्तरावर वित्तीय क्षेत्रात काम करू इच्छिणाऱ्यांसाठी हा उत्तम पर्याय समजला जातो. करिअर संधी पोर्टफोलिओ मॅनेजर, गुंतवणूक सल्लागार, शेअर बाजार विश्लेषक, जोखीम व्यवस्थापक, खाजगी इक्विटी विश्लेषक

संपर्क- www.cfainstitute.org