(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

पाणी,पेप्सी आणि सन्नी
   वरुणराजा रुसलेलाच.त्याचा राग काही शांत होईना.तो रुसला कशासाठी हेही कळेना.देवादीदेव इंद्रसेन यांनाही समजेना. राहवून त्यांनी वरुणराजाला बोलावून घेतले,सक्काळी सक्काळी आपल्या महाली नाश्त्याला.इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या.हवापाण्यावर चर्चा झाली.इंद्राणी वहीनींनी मस्त नाश्ता आणला.वरुणराजा नाश्त्यावर ताव मारु लागला.भज्याचं सेवन करता करता त्यांना मिरची लागली.
   पाणी द्या ,पाणी द्या वरुणराजा म्हणाले.इंद्राणी वहिनींनी त्यांच्यापुढे ग्लास पुढे केला.त्यात पाणी नव्हतं.फेसळणारं रंगीत द्रव्य होतं.
   वहिनीराजे आम्हासी या क्षणी जल हवे.अमृत नाही.वरुणराजा हाश्य हुश्य करत म्हणाले.
   घ्याहो वरुणराजा.हे अमृत नाही,हे खरे असले तरी ते त्याहून कमी दर्जाचे नाही.या द्रव्यासी पेप्सी म्हणतात.इंद्रसेन म्हणाले.
   म्हणजे हो काय देवा.अतिव आश्चर्यानं वरुणराजांनी विचारलं.
   वरुणराजा,त्याचं काय आहे की या पेप्सी नामक द्रव्यानं सुध्दा मिरचीचा तिखटपणा जातो.
   पण देवा पाण्याची सर या पेप्सी की फेप्सीला कशी हो येईल.वहिनीराजे मी बरोबर बोलतोय ना.इंद्राणी वहिनीकडे बघत वरुणराजा म्हणाले.
   अगदी बरोबर आहे हो तुमचं म्हणणं वरुणराजा..पण पाणीच मिळत नसेल तर पेप्सी प्यायला हवी ना..इंद्रसेन म्हणाले.
   काय म्हणता काय इंद्रसेनदेवा तुमच्याकडे पाणी नाही?आम्ही आताच्या आता आमच्या ढगेश्वर दुतांना आदेश देऊन आपल्या महाली पाण्याच्या डोंगर उभा करतो.
   पाण्याच्या डोंगर नको हो.पाण्याचा सागर म्हणा हवा तर..पण ते जाऊ दे.आम्हासी त्याची गरज नाही.आम्ही काय पेप्सी पिऊन सुध्दा राहू शकतो.पण आपली भगिनी वसुंधरा हिच्याशी आपले काय बिनसले बरे.आपण फार नाराज दिसता आहात.कारण यंदा वसुंधरेच्या सागरी,विहिरी,नदींमध्ये आपण अल्प आणि अत्यल्प पाणी दिले आहे.त्यामुळे वसुंधरेच्या लेकरांना पाणी नाही तर पेप्सी प्राशन करावी लागण्याची पाळी येऊ शकते हो. इंद्रसेन उत्तरले.
   इंद्रसेनदेवा आपल्या भगीनी वसुंधरेची लेकरं फार आगावू व्हायला लागलीत हो.वनांची कत्तल काय करतात,विविध प्रकारचे धुर काय अवकाशात टाकतात.विषारी विषारी द्रव्य सागरी काय  टाकतात.त्यामुळे त्यांना धडा शिकवावा म्हणतो यंदा.
   त्यांना धडे शिकवायला श्री श्री रवी शंकर आहेत,बापू आहेत नित्यानंद स्वामी आहे.चाटे आहेत.तुमची आमची हो आता गरज उरलेली नाही.म्हणून तुम्हाला सावध करायचे होते.नाराजी सोडा नि ढगेश्वरांना बरसण्याचे आदेश द्या..
   पण इंद्रसेनदेवा,गरज सरो नि वैद्य मरो,असं वागणाऱ्या वसुंधरेच्या लेकरांना आपण ब्रेक लावायला हवा ना.
   वरुणराजा तुम्ही आम्ही ब्रेक लावण्याच्या पलिकडे गेलोत हो.वसुंधरेची लेकरं लयी भारी आहेत.त्यांच्या डोस्क्यात शिरलं तर ते तुमचा दुसरा पर्यायच उभा करतील हो.पाण्याऐवजी पेप्सी प्राशन करतील,पेप्सीने शेती करतील.पेप्सीने स्वच्छता करतील.शिवाय ढगेश्वरांना जलवृष्टी करायला बाध्य करतील.
   ते हो कसे.
   हे बघा वरुणराजे.जलवृष्टी कशी होते.
   सागराच्या पाण्यातील वाफ होते.ती वर आकाशी येते.त्याचे ढग बनतात.त्यातून जलवृष्टी होते.
   वसुंधरेची लेकरं तुमच्या खऱ्या ढगेश्वरांच्या नाकावर टिच्चून कृत्रिम ढगेश्वर तयार करु शकतात हो.
   इंद्रसेन देवा तुम्ही काळजी करु नका हो.आपण सूर्यदेवाला सांगू की सागरजलाची वाफच करु नको म्हणून.
   हा हा हा..वरुण देवा तुम्ही अजून 15व्या शतकातच वावरता हो.अहो या वसुंधरेच्या लेकरांना सूर्यदेवाची काही गरजच नाही.
   काय म्हणता काय देवा.
   खरच वरुणदेवा.त्यांच्याकडे सन्नी लेओन नावाचं हॉट म्हणजे उष्ण आयटेम आहे हो.
   आँ.
   तुम्ही असं आँ करु नका,मी जे काही सांगेल ते ऐकून तुम्ही बाँच कराल.
   आँ..
   नाही हो बाँ..बाँ..
   ते कसं
   ते असं की सन्नी लेऑन नावाच्या हॉट कन्याकुमारींना ही मंडळी सागरकिनारी उभे करतील.सन्नी यांच्या उष्णतेने सागरजलाची वाफ करतील.ती वाफ वर गगनी येईल.वसुंधरेची लेकरं त्या वाफेचं ढग करतील.त्या ढगांतून धो धो पाऊस पाडतील.तुमचं साम्राज्य खालसा करतील.रुद्राभिषेकासाठीही पेप्सिच उपयोगात आणतील.तेव्हा वेळीच सावध व्हा.सन्नी लेऑनची कल्पना त्याच्या मेंदूत शिरण्याआधी तुम्ही ढगेश्वरांना बरसण्याचा आदेश द्या.वरुणदेवाला पेप्सीचा प्याला देत देत इंद्रसेन देव म्हणाले.