मार्ग यशाचा- ६५-१२वीतील विद्यार्थ्यांसाठी पीसीएम की पीसीबी,महत्वाचे?
११ वी मध्ये विज्ञानशाखेत प्रवेश घेताना, भौतिकशास्त्र, गणित, रसायनशास्त्र (फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथेमॅटिक्स – पीसीएम) की भौतिकशास्त्र, जीवशास्त्र, रसायनशास्त्र (फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी – पीसीबी) या दोन गटांपैकी कोणत्या गटाचा स्वीकार करावा याबाबत बऱ्याच पालकांमध्ये गोंधळ दिसून येतो. काही पालकांमध्ये स्पष्टता असते. काही विद्यार्थ्यांच्या मनातही स्पष्टता असते. पण बरेच विद्यार्थी पालकांच्या मतानुसार आपले मत बनवून, त्यांच्या मताप्रमाणे ११ वी मध्ये अभ्यास विषयाचा गट निवडतात.
पीसीबीचे महत्त्व
दोन्ही विषय गटांचे महत्त्व वेगवेगळे आहे. पीसीबी हा गट घेतल्यावर, ज्या ज्या अभ्यासक्रमासाठी गणित विषय आवश्यक असतो, त्या सर्व ज्ञानशाखांमधील प्रवेशाचा मार्ग बंद होतो. उदा. अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञानाच्या सर्व शाखा, काही आयआयटीमधील बॅचलर ऑफ डिझाइन अभ्यासक्रम, बॅचलर ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी, एनडीए (हवाई दल आणि नौदल), भाभा अॅटोमिक रिसर्च सेंटरने सुरू केलेल्या संशोधन कार्यावर भर देणाऱ्या इंटिग्रेटेड एमएससी इन मॅथेमॅटिक्स, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अॅण्ड रिसर्च (आयसर) मधील बीएस-एमएस इन मॅथेमॅटिक्स, बीएस-एमएस इन इकॉनॉमिक्स, बीएससी अॅव्हिएशन, बीटेक इन मरीन इंजिनिअरिंग, बीटेक इन नॅव्हल आर्किटेक्चर अॅण्ड ओशन इंजिनिअरिंग, बीएससी इन नॉटिकल सायन्स, बॅचलर इन कॉम्प्युटर अॅप्लिकेशन, साउंड इंजिनिअरिंग, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स मधील बीएस इन मॅथेमॅटिक्स, इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूटच्या बीएससी (ऑनर्स) इन मॅथेमॅटिक्स, बीएससी (ऑनर्स) इन स्टॅटिस्टिक्स, चेन्नई मॅथेमॅटिकल इन्स्टिट्यूटच्या बीएससी ऑनर्स, कमर्शियल पायलट ट्रेनिंग, पॉलिटेक्निक आदी अभ्यासक्रमांपासून वंचित व्हावे लागते. उपरोक्त नमूद या महत्त्वाच्या संस्था असून त्यामध्ये प्रवेश मिळाल्यास उत्तम करिअर घडणे शक्य होते.
पीसीबी हा गट घेतलेल्या विद्यार्थ्यांना एमबीबीएस, बीडीएस, बॅचलर ऑफ फिजिओथेरपी, बॅचलर ऑफ ऑक्युपेशनल थेरपी, विविध पॅरामेडिकल अभ्यासक्रम, नर्सिंग, बॅचलर ऑफ मेडिकल टेक्नॉलॉजी, एनडीए (भूदल शाखा), आयसर मधील बीएस-एमएस इन बायोलॉजी, बीएस-एमएस इन फिजिक्स, बीएस-एमएस इन केमिस्ट्री, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अॅण्ड रिसर्च (नायसर) मधील इंटिग्रेटेड एमएससी इन फिजिक्स, इंटिग्रेटेड एमएससी इन बायोलॉजी, इंटिग्रेटेड एमएससी इन केमिस्ट्री, काही आयआयटीमधील डिझाइन कोर्स, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी मधील बॅचलर ऑफ डिझाइन कोर्स असे अभ्यासक्रम करता येतात. याचा अर्थ असा की पीसीबी गट घेतल्यास करिअरचे अर्धे पर्याय दूर जातात. सध्याच्या आत्यंतिक स्पर्धेच्या काळात असे होणे एका दृष्टीने योग्य नाही. पण ज्या पालक आणि विद्यार्थ्यांच्या मनात पीसीबी गटाबाबत कोणताही गोंधळ नसेल आणि त्यांनी अगदी ठामपणे याच विषय गटाला स्वीकारण्याचा निर्णय घेतला असेल तर त्यांच्यासाठी उपलब्ध असलेल्या ज्ञानशाखांमध्ये पुढील पदवी, पदव्युत्तर पदवी शिक्षण घेऊन उत्तम करिअर घडवता येऊ शकते. मात्र हे करताना पुढील चार-पाच वर्षे झोकून देऊन ज्ञानार्जन करणे आवश्यक ठरते.
निराशा टाळा
पीसीबी गट घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मनात पहिला करिअर पर्याय हा एमबीबीएस प्रवेशाचाच असतो. त्यासाठी ‘नीट’ परीक्षेच्या अभ्यासावर पूर्ण लक्ष केंद्रित केले जाते. हा अभ्यास कितीही केला तरी शासकीय आणि खाजगी वैद्यकीय महाविद्यालयातील एकूण संख्या लक्षात घेता, सुमारे २० ते २३ लाख विद्यार्थ्यांपैकी साधारणतः १.३६ ते १.४० लाख विद्यार्थ्यांना एमबीबीएस (आणि काही प्रमाणात बीडीएस) या अभ्यासक्रमास प्रवेश मिळू शकतो. तेव्हा पीसीबी या गटावर आधारित इतर अभ्यासक्रमांना प्रवेश मिळाल्यास या पर्यायांकडे दुय्यम श्रेणीचे न बघता त्यांचा आनंदाने स्वीकार करायला हवा. आपल्याला वैद्यकीय शाखेत प्रवेश मिळाला नाही, म्हणजे आपली पात्रता नाही, असा निराशावादी दृष्टिकोन ठेवण्यात हशील नाही. या विषय गटाच्या आधारे प्रवेश मिळालेल्या इतर ज्ञानशाखांमध्ये प्रवेश घेऊन पुढील काही वर्षे मनापासून अभ्यासात घालवली तर करिअरच्या उत्तम दिशा आपोआपच गवसू लागतात. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अॅण्ड रिसर्च (आयसर), नायसर, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स या संस्थांमधील अभ्यासक्रम हे संशोधनास प्रोत्साहन देणारे आहेत. त्यांना प्रवेश घेतल्यास दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण संस्थेमध्ये शिकण्याची, संशोधन करण्याची संधी मिळते. पॅरामेडिकलच्या विविध विषयांमधील अभ्यासक्रमांमुळे वेगवेगळ्या प्रकारचे कौशल्य हस्तगत करता येते. सध्या अशा कौशल्यप्राप्त उमेदवारांना रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी मिळतात.
पीसीएमचे महत्त्व
पीसीएम हा गट घेतलेल्या विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी/तंत्रज्ञान शाखेतील वेगवेगळ्या शाखांमध्ये शिक्षण घेऊन करिअरच्या वाटा निश्चित करता येतात. पीसीबी गटामुळे मिळणाऱ्या करिअर संधींपासून अशा विद्यार्थ्यांना वंचित राहावे लागते. मात्र पीसीएम हा गट जाणीवपूर्वक घेतल्यास दुसऱ्या पर्यायांचा विचार करण्याची गरज नाही. त्यांची खंतही वाटून घेण्याची गरज नाही.
मात्र त्यासाठी अतिशय काळजीपूर्वक ११ वी प्रवेशाच्या वेळी निर्णय घ्यायला हवा. त्यात स्पष्टता हवी. मग पुढे जाऊन “दोन्ही गट घेतले असते तर बरे झाले असते” वगैरे असे वाटून घेऊ नये. असा गोंधळ पालकांनीही ठेऊ नये आणि पाल्यांनाही त्यासाठी भरीस घालू नये.
भौतिकशास्त्र, गणित, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र या चार विषयांतील गती, आवड, रस, संकल्पनांमधील स्पष्टता आणि विद्यार्थ्याने स्वतःची बौद्धिक क्षमता या बाबी लक्षात घेऊन दोन्ही गट घ्यायचे की एकच घ्यायचे हे ठरवायला हवे. गणितामध्ये गती नसेल, संकल्पना समजून घेणे आणि त्याचा प्रश्न सोडवताना उपयोग करणे जमायला कठीण जात असल्यास गणिताचा अट्टाहास करण्यात हशील नाही. कितीही इंजिनिअर व्हावे वाटले तरी गणित हाच इंजिनिअरिंगचा पाया असतो, हे लक्षात ठेवायला हवे. हा पायाच भुसभुशीत असल्यास इंजिनिअरिंगची पदवी मिळेल पण त्यात करिअर घडणे कठीण राहील. सध्या अभियांत्रिकी/तंत्रज्ञान शाखेला प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांपैकी २० ते ३० टक्क्यांच्या आसपास विद्यार्थी अभियांत्रिकीचे ज्ञान आणि कौशल्य प्राप्त करू शकतात, असे वेगवेगळ्या सर्वेक्षणांत आढळून आले आहे.
जीवशास्त्रामध्ये ज्याला फार रस नसेल तर या विषयाचा अभ्यास न केलेलाच बरा. जीवशास्त्राचा अभ्यास थातूरमातूर पद्धतीने करणे योग्य नाही, ही बाब लक्षात ठेवायला हवी. वैद्यकीय शाखेकडे जाण्याची महत्त्वाकांक्षा ठेवणाऱ्यांनी जीवशास्त्रावर लक्ष केंद्रित करावे.
मात्र ज्या विद्यार्थ्यांना चारही विषयांमध्ये समान गती असेल आणि आवडही असेल, त्यांनी दोन्ही गटातील विषयघटकांचा अभ्यास करायला काहीच हरकत नाही. त्यांना दोन्ही गटातील करिअरचे सर्व पर्याय उपलब्ध होतात. भौतिकशास्त्र, गणित, जीवशास्त्र आणि रसायनशास्त्र या चारही विषयांचा अभ्यास उत्तम रीतीने केल्यास नीट, जेईई, आयसर अॅडमिशन टेस्ट, नायसर अॅडमिशन टेस्ट – नेस्ट (नॅशनल एलिजिबिलिटी कम एन्ट्रन्स टेस्ट) अशासारख्या चाळणी परीक्षा उत्तम रीतीने देता येतात. गणिताचा पाया पक्का असेल तर विधि शाखेतील बीए-एलएलबी, बीबीए-एलएलबी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात येणारी कॉमन लॉ अॅडमिशन टेस्ट, इंदौर, रोहतक, बोधगया, रांची, जम्मू या आयआयएममधील १२ वी नंतरच्या इंटिग्रेटेड एमबीए अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या जिपमॅट (जॉईंट इंटिग्रेटेड प्रोग्राम इन मॅनेजमेंट अॅडमिशन टेस्ट) सारख्या परीक्षेत चांगले गुण मिळवता येऊ शकतात. एनडीए परीक्षाही उत्तम रीतीने उत्तीर्ण होण्याची शक्यता अधिक वाढते. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजीतील विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या चाळणी परीक्षेत सर्वसाधारण गणितावर आधारित प्रश्न विचारले जातात, ते सोडवणे सोपे जाऊ शकते. आयसर अॅडमिशन टेस्टही तुलनेने सुलभ जाऊ शकते. नेस्ट परीक्षेत गणित, भौतिकशास्त्र, जीवशास्त्र आणि रसायनशास्त्र या चारही विषयांवर आधारित प्रश्न विचारले जातात. नेस्ट परीक्षा व्यवस्थापनाने चारही विषयांचे प्रश्न सोडवण्याची सूचना केली आहे. गुणवत्ता यादी तयार करताना कोणत्याही तीन विषयातीलच गुण ग्राह्य धरले जातात. त्यामुळे चारपैकी कोणत्याही तीन विषयांतील सर्वोच्च गुणच गुणवत्ता यादी तयार करण्यासाठी वापरले जातात.
अशा सर्व बाबींचा साधकबाधक विचार करून दोन्ही गटांचा पर्याय घेण्याबाबतचा निर्णय घ्यायला हवा.
२०२६ मधील काही नवीन/अद्ययावत बाबी
१)नीट २०२६ आकडेवारी: नोंदणी सुमारे २० ते २३ लाख, पात्र सुमारे ११ ते १२ लाख. एमबीबीएस सीट्स सुमारे १.३६ ते १.४० लाख झाल्या आहेत (नवीन कॉलेज आणि विस्तारामुळे). स्पर्धा अजूनही तीव्र आहे (पात्र उमेदवारांपैकी अंदाजे ८-१० पैकी १ जणाला सीट), पण पूर्वीपेक्षा थोडी सुधारली आहे. बीडीएस आणि इतर वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या सीट्सही वाढलेल्या आहेत.
२)जेईई मेन २०२६: बी.टेकसाठी फिजिक्स आणि मॅथ्स अनिवार्य; तिसरा विषय केमिस्ट्री/बायोलॉजी/बायोटेक/टेक्निकल व्होकेशनल असू शकतो. मात्र बहुतेक अभियंत्रिकी प्रवेश आणि आयआयटीसाठी पीसीएमच आवश्यक राहते.
३)नेस्ट/आयसर: अद्याप चार विषयांपैकी कोणत्याही तीन विषयांचे सर्वोत्तम गुण ग्राह्य धरले जातात. चारही विषय घेतल्यास अधिक पर्याय मिळतात.
४)नवीन कल (२०२६): काही शाळा/बोर्डांत (एनईपीच्या प्रभावाखाली) ११ वी मध्ये पारंपरिक “पीसीएम/पीसीबी” गटांपलीकडे अधिक लवचिक विषय संयोजन शक्य होत आहे (उदा. फिजिक्स + म्युझिक, मॅथ्स + इकॉनॉमिक्स इ.). मात्र कॉलेज प्रवेशासाठी अजूनही संबंधित विषयांची आवश्यकता कायम आहे. एआय/एमएल, डेटा सायन्स, सेमिकंडक्टर, ग्रीन एनर्जी (पीसीएमसाठी) आणि बायोटेक, अलाईड हेल्थ (पीसीबीसाठी) हे क्षेत्रे अधिक महत्त्वाची होत आहेत.
५)राष्ट्रीय शिक्षण धोरण (NEP २०२०) आणि बहुविद्याशाखीय दृष्टिकोन (Multidisciplinary Approach): सध्याच्या २०२६ मधील उच्च शिक्षण प्रणालीत ‘मल्टीडिसिप्लिनरी’ शिक्षणावर भर दिला जात आहे. त्यामुळे पारंपरिक सायन्सच्या चौकटीबाहेर जाऊन आता इंजिनिअरिंगचे विद्यार्थी बायो-सायन्स आणि आर्ट्स किंवा डिझाईनचे विषय एकत्र शिकू शकतात. विद्यार्थ्यांनी आता केवळ एकाच शाखेत अडकून न राहता, लवचिक (Flexible) करिअर पर्यायांचा विचार करणे गरजेचे ठरत आहे.
७)एआय (AI) आणि इमर्जिंग टेक्नॉलॉजीजचे महत्त्व: पीसीएम असो वा पीसीबी, आजच्या २०२६ च्या डिजिटल युगात कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence), डेटा सायन्स, मशीन लर्निंग आणि बायो-इफॉर्मेटिक्स (Bioinformatics) यांसारख्या आधुनिक शाखांचे ज्ञान प्रत्येक क्षेत्रात अनिवार्य बनले आहे. जीवशास्त्र आणि तंत्रज्ञान (Bio-tech) किंवा गणित आणि वैद्यकीय क्षेत्र (Health-tech) यांच्या संगमातून अनेक नवीन रोजगाराच्या संधी निर्माण होत आहेत. त्यामुळे अकरावीपासूनच या आधुनिक तंत्रज्ञानाबद्दलची प्राथमिक आवड निर्माण करणे फायदेशीर ठरते.
७). नवीन प्रवेश प्रक्रियांचे अपडेट्स: देशातील बऱ्याच केंद्रीय विद्यापीठांमध्ये आणि नामांकित संस्थांमध्ये प्रवेशासाठी आता सामायिक प्रवेश परीक्षांच्या (CUET आणि इतर राष्ट्रीय स्तरावरील चाचण्या) स्वरूपात बदल झाले आहेत. त्यामुळे कोणत्याही एकाच परीक्षेवर अवलंबून न राहता, विविध पर्यायी प्रवेश परीक्षांची तयारी ठेवणे २०२६ मध्ये अधिक सुसंगत ठरत आहे.