(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

 मर्चंट नेव्ही

याविषयातील शिक्षण-प्रशिक्षण देणाऱ्या संस्था-

() महाराष्ट्र अॅकेडमी ऑफ नॅव्हल एज्युकेशन ॲण्ड ट्रेनिंग – बी.टेक इन मरिन इंजिनीअरिंग. चार वर्षे कालावधीच्या या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी संस्थेमार्फत चाळणी परीक्षा घेतली जाते. अर्हता- १२ वी विज्ञान परीक्षेतील भौतिकशास्त्र, गणित आणि रसायनशास्त्र याविषयांमध्ये किमान ६० टक्के गुण आवश्यक.

 संपर्क – गेट नंबर १४०, राजबाग, पुणे-सोलापूर हायवे, लोणी काळभोर, पुणे-४१२२०१, दूरध्वनी- ०२०-३०६९३८४५, फॅक्स-२६९१२९०४, ईमेल- office@manetpune.com,संकेतस्थळ http://www.manetpune.edu.in.

() तोलाणी मेरिटाइम इंस्टिटयूट- अभ्यासक्रम- बी.टेक इन मरिन इंजिनीअरिंग, अर्हता- १२ वी विज्ञान परीक्षेतील भौतिकशास्त्र, गणित आणि रसायनशास्त्र याविषयांमध्ये किमान ६० टक्के गुण आवश्यक आहे. कालावधी- चार वर्षे. प्रवेशासाठी संस्थेमार्फत चाळणी परीक्षा घेतली जाते.

संपर्क() मुंबई कॅम्पस- १४९-१५१, शेर- ई- पंजाब सोसायटी महाकाली गुफांच्या पाठिमागे, अंधेरी पूर्व मुंबई-४०००९३, दूरध्वनी- ०२२-६१५३५४५४, फॅक्स-६१५३५४५३, ईमेल- dlp@tolani.edu() पुणे कॅम्पस – तळेगाव चाकण, रोड इंदुरी तळेगाव- पुणे- ४१०५०७, दूरध्वनी- ०२११४-६६९६००, फॅक्स- ६६९६१३, ईमेल-info@tmi.tolani.edu

() ॲकेडमी ऑफ एज्युकेशन ॲण्ड ट्रेनिंग- या संस्थेला,डीम्ड टू बी युनिव्हर्सिटीचा दर्जा देण्यात आला आहे. सागरी वाहतूक आणि अभियांत्रिकीच्या क्षेत्रात शिक्षण आणि प्रशिक्षण देणारी ही एक महत्वाची संस्था आहे. या संस्थेने सागरी वाहतूक, अभियांत्रिकी आणि व्यवस्थापन या विषयातील पदविका,पदवी, पदव्युत्तर पदवी आणि पीएचडी अभ्यासक्रम सुरु केले आहे. पदवी स्तरावरील बी.एस्सी इन नॉटिकल सायन्स आणि बी.टेक इन मरिन इंजिनीअरिंग या दोन अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी संस्थेमार्फत चाळणी परीक्षा घेतली जाते.

अर्हता १२ वी विज्ञान परीक्षेतील भौतिकशास्त्र, गणित आणि रसायनशास्त्र याविषयांमध्ये किमान ६० टक्के गुण आवश्यक. कालावधी चार वर्षे. इंग्रजी विषयात किमान ५० टक्के गुण मिळणे आवश्यक.

इतर अभ्यासक्रम

() प्री सी ट्रेनिंग फॅार ग्रॅज्युएट मेकॅनिकल इंजिनिअर, कालावधी एक वर्षं. मेकॅनिकल इंजिनीअर आणि नॅव्हल आर्किटेक्चर या शाखेतील पदवीधरांना हा अभ्यासक्रम करता येतो. हा अभ्यासक्रम केल्यावर हे उमेदवार मरिन इंजिनीअर बनण्यासाठी पात्र ठरतात. या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी चाळणी परीक्षा घेतली जाते. या अभ्यासक्रमाला डायरेक्टोरेट जनरल ऑफ शिपिंग यांनी मान्यता प्रदान केली आहे.

() प्रि सी जनरल परपोज रेटिंग (जीपी) या अभ्यासक्रमाला डायरेक्टोरेट जनरल ऑफ शिपिंग यांनी मान्यता प्रदान केली आहे. हा अभ्यासक्रम केल्यावर व्यापारी जहाजांवर डेक /इंजिन क्रु म्हणजेच डेक (जहाजाचा परिसर) आणि यंत्र परिसरात कार्य करणारे साहाय्यक म्हणून रोजगार संधी मिळू शकते. अनुभव आणि कामगिरी लक्षात घेऊन या उमेदवारांना मोटरमॅन/ ऑइलमॅन, डेक सेरंग, एबल्ड बॉडिड – सीमॅन अशा पदांवर नियुक्ती मिळू शकते. यापेक्षा अधिक कालावधीचा अनुभव घेतल्यावर अधिकारी पदाचीही नियुक्ती मिळू शकते. या अभ्यासक्रमासाठी दर वर्षी जानेवारी आणि जुलै महिन्यात उमेदवारांची निवड केली जाते. अर्हता- १० मध्ये इंग्रजी, गणित आणि विज्ञान विषयात सरासरीने ४० टक्के गुण आणि १० वी व १२ वीमध्ये इंग्रजी विषयात सरासरीने ४० टक्के गुण मिळणे आवश्यक. किंवा कोणत्याही विषयातील १२ वी मध्ये उत्तीर्ण श्रेणी आणि १० वी व १२ वीमध्ये इंग्रजी विषयात सरासरीने ४० टक्के गुण मिळणे आवश्यक . १० वी मध्ये इंग्रजी, गणित आणि विज्ञान विषयात सरासरीने ४० टक्के गुण मिळायला हवे, किंवा फिटर/ मेकॅनिस्ट/ मेकॅनिक/ वेल्डर/टर्नर या विषयांमधे २ वर्षे कालावधीचा आयटीआयचा अभ्यासक्रम आणि १०वी व १२ वीमध्ये इंग्रजी विषयात सरासरीने ४० टक्के गुण मिळणे आवश्यक. वयोमर्यादा-साडेसतरा ते २५ वर्षे. अनुसूचित जाती आणि जमाती संवर्गातील विद्यार्थ्यांसाठी वयोमर्यादेत पाच वर्षाची सूट.

संपर्क– एएमइटी, १३५, ईस्ट कोस्ट रोड, कांथूर, ६०३११२, दूरध्वनी- ०४४-२७४४४६५२, फॅक्स-२७४४ २८०४, ईमेल-office@ametuniv.ac.in, संकेतस्थळ- ametuniv.ac.in.

०००