(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

मार्ग यशाचा ४५-पॅकेजिंग ते पेट्रोकेमिकल्स…

पॅकेजिंग उद्योग हा भारताच्या अर्थव्यवस्थेतील पाचवे सर्वात मोठे क्षेत्र. ई-कॉमर्स, अन्न प्रक्रिया आणि औषध निर्मिती क्षेत्रांतील वाढीमुळे पॅकेजिंग उद्योगाला मोठी चालना मिळाल्याने भारतीय पॅकेजिंग बाजारपेठ दरवर्षी साधारणपणे १२ टक्के ते १५ टक्के दराने वाढताना दिसते. यामध्ये प्लॅस्टिक पॅकेजिंगचा वाटा सर्वाधिक असला तरी, आता कागद आणि पर्यावरणपूरक पॅकेजिंगकडे कल वाढलेला आहे.

पॅकेजिंग क्षेत्राशी निगडित विविध अभ्यासक्रम, भारत सरकारच्या वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयांतर्गत कार्यरत भारतीय पॅकेजिंग संस्था (इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पॅकेजिंग) या संस्थेने सुरु केले आहेत. या संस्थेला स्वायत्तता प्रदान करण्यात आली आहे. या संस्थेला ‘ इंस्टिट्यूट ऑफ नॅशनल इम्पॉर्टन्सचा दर्जा प्रस्तावित आहे. पुढील काळात आयआयटीच्या धर्तीवर  संस्थेला विकसित केले जाणार आहे.

अभ्यासक्रम

दिल्ली केंद्र – १) बॅचलर ऑफ सायन्स इन पॅकेजिंग टेक्नॉलॉजी हा अभ्यासक्रम गुरु गोबिंद सिं इंद्रप्रस्थ युनिव्हर्सिटीशी संलग्न आहे, कालावधी४ वर्षे, अर्हता१२ वी उत्तीर्ण (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित/ जीवशास्त्र/ कृषी विज्ञान/ व्होकेशनल सायन्स आणि इंग्रजी).

प्रवेशासाठी सीयूइटी-यूजी (कॉमन युनिव्हर्सिटी एन्ट्रन्स टेस्ट- अंडर ग्रॅज्युएट), जेइइ-मेन, नीट (नॅशनल इलिजिबिलिटी कम एन्ट्रन्स टेस्ट) या परीक्षेतील गुण ग्राह्य धरले जातात.

काय शिकाल?

१) पॅकेजिंग साहित्याचे गुणधर्म (कागद, बोर्ड, प्लॅस्टिक, काच, धातू),२) ग्रॅफिक्स डिझाइन आणि पॅकेजिंग संरचना (स्ट्रक्चरल डिझाइन), ) पॅकेजिंग मशिनरी आणि ऑटोमेशन, ४) क्वालिटी कंट्रोल आणि टेस्टिंग (चाचणी),) लॉजिस्टिक्स आणि सप्लाय चेन मॅनेजमेंट.

२) बॅचलर ऑफ सायन्स (पॅकेजिंग टेक्नॉलॉजी) – थेट प्रवेश (लॅटेरल एन्ट्री)या अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या वर्षाला थेट प्रवेश दिला जातो, अर्हताभौतिकशास्त्र/ रसायनशास्त्र/ गणित/ मायक्रोबायोलॉजी किंवा बायो-केमिस्ट्री या विषयातील किमान ५० टक्के गुणांसह पदवी किंवा प्रिंटिंग टेक्नॉलॉजी/ केमिकल इंजिनिअरिंग/ मेकॅनिकल इंजिनिअरिंग/ फूड टेक्नॉलॉजी/ डेअरी टेक्नॉलॉजी/ फार्मसी/ मायक्रोबायोलॉजी/ ॲग्रीकल्चर/ पेपर टेक्नॉलॉजी/ सिरॅमिक टेक्नॉलॉजी/ बायोटेक्नॉलॉजी यामध्ये किमान ५० टक्के गुणांसह पदविका (डिप्लोमा).

३) बॅचलर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज (पॅकेजिंग बिझिनेस), कालावधी४ वर्षे, अर्हताकोणत्याही शाखेतील १२ वी परीक्षेत एकूण किमान ५० टक्के गुण. १२ वीमध्ये इंग्रजीचा अभ्यास केलेला असावा.

प्रवेशासाठी सीयूइटी-यूजी किंवा गुरु गोबिंद सिं युनिव्हर्सिटीमार्फत घेण्यात येणाऱ्या सीइटीचे गुण ग्राह्य धरले जातात.

४) मास्टर ऑफ सायन्स इन पॅकेजिंग टेक्नॉलॉजी, अर्हताबी.एस्सी. (भौतिकशास्त्र/ रसायनशास्त्र/ गणित/ मायक्रोबायोलॉजी किंवा बायोकेमिस्ट्री हे मुख्य विषय असावेत किंवा कृषी/ अन्न विज्ञान/ पॉलिमर सायन्स किंवा इंजिनिअरिंग/ टेक्नॉलॉजी पदवी) मान्यताप्राप्त विद्यापीठातून किमान द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण.

प्रवेशासाठी संस्थेची प्रवेश परीक्षा, ‘आयआयपी-सीइटी’ द्यावी लागते. गे (ग्रॅज्युएट ॲप्टिट्यूड टेस्ट इन इंजिनीअरिंग), युजीसी-नेट (युनिव्हर्सिटी ग्रँट्स कमिशन – नॅशनल एलिजिबिलिटी टेस्ट) आणि सीएसआयआर-नेट (काउन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च – नॅशनल एलिजिबिलिटी टेस्ट) या परीक्षेत उत्तम गुण असणाऱ्या उमेदवारांना विशेष प्राधान्य दिले जाते.

काय शिकाल?) शाश्वत पॅकेजिंग – पर्यावरणपूरक आणि पुनर्वापर करण्यायोग्य साहित्याचा शोध, २) स्मार्ट आणि ॲक्टिव्ह पॅकेजिंग – अन्नपदार्थाचे आयुष्य वाढवण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान, ३) प्रगत प्रयोगशाळा कार्य साहित्याची मजबूती, टिकाऊपणा आणि सुरक्षितता तपासण्यासाठी चाचण्या. दुसऱ्या वर्षात विद्यार्थ्यांना एखाद्या विशिष्ट विषयावर सखोल संशोधन प्रकल्प पूर्ण करावा लागतो.

इतर केंद्रांवरील अभ्यासक्रम

) मास्टर ऑफ सायन्स इन पॅकेजिंग टेक्नॉलॉजी (हैदराबाद) हा अभ्यासक्रम जवाहरलाल नेहरू टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीशी संलग्नित आहे. कालावधी २ वर्षे. अर्हता- अभियांत्रिकी पदवी किंवा ४ वर्षांची विज्ञान पदवी.

) पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन पॅकेजिंगहा अभ्यासक्रम मुंबई, कोलकाता आणि अहमदाबाद या केंद्रांवर करता येतो. कालावधी २ वर्षे. अर्हता- इंजिनिअरिंग/ टेक्नॉलॉजी मधील पदवी किंवा भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित मुख्य विषय असलेली विज्ञान पदवी. या विद्यार्थ्यांना शेवटच्या सत्रात ३ महिन्यांची औद्योगिक इंटर्नशिप करावी लागते.

) सर्टिफाईड पॅकेजिंग इंजिनीअर कोर्सहा अभ्यासक्रम चेन्नई केंद्रामार्फत ऑनलाइन पद्धतीने चालवला जातो. कालावधी १ वर्षं. अर्हता- मान्यताप्राप्त विद्यापीठातील अभियांत्रिकी पदवी.

) डिप्लोमा इन पॅकेजिंग टेक्नॉलॉजी हा अभ्यासक्रम लखनौ केंद्रावर करता येतो. कालावधी ३ वर्षे. अर्हता- १० वी उत्तीर्ण (विज्ञान आणि गणित).

) डिप्लोमा इन पॅकेजिंग हा अभ्यासक्रम पत्रव्यवहाराद्वारे करता येतो. कालावधी १८ महिने. एशियन पॅकेजिंग फेडरेशनद्वारे या अभ्यासक्रमाला मान्यता देण्यात आली आहे.

करिअर संधीविद्यार्थ्यांना नेस्ले, मदर डेअरी, पिडिलाईट, ब्रिटानिया, कोका-कोला, गोदरेज, रेकिट बेनकिसर, आयटीसी लिमिटेड, युफ्लेक्स, पी अँड जी, हिंदुस्थान युनिलिव्हर लिमिटेड, मॅरिको, विप्रो, हिमालय, डाबर अशा अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये प्लेसमेंट मिळते. या कंपन्यांमध्ये पॅकेजिंग डेव्हलपमेंट मॅनेजर, डिझाइन इंजिनीअर, क्वालिटी श्युरन्स ऑफिसर यांसारखी पदे उपलब्ध होतात. भारताशिवाय जर्मनी, अमेरिका आणि आखाती देशांतील एफएमसीजी (फास्ट मुव्हिंग कंझ्युमर गुड्स) क्षेत्रातही मोठी मागणी आहे.

संस्थेकडे अत्याधुनिक ‘पॅकेजिंग टेस्टिंगप्रयोगशाळा आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभव मिळतो. विद्यार्थ्यांना नामांकित कंपन्यांमध्ये औद्योगिक प्रशिक्षण आणि इंटर्नशिपची सुविधा उपलब्ध करून दिली जाते. प्रवेश प्रक्रिया दरवर्षी मे ते जून दरम्यान सुरू होते.

संपर्क(१) ई-२, रोड नंबर ८, एम.आय.डी.सी. एरिया, अंधेरी (पूर्व), मुंबई – ४०००९३, ईमेल– iip@iip-in.com. फोन ०२२-२८२१९३३३, २८२१९७१४, २८२१९४६९, (२) प्लॉट नंबर २१, फंक्शनल इंडस्ट्रिल इस्टेट, पटपरगंज, दिल्ली – ११००९२. ईमेल: iipdelhi@iip-in.com. फोन: ७४१६५६४१२९, ९२६६१६२४२८, संकेतस्थळ: www.iip-in.com

०००

प्लॅस्टिक उद्योगाचे तंत्रज्ञ

प्लॅस्टिक, पॉलिमर आणि पेट्रोकेमिकल्स या क्षेत्रासाठी आवश्यक तंत्रकुशल मनुष्यबळाची गरज पुरवण्यासाठी विविध प्रकारचे अभ्यासक्रम सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ पेट्रोकेमिकल्स इंजिनीअरिंग अँड टेक्नॉलॉजी(सिपेट)  या संस्थेने सुरु केले आहेत. ही संस्था केंद्र सरकारच्या रसायन आणि पेट्रोकेमिकल मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत आहे. प्लॅस्टिक प्रकिया, परीक्षण  (टेस्टिंग) आणि डिझायनिंगसाठी लागणारी अत्याधुनिक यंत्रसामग्री या संस्थेच्या कॅम्पसमध्ये उपलब्ध आहे. या संस्थेला संशोधनासाठी केंद्र सरकारकडून मोठा निधी उपलब्ध होतो.

अभ्यासक्रम

१) डिप्लोमा इन प्लॅस्टिक मोल्ड टेक्नॉलॉजी, २) डिप्लोमा इन प्लॅस्टिक टेक्नॉलॉजी (कालावधी- तीन वर्षे, अर्हता-१०वी), ३) पोस्ट डिप्लोमा इन प्लॅस्टिक मोल्ड डिझाइन वुइथ कॉम्प्युटर एडेड डिझाइन /कॉम्प्युटर एडेड मॅन्युफॅक्च्युरिंग (कालावधी- दीड वर्षे, अर्हता- ३ वर्षे कालावधीची संबधित विषयातील पदविका), ४) पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन प्लॅस्टिक प्रोसेसिंग ॲण्ड टेस्टिंग (कालावधी- दोन वर्षे, अर्हता- विज्ञान विषयातील पदवी)

या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी संस्थेची ‘सीआयपीइटी- जेइइ’ ही परीक्षा द्यावी लागते.

पदवी अभ्यासक्रम

बी.ई. / बी.टेक. (प्लॅस्टिक्स इंजिनिअरिंग / टेक्नॉलॉजी)– कालावधी- ४ वर्षे. प्लॅस्टिक आणि त्याच्याशी संबंधित उद्योगांमधील नवीन बदल लक्षात घेऊन या अभ्यासक्रमाची रचना करण्यात आली आहे. या अभ्यासक्रमात प्लॅस्टिक आणि संबंधित उत्पादनांचे प्रोसेसिंग (प्रक्रिया), डिझायनिंग (रचना), विकास आणि निर्मिती (मॅन्युफॅक्चरिंग) या बाबी शिकवल्या जातात. अर्हता- १२ वी (गणित, भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र)

संलग्न विद्यापीठे

विद्यार्थी ज्या शहरातील ‘सिपेट केंद्रामध्ये प्रवेश घेतात, त्यानुसार पुढील संलग्न विद्यापीठांची पदवी मिळते-१)अहमदाबाद (गुजरात टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी, अहमदाबाद (www.gtu.ac.in),२) भुवनेश्वर (बिजू पटनायक युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजी, रुरकेला (www.bput.ac.in),३) चेन्नई (अण्णा युनिव्हर्सिटी, चेन्नई (www.annauniv.edu), ४) लखनौ (डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम टेक्निकल युनिव्हर्सिटी, लखनऊ (https://aktu.ac.in), ५) रायपूर (छत्तीसगड स्वामी विवेकानंद टेक्निकल युनिव्हर्सिटी, भिलाई (http://csvtu.ac.in/ew), ६) जयपूर (राजस्थान टेक्निकल युनिव्हर्सिटी, कोटा, राजस्थान (https://www.rtu.ac.in),७) मुरथल (दीनबंधू छोटू राम युनिव्हर्सिटी ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी, मुरथल (http://www.dcrustm.ac.in)

करिअर संधी

या संस्थेने देशातील सर्व मोठ्या पेट्रोकेमिकल, ऑटोमोबाइल आणि पॅकेजिंग कंपन्यांसोबत सामंजस्य करार केले आहेत. यामुळे विद्यार्थ्यांना थेट कारखान्यांमध्ये इंटर्नशिप आणि व्यावसाययिक प्रशिक्षण मिळते. नामांकित कंपन्यांमध्ये रोजगाराच्या संधी सहज उपलब्ध होतात.

संपर्क- सीआयपीइटी हेड ऑफिस, चेन्नई- ६०००३२, दूरध्वनी- ०४४-२२२५४५१४, संकेतस्थळ- www.cipet.gov.in

०००