कौशल्यातून रोजगार संधी – भाग एक
कौशल्याधारित अभ्यासक्रम केल्यावर रोजगार आणि स्वयंरोजगाच्या विविध संधी सध्या उपलब्ध होऊ शकतात. असे काही अभ्यासक्रम आणि संस्था –
(१) इंडियन इंस्टिट्यूट ऑफ कार्पेट टेक्नॉलॉजी
गालिचे घेणारे ग्राहक हे उच्च उत्पन्न गटातीलच असण्याचे दिवस आता राहिलेले नाहीत. अल्प प्रमाणात कां होईना इतर उत्पन्न गटातील ग्राहक त्यांना परवडतील असे गालीचे घराच्या सौंदर्यवृध्दीसाठी खरेदी करतात. गालीचे निर्मिती आणि डिझाइन उद्योगासाठी चांगल्या मनुष्यबळाची सतत गरज भासत असते. अशा मनुष्यबळ निर्मितीसाठी इंडियन इंस्टिट्यूट ऑफ कार्पेट टेक्नॉलॉजी या संस्थेमार्फत विविध अभ्यासक्रम सुरु करण्यात आले आहेत. या संस्थेची स्थापना भारत सरकारच्या वस्त्रोद्योग मंत्रालयाने केली आहे. या क्षेत्रातील ही एकमेव शैक्षणिक संस्था आहे.
संस्थेचे अभ्यासक्रम
(१) बीटेक इन कार्पेट ॲण्ड टेक्सटाईल टेक्नॉलॉजी- अभ्यासक्रमाचा कालावधी – चार वर्षे. या अभ्यासक्रमांतर्गत होम टेक्सटाईल टेक्नॉलॉजी, ॲडव्हान्स्ड टेक्सटाईल टेक्नॉलॉजी, टेक्सटाईल डिझायनिंग टेक्नॉलॉजी, या तीन विषयांमध्ये स्पेशलायझेशन करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. प्रवेशासाठी जॉईंट एन्ट्रन्स (मेन) परीक्षेचे गुण ग्राह्य धरले जातात.
(२) गालिचे निर्मिती उद्योगास उपयुक्त ठरणारे लघु मुदतीचे अभ्यासक्रम- (अ) कार्पेट ॲण्ड टेक्सटाइल डिझायनिंग/ अर्हता- १० वी आणि कला क्षेत्राचे मुलभूत ज्ञान, (ब) कार्पेट ॲण्ड टेक्सटाइल यार्न डायिंग, अर्हता- १० वी, (क) प्रोफिसिएन्सी प्रोग्रॅम इन कॉम्प्युटर ॲप्लिकेशन ॲण्ड मॅनेजमेंट. अर्हता- १० वी
(३) प्रमाणपत्र अभ्यासकम- (१) टेक्सटाईल प्रिंटिंग (२) टेक्सटाइल ॲण्ड मशिनरी, (३)कार्पेट मॅन्युफॅक्चरिंग, (४) कार्पेट फिनिशिंग, (५) वूल मार्केट सिस्टिम्स,(६) वूल कॉर्पेट्स, (७) कार्पेट मेंटनंन्स, (८)ॲडव्हान्स्ड कार्पेट मॅन्युफॅक्चुरिंग, (९) कार्पेट परफॉर्मन्स, (१०)कार्पेट ॲण्ड टेक्सटाइल डिझायनिंग.
(४) पदविका अभ्यासक्रम
(१) डिप्लोमा इन ॲपेरल यार्न मन्युफॅक्चरिंग, (२) डिप्लोमा इन बेसिक टेक्नॉलॉजी, (३) डिप्लोमा इन कॉर्पेट ॲण्ड टेक्सटाइल डिझायनिंग, (४) डिप्लोमा इन कॉर्पेट टेक्नॉलॉजी, (५) डिप्लोमा इन टेक्सटाइल डायिंग ॲण्ड फिनिशिंग, (६) डिप्लोमा इन वूल स्कॉउरिंग टेक्नॉलॉजी.
यातील काही अभ्यासक्रम दूरशिक्षण पध्दतीचे आहेत. या अभ्यासक्रमांना अखिल भारतीय तंत्रशिक्षण मंडळ आणि विद्यापीठ अनुदान आयोगाने मान्यता प्रदान केली आहे. या संस्थेने अभ्यासक्रमांची रचना आणि उन्नतीकरणासाठी न्यूझिलंड देशाच्या ॲग्रीसर्च या संस्थेशी करार केला आहे. त्यानुसार हे अभ्यासक्रम आंतरराष्ट्रीय दर्जाचे बनावेत यासाठी अभ्यासक्रमाच्या रचनेत वेळोवेळी बदल केले जातात. लोकर, गालिचे आणि वस्त्रोद्योग या क्षेत्रात करिअर करु इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे अभ्यासक्रम उपयुक्त ठरु शकतात. पदविका अभ्यासक्रमांचा कालावधी – प्रत्येकी तीन वर्षे आणि प्रमाणपत्र अभ्यासक्रमांचा कालावधी- सहा महिने. या कालावधीत संबंधित विद्यार्थ्याने अभ्यासक्रम पूर्ण केला नाही तर त्याला नव्याने नोंदणी करावी लागते. हे अभ्यासक्रम सतत सुरु असणाऱ्या गटातील असल्याने विद्यार्थ्यांना कोणत्याही वेळेस त्यासाठी नोंदणी करता येते. विद्यार्थ्यांना इंग्रजीचे चांगले ज्ञान असावे. संगणक प्रशिक्षण घेतले असल्यास उत्तम.
संपर्क- द कूऑर्डिनेटर, आयडीएलपी सेल, इंडियन इंस्टिट्यूट ऑफ कार्पेट टेक्नॉलॉजी, चौरी रोड, बधोई – २२१४०१, दूरध्वनी- ०५४१४ – २२५५०४, संकेतस्थळ- www.iict.ac.in, ईमेल- iict@iict.ac.in
००००
(२) नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रॉनिक्स ॲण्ड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी(एनआयईएलआयटी)
औरंगाबाद स्थित या संस्थेने, इलेक्ट्रॉनिक्स प्रॉडक्शन ॲण्ड मेंटनन्स, हा इलेक्ट्रॉनिक वस्तू निर्मिती क्षेत्रातील कौशल्यनिर्मितीसाठी उपयुक्त ठरणारा पदविका अभ्यासक्रम सुरु केला आहे. या उद्योगातील निर्मिती /देखभाल पर्यवेक्षक, डिझाइन अस्टिटंट म्हणून या विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी मिळतात. स्वयंरोजगारही सुरु करता येतो. १९८७ सालापासून हा अभ्यासक्रम चालवण्यात येतो. कालावधी – तीन वर्षे. अर्हता – १० वी उत्तीर्ण. या अभ्यासक्रमाला तंत्रशिक्षण मंडळाची मान्यता मिळाली आहे.
इतर अभ्यासक्रम
नॅशनल स्किल क्वालिफिकेशन फ्रेमवर्क अंतर्गत सुरु करण्यात आलेले कौशल्य विकासाचे अभ्यासक्रम (१) ॲण्ड्राईड ॲप डेव्हलपर, (२)ॲडिटिव्ह मॅन्युफॅक्चुरिंग, थ्री डी प्रिंटिंग, (३) ऑटोमेशन टेक्नॉलॉजी – बेसिक (४) ऑटोमेशन टेक्नॉलॉजी -ॲडव्हान्स्ड, (५) सोलर एलईडी लॅम्प प्रॉडक्शन, (६) सोलर पॉवर इन्टॉलेशन, ऑपरेशन ॲण्ड मेंटनन्स
भविष्यात उपयुक्त ठरणारे कौशल्य अभ्यासक्रम – इंटरनेट ऑफ थिंग्ज, ब्लॉक चैन, बिग डेटा, रोबोटिक प्रोसेस ऑटोमेशन.
इतर अभ्यासक्रम- सायबर सेक्युरिटी ॲण्ड डिजिटल फॉरेंसिक, नेटवर्किंग, रोबोटिक्स
संपर्क- एनआयईएलआयटी, डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ परिसर, औरंगाबाद- ४३१०००४,संकेतस्थळ-https://nielit.gov.in/aurangabad/
०००
(३) इन्डो–जर्मन टूल रुम
औरंगाबाद येथे असणाऱ्या इन्डो–जर्मन टूल रुम या संस्थेने रोजगार आणि स्वयंरोजगारक्षम पुढील विविध अभ्यासक्रम सुरु केले आहेत.
(अ) देखभाल आणि दुरुस्ती अभ्यासक्रम- (१) टॅबलेट, मोबाईल आणि स्मार्ट फोन दुरुस्ती/ कालावधी- ३ महिने/ अर्हता – १२ वी किंवा आयटीआय. (२) ऑडिओ व्हिडिओ (एलईडी/ एलसीडी/ प्लाझमा/ टीव्ही/ होम थिएटर) दुरुस्ती / कालावधी- ३ महिने/ अर्हता – १२ वी किंवा आयटीआय. (२) रुम एअर कंडिशनर आणि घरगुती उपकरणे (रेफ्रिजरेटर, वाशिंग मशिन/ ओव्हन) दुरुस्ती/ कालावधी- ३ महिने/ अर्हता -१२ वी किंवा आयटीआय. प्रत्येक महिन्याच्या पहिल्या आणि तिसऱ्या सोमवारी एका तुकडीच्या प्रशिक्षणास प्रारंभ होतो.
(ब) नॅशनल स्किल क्वालिफिकेशन फ्रेमवर्कने मान्यता प्रदान केलेले अभ्यासक्रम- (१) मास्टर सर्टिफिकेट कोर्स इन इन कॉम्प्युटर एडेड डिझाइन/ कालावधी – सहा महिने/ अर्हता- मेकॅनिकल/ प्रॉडक्शन अभियांत्रिकी पदविका किंवा पदवी. (२) मास्टर सर्टिफिकेट कोर्स इन मेकॅट्रॉनिक्स / कालावधी – सहा महिने/ अर्हता- इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रिकल/ इंस्ट्रुमेंटेशन/ मेकॅनिकल/ प्रॉडक्शन अभियांत्रिकी पदविका किंवा पदवी. (३)मास्टर सर्टिफिकेट कोर्स इन कॉम्प्युटर एडेड टूल इंजिनीअरिंग कालावधी – सहा महिने/ अर्हता- मेकॅनिकल/ प्रॉडक्शन अभियांत्रिकी पदविका किंवा पदवी. (४) मास्टर सर्टिफिकेट कोर्स इन ऑटोमेशन ॲण्ड प्रोसेस कंट्रोल / कालावधी – सहा महिने/ अर्हता – इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रिकल/ इंस्ट्रुमेंटेशन/ मेकॅनिक/ प्रॉडक्शन अभियांत्रिकी पदविका किंवा पदवी. (५) ॲडव्हान्सड डिप्लोमा कोर्स इन मशिन मेंटनन्स / कालावधी-सहा महिने/ अर्हता- इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रिकल/ इंस्ट्रुमेंटेशन/ मेकॅनिक/ प्रॉडक्शन अभियांत्रिकी पदविका किंवा पदवी. (६) ॲडव्हान्सड डिप्लोमा कोर्स इन स्ट्रक्चरल डिझाइन ॲण्ड ॲनॅलिसीस/ कालावधी – सहा महिने/ अर्हता- सिव्हिल/ आर्किटेक्चरल अभियांत्रिकी पदविका किंवा पदवी. (७) पोस्ट डिप्लोमा इन इंडस्ट्रिअल ऑटोमशेन ॲण्ड रोबोटिक्स / कालावधी – एक वर्षं/ अर्हता- इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रॉनिक्स ॲण्ड कॉम्युनिकेशन इंजिनीअरिंग/ इंस्ट्रुमेंटेशन/ प्रॉडक्शन/ मेकॅनिकल पदविका, (८) पोस्ट डिप्लोमा इन मेकॅट्रॉनिक्स / कालावधी – एक वर्षं/ अर्हता- इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रॉनिक्स ॲण्ड कॉम्युनिकेशन इंजिनीअरिंग/ इंस्ट्रुमेंटेशन/ प्रॉडक्शन/ मेकॅनिकल, (९) पोस्ट डिप्लोमा इन प्रॉडक्ट डिझाइन / कालावधी – एक वर्षं/ अर्हता- प्रॉडक्शन/ मेकॅनिकल पदविका,(१०) पोस्ट डिप्लोमा इन मशिन मेंटनन्स / कालावधी – एक वर्षं/ अर्हता- प्रॉडक्शन/ मेकॅनिकल पदविका, (११) पोस्ट डिप्लोमा इन टूल ॲण्ड डाय मॅन्युफॅक्चुरिंग/ कालावधी – एक वर्षं/ अर्हता – प्रॉडक्शन/ मेकॅनिकल पदविका, (१२) पोस्ट डिप्लोमा इन टूल डिझाइन/ कालावधी-एक वर्षं/ अर्हता- प्रॉडक्शन/ मेकॅनिकल पदविका, (१३) पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन टूल डिझाइन/ कालावधी – दीड वर्षं/ अर्हता-प्रॉडक्शन/ मेकॅनिकल पदवी, (१४) पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन मेकॅनिकल प्रॉडक्ट डिझाइन/ कालावधी – दीड वर्षं/ अर्हता- प्रॉडक्शन/ मेकॅनिकल पदवी, (१५) पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन मेकॅट्रॉनिक्स- कालावधी – दीड वर्षं/ अर्हता- प्रॉडक्शन/ मेकॅनिकल इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रिकल/ इंस्ट्रुमेंटेशन/ मेकॅनिक पदवी,(१६) ॲडव्हान्स्ड सर्टिफिकेट कोर्स इन टूल डिझाइन/ कालावधी – एक वर्षं/ अर्हता – आयटीआय-ड्रॉफ्टसमन, मेकॅनिकल/ मेकॅनिस्ट/ टर्नर/ बेंच फिटर/ टूल ॲण्ड डाय मेकर, (१७) ॲडव्हान्स्ड सर्टिफिकेट कोर्स इन टूल ॲण्ड मॅन्युफॅक्चुरिंग /कालावधी-एक वर्षं/ अर्हता – आयटीआय-ड्रॉफ्टसमन मेकॅनिकल/ मेकॅनिस्ट/ टर्नर/ बेंच फिटर/ टूल ॲण्ड डाय मेकर
संपर्क– इंडो जर्मन टूल रूम, पी–३१, एमआयडीसी, इंडस्ट्रिअल एरिआ, चिखलठाणा, औरंगाबाद–४३१००६, दूरध्वनी– ०२४०–२६१०१००, ईमेल-training@igtr-aur.org, संकेतस्थळ– www.igtr-aur.org.
सुरेश वांदिेले
०००