(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

गॉसिपिंग छे पॉझिटिव्ह थिकिंग !
   हे बघा,हे बघा,बायको पेपरकडे बोट दाखवत जोरात  ओरडली.
   मी दचकलो.
   पेपर मध्ये दचकण्यासारख्या (महागाई,भ्रष्टाचार,प्रदुषण,डेंग्यू,) आणि त्या वाचून वाचून गचकण्याची क्षमता ठेवणाऱ्या बातम्या येत असल्या तरी त्यामुळे पेपर वाचण्याची दुर्बुध्दी ज्या क्षणापासून झाली तेव्हापासून मी कधीच दचकलो नाही.कारण, त्यात काय मोठसं,हे तर चालयचच,तसं झालं नाही तर जगच बदं पडायचं असं माझ्या मनाला वाटत आलाय.
   पण बायकोच्या ओरडण्याला अजुनही मन तसं मानत नाही.त्यामुळे ती ओरडली की दचकायला होतं.तिच कुंकू आडव येत असल्यानं गचकण्याची स्टेज अद्यापतरी आलेली नाहीय..असो,आज तिच्या ओरडण्यानं मी दचकलो. मी लगबगिने तिच्याकडे जात म्हणालो,
   काय झालं गं.
   हे बघा,हे बघा..ती पेपरमधील बातमीकडे बोट दाखवित म्हणाली.
   बघा.बघा..तुम्ही आम्हा बायकांच्या नावे खडे फोडत असता ना,आता हे बघा..
   अगं पण,काय बघा..
   अहो,हे संशोधन बघापरदेशात झालेलं..
   नवऱ्यावर संशय घेणे हा त्यांचा जन्मसिध्द अधिकार असल्याचं तर हे संशोधन नाही ना..
   हे बघा हे बघा..आमच्या ज्या गोष्टीबद्यल तुम्ही नाक मुरडत असता.ज्याला तुम्ही टाइमपास म्हणता,त्याची व्हॅल्यू किती आहे ते बघा..
   अगं नेमकं काय बघा..ते तू सांगत नाहीसच ना..
   अहो, डच देशातल्या थोर शास्त्रज्ञांनी हे संशोधन करुन आमच्यावर फार उपकार केलेत हो.
   पण,कसलं संशोधन माझे आई.
   अहो ,तुम्ही पुरुष मंडळी आमच्या बायकांच्या गॉसिपवर  नाव बोटं ठेवता ना.त्याला तुम्ही कुचाळक्या करणं असं म्हणता ना.त्याला तुम्ही टाइम पास असं म्हणता ना..
   ते खोटं निघालं की काय,धन्य आहे त्या शास्त्रज्ञांची .जगात अनंत विषय पडले असताना,लिबियाची अर्थव्यवस्था बुडित निघाली असताना,रब्बानी मॅडम प्रेमात बुडालेल्या असताना,बिग बॉस सिझन 6 सुरु झालं असताना,त्यांना या अशा विषयावर संशोधन करुन आपला अमूल्य वेळ दवडवावा वाटला याचा अर्थ डच संशोधकांना आता काहीच काम उरलेलं दिसत नाही.. यावर गंभिर विचार करावा लागेल.
   अहो महाशय,तुम्ही गंभिर विचार करणार म्हणजे काय करणार?डच राष्ट्रपतींना सांगणार की युनोच्या महासचिवांना कळवणार? तुम्हाला तुमच्या वार्डातला नगरसेवक ओळखत नाही.बाजूला असलेला किराण दुकानदार ओळखत नाही.तर डच राष्ट्रपती कुठून आले ओळखायला.युनोच्या महासचिवांचा तर प्रश्नच येत नाही.बायको खवचटपणे म्हणाली.
   तिचं म्हणणं खरचं होतं म्हणा.त्यामुळे तिचा खवचटपणा माझ्या नाकर्तेपणावर कथ्थक  करण्याआधी मीचशरणागती पत्करली.तिच्या हातातला पेपर घेतला. डच शास्त्रज्ञांच्या संशोधनाची बातमी मनोभावे वाचून काढली.बातमी वाचताच मी सुध्दा बायको इतकाच मोहरुन गेलो आणि जोराने ओरडलो बघा बघा ..
   000
   अहो,तुम्ही कशाला म्हणता बघा.बघा . मी म्हणाले त्याची खात्री पटली ना.   बायको दचकता माझ्यावर खेकसली.
पटणारच..कारण आता आम्ही सुध्दा या संशोधनाचा आधार घेऊ ..
   तो कसा..
   गॉसिप म्हणजे प्रॉडक्टिव्हीटी वाढवणारं,पॉझिटिव्ह थिकिंग असतं असं हे संशोधन सांगत ..
   तेच मी म्हणत हो बघा..बायका दुपारी घरी केवळ गॉसिपिंग करतात असं तुम्हा पुरुषमंडळींना जे वाटतं नि त्यावरुन उठता बसता तुम्ही नाव बोट ठेवता.ते किती चुकिचं असल्याचं लक्षात आलय ना तुमचं.गॉसिपिंग मुळे पॉझिटिव्ह तरंग इकडून तिकडे जातात.महिलांचा भगिनीभाव वाढतो.परस्परातील नातेबंध दृढ होतात.एकमेकांची मनं मोकळी होतात.त्यात पारदर्शकता येतं.मनातलं जळमट निघून जातात.वन्स ऍ़पान टाइम,गंगा नदी शुध्द आणि स्वच्छ होती,तेव्हा सारखं शुध्दत्व आणि स्वच्छत्व भगिनींच्या मनाला येतंहे सर्व घडतं,त्यामुळे प्रॉडक्टव्हिटी वाढते..म्हणजेच कार्यक्षमता वाढते..बायका घरी इतकं मरमर काम कां करु शकतात,हे आता तरी लक्षात येतय ना तुमच्या..
   आलच की माझ्या लक्षात .. गॉसिपिंग करण्यासाठी दोन तासांचा अधिकृत वेळच दिला जावा अशी मागणी करण्याचं पत्रक कर्मचारी संघटनेच्या मार्फत काढायचं ठरवलय,मी आत्ताच.. आमची कार्यक्षमता वाढायला हवी आहे ना..मग ऑफिशिएली गॉसिपिंगची परवानगी हवीच ,कसं
   अगदी बरोबर,तुम्हाला जमलं नाही तर मला सांगा..महिला मंडळांचं निवदेन काढते नि तुम्ही म्हणाल तर एक मोर्चाही काढते.बायको हसत म्हणाली..